Rashi Bhavishya | राशी भविष्य | Rashi Bhavishya in Marathi | Weekly Horoscope | Rashifal
Rashi Bhavishya : १० मार्च ते १६ मार्च २०२५ या आठवड्याचे सर्व राशींचे #rashi bhavishya राशी भविष्य या लेखाद्वारे देत आहोत.

Rashi Bhavishya / Rashi bhavishya : मेष राशीचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( १० मार्च ते १६ मार्च २०२५ rashi bhavishya) मेष राशीच्या लोकांना हा आठवडा थोडा त्रासदायक जाण्याची शक्यता आहे. या आठवड्यात नवीन काही आव्हानांना सामोरे जाण्याची शक्यता आहे. मानसिक स्थिती सकारात्मक ठेवल्यास मनावर व शरीरावर होणारा ताण ताणव नक्की कमी होईल. या आठवड्यात आपल्याला प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. प्रकृती ठीक राहण्यासाठी दिनचर्येत व्यायाम, योगासने व प्राणायाम यांना महत्व देणे आवश्यक आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना कोणताही निर्णय घेताना तो घाई गडबडीत घेवू नये अन्यता वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नाराजगीला सामोरे जावे लागेल. या आठवड्यात कोणालाही पैसे उधार देवू नका. या आठवड्यात खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. व्यावसायीकांनी कठोर मेहनत घेतल्यास नक्की यश प्राप्त होईल. वैवाहिक जीवनात संशय वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु चर्चेने सदर वातावरण बदलू शकते.
मेष राशीच्या लोकांना या आठवड्यात भगवान हनुमानाचे स्मरण करून हनुमान चालीसा पठण करणे.

वृषभ राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( १० मार्च ते १६ मार्च २०२५ rashi bhavishya) वृषभ राशीच्या लोकांना हा आठवडा संमिश्र फळ देणारा असेल. या आठवड्यात आरोग्याची तक्रार होण्याची शक्यता आहे. पोटाचे विकार वाढण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांनी सकारात्मक विचार केल्यास हातात आलेली कामे भराभर पूर्ण होतील. आपल्या मनात असणाऱ्या भविष्य बाबतच्या योजना गुप्त ठेवणे आवश्यक आहे. गुंतवणूक करताना अनुभवी लोकांचा, अभ्यासू लोकांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याना हा आठवडा अनुकूल आहे, अध्ययनात लक्ष लागेल. वैवाहिक जीवनात आनंद प्राप्त होईल.
वृषभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात दत्त उपासना केली असता लाभ मिळेल.

मिथुन राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( १० मार्च ते १६ मार्च २०२५ rashi bhavishya) मिथुन राशीच्या लोकांना हा आठवडा सामान्य फळ देणारा असणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना या वर्षी बढतीची अपेक्षा असल्यास थोडी वाट पहावी लागेल. थोडी जास्त मेहनत घेतल्यास वरिष्ठ अधिकारी आपल्या कामातील प्रगती पाहून अपेक्षित बढती देवू शकतात. या आठवड्यात घराची, वाहनाच्या दुरुस्ती मध्ये पैसा खर्च होईल. या आठवड्यात कोणासोबत बोलताना जिभेवर साखर ठेवणे, बोलताना संयम ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पोटाच्या तक्रारी वाढू शकतात. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल.
मिथुन राशीच्या लोकांना या आठवड्यात श्री गणेशाची उपासना केल्यास शुभ फळ मिळेल.
सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? | Cyber Security


कर्क राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( १० मार्च ते १६ मार्च २०२५ rashi bhavishya) कर्क राशीच्या लोकांना हा आठवडा सामान्य फळ देणारा असेल. नोकरी करणाऱ्या लोकांना या आठवड्यात काही नवीन जबाबदारी मिळू शकतात. दिलेली जबाबदारी आपण यशस्वीरित्या पूर्ण कराल. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नजरेत आपली वेगळी छाप निर्माण होवू शकते. आरोग्याकडे लक्ष देणे. या आठवड्यात पोटाचे व घशाचे विकार होण्याची शक्यता आहे. कृपया दुर्लक्ष करू नये. या आठवड्यात खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. या आठवड्यात घराच्या डागडूजीवर पैसा खर्च होवू शकतो. विद्यार्थ्याना हा आठवडा अनुकूल आहे, अध्ययनात लक्ष लागेल. जोडीदारासोबत मनमोकळे बोलू शकता.
कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात देवीची उपासना करणे आवश्यक आहे.

