Today Rashi Bhavishya in marathi| आजचे राशी भविष्य मराठी (शुक्रवार, २७ डिसेंबर २०२४) |Aajche Rashi bhavishya
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-01.png)
Rashi Bhavishya / Rashi bhavishya Today : मेष राशी (Aries Daily Rashifal) – आज शुक्रवार चंद्र तुळ राशीत #rashi bhavishya असून आपल्या राशीपासुन चंद्र सातव्या स्थानी आहे. आपल्या आचरणातून चूकीचे संदेश जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही व्यक्तीला क्षुल्लक लेखू नका. आपल्या कामाचे योग्य नियोजन करायला हवे. वरिष्ठांशी वादाचे विषय टाळावेत. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. अचानकपणे हाती असलेल्या कार्यात बदल करू नका. बोलताना शब्द अतिशय जपून वापरावा लागणार आहे. प्रलंबित अडचणी प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला कोठेना कोठे तरी सुरुवात कराविच लागेल. म्हणून सकारात्मक विचाराने आजच त्या दिशेने प्रयत्न सुरू करा. भाग्यापेक्षा कर्मावर अधिक विश्वास हवा. ज्येष्ठांबरोबर होणारे वादाचे विषय टाळा. त्यांच्याशी सामंजस्याची भूमिका घ्या. भाग्यांक :- 7
भाग्य रंग :- पांढरा
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-02.png)
वृषभ राशी (Taurus Daily Rashifal) – आज शुक्रवार #rashi bhavishya चंद्र तुळ राशीत असून आपल्या राशीपासुन चंद्र सहाव्या स्थानी आहे. मनातील गोंधळाचे विचार बाजूला ठेवा. स्थिर मनाने विचार करा. समोरील व्यक्ती आपल्यावर छाप पाडण्याचा प्रयत्न करील, अशा व्यक्तींचा हेतू जाणून घ्या. द्विस्वभाव वृत्ती सोडून द्या. तुम्ही स्वत:हून ठरवून घेतलेले शैक्षणिक उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नशील राहा. दुसर्यांच्या प्रगतीने उदास न होता स्वतःच्या ध्येयावर लक्ष द्या. आज आपल्या विवेक वापर करून कुटुंबियातील सदस्यांसोबत बोला जर तुम्ही असे नाही केले तर, व्यर्थ भांडणांवर तुमचा वेळ खर्च होऊ शकतो. व्यसनाच्या आहारी न जाता कामाकडे लक्ष द्या. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घाला. आपल्या लहरी व हट्टी स्वभावाला थोडी मुरड घाला. भाग्यांक :- 6
भाग्य रंग :- गुलाबी
Acidity | Apachan | अपचन-गॅसेसचा त्रास होतो? डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला तातडीने वाचा….
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/apachan-1024x576.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-03.png)
मिथुन राशी (Gemini Daily Rashifal) – आज शुक्रवार #rashi bhavishya चंद्र तुळ राशीत असून आपल्या राशीपासुन चंद्र पाचव्या स्थानी आहे. महत्त्वाकांक्षा जिवंत ठेवल्यास उत्साह टिकून राहतो. बोलण्यावर नियंत्रण राखा. अनावश्यक राग करू नका. झोपेच्या वेळा पाळा. एखादया व्यक्तीचे अनुकरण करून आपली खाण्याची पद्धती बदलू नका. तब्बेतीविषयी डॉक्टरांकडून वेळच्या वेळी तपासणी करून घ्या. स्वत:ची बुद्धी जागृत ठेवा. एखाद्याला दुखावले असेल तर त्याची माफी मागा. प्रत्येकजण चुका करतो, पण मूर्ख व्यक्ती चुकांची पुनरावृत्ती करतात हे लक्षात ठेवा. एखाद्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर पूर्ण त्यात झोकून देऊन काम करा. विद्यार्थ्यांना शिक्षणात मोठे यश मिळेल. आर्थिक स्थिती बलवान करण्याचा प्रयत्न करा. भाग्यांक :- 4
भाग्य रंग :- चॉकलेटी
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-04.png)
