उद्योग व्यवसायांची यादी | Udyog in Marathi Information | Udyog Vyavsay Yadi |
Udyog Vyavsay Mahiti : या लेखाद्वारे आम्ही वेगवेगळ्या आवश्यक लघुउद्योग(Small Scale Business), गृहउद्योग (Household Industry), सेवा उद्योग(Service Industry), अन्न प्रक्रिया उद्योग (Food Processing Industry) आणि शेती उद्योग (Agricultural Industries) आणि शेतीपूरक उद्योग, आधुनिक उद्योग (Modern Industry) या आणि अशा अनेक प्रकारच्या Udyog Vyavsay Mahiti देणार आहोत. या पूर्वी आपण ‘नोकरी की व्यवसाय’ या बाबत माहिती वाचलीच असेल. जर वाचली नसेल तर कृपया खालील लिंक वर क्लिक करून माहिती घ्या.
नोकरी की व्यवसाय करावे ? | Nokari vs Business|Naukri vs Business| Which is better Job or Business

आजच्या तरुण पिढीने स्वावलंबी व्हावे, देशाच्या विकासासाठी हातभार लावावा याकरिता सरकार देखील अशा उद्योग आणि व्यवसायांना आर्थिक सहकार्य करत आहे, जेणे करून स्वत:साठी रोजगार सुरु करताना युवा पिढीने स्वतः सोबतच समाजातील मेहनती होतकरूंकरिता देखील नोकरी, व्यवसाय याची निर्मिती करून द्यावी. परंतु आजची युवा पिढी उद्योग, व्यवसायाकडे न वळता नोकरी करणे प्राधान्याने स्वीकारते आहे. ही मानसिकता का? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाचे निरनिराळे मिळेल. परंतु आपण नोकरी करून जर पैसे मिळवू शकत असू, तर नक्कीच तेवढीच मेहनत किंबहुना मेहनती बरोबर सातत्याची जोड असेल तर व्यवसाय उद्योग करून त्याहीपेक्षा अधिक पैसे कमावू शकतो हे मात्र सत्य आहे. इतरांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचे Udyog Vyavsay सुरु करून स्वावलंबी बनणे केव्हाही हिताचे असते. यशस्वी उद्योजक बनण्यासाठी उद्योग व्यवसायाचा अभ्यास व कठोर मेहनत केल्यास नक्की आपण यशस्वी होवू शकतो. सरकार देखील वेगवेगळ्या योजनेमार्फत युवा पिढीतील दडलेल्या गुणांना, त्यांच्यात लपलेल्या उद्योजकाला प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत आहे.
उद्योग, व्यवसायाची निर्मिती करत असताना स्वत:च्या प्रगती सोबत समाज व देशाच्या प्रगतीकरिता यशस्वी उद्योजकांचा मोलाचा वाटा आहे, ही भावना आता जागृत करणे आवश्यक आहे. कालानुरूप प्रत्येकाची परिस्थिती बदलत आहे, गरजा वाढत आहेत. वाढती महागाई, शिक्षणासाठी लागणारा पैसा, आरोग्या करिता येणारा खर्च पाहता आज नोकरी करणाऱ्या लोकांना पगार पुरेनासा झाला आहे. त्यामुळे परिस्थिती बदलायची असेल तर परिस्थितीवर स्वार होवून आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे. तरच आपण यशस्वी होवू शकू.
भूतपूर्व राष्ट्रपती मा. स्व. अब्दुल कलाम साहेब यांनी सांगितले आहेच कि, “ सपने वह नहीं होते जो नींद में देखते है, तो सपने वह होते है जिनके कारण हमारी नींद उड जाती है”…. म्हणजे काय तर स्वप्ने ती नसतात कि जी आपण झोपेत पाहतो, स्वप्न ती असावित जी पूर्ण करण्यासाठी आपली झोप उडाली पाहिजे.
जगात श्रीमंत असणाऱ्या लोकांनी स्वतःचा व्यवसाय, उद्योग करूनच श्रीमंती प्राप्त केली आहे. आपण देखील असे मोठे स्वप्न पाहत असाल व सातत्याने परिश्रम करण्याची तयारी असेल तर नक्की तुम्हाला या लेखमालिकेतून सहकार्य मिळेल.