सिंह राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( १० मार्च ते १६ मार्च २०२५ rashi bhavishya) सिंह राशीच्या लोकांना हा आठवडा संमिश्र फळ देणारा असणार आहे. या आठवड्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. चर्मरोग किंवा रक्तवाहिन्याचे विकार होवू शकतात. एखाद्या आर्थिक निर्णयासाठी कठोर पाऊले उचलावी लागतील. जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्हाला यश प्राप्त होवू शकेल. रखडलेली व्यवहारिक कामे मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात आनंद व सुख मिळण्यासाठी एकमेकांमध्ये समन्वय साधने आवश्यक आहे. जोडीदाराच्या हृदयात स्थान प्राप्त करा, त्यांच्या भवनाचा आदर करा. आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर दीर्घ काळ असणाऱ्या योजनेत विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास लाभ मिळेल.
सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात महादेवाची उपासना केल्यास शुभफल मिळेल.

कन्या राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( १० मार्च ते १६ मार्च २०२५ rashi bhavishya) कन्या राशीच्या लोकांना हा आठवडा सकारात्मक परिणाम घेवून येणारा असेल. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवेल. या आठवड्यात नवीन नवीन आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. आपल्यातील सकारात्मक गुणामुळे आपण आव्हानांना यशस्वीरित्या पार कराल. यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्याना कठोर मेहनत घेणे आवश्यक आहे. आज आपण जोडीदारासोबत बाहेर फिरण्याचा प्लान करू शकता. इतर कोणाकडून अपेक्षा केली असता पदरांत निराशा मिळेल. त्यामुळे इतरांवर अवलंबून न रहाता, स्वतः कामे पूर्ण केल्यास नक्की आनंद व समाधान प्राप्त होईल.
कन्या राशीच्या लोकांनी या आठवड्यात ॐ राहवे नम: या मंत्राचा किमान दिवसातून एकदा बसून किमान ४१ वेळा तरी जप करावे.

तूळ राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi) – ( १० मार्च ते १६ मार्च २०२५ rashi bhavishya) तुळ राशीच्या लोकांना हा आठवडा सामान्य फळ देणारा आठवडा असणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी ताण वाढू शकेल. व्यापारी लोकांना नव नवीन आवाहनांना सामोरे जावे लागेल. या आठवड्यात आरोग्य ठीक राहील. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवलास नक्की लाभ मिळेल. या आठवड्यात भविष्याबाबत गुंतवणूक करू शकता. विद्यार्थ्यानी यश प्राप्त करण्याकरिता इतर गोष्ठीवर लक्ष न देता अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची असल्यास दीर्घ काळ असणार्या योजनेत पैसे गुंतवू शकता. वैवाहिक जीवनात ताण तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
तुळ राशीच्या लोकांना या आठवड्यात ओम नमः शिवाय या मंत्राचा ११ वेळा जप केल्यास लाभ मिळेल.

वृश्चिक राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( १० मार्च ते १६ मार्च २०२५ rashi bhavishya) वृश्चिक राशीच्या लोकांना हा आठवडा शुभ फळ देणारा असेल. आरोग्याकडे मात्र लक्ष देणे आवश्यक आहे. या आठवड्यात तीव्र डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. आरोग्य ठीक रहाण्यासाठी, मानसिक ताण कमी होण्यासाठी योग व प्राणायाम करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याना शिक्षणासाठी बाहेर जायचे असल्यास हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात पूर्वी घडलेल्या गोष्ठी विसरून सुखी संसार करणे आवश्यक आहे. या आठवड्यात वाणीवर नियंत्रण ठेवावे अन्यथा आपल्या जवळची माणसे दुखावू शकतात. व्यापार करण्याऱ्या लोकांसाठी हा आठवडा लाभदायक आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना नोकरीच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. जमीन किंवा प्रोपर्टी खरेदी करायची असल्यास हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल आहे.
वृश्चिक राशीच्या लोकांनी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्यास लाभ मिळू शकेल.
Sanskar | संस्कार म्हणजे काय ? मुलांच्या अवस्था ? | Mulavar Sanskar kase karave |


