Rashi Bhavishya Weekly : दिनांक 21 ते २7 ऑक्टोबर २०२४ या आठवड्याचे सर्व राशींचे राशी भविष्य या लेखाद्वारे देत आहोत | Weekly Horoscope |
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/1Aries.webp)
मेष राशी (Aries Weekly Horoscope) – (21 ऑक्टोबर 2024 ते 27 ऑक्टोबर 2024)
या आठवड्यात अश्विन नक्षत्राच्या व्यक्तींचे ग्रहांचे अस्तित्व थोडे संमिश्र स्वरूपाचे राहील. या सप्ताहात #rashi bhavishya वेगवेगळ्या खर्चाचे प्रसंग येतील. खरेदी करताना फसले जाऊ नका. विशिष्ट औषधांची रिएक्शन होऊ शकते. गर्भवती स्त्रियांनी स्वतःला सांभाळावे. २४ ऑक्टोबर आणि २५ ऑक्टोबर हे दिवस तरुणांना शिक्षण नोकरी आणि विवाह यासाठी उत्तम प्रतिसाद देतील. या आठवड्यात #rashi bhavishya weekly भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना एखादी संततीची चिंता सतावू शकते. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहात मोठे स्पर्धात्मक यश मिळेल.
मेष राशींच्या व्यक्तींनी या सप्ताहात “ओम नमः शिवाय” या मंत्राचा जप करावा.
![](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/2Taurus.webp)
वृषभ राशी (Taurus Weekly Horoscope) – (21 ऑक्टोबर 2024 ते 27 ऑक्टोबर 2024)
दिनांक २४, २५, २६ ऑक्टोबर या दिवसात घरातील मानसिक स्पंदने प्रसन्न असल्याने वातावरण आनंदी राहील. गुरुभ्रमणातून वेळोवेळी विशिष्ट आशीर्वाद पुरवले जातील. त्यामुळे गुरु ग्रहाची कृपा राहील. मृग नक्षत्राच्या #rashi bhavishya व्यक्तींना त्याचा लाभ होईल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना वरील दिवसात नोकरीत विशिष्ट घडामोडीतून दिलासा मिळेल. मात्र प्रेमिकांनी एकमेकांसोबतचे वादविवाद टाळावेत. #rashi bhavishya weekly वैवाहिक जीवनात पती-पत्नींनी गैरसमज होऊ देऊ नयेत. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट मानसन्मान मिळाल्याने आश्चर्य वाटेल, काही घटना चकित करणाऱ्या घडतील.
वृषभ राशीच्या व्यक्तींनी या सप्ताहात “गं गणपतये नमः” या मंत्राचा जप करावा.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/3Gemini.webp)
मिथुन राशी (Gemini Weekly Horoscope) – (21 ऑक्टोबर 2024 ते 27 ऑक्टोबर 2024)
या आठवड्यात भावा बहिणींनी परस्परांशी #rashi bhavishya होणारे वादविवाद टाळावेत मिथुन राशीचा मंगळ वादग्रस्त असणार आहे. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सहकाऱ्यांच्या कामगारांच्या कृतीतून त्रास होऊ शकतो मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी या आठवड्यात #rashi bhavishya weekly जुगार सदृश्य व्यवहार करू नयेत बाकी सप्ताहातील शुक्र भ्रमणातून दिनांक 24 25 26 हे दिवस मोठे चमत्कार घडवतील. आर्द्रा आणि पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. काही व्यक्तींना परदेशात नोकरी संदर्भात भाग्योदय संभवतो. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.
या सप्ताहात मिथुन राशीच्या व्यक्तींनी “गणेश पंचरत्न स्तोत्र” वाचावे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/4Cancer.webp)
कर्क राशी (Cancer Weekly Horoscope) – (21 ऑक्टोबर 2024 ते 27 ऑक्टोबर 2024)
या आठवड्यात तुमचे पूर्व सुकृत फळास येईल. चांगल्या गोष्टी घडतील. घेतलेले नवस फेडू शकाल. सप्ताहाच्या #rashi bhavishya weekly आरंभी तरुणांचा उत्साह छान राहील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी माध्यमातून लाभ होण्याचा संभव आहे. व्यावसायिकांची बँकांची कामे मार्गी लागतील. #rashi bhavishya वादग्रस्त वसुली होईल. मात्र पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींनी पैशाचे पाकीट जपावे. सतर्क राहावे. शुक्र भ्रमण घरातील प्रिय व्यक्तींच्या चांगल्या वार्ता आणि चांगली स्पंदने कुटुंबात भरलेली ठेवतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुपुष्यामृत योग लाभदायी ठरेल.
