Rashi Bhavishya | राशी भविष्य | Rashi Bhavishya in Marathi | Weekly Horoscope | Rashifal
Rashi Bhavishya : ०३ फेब्रुवारी ते ०९ फेब्रुवारी २०२५ या आठवड्याचे सर्व राशींचे #rashi bhavishya राशी भविष्य या लेखाद्वारे देत आहोत.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/1Aries.webp)
Rashi Bhavishya / Rashi bhavishya : मेष राशीचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( ०३ फेब्रुवारी ते ०९ फेब्रुवारी २०२५ rashi bhavishya) या साप्ताहिक मध्ये मेष राशीच्या लोकांना आव्हानांना सामोरे जावे लागेल. मानसिक स्थिती सकारात्मक ठेवल्यास चिंता नक्की कमी होईल. प्रकृती ठीक रहाण्यासाठी व्यायाम, योगासने व प्राणायाम करणे आवश्यक आहे. नोकरी करण्याऱ्या व्यक्तींनी कोणताही निर्णय घाईत घेवून नये, निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्यावे. आपल्या मुलांचे आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. कोणालाही उधार पैसे देताना विचारपूर्वक द्या, शक्यतो उधार पैसे देवू नका. या आठवड्यात जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. या दिवसात खर्चावर थोडे नियंत्रण ठेवावे.
![](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/2Taurus.webp)
वृषभ राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( ०३ फेब्रुवारी ते ०९ फेब्रुवारी २०२५ rashi bhavishya) वृषभ राशीच्या लोकांना हा सप्ताह सामान्य फळ देणारा असेल. सकारात्मक विचार करून काम केल्यास कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश प्राप्त होईल. आपल्या कार्याची योजनेची गुप्तता पाळणे आवश्यक आहे. एखादा निर्णय घेताना इतरांसोबत चर्चा केली तरी निर्णय घेताना स्वतः घेणे. कायदेविषयक बाबींचे नियम पाळावे. वैवाहीकांनी आपले नाते जपणे आवश्यक आहे, आपल्या जोडीदाराला आपल्या पासून आनंद कसा मिळेल याकडे लक्ष देणे. भविष्याची चिंता करण्यात विनाकारण वेळ घालवण्यापेक्षा वर्तमानात घडणाऱ्या गोष्ठी बाबत आनंद घ्या. प्रेमसंबंधात यश मिळेल.
आहार कसा निवडावा | Aahar Kasa Nivadava | योग्य आहार कसा घ्यावा? | Yogya Aahar Kasa Ghyava |
![](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2025/01/Aahar-Kasa-Nivadava-1024x536.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/3Gemini.webp)
मिथुन राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( ०३ फेब्रुवारी ते ०९ फेब्रुवारी २०२५ rashi bhavishya) मिथुन राशीच्या लोकांना हा सप्ताह सामान्य फळ देणारा असेल. नोकरीत बढती मिळण्याची वाट पहात असल्यास थोडी जास्त मेहनत करावी लागेल. तसेच नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकार्यांना अपेक्षित असे कामात प्रगती करून दाखवावी लागेल. कोणासोबत बोलताना, संभाषण करताना काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा गैरसमज होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवावे. आरोग्याकडे लक्ष देणे, वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यानी अभ्यासात लक्ष देणे आवश्यक आहे. प्रेमसंबधमध्ये असणाऱ्या जोडीदारांनी एकमेकाला समजून घेणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवन सुखी असेल.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/4Cancer.webp)
