आजचे राशी भविष्य मराठी (मंगलवार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२४)
Today Rashi Bhavishya Marathi : मेष राशी (Aries Daily Horoscope) – आज चंद्र रास बदलून कन्या राशीत प्रवेश करेल. मेष राशीकरिता चंद्र आज सहाव्या स्थानी आहे. #aajache rashi bhavishya एखाद्या व्यवहारातून आपल्याला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. #rashi bhavishya सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळपणामुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. प्रकृती थोडी ठीक नसल्याने कदाचित कामात थोडे लक्ष विचलित होईल. अविवाहित लोकांसाठी चांगले नाते येऊ शकते. कुटुंबात काही शुभ किंवा शुभ कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात, #aajche rashi bhavishya ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य व्यस्त राहतील आणि तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. गोड आश्वासन देणाऱ्यापासून सावधान रहा. व्यवसाय व नोकरीत रूळण्यात थोडा वेळ जाईल.
आजचा भाग्यांक : २
शुभ रंग : पांढरा
वृषभ राशी (Taurus Daily Horoscope) – वृषभ राशीतील व्यक्तींचा चंद्र रास बदलून कन्या राशीत प्रवेश करेल. चंद्र पाचव्या स्थानात आहे. आर्थिक नियोजन करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. आपल्या बोलण्या चालण्यातून इतरांवर प्रभाव पडेल. कुटुंबियांनी दिलेला #aajache rashi bhavishya चांगला सल्ला आज तुमच्यासाठी लाभदायक फळ देणारा असेल. प्रेम जीवन जगणारे लोक त्यांच्या जोडीदारासोबत लाँग ड्राईव्हवर जाण्याची योजना आखतील. कुटुंबातील सदस्याकडून काही जबाबदारी आली तर ती वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक खर्चामुळे तुम्ही थोडे तणावग्रस्त व्हाल, ज्यावर नियंत्रण ठेवण्याचा विचार तुम्हाला करावा लागेल. तुमच्यावर जास्त काम केल्यामुळे मानसिक तणाव राहील. बुद्धिवान लोकांशी सलोख्याचे संबध वाढतील. सकाळचा नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. आर्थिक गुंतवणूक करताना पूर्ण विचारांनी करा. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. आज दिवसभरात आनंदाचे क्षण अनुभवाल त्यामुळे तुम्ही भावूक होण्याची शक्यता आहे.
आजचा भाग्यांक : २
शुभ रंग : पांढरा
मिथुन राशी (Gemini Daily Horoscope) – आज चंद्र रास बदलून कन्या राशीत येणार असून चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. आजचा परगावी प्रवास फारसा आरामदायी नसल्याने प्रवास #rashi bhavishya टाळण्याचा प्रयत्न करा. आपण विचारात मग्न राहाल. आज कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस चांगला जावा याकरिता आपण मनापासून काम करून आपली क्षमता दाखवून द्याल.
आजचा भाग्यांक – ९
शुभ रंग – लाल
कर्क राशी (Cancer Daily Horoscope) – आज कर्क राशीचा चंद्र रास बदलून कन्या राशीत प्रवेश करेल. चंद्र आज तिसऱ्या स्थानी आहे. आज पैसा जास्त खर्च होईल. छातीत जळजळ होवून #aajache rashi bhavishya छातीच्या विकारांचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे कदाचित झोप लागणार नाही. तब्येतीची काळजी घ्यावी. आज आपली मनस्थिती ठीक नसणार आहे. क्रिएटीव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. आरोग्याची काळजी सोडल्यास बाकी दिवस उत्तम आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी #rashi bhavishya वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा. यामुळे तुमच्या व्यक्तित्वात सकारात्मक परिवर्तन येईल. आज तुम्हाला मित्रांचा आधार लाभेल. #aajche rashi bhavishya बँकिंग क्षेत्रात काम करणारे लोक चांगल्या योजनेत गुंतवणूक करू शकतात. जर तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ते तुमच्यासाठी चांगले असेल. तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तूंचे रक्षण केले पाहिजे. तुमचा एखादा बॉस तुमच्यावर काही कामाची जबाबदारी टाकू शकतो, जी तुम्हाला पूर्ण करावी लागेल. पैशाचा ओघ लक्षात घेता भविष्यकाळात योग्य गुंतवणूक करणे हितकारक आहे.
