Today Rashi Bhavishya in marathi| आजचे राशी भविष्य मराठी (मंगलवार, ७ जानेवारी २०२५) |Aajche Rashi bhavishya

Rashi Bhavishya / Rashi bhavishya Today : मेष राशीचे आजचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Aajche Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीत चंद्र बाराव्या स्थानी आहे. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. व्यवसायात चांगला नफा मिळेल. त्यामुळे मिळकत चांगली राहील. कोणाशीही कुठल्याच कारणावरून वाद घालू नये. जर एखाद्या मालमत्तेशी संबंधित प्रकरण वादांमुळे कोर्टकचेरीच्या प्रकरणात अडकले असेल तर तुम्हाला त्यात काही अडचणी येतील, परंतु निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. उत्पन्नाचे स्रोत वाढल्याने तुम्ही आनंदी व्हाल. विद्यार्थी कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकतात. यश प्राप्तीसाठी ग्रहमान चांगले आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक 5 आहे व आपल्यासाठी आजचा रंग हिरवा आहे.

वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीत चंद्र लाभ स्थानी आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने थोडा कमजोर असणार आहे. तुमचे काही मित्र तुमचे शत्रू होऊ शकतात, त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहावे लागेल. मनातील सुखदुःख त्यांच्याकडे व्यक्त करू नका. आपल्या जबाबदाऱ्यांपासून अजिबात मागे हटू नका. विचार न करता कोणतेही काम हाती घेतले तर नंतर पश्चाताप होईल. तुम्ही तुमच्या घराचे नूतनीकरण करण्याचाही विचार करू शकता. तुमचे वडील तुमच्यावर एखाद्या गोष्टीबद्दल रागावू शकतात. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ४ आहे व आपल्यासाठी आजचा रंग करडा आहे.
पालक नोकरीच्या #nokari फायद्याचा आणि तोट्याचा विचार करतात.


मिथुन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीत चंद्र दहाव्या स्थानी आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चिंताजनक असणार आहे. तुमच्या मुलाच्या करिअरची तुम्हाला चिंता लागून राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमचा जोडीदार तुमच्या खांद्याला खांदा लावून कुटुंबासाठी मदत करेल आणि तुमच्या कामात तुम्हाला पूर्ण साथ देईल. राजकारणात तुम्ही विचारपूर्वक पुढे जावे, कारण तेथे तुमच्यासाठी समस्या तयार असणार आहेत. सावधपणे पाऊल उचलावे. त्यामुळे कोणी काही सांगितल्यास तुम्हाला वाईट वाटण्यापेक्षा त्या वाटेतच जाऊ नये, आणि जाणे झालेच तरीही त्यांना काही बोलू नये. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक २ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.

कर्क राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीत चंद्र भाग्य स्थानी आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी असणार आहे. लहानसहान गोष्टींवर रागावणे टाळावे लागेल. व्यवसायात परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल, कारण तुमची आर्थिक स्थिती मजबूत करणारे ग्रहमान जुळून आले आहे. तुम्ही गुंतवणूक करण्याचाही विचार करू शकता. तुम्हाला काही सरकारी टेंडर सुद्धा मिळू शकतात. धार्मिक कार्यातही तुम्हाला खूप रस असेल. आई-वडिलांची सेवा करण्यासाठीही थोडा वेळ काढाल. एकंदरीत वातावरण चांगले असेल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ५ आहे व आपल्यासाठी आजचा रंग हिरवा आहे.

सिंह राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीत चंद्र आठव्या स्थानी आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे. तुमच्या घरी पाहुण्यांच्या आगमनामुळे वातावरण प्रसन्न राहील. सामाजिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्याल. वाहने जपून वापरल्यास ते तुमच्यासाठी चांगले राहील. तुम्हाला तुमच्या कुटुंबात काही मोठी जबाबदारी मिळू शकते, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. उलट एक चांगली संधी चालू झाली आहे असा विचार करून कार्य तत्परतेने सुरू करावे. नोकरीच्या ठिकाणी कोणीतरी तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करू शकेल. त्यासाठी सावध राहावे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ४ आहे व आपल्यासाठी आजचा रंग करडा आहे.