धनु राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( १० मार्च ते १६ मार्च २०२५ rashi bhavishya) धनु राशीच्या लोकांना हा आठवड्या सामान्य फळ देणारा असेल. शेअर मार्केट मध्ये गुंतवणून करण्याचा विचार करत असल्यास या आठवड्यात ते टाळावे, हा आठवडा गुंतवणूक करण्यासाठी योग्य नाही. व्यापारी लोकानी या आठवड्यात लक्षपूर्वक व्यापार करावा. एखादी चूक आपले नुकसान करू शकते. या आठवड्यात उधार पैसे देवू नयेत. वैवाहिक जीवनात आनंद मिळण्यासाठी एकमेकाच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे. सेल्स व मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना हा आठवडा अनुकूल आहे. नोकरीच्या शोधात असणार्या लोकांना किंवा करत असलेली नोकरी बदलण्याचा विचार करत असलेल्या लोकांना नोकरीच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन करू शकता.
धनु राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात मारुतीची उपासना केली असता लाभ मिळेल.

मकर राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( १० मार्च ते १६ मार्च २०२५ rashi bhavishya) मकर राशीच्या लोकांना हा आठवडा शुभ फळ देणारा आहे. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक व शांतपणे निर्णय घेतल्यास या आठवड्यात यश प्राप्त होईल. कोणतेही काम करताना इतरांवर अवलंबून राहू नका. या आठवड्यात शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक नुकसानकारक असू शकते. आरोग्याची काळजी घेणे. तीव्र डोके दुखीचा त्रास होवू शकतो. हा आठवड्यात व्यापार संदर्भात प्रवास करावा लागू शकतो. घरात वायफळ खर्च झाल्याने मानसिक तणाव वाढू शकतो. जोडीदारासोबत मनमोकळे गप्पा मारण्यासाठी कुठे तरी बाहेर जाण्याचे नियोजन कराल.
मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात कुलदेवीची उपासना केली असता लाभ मिळेल.

कुंभ राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( १० मार्च ते १६ मार्च २०२५ rashi bhavishya) कुंभ राशीच्या लोकांना हा आठवडा सामान्य फळ देणारा असणार आहे. अनेक दिवसापासून एखादा आजार त्रास देत असल्यास त्रास कमी होईल. नोकरीच्या ठिकाणी विरोधकांचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. कोणत्याही चर्चेत सहभागी झाल्यास आपल्या वाणीवर व रागावर नियंत्रण ठेवावे. कुटुंबात वावरताना आपली मते त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करू नका. एखाद्या धार्मिक कार्यक्रमा करिता पैसे खर्च करू शकता. विवाहिक जीवनाकरिता हा आठवडा अनुकूल आहे, जोडीदारासोबत एखादे नवीन कार्य सुरु करू शकता. काम करत असताना कामाचे नियोजन केल्यास काम पूर्ण होईल. विद्यार्थ्याना अध्ययनात यश मिळेल.
कुंभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात कुलदेवतेची उपासना व गरिबांना अन्नदान केल्यास लाभ मिळेल.

मीन राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( १० मार्च ते १६ मार्च २०२५ rashi bhavishya) मीन राशीच्या लोकांना हा आठवडा शुभ फळ देणारा आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना हा आठवडा अनुकूल आहे. नोकरीच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. व्यापारी लोकांकरिता हा आठवडा शुभ फळ देणारा असेल. पूर्वी झालेल्या चुकांमधून सुधारणा करून जीवन जगणे आवश्यक आहे. या आठवड्यात आपले आरोग्य छान असेल. हा आठवडा आपल्यासाठी सकरात्मक व नवीन उर्जा व उस्ताह घेवून येणारा असेल. विद्यार्थ्यानी बौद्धिक चर्चेत सहभागी होवून आपल्यातील हुशारी दाखविणे आवश्यक आहे. बँकेतून कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना कर्ज मिळू शकेल. वैवाहिक जीवनासाठी हा आठवडा अनुकूल आहे. जोडीदारासोबत एखादे नवीन काम सुरु करू शकता. जोडीदाराची साथ मिळेल.
मीन राशीच्या लोकांनी ओम नमो विष्णवे नमः या मंत्राचा जप केल्यास लाभ मिळेल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)