कोणताही उद्योग किंवा व्यवसाय (Udyog Vyavsay) सुरु करताना खालील काही प्रश्नांची उत्तरे जाणणे आवश्यक आहे.
१. उद्योग, व्यवसाय कोणता करावा?
२. व्यवसाय सुरु करताना पूर्व नियोजन कसे करावे?
३. मार्केट बाबत माहिती.
४. व्यवसायाबाबत प्रशिक्षण.
५. व्यवसाय सुरु करताना आर्थिक नियोजन कसे करावे?
६. मनुष्यबळाचे नियोजन कसे करावे?
७. व्यवसायाकरिता लागणारा कच्चा माल, मशिनरी याबाबत माहिती.
८. व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारी मुबलक जागा, इलेक्ट्रिसिटी, पाणी व इतर योजना.
९. उत्पादनाची गुणवत्ता तपासणे, जोपासणे.
१०. मटेरियल पॅकिंग, वितरण (डिस्ट्रीब्यूशन) बाबत माहिती.
११. जाहिरात करणे. (Advertisement)
१२. मार्केट (Market) मध्ये टिकून रहाण्यासासाठी व्यवसाय स्पर्धा नियोजन.
१३. सरकारी परवाने व मटेरीअल ट्रेडमार्क.
आज आपण या लेखात उद्योग, व्यवसाय (Udyog Vyavsay) कोणता करावा? उद्योग-व्यवसायाचे प्रकार कोणते हे पाहणार आहोत.

आपल्याला यशस्वी उद्योजक, व्यावसायिक व्हायचे आहे हे नक्की केल्यानंतर नेमका कोणता Udyog Vyavsay सुरु केला पाहिजे हा निर्णय घेणे गरजेचे आहे. कोणताही व्यवसाय सुरु करण्यापूर्वी आपण स्वत:ला प्रश्न विचाराने आवश्यक आहे कि, “मी कोणता व्यवसाय सुरु करू शकतो?” आपल्याला आवडणारा व्यवसाय सुरु करताना आपण हा विचार करणे आवश्यक असते की, खरंच हा व्यवसाय मी करू शकतो का? या व्यवसायाची मला पूर्ण माहिती आहे का? असे अनेक प्रश्न आपण स्वत:ला विचारणे गरजेचे आहे. आपली आर्थिक परिस्थिती, शैक्षणिक, शारीरिक व बौद्धिक क्षमता, त्या व्यवसायाबाबत मार्केट मधील अभ्यास या सर्व गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. एकदा का आपण व्यवसायात उतरलो, तो व्यवसाय सुरु केला कि, त्यात होणाऱ्या नफा किंवा तोट्याची पूर्ण जबाबदारी आपली असते. त्यामुळे कोणताही व्यवसाय सुरु करताना विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.
खालील विभागांपैकी आपण करू शकणाऱ्या व ज्यात आपण खरच यशस्वी होवू शकतो अशा एका BUdyog Vyavsay ची निवड करावी. १. लघुउद्योग २. गृहोपयोगी उद्योग ३. आधुनिक उद्योग ४. शेती विषयक उद्योग ५. अन्न प्रक्रिया उद्योग ६. सेवा उद्योग
१. लघुउद्योग (Small Scale Business): कमी पैसा व कमी जागेत करू शकणाऱ्या व्यवसायाला/ उद्योगाला लघुउद्योग म्हटले जाते. कमी मनुष्यबळ, स्थानिक बाजारात आवश्यक असणाऱ्या वस्तूंची निर्मिती या उद्योगात केली जाते. उदा. बॉलपेन, बुक बायडिंग, स्क्रीन प्रिंटींग, पशु खाद्य, साबण , अगरबत्ती, परफ्यूम, पिशव्या तयार करणे, शाम्पू तयार करणे, बॉक्स पॅकींग करणे, गॅस शेगडी उपकरण, कपडे धुण्याचे, भांड्याचे, अंगाचे साबण तयार करणे, भांडी तयार करणे असे अनेक लघुउद्दोग करू शकतो.