आजचा भाग्यांक : ३
शुभ रंग : पिवळा
जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचे जन्मोत्सवानिमित्त जल्लोषात अभिष्टचिंतन | Jagadguru Narendracharyaji Maharaj | Nanijdham |
सिंह राशी (Leo Daily Horoscope) – आज चंद्र रास बदलून कन्या राशीत प्रवेश करणार असून चंद्र दुसऱ्या स्थानी असेल. आज #aajache rashi bhavishya मानसिक तणावातून चिंतामुक्त व्हाल. आजचा दिवस सुखाचा व समाधानाचा जाईल. भावंडांचे सहकार्य लाभेल. तुम्हाला तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यावी लागेल. तुमच्या आजूबाजूला कोणताही वाद निर्माण झाला तर तुम्ही त्याबाबत मौन बाळगावे, अन्यथा त्याची कायदेशीर बाबही बनू शकते. राजकीत क्षेत्रात आपला दरारा निर्माण होईल. कोणताही निर्णय घेताना भावनेच्या आहारी जाणे टाळा. रोजच्या चाकोरीचा कंटाळा आल्यामुळे काहीतरी वेगळे करण्याकडे कल असेल. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची #rashi bhavishya उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. आज आपण आपल्या जोडीदारासोबत गप्पा माराल, त्यामुळे तुम्हाला जाणवेल कि तुमचे एकमेकांवर किती प्रेम आहे.
आजचा भाग्यांक : २
शुभ रंग : पांढरा
कन्या राशी (Virgo Daily Horoscope) –आज चंद्र रास बदलून कन्या राशीत प्रवेश करेल. प्रथम स्थानी चंद्र असेल. आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. शारीरक स्वास्थ छान राहील. आज कुटुंबात आनंदी #aajache rashi bhavishya वातावरण राहणार असून आपली निर्धारित कामे पूर्ण होतील. नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका. मालमत्तेशी संबंधित कोणतीतरी बाब तुम्हाला त्रास देईल. जर तुम्ही एखाद्याला कर्ज वगैरे घेण्यास सांगितले असेल, तर तुम्हाला ते देखील मिळू शकते. तुमच्या सासरच्या व्यक्तीचे तुमच्याशी मतभेद होऊ शकतात. तुमचा बॉस तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रमोशन देऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला एका ठिकाणाहून दुसरीकडे जावे लागेल. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल.
आजचा भाग्यांक – ९
शुभ रंग – लाल
तुळ राशी (Libra Daily Horoscope) – चंद्र रास बदलून कन्या राशीत प्रवेश करेल. चंद्र बाराव्या स्थानी असेल. आर्थिक नियोजनाला महत्व द्या. आपण नियोजनबध्द केलेली कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल. आज स्वतःच्या आनंदाकरिता पैसा खर्च कराल. तुमचा जोडीदार तुम्हाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेल. आज तुमच्यासाठी धन कमावण्याच्या बऱ्याच संधी चालून येतील. त्याचा योग्य फायदा उचला. तुम्हाला तुमच्या मोठ्यांच्या बोलण्याकडे लक्ष #rashi bhavishya द्यावे लागेल, कारण तेच तुम्हाला काही चांगले काम करण्याचा सल्ला देतील. कुटुंबातील कोणताही सदस्य घरापासून दूर असेल तर तो तुम्हाला भेटायला येऊ शकतो. काही रोचक मॅगझीन किंवा उपन्यास वाचून तुम्ही आजचा दिवस चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकतात. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल, तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल.