कर्क राशी (Cancer Daily Rashifal) – आज शुक्रवार #rashi bhavishya चंद्र तुळ राशीत असून आपल्या राशीपासुन चंद्र चवथ्या स्थानी आहे. स्वत:ची आत्मप्रौढी मिरवणे टाळावे. व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल. घेण्यापेक्षा देण्यात आनंद माना. कोणतीही गोष्ट फार न ताणता त्यातून सामंजस्याने कसा मार्ग काढता येईल हयाचा विचार करावयास हवा. इतरांच्या मनात प्रेरणेची ऊर्जा निर्माण करण्यात पुढाकार घेतल्यास त्यात यश मिळेल. प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शांतपणे काम करा आणि तुम्ही त्यात यशस्वी होईपर्यंत तुमच्या हेतूबद्दल कुणाला काही सांगू नका. खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. नावीन्याकडे तुमची झेप ठेवावी लागेल. इतरांची मदत मिळेल या आशेवर राहू नका. परिस्थितीपुढे माघार न घेता दृष्टिकोन सकारात्मक ठेवल्यास त्यातून मार्ग निघू शकेल. भाग्यांक :- 7
भाग्य रंग :- पांढरा
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-05.png)
सिंह राशी (Leo Daily Rashifal) – आज शुक्रवार #rashi bhavishya चंद्र तुळ राशीत असून आपल्या राशीपासुन चंद्र तिसऱ्या स्थानी आहे. लिखाणाला चांगला विषय सापडेल. विचारांचा पाया भक्कम असणारी माणसं संकटाला ठामपणे तोंड देतात. घडलेल्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्याचा विचार करू नका. कौटुंबिक प्रश्न असंतोष वादाचे प्रसंग होणार नाहीत याच्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. उच्च रक्तदाबाकडे जास्त लक्ष द्या. जंकफूड सोडा भाकरीकडे वळा. दिवसाची सुरवात जरी थोडी थकणारी राहील परंतु, जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. खाण्यापिण्यात हयगय करू नका. वैवाहिक जीवनात कटकटी होणार नाहीत याची काळजी घ्या. कायदेविषयक अडचणी तिथल्या तिथे सोडवाव्यात. भाग्यांक :- 6
भाग्य रंग :- गुलाबी
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-06.png)
कन्या राशी (Virgo Daily Rashifal) – आज शुक्रवार #rashi bhavishya चंद्र तुळ राशीत असून आपल्या राशीपासुन चंद्र दुसऱ्या स्थानी आहे. आत्मपरीक्षण केल्यास पुढील चुका टाळता येतील. जीवनात कोणत्याही पळवाटीचा अवलंब सध्या तरी करू नका. एकाचवेळी अनेक कार्य हाताळण्यास यश मिळणार नाही. वाजवीपेक्षा जास्त साहसी वृत्ती दाखवू नका. आपल्याला विश्रांतीची गरज भासेल. आज तुमची व्यस्त दिनचर्या असून ही स्वतःसाठी वेळ काढण्यात समर्थ असाल आणि या रिकाम्या वेळेत आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत चर्चा आणि गप्पा करू शकतात.कौटुंबिक जीवनात मतभेद तीव्र झाले तरी टोकाची भूमिका न घेता विसरा व क्षमा करा. आपल्या अभ्यासशैलीत आवश्यक तो सुधार करा. मनाची एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करा. भाग्यांक :- 4
भाग्य रंग :- चॉकलेटी
Aarogya | स्वतःचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी |आरोग्य
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/aarogya_5.jpg)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-07.png)
तुळ राशी (Libra Daily Rashifal) – आज शुक्रवार #rashi bhavishya चंद्र तुळ राशीत असून आपल्या राशीपासुन चंद्र प्रथम स्थानी आहे. आनंदात जगत राहा व दुसर्याला जगवा. सरकारी कामातून लाभ होईल. धंदा व्यवसायाच्या विस्तारासाठी प्रयत्नशील राहाल. सर्व व्यवहार मुत्सद्दीपणे पार पाडाल. नोकरदारांना वरचा दर्जा लाभेल. रोजगाराची नवीन संधी सहजगत्या उपलब्ध होईल. प्रेमाचा अतिरेक होणार नाही याकडे लक्ष ठेवा. प्रिय व्यक्तीच्या लहानसहान अपेक्षांचा अंदाज घ्या. आज तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमाविण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. वैवाहिक सौख्य वृद्धिंगत करण्यासाठी घरातील वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. भाग्यांक :- 7
भाग्य रंग :- पांढरा
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-08.png)
