आजचे राशी भविष्य मराठी (रविवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२४)
Today Rashi Bhavishya Marathi : मेष राशी (Aries Daily Horoscope) – आज चंद्र सिंह राशीत आहे. तसेच राशीपासून चंद्र पाचव्या स्थानी आहे. आज रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. हट्टीपणा करू नये. मेहनत करून देखील सफलता न मिळाल्याने आज मनस्थिती ठीक नसेल. आज प्रवास योग आहे. #rashi bhavishya संतती विषयी काळजी निर्माण होईल. कोणतेही निर्णय घेताना साधकबाधक विचार करून निर्णय घ्यावे लागतील.
आजचा भाग्यांक : ७ रंग : बदामी किवा पांढरा
वृषभ राशी (Taurus Daily Horoscope) – आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी आहे. आज तुम्हाला पैशाची किमंत कळू शकेल. तुम्हाला पैश्याची अत्यंत आवश्यकता असेल परंतु तुमच्याकडे पर्याप्त धन उपलब्ध नसल्यामुळे मनस्थिती बिघडेल. शांत राहावे. घरातील #rashi bhavishya वरिष्ठ व्यक्तींकडून लाभ मिळेल. कलाकार व खेळाडू यांना आपले कौशल्य दाखविण्याची आज संधी आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी निर्माण होईल.
आजचा भाग्यांक : ६ रंग : गुलाबी
मिथुन राशी (Gemini Daily Horoscope) – आज चंद्र सिंह राशीत असून तिसऱ्या स्थानी आहे. आज नवीन कामाची जबाबदारी घेवून काम सुरु करू शकाल. रिकाम्या वेळेत आज तुम्ही आपल्या मोबाइल वर #daily horoscope काही वेब सीरीज पाहू शकतात. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात, त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. आजचा दिवस #rashi bhavishya उत्साहवर्धक आहे. दिवसाची सुरुवात आनंदी होईल. आज आपल्याला अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. #aajche rashi bhavishya व्यवसायात तुम्ही काही नवीन उपकरणांचा समावेश कराल, ज्यामुळे त्याला अधिक गती मिळेल. तुमच्या मुलाच्या मनमानी वागण्यामुळे तुम्ही विनाकारण तणावात राहाल. रोजच्यापेक्षा आज तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. कोणत्याही कामासाठी इतरांवर अवलंबून राहू नये.
आजचा भाग्यांक : ४ रंग : करडा किवा चॉकलेटी
Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | Rashi Bhavishya | 21 TO 27 OCT 2024
कर्क राशी (Cancer Daily Horoscope) – आज चंद्र सिंह राशीत असून राशी पासून चंद्र दुसऱ्या स्थानी आहे. आज मन थोडे उदास असेल. कोणाबद्दलही त्वरित निर्णय घेऊन त्यांच्या हेतूबद्दल शंका घेऊ नका, कदाचित त्या व्यक्तीला तुम्ही समजून घेण्याची, सहानुभूतीची गरज असू शकते. आपल्या प्रियकर/प्रेयसीला न आवडणारे कपडे वापरू नका, त्यामुळे तो/ती नाराज होऊ शकतात. कुटुंबाशी मतभेद किंवा गैरसमज होतील. अंहकारामुळे इतरांच्या भावना दुखवाल. आज धनखर्च वाढेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन एकाग्र होणार नाही. तुमच्यावर जुने कर्ज असेल तर ते तुम्ही मोठ्या प्रमाणात फेडू शकता. घराची स्वच्छता आणि देखभाल याकडे पूर्ण लक्ष द्याल. खूप विचारपूर्वक काहीतरी सांगायला हवं. तुमच्या उत्पन्नाचे #rashi bhavishya स्रोत वाढतील, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमचे कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होईल. तुम्ही आज योजना आखण्याआधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाही तर तुम्हाला विपरित प्रतिक्रिया मिळू शकेल.
आजचा भाग्यांक : ७ रंग : पांढरा
सिंह राशी (Leo Daily Horoscope) – आज चंद्र सिंह राशीत असून राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज आत्मविश्वास वाढून कामे पूर्ण कराल. झटपट निर्णय घ्याल. आपल्या कमतरतेवर तुम्हाला काम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. कुणाच्या मदतीशिवाय तुम्ही धन कमावण्यात सक्षम राहू शकतात. फक्त तुम्हाला स्वतःवर #rashi bhavishya विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. समाजात तुमची मान प्रतिष्ठा वाढेल. अहंपणा मुळे संघर्ष होण्याची शक्यता आहे. तुम्ही जास्त व्यस्त असाल. तुमची मुले सहलीला जाऊ शकतात इ. घाईघाईत कोणताही निर्णय घेणे टाळावे लागेल, अन्यथा ते पूर्ण #rashi bhavishya करण्यात अडचणी येतील. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला वैवाहिक आयुष्यात थोडीशी खासगी स्पेस आवश्यक आहे. काही नवीन कामात तुमची आवड निर्माण होऊ शकते. व्यवसायात तुम्ही तुमच्या योजनांवर खूप मेहनत कराल. आज प्रकृतीची थोडी कुरबुर राहील.
आजचा भाग्यांक : ६ रंग : गुलाबी
मूलमंत्र, आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?