कर्क राशीच्या व्यक्तींनी या सप्ताहात “भीमरूपी स्तोत्र” म्हणजेच “मारुती स्तोत्र” वाचावे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/5Leo.webp)
सिंह राशी (Leo Weekly Horoscope) – (21 ऑक्टोबर 2024 ते 27 ऑक्टोबर 2024)
पितृपंधरवडा पूर्वजांचे संकल्प पूर्ण करेलच, परंतु मघा नक्षत्राच्या व्यक्तींना याची दिव्य प्रचिती मिळेल. या आठवड्यात #rashi bhavishya weekly परदेशी स्थित असलेल्या तरुणांचे मोठे भाग्य उदयास येईल. तुम्हाला एखादा व्यावसायिक गॉडफादर मिळेल. त्याच्या मदतीने #rashi bhavishya व्यवसायात प्रगती कराल. पूर्वा नक्षत्रास दिनांक 24, 25, 26 ऑक्टोबर हे दिवस छप्पर फाडके म्हणजेच भरभरून यश देतील. काहींना परदेशी व्यापारातून मोठा धनवर्षाव संभवतो. काही व्यक्तींना राजकीय घडामोडीतून उत्तम लाभ होईल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना या आठवड्यात अक्षरशः लाभाची पर्वणी अनुभवायला मिळेल. भक्तांना गुरुप्रचितीचा अनुभव येईल.
या सप्ताहात सिंह राशीच्या व्यक्तींनी “महालक्ष्मी अष्टक” स्तोत्र पठण करावे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/6Virgo.webp)
कन्या राशी (Virgo Weekly Horoscope) – (21 ऑक्टोबर 2024 ते 27 ऑक्टोबर 2024)
कन्या राशीच्या बुद्धिजीवी व्यक्तींना या आठवड्यात आपल्या बुद्धीचे चांगले फळ मिळेल. नोकरी आणि व्यावसायिक प्रगतीच्या संधी चालून येतील. पितृ-पंधरवड्यातही चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरु प्रचितीचा लाभ होईल. नोकरीत पगार वाढ संभवते. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना दिनांक 24, 25 ऑक्टोबर हे दिवस घरात आनंदाचे आणि खेळीमेळीचे वातावरण निर्माण करणारे राहतील. तरुणांचे भाग्योदय होतील. काहींचा परदेशी भाग्योदय संभवतो. #rashi bhavishya हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहाच्या #rashi bhavishya weekly आरंभी व्यवसायिक प्रगतीमुळे उत्तम धनलाभ होईल. मात्र संसर्गजन्य रोगांपासून सावध राहावे प्रकृती बिघडू शकते.
कन्या राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात “शिव सहस्त्रनाम स्तोत्र” वाचावे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/7Libra.webp)
तुळ राशी (Libra Weekly Horoscope) – (21 ऑक्टोबर 2024 ते 27 ऑक्टोबर 2024)
या आठवड्यात तूळ राशीच्या व्यक्तींना आरोग्य विषयक बाबीतून जपण्याचा तसेच प्रवासात काळजी घेण्याचा सल्ला आहे. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना या #rashi bhavishya weekly आठवड्याच्या पूर्वार्धात गुप्त चिंतेतून मानसिक ताण उद्भवू शकतो. नोकरीतील राजकारणातून त्रास होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक देणे घेणे अंगाशी येईल. राशींचे शुक्र भ्रमण #rashi bhavishya अचानक उद्भवलेल्या गाठीभेटीतून लाभ देईल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींची विवाहकडे वाटचाल होईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींचे आर्थिक संकट टळेल. नोकरीत चांगली परिस्थिती निर्माण झाल्यामुळे लाभ होण्याची शक्यता आहे.