आजचा भाग्यांक : २
शुभ रंग : पांढरा
Marathi Motivational Quotes | प्रेरणादायी सुविचार मराठी | Success Quotes In Marathi
वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope) – चंद्र रास बदलून कन्या राशीत प्रवेश करेल. चंद्र लाभ स्थानी आहे. आज प्रकृती साथ देणार नाही. वैद्यांच्या सल्ला आणि योग्य इलाज #aajache rashi bhavishya घेण्याची आवश्यकता निर्माण होऊ शकते. कुटुंबियांशी वाद विवाद होण्याची शक्यता आहे. शक्यतो वाद टाळावे. #rashi bhavishya वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध होऊ शकतो, पण तुम्ही डोकं शांत ठेवणे गरजेचे आहे. रात्री ऑफिस मधून घरी येण्याच्या वेळी सावधानतेने वाहन चालवले पाहिजे. काळजी घ्यावी.
आजचा भाग्यांक – ४
शुभ रंग – करडा
धनु राशी (Sagittarius Daily Horoscope) – चंद्र रास बदलून कन्या राशीत प्रवेश करेल. दहाव्या स्थानी चंद्र आहे. आज मनसोक्त जेवणाचा आनंद घ्याल. कौटुंबिक आणि वैवाहिक सुख मिळेल. आज प्रवास योग आहे. मित्रांसोबत, कुटुंबियांसोबत एखाद्या रम्य ठिकाणी #aajache rashi bhavishya सहलीला जाण्याची शक्यता आहे. आनंद घ्याल. व्यावसायिक स्तरावर जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल.
आजचा भाग्यांक : १
शुभ रंग – नारंगी
मकर राशी (Capricorn Daily Horoscope) – चंद्र रास बदलून कन्या राशीत प्रवेश करेल. चंद्र भाग्य स्थानी आहे. मुलांच्या अभ्यासातील प्रगती पाहून समाधान प्राप्त होईल. आजचा दिवस व्यवसायाकरीता लाभदायक #rashi bhavishya असून त्याकरिता धावपळ होईल. मित्र व कुटुंबियांकडून लाभ होतील. कुटुंबातील सदस्य पाठिंबा देतील पण त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षादेखील वाढलेल्या असतील.
आजचा भाग्यांक : १
शुभ रंग : नारंगी
कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope) – चंद्र रास बदलून कन्या राशीत प्रवेश करेल. आज चंद्र आठव्या स्थानी आहे. प्रवास योग संभवतो. संततीबाबत चिंता निर्माण होईल. आज कामात उत्साह वाटणार नाही. आज #aajache rashi bhavishya करमणूकीवर खर्च कराल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची नाराजगी सहन करावी लागेल. क्रिएटीव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. आज दीर्घकालाकरीता गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
आजचा भाग्यांक – ८
शुभ रंग – निळा
Diwali | Diwali Faral | दिवाळी फराळाच्या रेसिपीज आणि तळण करण्यासाठी योग्य वेळांचं वेळापत्रक
मीन राशी (Pisces Daily Horoscope) – आज चंद्र रास बदलून कन्या राशीत प्रवेश करेल. चंद्र #aajache rashi bhavishya सातव्या स्थानात आहे. आज यश व प्रसिद्धी मिळेल. आज आपल्यातील कलागुणांना वाव मिळणार आहे. आज दिवसभरातील कामे व्यवस्थित पूर्ण होतील, ज्यामुळे तुम्हाला आनंद प्राप्त होईल. व्यस्त #rashi bhavishya दिनचर्येच्या व्यतिरिक्त ही आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात यशस्वी व्हाल. रिकाम्या वेळात काहीतरी रचनात्मक कार्य हातून घडण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा.
आजचा भाग्यांक : ६
शुभ रंग – गुलाबी
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)