Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 20 Jan TO 26 Dec 2024

Rashi Bhavishya | राशी भविष्य | Rashi Bhavishya in Marathi|Weekly Horoscope |

Rashi Bhavishya : २० जानेवारी ते २६ जानेवारी २०२५ या आठवड्याचे सर्व राशींचे #rashi bhavishya राशी भविष्य या लेखाद्वारे देत आहोत.

dnyanjyotmarathi.com

मेष राशी (Aries Weekly Horoscope) – ( २० जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२५ rashi bhavishya) मेष राशीच्या लोकांना या आठवड्यामध्ये कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होवू शकतात, त्याचा पुरेपूर फायदा घ्या जेणेकरून तुमच्या करियर मध्ये त्याचा फायदा होईल. या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्या. परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. वैयक्तिक कामाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ताण तणावापासून लांब राहणे आवश्यक आहे. विद्यार्थी यांचे अभ्यासातील लक्ष विचलित होवू शकते. गुरुजनांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.

मेष राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात शुभ रंग आहे राखाडी. मेष राशीच्या लोकानी श्री गणेशाला नैवद्य म्हणून मोदक दाखविल्यास फायदेशीर ठरेल.


वृषभ राशी (Taurus Weekly Horoscope) – ( २० जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२५ rashi bhavishya) वृषभ राशीतील लोक जर सरकारी नोकरीत असतील तर त्यांना हा आठवडा काहीसा आवाहनात्मक असणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, कृपया ती टाळू नका. यशस्वी होण्यासाठी आवाहनांना तोंड द्यावेच लागेल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला तुमच्या नियोजित कामामध्ये लक्ष द्यावे लागेल. तुमच्या परिवारात थोडे वाद होण्याची शक्यता आहे. परंतु वाणीवर व रागावर नियंत्रण ठेवावे. आर्थिकबाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम ठेवावे. आठवड्याचा उत्तरार्थ समाधानकारक असेल. बुद्धीचा वापर करून घरात एकोपा कशा निर्माण होईल याकडे लक्ष द्यावे.

या आठवड्यात शुभ रंग आहे सफेद. वृषभ राशीच्या लोकांनी दररोज हुनुमान चालीसा पठण करणे आवश्यक आहे.

सायबर क्राईम (Cyber Crime) हा गंभीर गुन्हा का मानला जातो? सायबर क्राइमचे प्रकार कोणते आहेत?


dnyanjyotmarathi.com

मिथुन राशी (Gemini Weekly Horoscope) – ( २० जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२५ rashi bhavishya) मिथुन राशीतील लोकांना या आठवड्यात गुंतवणुकीकरिता लाभदायक आहे. गुंतवणुकीकरिता नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. परंतु गुंतवणूक करताना विचारपूर्वक संपूर्ण अभ्यास करून गुंतवणूक करावी. नोकरी करणाऱ्या लोकांना बढती मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात आरोग्य ठीक राहील. मित्रांसोबत, कुटुंबियांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखू शकता. वैवाहिक सौख्य टिकवून ठेवा. एकमेकांच्या विचारांचा आदर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी दिशाहीन न होता जिद्दीने अभ्यास करावा, गुरुजनांचे मार्गदर्शन घ्यावे.

मिथुन राशीच्या लोकांसाठी या आठवड्यासाठी रंग आहे हिरवा. मिथुन राशीच्या लोकांना शिव सहत्रनाम स्तोत्र पठन करावे.


dnyanjyotmarathi.com

कर्क राशी (Cancer Weekly Horoscope) – ( २० जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२५ rashi bhavishya) कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांचे ग्रह अनुकूल असल्याने, त्यांना साथ देणारे असल्याने त्यांचे नियोजित कार्य सफल, यशस्वी होवू शकतात. विरोधकांची चिंता करण्याची आवश्यकता नाही. या आठवड्यात आपल्या हातून सामाजिक कार्य होण्याची शक्यता असल्याने सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. विशेषतः उष्णतेचे विकार, आजार होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात रस निर्माण करण्याचा प्रयत्न जरूर करा. प्रेम संबंधात असणाऱ्या व्यक्तीने एकमेकांचे मनातील ओळखण्याचे प्रयत्न करा. जीवनसाथीचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. या राशीच्या लोकांची कल्पनाशक्ती चांगली आहे. विद्यार्थी यांनी स्वतः ठरवून घेतलेले अभ्यासाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतील.