वृश्चिक राशी (Scorpio Daily Rashifal) – आज शुक्रवार #rashi bhavishya चंद्र तुळ राशीत असून आपल्या राशीपासुन चंद्र बाराव्या स्थानी आहे. आपल्या विचारांमध्ये सुधारणा करा. वैयक्तिक जीवनात सांभाळून वागल्यास पश्चात्ताप करायला लागणार नाही. आपली सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा. स्थावराची कामे करताना ती विचारपूर्वक करावयास हवीत. आपल्या हातून एखादे धार्मिक काम होण्याची शक्यता आहे. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. व्यवसायात व्यापार्यांनी काही रचनात्मक बदल केल्यास असे बदल आपणास फायदेशीर ठरतील. नोकरीत असल्यास मन लावून काम करा. भाग्यांक :- 8
भाग्य रंग :- काळा
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-09.png)
धनु राशी (Sagittarius Daily Rashifal) – आज #rashi bhavishya शुक्रवार चंद्र तुळ राशीत असून आपल्या राशीपासुन चंद्र लाभ स्थानी आहे. आपल्या विकासाची दीर्घकालीन योजना आखायला हवी. नावीन्याकडे तुमची झेप ठेवावी लागेल. कोणतेही प्रश्न चर्चा करून सोडवा. नात्यातील प्रेमळ धागा जपा. इतरांमधील गैरसमज दूर करा. प्रेमसंबंधात वाढ करण्याचा प्रयत्न करा. प्रिय व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा योग्य मान राखा. विवाहाची बोलणी करण्यापूर्वी आलेल्या स्थळाची नीट माहिती घेऊन मग योग्य तो निर्णय घ्या. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक कर्तव्य पूर्ण करा. ज्येष्ठ व्यक्तींचा मान राखा. भाग्यांक :- 5
भाग्य रंग :- हिरवा
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-10.png)
मकर राशी (Capricorn Daily Rashifal) – आज शुक्रवार #rashi bhavishya चंद्र तुळ राशीत असून आपल्या राशीपासुन चंद्र दहाव्या स्थानी आहे. तुमच्या सेवावृत्तीला पुर्वसुकृताची जोड लाभेल. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. आपले प्रयत्न चुकीच्या दिशेने चालू राहणार नाहीत याची काळजी घ्या. नीट नियोजन करून अर्थार्जनासोबत धन संचय करा. उधार उसनवारीचे व्यवहार तुम्हाला हितकारक ठरणार नाही. घरातील लहान मुलांकडे लक्ष द्या. नातेवाईकांच्या शेरेबाजीचा जास्त विचार करू नका. आज तुम्ही छोटी छोटी पण महत्त्वाची प्रलंबित कामे हातावेगळी करू शकाल. घरातील माणसांची मने सांभाळा. प्रेमाची व्यक्ती तुटकपणे वागण्याची शक्यता आहे. भाग्यांक :- 5
भाग्य रंग :- हिरवा
Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/face-glow-tips-1-1.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-11.png)
कुंभ राशी (Aquarius Daily Rashifal) –आज शुक्रवार #rashi bhavishya चंद्र तुळ राशीत असून आपल्या राशीपासुन चंद्र भाग्य स्थानी आहे. इतरांच्या मनात प्रेरणेची ऊर्जा निर्माण करण्यात पुढाकार घ्या. आपल्या जीवनाशी निगडीत असलेल्या व्यक्तींच्या विचारांचा पगडा तुमच्यावर राहील. यशस्वी होण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी ठेवा. स्वत:ची बुद्धी जागृत ठेवा. झेपतील अशाच जबाबदार्या घ्या. थोडे हिशोबी राहणे आवश्यक आहे. करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. अडथळयांची पर्वा न करता तुमचे प्रयत्न वाढवण्याचा सतत प्रयत्न करावयास हवा. कुठल्याही मित्रपरिवारातील व्यक्तीस उधार देणे टाळा. भाग्यांक :- 3
भाग्य रंग :- पिवळा
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-12.png)
मीन राशी (Pisces Daily Rashifal) – आज शुक्रवार #rashi bhavishya चंद्र तुळ राशीत असून आपल्या राशीपासुन चंद्र आठव्या स्थानी आहे. अती आत्मविश्वास बाजूस ठेवून योग्यवेळी योग्य धोरण राबवणे हिताचे ठरेल. हितचिंतकांच्या सल्ल्यांनी चांगले निर्णय घ्या. आपल्या जबाबदार्या सांभाळूनच धाडस करा. स्थिर वृत्ती राखल्यास आयुष्यात अधिक सफलता येईल. लहानसहान गोष्टी मनाला लावून घेऊ नका. आपल्या विकासाची दीर्घकालीन योजना राबविल्यास ती श्रेयस्कर ठरेल. इतरांना मदत करण्याच्या वृत्तीत वाढ होईल. विवाहाचा परमानंद काय असतो, याची जाणीव आज तुम्हाला होईल. नावीन्याकडे आपली झेप ठेवावी लागेल. स्वत:ची बुद्धी जागृत ठेवा. भाग्यांक :- 1
भाग्य रंग :- नारंगी