Today Rashi Bhavishya in marathi| आजचे राशी भविष्य मराठी (गुरुवार, ९ जानेवारी २०२५) |Aajche Rashi bhavishya
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-01.png)
Rashi Bhavishya / Rashi bhavishya Today : मेष राशीचे आजचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Aajche Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र प्रथम स्थानी आहे. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. व्यवसायातील तुमच्या काही योजना पूर्णत्वास जाण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुमचा तणाव वाढेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न कराल, त्यामुळे तुमच्या कामात गोंधळ निर्माण होऊ शकतो. घाईघाईने निर्णय घेणे टाळावे लागेल. काही कौटुंबिक बाबींमध्ये तुम्ही तुमच्या आईचा सल्ला घेऊ शकता. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक १ आहे व आपल्यासाठी आजचा रंग नारंगी आहे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-02.png)
वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र बाराव्या स्थानी आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समस्यांनी भरलेला असणार आहे. आज तुम्ही इतरांकडून जे काही ऐकाल त्यावर विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीची शहानिशा करा आणि निर्णय घ्या. राजकारणात काम करणाऱ्या लोकांना मोठ्या नेत्याला भेटण्याची संधी मिळेल. तुमच्या काही चुका तुमच्या कुटुंबातील सदस्यांसमोर उघडकीस येऊ शकतात, ज्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांकडून फटकारले जाऊ शकते. तुम्ही तुमच्या घरासाठी चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी चांगलाच पैसा खर्च कराल. त्यामुळे खिशाला कैची बसण्याची शक्यता आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ९ आहे व आपल्यासाठी आजचा रंग लाल आहे.
आहार कसा निवडावा | Aahar Kasa Nivadava | योग्य आहार कसा घ्यावा? | Yogya Aahar Kasa Ghyava |
![](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2025/01/Aahar-Kasa-Nivadava-1024x536.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-03.png)
मिथुन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र लाभ स्थानी आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा दिवस आहे. तुम्ही सहलीला जात असाल तर तुमच्या मौल्यवान वस्तूंचे रक्षण करा. अन्यथा वस्तू हरवण्याचा, गहाळ होण्याचा, चोरीला जाण्याचा संभव आहे. स्पर्धेची भावना तुमच्या मनात कायम राहील. एखाद्याच्या मदतीसाठी तुम्ही पुढे याल. तुम्हाला तुमच्या भावंडांकडून कामाबाबत काही सल्ला घ्यावा लागेल. मुले तुमच्याकडून त्यांची आवडती वस्तू, पदार्थ मागू शकतात. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ७ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-04.png)
कर्क राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) –आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र दहाव्या स्थानी आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कायदेशीर बाबींमध्ये चांगला जाणार आहे. कोर्टकचेरी च्या कामात गती मिळेल. आरोग्यविषयक जर तुम्हाला पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर ती देखील बऱ्याच प्रमाणात दूर होईल. व्यवसायात चांगला नफा मिळेल. कोणी काय बोलले म्हणून हूरळून जाऊ नका. पैशाशी संबंधित कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. व्यवसायातही तुमच्या योजनांमधून चांगला नफा न मिळाल्याने काही तणाव जाणवण्याची शक्यता आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक २ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-05.png)
सिंह राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र भाग्य स्थानी आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. रोजगाराच्या शोधात इकडे-तिकडे भटकणाऱ्या लोकांना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. कामाशी संबंधित काही अडचण असेल तर तीही आज सोडवली जाईल. तुमच्या कामाच्या ठिकाणी काही मुद्द्यावरून तुमच्या बॉससोबत वाद होण्याची शक्यता आहे. काही वडिलोपार्जित संपत्ती मिळाल्यानंतर तुमचे मन प्रसन्न राहील. कुटुंबात काही शुभ कार्यक्रमाची पूर्वतयारी होण्याची शक्यता आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ९ आहे व आपल्यासाठी आजचा रंग लाल आहे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-06.png)
कन्या राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र आठव्या स्थानी आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावधगिरी बाळगण्याचा दिवस असणार आहे. तुम्हाला तुमच्या कामात थोडी काळजी घ्यावी लागेल. जर तुम्हाला नवीन वाहन घ्यायचे असेल तर आजचा दिवस त्यासाठी योग्य असणार आहे. परंतु कोणतेही काम नशिबावर सोडू नका, अन्यथा ते पूर्ण करण्यात अडचणी येतील. तुमच्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. तुम्ही तुमच्या लाइफ पार्टनरसाठी व्यवसाय सुरू करू शकता. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ७ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-07.png)
तूळ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र सातव्या स्थानी आहे.तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक दृष्टिकोनातून चांगला जाणार आहे. नोकरीत काम करणाऱ्या लोकांच्या कामाचे कौतुक होईल. प्रेम जीवन जगणारे लोक त्यांच्या जोडीदारासोबत लाँग ड्राईव्हवर जाण्याची योजना आखू शकतात, ज्यामुळे दोघांनाही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याची संधी मिळेल. तुमच्या व्यवसायात छोट्या छोट्या नफ्याच्या योजनांना सध्या गती देऊ नये. थोडी सबुरी ठेवावी लागेल. विद्यार्थी त्यांच्या परीक्षेच्या तयारीत व्यस्त राहतील. चांगली तयारी केली तर यश प्राप्ती संभवते. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक १ आहे व आपल्यासाठी आजचा रंग नारंगी आहे.