कर्क राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( ०३ फेब्रुवारी ते ०९ फेब्रुवारी २०२५ rashi bhavishya) कर्क राशीच्या लोकांना हा आठवडा शुभ फळ देणारा असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकेल. दिलेली जबाबदारी आपण यशस्वीरित्या पूर्ण कराल. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत आपली वेगळी छाप निर्माण होईल. या आठवड्यात खर्चावर नियंत्रण ठेवा. या आठवड्यात घराच्या डागडुजीवर खर्च होवू शकतो. आरोग्याबाबत काळजी घ्यावी. एखादा जुना आजाराबाबत काळजी न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे. वैवाहिक जीवन आनंदी होण्यासाठी काही गोष्टीची तडजोड करणे आवश्यक आहे. वाणीवर व रागावर नियंत्रण ठेवावे. दुसऱ्याचे मन दुखावेल किंवा अपमान होईल असे वागू नका. व्यापारी लोकांकरिता देखी हा आठवडा शुभ फळ देणारा आहे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/5Leo.webp)
सिंह राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( ०३ फेब्रुवारी ते ०९ फेब्रुवारी २०२५ rashi bhavishya) सिंह राशीच्या लोकांना हा सप्ताह मध्यम फळ देणारा असेल. कामाच्या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागेल. व्यापाऱ्यांना देखील या आठवड्यात शुभ फळ मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या निर्णयासाठी आर्थिक कठोर पाऊले उचलावी लागतील. जिद्द व आत्मविश्वास या जोरावर यश मिळू शकेल. रखडलेले व्यवहार मार्गी लागतील. वैवाहीकाना जीवन सुखद होण्यासाठी जोडीदारासोबत समन्वय साधने आवश्यक आहे. जोडीदाराच्या हृदयात स्थान प्राप्त करा. त्यांच्या भावनाचा आदर करा. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना हा आठवडा शुभ फळ देणारा आहे. या आठवड्यात उधार पैसे देवू नये.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/6Virgo.webp)
कन्या राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( ०३ फेब्रुवारी ते ०९ फेब्रुवारी २०२५ rashi bhavishya) कन्या राशीच्या लोकांना हा आठवडा संमिश्र फळ देणारा असेल. नोकरी करणाऱ्या नोकरदार वर्गाला या आठवड्यात भरपूर मेहनत करावी लागेल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल. या आठवड्यात आवाहानाना सामोरे जाण्याची मानसिक तयारी ठेवणे. सकारात्मक मानसिकता ठेवल्यास आलेल्या आवाहनाला यशस्वीरित्या हातालाल. विध्यार्थ्यांना जास्त मेहनत घ्यावी लागेल. जोडीदारासोबत बाहेर फिरण्याचा बेत आखू शकता. इतर लोकांच्या जीवनाशी तुलना केल्यास्त पदरात दुःखच मिळेल, त्यामुळे समाधानी व आनंदी रहाण्याचा प्रयत्न करा. जीवन फार सुंदर आहे.
सहवास आणि सुसंवाद हे दोन कोणत्याही सुदृढ नात्याचे बीजमंत्र आहेत.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/12/SANSKAR1-1024x679.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/7Libra.webp)
तूळ राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi) – ( ०३ फेब्रुवारी ते ०९ फेब्रुवारी २०२५ rashi bhavishya) तुळ राशीच्या लोकांना आजचा आठवडा सामान्य फळ देणारा असेल. कामाच्या ठिकाणी कामाचे ताण वाढेल. व्यापारी वर्गातील लोकांना अनेक आवाहनाला सामोरे जावे लागेल. या आठवड्यात आपण भविष्याबाबत उत्तम नियोजन करू शकता. जुनी येणी वसूल होतील. विद्यार्थ्याना यशस्वी होण्यासाठी इतर गोष्ठीकडे लक्ष न देता एकाग्रतेने अभ्यास करणे आवश्यक आहे. आरोग्याच्या तक्रारीवर दुर्लक्ष करू नये. वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होवू शकते व त्यामुळे मानसिक तणाव वाढेल.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/8Scorpio.webp)
वृश्चिक राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( ०३ फेब्रुवारी ते ०९ फेब्रुवारी २०२५ rashi bhavishya) वृश्चिक राशीच्या लोकांना हा आठवडा सामान्य फळ देणारा असेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना देखील हा सप्ताह सामान्य फळ देणारा असेल. मानसिक ताण कमी करण्यासाठी या आठवड्यात प्राणायाम व योगा यावर लक्ष केंद्रित करा. ज्या विद्यार्थ्याना शिक्षणासाठी बाहेर जाण्याची इच्छया असेल तर त्यांना हा आठवडा अनुकूल आहे. वैवाहीकांनी पूर्वीच्या गोष्ठी विसरून आनंदी संसार करणे. प्रेम संबंधात कोणताही तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/9Sagittarius.webp)