२. गृहपयोगी उद्योग (Household Industry) : महिलांकरिता, पुरुषांकरिता तसेच कुटुंबाकरिता रोजगार मिळावा यासाठी घरगुती व्यवसाय केला जातो, त्यालाच गृहपयोगी उद्योग असे म्हणतात. या मध्ये घरात नेहमी लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती केली जाते. प्रत्येकाच्या गरजांचा व मागणीचा विचार करून घरातच अशाप्रकारचे छोट्या प्रमाणात उद्योग सुरु करता येतात. यात प्रामुख्याने खाण्यापिण्याचे पदार्थ, रोजच्या वापरायच्या वस्तूंची निर्मिती करू शकतो. उदा. पापड, मिर्च मसाले, मेणबत्ती, अगरबत्ती, टिकल्या, पेन्सिल, खडू, लोणचे, द्रोण, पत्रावळी, मसाला पावडर, चिवडा, फरसाण, शेव, दंतमंजन, पायपुसणी, गुलकंद, मसाला सौफ, लाकडाच्या वस्तू, पेंटिंग असे अनेक प्रकारचे गृहपयोगी Udyog Vyavsay आपण करू शकतो.
३. आधुनिक उद्योग (Modern Industry) : पारंपारिक पद्धतीने न करता आधुनिकतेचा वापर करून निर्मिती ज्या उद्योगातून केली जाते, अशा उद्योगाला आधुनिक उद्योग असे संबोधले जाते. या उद्योगामध्ये तरुणांचा जास्त सहभाग असतो. भारतात जास्त प्रमाणात युवकवर्ग असल्याने आधुनिकतेकडे व तंत्रज्ञानाकडे तरुणांना जास्त आकर्षण आहे व त्यामुळेच आधुनिक उद्योगाला सरकार देखील जास्त प्राधान्य देते. उदाहरणार्थ मोबाईल करिता आवश्यक पार्टसची निर्मिती करणे, शेतीसाठी आवश्यक आधुनिक यंत्रसामुग्री तयार करणे, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रोनिक वस्तू किंवा त्याकरिता आवश्यक असणाऱ्या पार्टसची निर्मिती करणे, फोटो स्टुडीओ, झेरोक्स सेंटर, कॉम्पुटर सेंटर, विजेवर चालणारी उपकरणे, वेगवेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन (Event (इव्हेंट) मॅनेजमेंट), गारमेंट उद्योग, स्टेपल पीन, पीन टाचणी उद्योग, सौंदर्य प्रसाधन, व्यापारी दुकाने, नेट, कॅफे, सोफ्टवेअर डेव्हलपमेंट, फळांवर व फुलांवर प्रक्रिया करणारे उद्योग, फार्म हाउस असे अनेक प्रकारचे व्यवसाय आपण या आधुनिक उद्योगात करू शकतो.
४. शेती विषयक उद्योग (Agricultural Industries) : आपण जर ग्रामीण भागात वास्तव्य करत असल्यास गावातील शेतकरी बांधवाना शेती करताना येणाऱ्या अडचणी आपल्याला नक्कीच लक्षात येत असतील. भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. तो सुखी, तर संपूर्ण जग सुखी आणि आनंदी राहू शकते. माणसाच्या मुलभूत तीन गरजा आहेत, अन्न, वस्त्र व निवारा. त्यामुळे अन्न निर्मिती करणाऱ्या शेतकरी बांधवाची अडचण समजून घेवून तशा प्रकारचे उद्योग चालू केले असता त्यांना शेती विषयक उद्योग असे म्हणतात. असे उद्योग सुरु करण्यासाठी कच्चामाल त्याच ठिकाणी म्हणजेच आपल्या गावातच उपलब्ध होवू शकतो. तसेच त्यासाठीचा ग्राहक देखील जवळपासच्या परिसरात, बाजारपेठेत मिळू शकेल. आपला देश ७०% शेतीप्रधान असल्याने सरकारकडून देखील शेती उद्योगाला जास्त प्राधान्य दिले जाते. त्यामुळे तरुणांनी या उद्योगाकडे नाविन्यपूर्ण संधी म्हणून पाहणे आवश्यक आहे. या उद्योगात नर्सरी व्यवसाय, बिजोत्पादन व्यवसाय, जैविक खताची निर्मिती, ठिबक सिंचन सल्ला व सेवा उद्योग, फळ भाज्या उद्योग, गांडूळ खत व्यवसाय, गोवऱ्या तयार करणे व विक्री, शेळी, कुकुट व गायी पालन व्यवसाय, दुध व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती व विक्री व्यवसाय, शेतीविषयक आवश्यक अवजारे उद्योग, आयुर्वेदिक झाडांची निर्मिती व्यवसाय, फळ व फुलांवर प्रक्रिया करणारे व्यवसाय, केसांकारिता आवश्यक तेलाची निर्मिती व्यवसाय, घाण्यावर तेल तयार करणे उद्योग.. या आणि अशा बऱ्याचप्रकारे अनेक Udyog Vyavsay आपण शेती विषयक उद्योगात करू शकतो.
