Sukanya Samriddhi Account | Sukanya Samriddhi Yojana in Marathi | सुकन्या समृद्धी योजना | Sarkari Yojana |
Sukanya Samriddhi Yojana : दिनांक २२ जानेवारी २०१५ रोजी सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी #narendra modi यांचा हस्ते “मुलगी वाचवा मुलगी शिकवा’ याअंतर्गत केली गेली. या योजनेचा #sarkar yojana मुख्य हेतू आहे कि, मुलीच्या पालकांना तिच्या भविष्यासाठी बचत करण्याकरिता प्रोत्साहित करणे. सुकन्या समृद्धी योजनेच्या #sukanya samriddhi yojana मुदती नंतर मिळालेली रक्कम मुलीच्या उच्च शिक्षणासाठी, तिच्या लग्नासाठी वापरू शकतात. सुकन्या समृद्धी योजना हि मुलींना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवून सक्षम करणे आहे.
या योजनेत मुलींच्या नावाने बचत खाते ओपन करून दिले जाते. मुलीच्या जन्मापासून १० वर्षाच्या आत खाते उघडू शकता. पोस्ट ऑफिस, राष्ट्रीय बँक यामार्फत हे खाते उघडले जावू शकते. हे खाते उघडताना कमीत कमी २५० रुपयात उघडू शकता व एका वर्षात या खात्यात दीड लाखापर्यंत (१५००००) रक्कम भरू शकता. या ठेवीचा कालावधी खाते उघडल्यापासून २१ वर्ष आहे. या योजनेच्या सुरुवातीस ९.१ % वार्षिक दराने व्याज देण्यात आले होते. आता मुलींसाठी बचत राशीवर ८.२ % व्याज दर मिळते. सुकन्या समृद्धी योजना #sukanya samriddhi yojana त्यांच्यासाठी फायदेशीर आहे, ज्यांचे उत्पन्न फार कमी आहे.
सुकन्या समृद्धी योजनेचे #sukanya samriddhi yojana उद्दिष्ट आहे कि, मुलींच्या शैक्षणिक क्षेत्रात बाधा येवू नये, मुलींच्या लग्नात कोणतेही कमतरता येवू नये. या योजनेकरिता सरकारने #sarkari yojana कर सूट दिली आहे. आयटी कायदा १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत कर सूट देण्यात आलेली आहे. तिमाही आधारावर भारत सरकार #sarkari yojana व्याज दर जाहीर करते. मुलीचे १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर शिक्षणाकरिता जमा रक्कमेतून ५०% रक्कम काढता येते. मुलीचे २१ वर्ष पूर्ण झाल्यावर किवा लग्न झाल्यास पूर्ण रक्कम काढता येते.
Sukanya Samriddhi Yojana चे मुख्य उद्दिष्ट
- सुकन्या समृद्धी योजनचे सुरवात हि, मुलीचे शिक्षण, आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्य सुधारण्याच्या उद्देशानं करण्यात आली आहे.
- मुलीचे भविष्य सुरक्षित व्हावे, ती आत्मनिर्भर व्हावी या उद्देशाने सुकन्या समृद्धी योजनेची #sarkari yojana सुरवात करण्यात आली आहे.
- मुलींना भविष्यात उच्च शिक्षण मिळावे या करिता या सुकन्या समृद्धी योजनेची सुरवात करण्यात आली आहे.
- मुलीच्या लग्नात कोणतेही बाधा येवू नये या हेतूने देखील सुकन्या समृद्धी योजनेची #sukanya samriddhi yojana सुरवात केली आहे
सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्र | Sukanya Samriddhi Yojana |
- मुलीच्या जन्माचा दाखला
- पालकांचे पॅन कार्ड
- पालकांचे आधार कार्ड
- पालकांचे मतदान ओळखपत्र
- पालकांचे रेशन कार्ड
- पालकांचे विज बिल
- मुलीच्या पालकांचे फोटो रहिवासी प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
Marathi Ukhane – मराठी उखाणे

सुकन्या समृद्धी योजनेसाठी सध्या व्याजदर 8.2 टक्के आहे | Sukanya Samriddhi Yojana |
- सुकन्या समृद्धी योजनेमध्ये #sarkari yojana गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूक दारांना या वर्षी व्याजदरात वाढ करून मिळाली आहे.
- अंतर्गत उघडलेली खाती वार्षिक व्याज 8.20% प्राप्त करतात. तथापि, व्याज दर भारत सरकारने तिमाही अधिसूचित केले आहे.