धनु राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( ०३ फेब्रुवारी ते ०९ फेब्रुवारी २०२५ rashi bhavishya) धनु राशींच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींसाठी अनुकूल परिस्थिती आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना विचारपूर्वक गुंतवणूक करावी. व्यापारी वर्गातील व्यक्तींकडून एखादी चूक घडल्यास नुकसान भोगावे लागले त्यामुळे लक्षपूर्वक व्यवहार करावा. कोणालाही उधार मध्ये पैसे देवू नका. वैवाहिक जीवनात आनंद मिळण्यासाठी वेळप्रसंगी तडजोड करणे आवश्यक आहे. विद्यार्थीवर्ग जर एखाद्या परीक्षेची तयारी करत असती तर त्यांच्या आत्मविश्वासामुळे, मेहनतीमुळे ते यशस्वी होवू शकतात. जोडीदारासोबत बाहेर फिरण्याचा बेत आखू शकता.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/10Capricorn.webp)
मकर राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( ०३ फेब्रुवारी ते ०९ फेब्रुवारी २०२५ rashi bhavishya) हा आठवडा मकर राशीच्या लोकांना शुभ फळ देणारा असा आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणार्या व्यक्तींना अनुकूल परिस्थिती आहे, त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे नोकरी मिळण्याची शक्यता आहे. शांत विचाराने निर्णय घेतल्याने यशस्वी होवू शकता. कोणतेही काम करताना इतरांवर अवलंबून राहू नका. या आठवड्यात शेअर मार्केटमधील गुंतवणूक नुकसानकारक होवू शकते म्हणून शक्यतो गुंतवणूक टाळा. आरोग्याची काळजी घ्यावी. दिनचर्येची सुरुवात योगा व प्राणायाम करून करावी. कामाच्या ठिकाणी जबाबदारीची कामे असल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळावी. वैवाहिक जीवनात सौख्य प्राप्त होईल. जोडीदाराला वेळ देणे आवश्यक आहे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/11Aquarius.webp)
कुंभ राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( ०३ फेब्रुवारी ते ०९ फेब्रुवारी २०२५ rashi bhavishya) कुंभ राशीच्या लोकांना हा आठवडा संमिश्र फळ देणारा आहे. नोकरीच्या शोधात असणार्या व्यक्तींना नोकरी मिळण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. व्यावसायिकांना व्यवसायात उत्तम फायदा होईल. कामाच्या ठिकाण किंवा इतर ठिकाणी विरोधकांचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. बौद्धिक चर्चेत सहभागी झाल्यास वाणीवर व रागावर नियंत्रण ठेवावे. आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नये. काम करत अस्ताताना वेळेचे व कामाचे नियोजन करावे. आरोग्याची काळजी घ्यावी. सकाळी उठून चालणे, व्यायाम करणे हे आपल्या दिनचर्येत समाविष्ठ करा. वैवाहिक जीवनात ताण तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्यातील वाद विवाद इतर कोणासमोर उघड होणार नाही याची काळजी घ्या.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/12Pisces.webp)
मीन राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( ०३ फेब्रुवारी ते ०९ फेब्रुवारी २०२५ rashi bhavishya) मीन राशीच्या लोकांना हा आठवडा अनुकूल असेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना हा आठवडा अनुकूल असा असणार आहे. व्यापारी वर्गासाठी देखील हा आठवडा अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या चुकांमधून सुधारणा करून जीवन जगणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या विचारांचा सन्मान करा. आपले विचार त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करू नका. या आठवड्यात आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याना बौद्धिक चर्चेत सहभागी होवून आपले हुन्नर दाखविण्याची संधी आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)