५. अन्न प्रक्रिया उद्योग (Food Processing Industry) : आपल्या देशातील प्रत्येक राज्यातील किंबहुना जिल्ह्याजिल्ह्यातील आहार पद्धती ही ठरलेली आहे. भौगालिक परिस्थितीनुसार व धान्याच्या उपलब्धतेनुसार माणसाच्या आहारात अनेक पदार्थ येत असतात. परंतु आजच्या धावत्या युगात आधुनिकतेमुळे माणसाच्या खाण्यापिण्यात अनेक बदल झाले आहेत. बेकरी पदार्थ किंवा फास्ट फूड खाण्याकडे माणसाचे आकर्षण वाढले आहे. बेकरी पदार्थ खाण्यासाठी रुचकर असल्याने लहान मुलांमध्ये देखील याची मागणी जास्त असते. नोकरी करणाऱ्या पती पत्नीला वेळ मिळत नसल्याने हॉटेल, बेकरी, फास्ट फूड दुकाने, चायनीज दुकाने हे जास्त प्रमाणात चालताना दिसत आहेत. हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्स करून आजची तरुण पिढी या व्यवसायाकडे नवीन संधी म्हणून पाहत आहे. पदार्थांची थोडीफार माहिती घेतली, बाजारात कोणती मागणी आहे याचा जर अभ्यास केला तर नवतरुण या उद्योगात नक्की यश प्राप्त करू शकतात. या उद्योगात आपण काजू प्रक्रिया उद्योग, बेदाणे प्रक्रिया उद्योग, बिस्कीट/कुकीज निर्मिती उद्योग, बेकरी व्यवसाय, लोणचे व वेफर्स निर्मिती व्यवसाय, चॉकलेट, गोळ्या निर्मिती व्यवसाय, हॉटेल व्यवसाय, फास्ट फूड दुकाने, किराणा माल दुकाने, फळ ज्यूस, सरबत स्टॉल अशा प्रकारचे अनेक Udyog Vyavsay करू शकतो.
६. सेवा उद्योग (Service Industry) : कमी पैशात सुरु करण्यात येणारा व्यवसाय म्हणजे सेवा उद्योग. आपल्या कौशल्याने, ज्ञान व अनुभवाने गरजू व्यक्तींना सेवा देणे, माहिती देणे व त्या बदल्यात शुक्ल आकाराने या व्यवसायाला सेवा उद्योग-व्यवसाय असे म्हटले जाते. यात ग्रामीण भागात सेवाकेंद्र चालू करू शकतो ज्यामार्फत सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देवून त्यांना त्या त्या योजनेचा लाभ करवून देवू शकतो. या उद्योगात आपण मोटार ट्रेनिंग स्कूल, ट्रॅव्हल एजन्सी, मसाज सेंटर, नोकरी विषयक माहिती, नेटकॅफे, वाचनालय, पुस्तकालय, कोचिंग क्लास, फिटनेस सेंटर, वधूवर सूचक मंडळ, साउंड सिस्टम, लाईट डेकोरेशन व डीजे भाड्याने देणे व्यवसाय, प्रोपटी सल्लागार व्यवसाय असे अनेक प्रकारचे business करू शकतो.
कोणकोणते व्यवसाय (Udyog Vyavsay) आपण करू शकतो याबाबत माहित असल्यास आपण त्या त्या व्यवसायाबाबत अभ्यास करून योग्य निर्णय घेवू शकतो.
मित्रांनो, कुशल उद्योजक, व्यावसायिक होण्याकरिता जिद्द व सातत्याने मेहनत आवश्यक आहे. आपल्याला या लेखातील माहिती आवडल्यास नक्की ही माहिती आपल्या प्रियजनांना पोहचवा…..🙏🏽
आपण सर्वांनी मिळून एक कुशल उद्दोजक घडवूया…!
जय हिंद