कर्क राशीच्या लोकांसाठी रंग आहे पांढरा. कर्क राशीच्या लोकांनी दररोज रामरक्षा स्तोत्र वाचन करावे.


dnyanjyotmarathi.com

सिंह राशी (Leo Weekly Horoscope) – ( २० जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२५ rashi bhavishya) सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात काही महत्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. विवाह करण्यास इच्छुकांना या आठवड्यात सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. कामासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. रागावर व वाणीवर नियंत्रण ठेवा. उगाच इतरांवर रागावून आपल्या प्रकृतीला त्रास देवू नका. या राशीतील विद्यार्ध्यानी काही तरी नवीन शिकण्याचा सतत प्रयत्न करावा.

सिंह राशीच्या लोकांसाठी या आठवड्याचा रंग आहे तांबडा. सिंह राशीच्या लोकांनी या आठवड्यात महालक्ष्मी अष्टक वाचल्यास शुभ आहे.

सहवास आणि सुसंवाद हे दोन कोणत्याही सुदृढ नात्याचे बीजमंत्र आहेत.

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

कन्या राशी (Virgo Weekly Horoscope) –  ( २० जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२५ rashi bhavishya) कन्या राशीतील लोकांना सरकारी कामात सकारात्मक यश मिळण्याचा हा आठवडा आहे. या आठवड्यात तुम्ही नवीन योजना, नवीन प्रकल्प सुरु करू शकता याकरिता अनुकूल परिस्थिती आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा चांगला आहे. नोकरी करण्याऱ्या लोकांना प्रगती होण्याची शक्यता आहे. परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. आरोग्य उत्तम राहील. पालकांना त्यांच्या विद्यार्थी मुलांकडून शिक्षणाबाबत चांगली बातमी समजू शकेल. रागावर नियंत्रण ठेवावे. या आठवड्यात संयमाने व धीराने वाटचाल, कार्य करत रहा यश तुमचेच आहे.

कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ रंग आहे हिरवा. कन्या राशीच्या लोकांनी दरोरोज महादेवाच्या पिंडीवर पाणी व बेलपत्र अर्पण करावे.


dnyanjyotmarathi.com

तुळ राशी (Libra Weekly Horoscope) – ( २० जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२५ rashi bhavishya) तुळ राशीच्या लोक जर नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना सकारात्मक बातमी देणारा असा हा आठवडा असेल. तुम्हाला व्यवसायात किवा नोकरीत नवीन संधी उपलब्ध होवू शकेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. योग व ध्यान केल्यास आरोग्य चांगले राहील. जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा, त्याच्यावर विश्वास ठेवा, त्यांच्या भावनांचा आदर करा.

तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ रंग आहे निळा. तुळ राशीच्या लोकांना रोज भीमरूपी स्तोत्र वाचल्यास लाभ मिळेल.


dnyanjyotmarathi.com

वृश्चिक राशी (Scorpio Weekly Horoscope) – ( २० जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२५ rashi bhavishya) वृश्चिक राशीतील लोकांना हा आठवडा सकारात्मक असणार आहे. या लोकांनी सकारात्मक विचार करून कार्य केल्यास पुष्कळशा गोष्टी साध्य होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना दिलासा देणारा हा आठवडा असेल. आर्थिक गुंतवणूक करताना योग्य व्यक्तीचा सल्ला घेतल्याशिवाय गुंतवणूक करू नका. कलाक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळेल. या आठवड्यात प्रवास योग आहे. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी स्वतःला त्यात झोकून देणे आवश्यक आहे. नियोजनावर भर द्या.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ रंग आहे पांढरा. वृश्चिक राशीच्या लोकांनी रोज कुलदेवीला दुधाचा नैवद्य दाखवावा.


dnyanjyotmarathi.com

धनु राशी (Sagittarius Weekly Horoscope) – ( २० जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२५ rashi bhavishya) धनु राशीच्या लोकांना हा आठवडा सुरवातीला काळजी करण्याचा असेल. विशेषतः या राशीच्या जातकांसाठी हा आठवडा खडतर असण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ लोकांच्या रागाला सामोरे जावे लागेल. परंतु संयम ठेवावे, रागावर व वाणीवर संयम ठेवावे. आरोग्याची काळजी घ्यावी. आर्थिक स्थिती ठीक राहील. अवांतर गोष्ठीकडे लक्ष देवू नका. गुंतवणूकदारांनी मोठ्या मोठ्या गुंतवणून न करता या आठवड्यात छोट्या गुंतवणूकि कराव्यात. जोडीदाराच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न करा, आठवड्याचा शेवट सकारात्मक असेल.