- या योजनेसाठी या अगोदर गुंतवणूकदारांना ९.१ टक्के व्याज दिले जात होते, पण जानेवारी महिन्यापासून सुकन्या समृद्धी योजनेचा #sukanya samriddhi yojana व्याजदर ८.२ केला आहे.
- व्याज वार्षिक चक्रवाढ आणि आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात जमा केले जाईल.
सुकन्या समृद्धी योजनेचे (Sukanya Samriddhi Yojana) नियम व अटी :
- सुकन्या समृद्धी योजनेत खाते मुलीच्या जन्मापासून ती 10 वर्षाची होईपर्यंत उघडणे गरजेचे आहे. #sarkari yojana म्हणजे सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्याकरिता मुलीचे वय १० वर्षाच्या आता असणे बंधनकारक आहे
- एका कुटुंबात २ मुली असतील व त्यांना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर दोन्ही मुलींची वेगवेगळी खाती उघडणे आवश्यक आहे. तरच त्या दोन्ही मुली सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेवू शकतात.
- पालकांनी मुलीचे वय २१ वर्ष पूर्ण होण्याअगोदरच तिचा विवाह केला तर त्या मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेचे #sukanya samriddhi yojana खाते रद्द करण्यात येते. पुढे सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- मातेच्या दुसऱ्या प्रसूती वेळी जुळ्या किंवा तिळ्या मुली झाल्यास त्यांना देखील सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येईल.
- रोख रक्कम, डिमांड ड्राफ्ट, चेक किंवा कोअर बँकिंग सिस्टमच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजना खात्यात पैसे भरता येतात.
- मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यावर व्याजासकट जमा रक्कम पालकांच्या ताब्यात देवून सुकन्या समृद्धी योजनेचे खाते बंद केले जाते.
- खाते उघडताना मुलीचे नाव जर ठेवले नसेल तर तिच्या आईच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत #sukanya samriddhi yojana खाते उघडू शकता. मुलीचे नाव ठेवल्यानंतर खात्यावरील नाव बदली करून खाते चालू ठेवू शकता.
- सुकन्या समृद्धी योजना #sarkari yojana हि फक्त मुलींच्या भविष्याकरिता भारत सरकारने जाहीर केली आहे, त्यामुळे फक्त मुलींच या योजनेचा लाभ घेवू शकतात.
- सुकन्या समृद्धी योजनेचा मुलांना लाभ घेता येत नाही.
Marathi Motivational Quotes | प्रेरणादायी सुविचार मराठी | Success Quotes In Marathi

कोणत्या बँकेत तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचे (Sukanya Samriddhi Yojana खाते उघडू शकता?
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत #sarkari yojana नवीन खाते चालू करायचे झाल्यास आपण आपल्या जवळच्या कोणताही पोस्ट ऑफिस कार्यालयात चालू करू शकता किवा खालील दिलेल्या बँकेत सुद्धा आपण सुकन्या समृद्धी योजनेचे #sukanya samriddhi yojana खाते ओपन करू शकता.
- स्टेट बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ महाराष्ट्र
- इंडियन ओव्हरसीज बँक
- पंजाब आणि सिंध बँक
- युको बँक
- बँक ऑफ बडोदा
- IDBI बँक
- HDFC बँक
- कॅनरा बँक
- ॲक्सिस बँक
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया
- युनियन बँक ऑफ इंडिया
- ICICI बँक
- पंजाब नॅशनल बँक
सुकन्या समृद्धी योजनेसाठी नवीन खाते उघडण्याचा फॉर्म तुम्ही RBI च्या वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता.
Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi

सुकन्या समृद्धी योजना खाते ऑनलाईन उघडता येईल का ?
तर याचे उत्तर आहे कि, पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँक आपल्याला ऑनलाईन खाते उघडण्याची सुविधा देत नाहीत. खाते उघडण्यासाठी तुम्हाला आवश्यक ते कागदपत्र घेवून पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत जाणे आवश्यक आहे.
सुकन्या समृद्धी योजना खात्यातून शिल्लक रक्कमेतून काही रक्कम मुदतपूर्व काढता येते का ?
तर याचे उत्तर आहे कि, सुकन्या समृद्धी योजनेच्या #sukanya samriddhi yojana खात्यातील शिल्लक रक्कमेच्या ५०% रक्कम तुम्ही काढू शकता. परंतु मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झालेले असल्यास या सुविधेचा आपण लाभ घेवू शकता. सदरची रक्कम आपण मुलीच्या उच्च शिक्षणाकरिता वापरू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यातील शिल्लक रक्कमेवर कर्ज उपलब्ध होते का?