पालक नोकरीच्या #nokari फायद्याचा आणि तोट्याचा विचार करतात.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/11/Business.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-08.png)
वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र सहाव्या स्थानी आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने चांगला जाणार आहे. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना जर काही आजार असेल तर त्यांची स्थिती आज पूर्वीपेक्षा चांगली असणार आहे. एखाद्याने काही सांगितले तर तुम्हाला वाईट वाटेल, पण तरीही तुम्ही त्यांना काहीही बोलणार नाहीत हे डोक्यात पक्के ठरवून ठेवावे. तुम्ही तुमच्या कामासाठी लांबच्या प्रवासालाही जाऊ शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या घरी पाहुण्यांच्या आगमनामुळे कुटुंबातील सर्व सदस्य व्यस्त राहतील. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ३ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पिवळा आहे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-09.png)
धनु राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र पाचव्या स्थानी आहे. धनु राशीच्या लोकांनी आज घाईघाईने आणि भावनिक होऊन कोणताही निर्णय घेणे टाळावे. जर तुम्ही एखाद्याला वचन दिले असेल तर ते तुम्ही सहज पूर्ण करू शकाल. जर तुमची कोणतीही आवडती वस्तू हरवली असेल, तर तुम्हाला ती आज सापडण्याची शक्यता आहे. व्यवसायात कोणाशी भागीदारी करण्यापूर्वी तुम्हाला त्याची सखोल चौकशी करावी लागेल. तुमच्या मुलाला पुरस्कार, एखादे बक्षीस मिळाल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ९ आहे व आपल्यासाठी आजचा रंग लाल आहे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-10.png)
मकर राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र चवथ्या स्थानी आहे. मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. कायदेशीर बाबींमध्ये दिवस चांगला जाईल. तुमचे कोणतेही प्रकरण कायद्याच्या वादात असेल तर त्यात तुमचा विजय होईल आणि निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकेल. कोणत्याही भांडणापासून दूर राहिल्यास तुमच्यासाठी चांगले राहील. तुमचा जीवनसाथी तुमच्या कामात तुम्हाला पूर्ण साथ देईल, ज्यामुळे दोघांमधील बॉन्डिंग देखील चांगले राहील. एकंदरीत आजचा दिवस कौटुंबिक एकोप्याचा राहील. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ९ आहे व आपल्यासाठी आजचा रंग लाल आहे.
शेतकरी पैशाने श्रीमंत तर होईलच परंतु देश मात्र संपन्न आणि समृद्ध होईल. #agriculture
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/11/agriculture.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-11.png)
कुंभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र तिसऱ्या स्थानी आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी असणार आहे. तुमच्या तब्येतीत चढ-उतार असतील तर तेही बऱ्याच प्रमाणात दूर होतील. जर तुम्ही दीर्घकाळापासून संपत्तीशी संबंधित कोणत्याही डीलबद्दल चिंतेत असाल, तर ते देखील आज निश्चित केले जाऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. आज तुमच्या कुटुंबात छोटी मोठी भांडणे होण्याची शक्यता आहे, तुम्ही घरी राहून ही भांडणे सोडवल्यास चांगले होईल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ६ आहे व आपल्यासाठी आजचा रंग गुलाबी आहे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-12.png)
मीन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र दुसऱ्या स्थानी आहे. मीन राशीच्या लोकांसाठी आजचा सावधगिरीने राहण्याचा दिवस आहे. तुम्हाला तुमच्या मुलाच्या संगतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल आणि कुटुंबात बोलताना तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल, कारण तुम्ही एखाद्याला असे काही बोलू शकता ज्यामुळे त्यांना वाईट वाटेल. तुमच्याकडून माणूस दुखावला जाऊ शकतो त्यामुळे शांत डोक्याने विचार करून बोलावे. राजकारणात तुम्ही विचारपूर्वक पुढे जा, कारण तुमचे विरोधक सावधपणे खेळी खेळू शकतात. तुम्ही तुमच्या आईला तुमच्या मातृपक्षातील लोकांना भेटायला घेऊन जाऊ शकता. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ४ आहे व आपल्यासाठी आजचा रंग करडा आहे.