धनु राशीच्या लोकांसाठी शुभ रंग आहे पिवळा. धनु राशीतील लोकांनी गणेश पंचरत्न स्तोत्र नित्य वाचावे.


dnyanjyotmarathi.com

मकर राशी (Capricorn Weekly Horoscope) – ( २० जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२५ rashi bhavishya) मकर राशीतील लोकांसाठी हा आठवडा सकारात्मक फळ देणारा असणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा सकारात्मक असेल. या आठवड्यात तुम्हाला नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. त्याचा पूर्ण विचार करून, अभ्यास करून फायदा घ्यावा. व्यवसाय करणाऱ्या लोकांना देखील हा आठवडा शुभ फळ देणारा असण्याची शक्यता आहे. परिवारासोबत, जोडीदारासोबत वेळ घालवाल. त्यांच्याकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या आठवड्यात जुन्या मित्र मैत्रिणीची भेट होण्याची शक्यता आहे. तुमच्या मनातील सकारात्मक विचार तुमची प्रगती करणार आहे. जोडीदाराचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करा. तील/त्यांना आनंद द्या. विद्यार्थीनी अपयशाचा विचार न करता आपले १०० टक्के योगदान अभ्यासात द्यावे.

मकर राशीच्या लोकांसाठी शुभ रंग आहे करडा. मकर राशीच्या लोकांनी रोज कोणत्याही गणेश मंत्राचे पठण करावे.

Good Thoughts in Marathi| प्रेरणादायी सुविचार मराठी | Marathi Motivational Thoughts

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

कुंभ राशी (Aquarius Weekly Horoscope) – ( २० जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२५ rashi bhavishya) कुंभ राशीतील लोकांसाठी हा आठवडा थोडा सावधगिरी बाळगण्याचा आहे. विनाकारण सैरभेर धावणारे मन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आता पासून मेहनत केल्यास वार्षिक निकालात भरघोस यश मिळू शकेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन आवाहनाला सामोरे जावे लागेल. आर्थिक बाबतीत थोडे सावध रहाणे आवश्यक आहे. आठवड्याच्या शेवटी शेवटी सकारात्मक गोष्ठी घडू शकतात त्यामुळे काळजी करू नका.

कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ रंग आहे पांढरा. कुंभ राशीतील लोकांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.


dnyanjyotmarathi.com

मीन राशी (Pisces Weekly Horoscope) – ( २० जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२५ rashi bhavishya) मीन राशीच्या लोकांना हा आठवडा सकारात्मक असणार आहे. खास करून व्यवसाय करणाऱ्या लोकांना सकारात्मक जाणार आहे. आर्थिक स्थिती सकारात्मक असेल. तुम्हाला नवीन गुंतवणूक करण्यासाठी शुभ फळ देणारा आठवडा आहे, परंतु गुंतवणूक करताना अभ्यासपूर्ण गुंतवणूक करावी. आरोग्याची काळजी घ्यावी. परिवारासोबत, जोडीदारासोबत आनंदात आठवडा जाईल. जोडीदाराच्या भावनाचा आदर करा. कोणत्याही खोट्या प्रतिष्ठेला बळी पडू नका. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

मीन राशीच्या लोकांसाठी शुभ रंग आहे पिवळा. मीन राशीच्या लोकांना रोज विष्णू सहस्त्रनाम पठण करावे.


आहार कसा निवडावा | Aahar Kasa Nivadava | योग्य आहार कसा घ्यावा? | Yogya Aahar Kasa Ghyava |

Sanskar | संस्कार म्हणजे काय ? मुलांच्या अवस्था ? | Mulavar Sanskar kase karave |

Cyber Crime | सायबर क्राइम म्हणजे काय? | What is cyber crime?

शेती करा आणि श्रीमंत व्हा ! Sheti kara ani shrimant vha! | Farming | Agriculture