याचे उत्तर आहे कि, सुकन्या समृद्धी योजनेच्या #sukanya samriddhi yojana नियमानुसार सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यातील शिल्लक रक्कमेवर कोणतीही बँक किंवा पोस्ट ऑफिस कर्ज देत नाही. सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत कोणतेही कर्ज आपण घेवू शकत नाही.
Acidity | Apachan | अपचन-गॅसेसचा त्रास होतो? डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला तातडीने वाचा….

सुकन्या समृद्धी योजनेतील खाते केव्हा बंद होते व पूर्ण रक्कम केव्हा मिळू शकते?
तर याचे उत्तर आहे कि, मुलीचे वय २१ वर्ष पूर्ण झाल्यावर सुकन्या समृद्धी खाते मॅच्युअर होते. त्यानंतर खातेदार खाते बंद करण्यासाठी अर्ज दाखल करू शकतो. खातेदार खात्यातील संपूर्ण रक्कम काढू शकतो.
सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत कर लाभ
याचे उत्तर आहे कि, सुकन्या समृद्धी योजना आकर्षक होण्याकरिता, भारत सरकारने अनेक कर लाभ या योजनेकरिता दिले आहेत.
- आयकर कायदा १९६१ च्या कलम ८० C अंतर्गत खातेदार आर्थिक वर्षात खात्यात ठेवलेल्या रक्कमेवर कर माफीचा दावा करू शकतो. प्रती आर्थिक वर्षात १.५ लाख इतकी मर्यादा आहे.
- सुकन्या समृद्धी योजना खात्यात जमा केलेले कोणतेही व्याज प्राप्तीकर कायद्याच्या कलम १० नुसार पूर्णपणे करमुक्त आहे.
- सुकन्या समृद्धी योजना खात्यातून मुदतीनंतर किवा मुदतपूर्व काढलेली रक्कम देखील पूर्णपणे करमुक्त आहे.
सुकन्या समृद्धी योजनेत उघडलेले खाते सुरक्षित आहे का?
परताव्याची हमी आहे का? तर या प्रश्नांचे उत्तर आहे कि, सुकन्या समृद्धी योजना #sukanya samriddhi yojana हि भारत सरकार द्वारा राबविण्यात आलेली आहे, भारत सरकारचा #sarkari yojana या योजनेला पूर्ण पाठिंबा असल्याने सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्याच्या सुरक्षितेची व परताव्याची पूर्ण हमी दिली जाते.
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते हस्तातरीत करू शकतो का?
तर याचे उत्तर आहे कि, सुकन्या समृद्धी योजना #sukanya samriddhi yojana खाते पोस्ट ऑफिस मधून बँकेत हस्तातरीत करू शकतो. तसेच बँकेतून पोस्ट ऑफिस मध्ये देखील हस्तांतरीत करू शकतो.
सुकन्या समृद्धी योजनेत कमीत कमी व जास्तीत जास्त किती रक्कम भरू शकतो?
तर या प्रश्नाचे उत्तर आहे कि, सुकन्या समृद्धी योजनेत #sukanya samriddhi yojana आपण एका वर्षात कमीत कमी २५० रुपये व जास्तीत जास्त १.५ लाख रक्कम जमा करू शकता. एका वर्षात किमान ठेव २५० असल्याने जर त्या वर्षात ती रक्कम भरली नाही तर नाममात्र ५० रुपयाचा दंड भरावा लागतो.
सुकन्या समृद्धी योजनेची वयोमर्यादा व मुदत संपण्याचा कालावधी काय आहे?
तर याचे उत्तर आहे कि, सुकन्या समृद्धी योजने #sukanya samriddhi yojana अंतर्गत पालक आपल्या मुलीचे खाते तिच्या जन्मापासून तिच्या वयाच्या १० वर्षाच्या आत चालू करू शकतात. जेव्हा मुलीचे वय २१ वर्ष पूर्ण होते तेव्हा सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्याची मुदत संपते. मुदत पूर्ण झाल्यावर फंडावर व्याज मिळणे बंद होते. पालक मुलीचे २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अर्ज करून खाते बंद करू शकतात. जर मुलीने १८ वर्ष पूर्ण केल्यानंतर लग्न केले तर खात्यातील रक्कम काढू शकते.
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत #sukanya samriddhi yojana उघडलेले खाते, खाते चालवणाऱ्या पालकाचा मृत्यू झाल्यास खाते बंद करू शकतो.