कन्या राशी (Virgo Daily Horoscope) – आज चंद्र सिंह राशीत असून राशीपासून चंद्र बाराव्या स्थानी आहे. आज मनस्थिती विचलित होण्याची शक्यता आहे. तुम्हाला आज महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्यावे लागेल. नातेवाईकांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे, परंतु संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होईल. आज कुटुंबाचा मदतीने आर्थिक मदत होवू शकते. नोकर वर्गाकडून त्रास होण्याची शक्यता आहे. खूप विचार करूनच नोकरीत बदल करणे #rashi bhavishya तुमच्यासाठी चांगले राहील.या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. यावेळचा उपयोग तुम्ही आपले शोक पूर्ण करण्यात लावू शकतात. तुम्ही काही पुस्तके वाचू शकतात किंवा आपले आवडते म्यूजिक ऐकू शकतात. आज खर्चामुळे तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्यावर दुष्परिणाम होईल. सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक त्यांच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करतील, ज्यामुळे त्यांना नवीन पद मिळू शकेल. मतभिन्नता होण्यास आपला अहंकार कारणीभूत ठरू शकतो.
आजचा भाग्यांक : ४ रंग : राखाडी
तुळ राशी (Libra Daily Horoscope) – आज चंद्र सिंह राशीत असून राशीतून चंद्र लाभ स्थानी आहे. आज उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रवास आनंददायी होईल. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी घाईघाईत विचार करून निर्णय घेऊ नका. थोड्या फार अडचणींच्या व्यतिरिक्तही आज तुमचे प्रेम जीवन चांगले राहील आणि तुम्ही आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक सुख उत्तम मिळेल. कामात बढती मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही काही महत्त्वाची माहिती कोणत्याही बाहेरील व्यक्तीसोबत शेअर करू नका, अन्यथा तुम्हाला नंतर काही समस्या निर्माण होऊ शकतात. #rashi bhavishya तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या लहानशा मागण्या म्हणजेच एखादा पदार्थ किंवा मिठी नाकारलीतर तर तो/ती दुखावेल. मुलांच्या शिक्षणात काही अडचण असेल तर तीही सोडवली जायची. कौटुंबिक समस्यांबद्दल तुम्ही आईशी बोलू शकता.
आजचा भाग्यांक : ७ रंग : पांढरा
वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope) – आज चंद्र सिंह राशीत असून राशी पासून चंद्र दशम स्थानी आहे. आज कुटुंबात आनंद व समाधान राहील. सर्व कामे निर्विघ्नपणे पूर्ण कराल. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या #rashi bhavishya सहवासात घालवा. मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लुप्ती करावी लागली तरी चालेल. आज दिवस आनंदात, मज्जा लुटण्यात जाईल. संततीच्या प्रगतीचा आनंद मिळेल. आज आपले आरोग्य उत्तम राहील.
आजचा भाग्यांक : ८ रंग : निळा
Diwali | Diwali Faral | दिवाळी फराळाच्या रेसिपीज आणि तळण करण्यासाठी योग्य वेळांचं वेळापत्रक
धनु राशी (Sagittarius Daily Horoscope) – आज चंद्र सिंह राशीत असून राशी पासून चंद्र भाग्य स्थानी आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत वाद विवाद करून नका, त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. आज कोणतेही काम करण्यास उत्साह, आनंद वाटणार नाही. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. तुमच्या पालकांना आनंदी ठेवणे तुम्हाला कठीण वाटेल. #rashi bhavishya म्हणून सकारात्मक निकाल मिळण्यासाठी तुम्ही पालकांच्या दृष्टिकोनातून विचार करावा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. नोकरी व्यवसायात त्रास जाणवेल.
आजचा भाग्यांक : ५ रंग : हिरवा
मकर राशी (Capricorn Daily Horoscope) – आज चंद्र सिंह राशीत असून राशी पासून चंद्र आठव्या स्थानी आहे. आज कामानिमित्त प्रवास योग घडेल. अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. रागावर नियंत्रण ठेवा. स्वतःच्या विचारांना प्राधान्य दिलेत तरी बरेच समाधान आणि आराम लाभेल. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस.
आजचा भाग्यांक : ५ रंग : आकाशी
Marathi Motivational Quotes | प्रेरणादायी सुविचार मराठी | Success Quotes In Marathi
कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope) – आज चंद्र सिंह राशीत असून राशी पासून चंद्र सातव्या स्थानी आहे. आपला कामात आत्मविश्वास वाढल्याने यश प्राप्ती होईल. आज मित्र मंडळी, कुटुंबीयांसोबत बाहेर जेवणाकरीता जावू शकता. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा, मान सन्मान मिळेल. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवितो हे लक्षात घेऊन वाईट काळातही सकारात्मक विचाराने पुढे जा. आर्थिक गुंतवणूक करताना योग्य तो विचार करा. घाईत निर्णय घेवू नका. योग्य व्यक्तीच्या सल्ला घ्या. मित्रांसोबत आज वेळ घालवाल, गप्पा होतील.
आजचा भाग्यांक : ३ रंग : पिवळा
मीन राशी (Pisces Daily Horoscope) – आज चंद्र सिंह राशीत असून राशी पासून चंद्र सहाव्या स्थानी आहे. आज मनस्थिती ठीक नसून स्वभाव तापट राहील. दिवसभरातील कामे कोणतीही बाधा न येता पूर्ण होतील. आज घरात सुख शांती नांदेल. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. तुमची बुद्धिमता, विचार करण्याची क्षमता यामुळे आज उद्भवणाऱ्या समस्यांवर, #rashi bhavishya पैशांच्या अडचणीवर मात करू शकाल. मनात काही शंका असल्यास अनुभवी व्यक्तीकडून सल्ला किंवा विचारविनिमय करा.
आजचा भाग्यांक : १ रंग : नारंगी
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)