तूळ राशीच्या व्यक्तींनी “हनुमान चालीसा स्तोत्र” वाचावे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/8Scorpio.webp)
वृश्चिक राशी (Scorpio Weekly Horoscope) – (21 ऑक्टोबर 2024 ते 27 ऑक्टोबर 2024)
या आठवड्यातील तुमच्या ग्रहांचे विशेष सहकार्य लाभणार नाही. त्यासाठी तुम्ही फक्त आहे ते काम प्रामाणिकपणे करत रहा. गुप्त शत्रूंपासून स्वतःला सांभाळा बेकायदेशीर व्यवहार अजिबात करू नका. गुरुभ्रमणातून तुम्हाला उत्तम आशीर्वादाने सहकार्य मिळेल. जेष्ठ नक्षत्राच्या #rashi bhavishya व्यक्ती या गोष्टीचा उत्तम लाभ करून घेतील. मंगळवारी चांगल्या वार्ता कानी पडतील. त्यामुळे आनंदाने आश्चर्य वाटेल. दिनांक 26 ते 28 ऑक्टोबर हे दिवस वैवाहिक प्रश्न सोडवतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट वसुलीतून लाभ होण्याचा #rashi bhavishya weekly संभव आहे. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना अन्न- पाण्यातील संसर्गातून त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याला जपावे लागेल. काहींना त्वचेचा विकार होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवावा.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/9Sagittarius.webp)
धनु राशी (Sagittarius Weekly Horoscope) – (21 ऑक्टोबर 2024 ते 27 ऑक्टोबर 2024)
या आठवड्यात धनु राशीच्या व्यक्तींनी प्रसंगावधान ठेवावे. घरीदारी क्रिया प्रतिक्रिया संमिश्रित येतील, त्यामुळे सांभाळावे. #rashi bhavishya weekly स्वतंत्र व्यवसायिकांना मोठे लाभ होण्याची शक्यता आहे. दिनांक 24 ते 26 ऑक्टोबर हे दिवस मुळ नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत प्रसन्न ठेवतील, चांगले काम कराल. योग्य ठिकाणी बदली होण्याचा संभव आहे. #rashi bhavishya पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी नोकरीचा लाभ होऊ शकतो. पती किंवा पत्नीचा भाग्योदय होईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींच्या दिनक्रमात भाजण्याचे, कापण्याचे प्रसंग संभवतात, त्यामुळे काळजी घ्यावी.
धनु राशीच्या व्यक्तींनी रोज शंकराला पाणी व बेल अर्पण करावे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/10Capricorn.webp)
मकर राशी (Capricorn Weekly Horoscope) – (21 ऑक्टोबर 2024 ते 27 ऑक्टोबर 2024)
मकर राशीच्या व्यक्तींसाठी दिनांक 26 ते 28 ऑक्टोबर हे दिवस सुसंगत ग्रहमानाचे राहतील. व्यावसायिकांना सरकारी कामातून यशप्राप्ती होईल. पती किंवा पत्नीला उत्तम नोकरीचा लाभ संभवतो. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शुभ ग्रहांच्या चांगल्या ग्रहमानाचा लाभ होईल. काहींना बढतीची चाहूल लागेल. या व्यक्तींना गुरुपुष्यामृत योगाचा उत्तम लाभ होईल.#rashi bhavishya weekly राजकीय ओळखीमधून कामे मार्गी लागतील. संतती चिंता कमी होईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना स्वप्नदृष्टांत होतील.
मकर राशीच्या व्यक्तींनी रोज गणपतीला 21 दुर्वा वहाव्यात.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/11Aquarius.webp)
कुंभ राशी (Aquarius Weekly Horoscope) – (21 ऑक्टोबर 2024 ते 27 ऑक्टोबर 2024)
कुंभ राशीच्या व्यक्तींना साडेसाती असूनही ग्रहमान सुरक्षित ठेवणारे असेल. विनाकारण जनसंपर्क करणे टाळावे. अपरिचित व्यक्तींसोबत व्यवहार करू नयेत. घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी. बाकी आठवड्यात #rashi bhavishya weekly शुक्र भ्रमणातून चांगली गोष्ट घडेल. तरुणांना त्याचा फायदा होईल वैयक्तिक कलागुणांना वाव द्याल. नोकरीच्या मुलाखतीतून समोरच्यांवर चांगली छाप पाडाल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुपुष्यामृत योग भाग्य संकेत देणारा ठरेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना हरवलेले सापडेल. पुत्र चिंता निघून जाईल.
कुंभ राशीच्या व्यक्तींनी रोज रामरक्षा स्तोत्र वाचावे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/12Pisces.webp)
मीन राशी (Pisces Weekly Horoscope) – (21 ऑक्टोबर 2024 ते 27 ऑक्टोबर 2024)
मीन राशीच्या #rashi bhavishya व्यक्तींच्या खराब ग्रहमानामुळे मोह टाळणे सोयीचे राहील. प्रेम प्रकरणात पडू नका. कोणताही अति आत्मविश्वास बाळगू नका. त्यामुळे काम करताना तुमचा अति आत्मविश्वास नडू शकतो. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी पूर्ण काळजी घ्या. घरातील वादविवाद #rashi bhavishya weekly प्रकाशाने टाळावेत. अध्यात्मिक प्रचिती देणारे ग्रहमान असेल. दैवी संकेत मिळतील. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना दिनांक 26 ते 28 ऑक्टोबर हे दिवस ग्रहांच्या शुभ राहणीमानामुळे लाभ देणारे ठरतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत बढती मिळेल. चांगले मानांकन लाभेल.
मीन राशीच्या व्यक्तींनी या सप्ताहात “विष्णुसहस्त्रनाम” पठण करावे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)
मूलमंत्र, आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?
Ladki Bahin | लाडक्या बहिणींना मिळणार ११ हजारांचा पार्ट टाइम जॉब | Mahayuti