कन्या राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीत चंद्र सातव्या स्थानी आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामाच्या दृष्टीने चांगला जाणार आहे. तुम्हाला तुमची नोकरी बदलायची असेल तर तुम्ही इतरत्र अर्ज करू शकता, परंतु तुमच्या बोलण्यातली सौम्यता राखा. काही कामामुळे तुम्हाला अचानक बाहेरगावी जावे लागू शकते. तुमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमचे बरेच दिवस रखडलेले प्रलंबित काम पूर्ण होईल. तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्याच्या बोलण्याने प्रभावित होण्याचे टाळावे लागेल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक २ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.
शेतकरी पैशाने श्रीमंत तर होईलच परंतु देश मात्र संपन्न आणि समृद्ध होईल. #agriculture

तूळ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीत चंद्र सहाव्या स्थानी आहे. तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. तुमचे सुखाचे साधन वाढेल. जर कौटुंबिक समस्या तुम्हाला बर्याच काळापासून त्रास देत असतील तर त्याही आज बऱ्यापैकी दूर होण्याचे संभाव्य आहेत. त्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मजेत वेळ घालवाल. सासरच्या कोणाशी काही भांडण होत असेल तर तेही चर्चेतून सोडवले जाईल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ५ आहे व आपल्यासाठी आजचा रंग हिरवा आहे.

वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीत चंद्र पाचव्या स्थानी आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असणार आहे. घाईघाईने किंवा भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. तुमचा आदर वाढल्याने तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. परंतु जास्त आनंदाने हुरळूनही जाऊ नका. काही मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुम्हाला एखाद्या जुन्या मित्राची आठवण येत असेल, तर त्याच्याशी संपर्क करून बोलून घ्या. भेटणे शक्य असेल तर भेटा. धार्मिक कार्यात तुम्हाला खूप रस वाटेल. कोणतेही महत्त्वाचे काम उद्यापर्यंत पुढे ढकलणे टाळावे लागेल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ६ आहे व आपल्यासाठी आजचा रंग गुलाबी आहे.

धनु राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीत चंद्र चवथ्या स्थानी आहे. धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संयमाने आणि धैर्याने काम करण्याचा दिवस असणार आहे. जर तुम्ही कोणत्याही कामात घाई केली तर तुमच्याकडून चूक होऊ शकते. त्यामुळे संयमाने आणि शांततेने कार्य करावे. तुमच्या व्यवसायिक किंवा नोकरी संबंधीच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते. कौटुंबिक विषयांबाबत तुम्हाला तुमच्या वडिलांशी बोलावे लागेल. मुलाच्या नोकरीत काही अडथळे असतील तर तेही दूर होतील. तुम्हाला कोणतीही महत्त्वाची माहिती कोणाशीही शेअर करणे टाळावे लागेल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ३ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पिवळा आहे.

मकर राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीत चंद्र तिसऱ्या स्थानी आहे. मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. तुम्हाला एकाच वेळी अनेक कामे करावी लागणार असल्याने आज तुमची चिंता आणि धावपळ काही मावशी वाढण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमच्या मालमत्तेशी संबंधित कोणतेही सौदे दीर्घकाळ प्रलंबित असल्यास, ते आज अंतिम केले जाऊ शकतात. ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्या लोकांनी थोडे लक्ष देणे आवश्यक आहे, कारण ऑनलाइन प्रक्रियेमध्ये काही फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणाला काही सांगण्यापूर्वी नीट विचार करावा. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ३ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पिवळा आहे.

कुंभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीत चंद्र दुसऱ्या स्थानी आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुखद परिणाम घेऊन येणार आहे. तुम्हाला एखाद्या योजनेतून चांगला लाभ मिळाल्यास तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. तुमचे हरवलेले पैसेही तुम्ही परत मिळवू शकता. तब्येतीत चढ-उतार असतील. आज मनातील काही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता असल्याने तुम्हाला आनंद प्राप्त होणार आहे. तुम्ही तुमच्या लाइफ पार्टनरसोबत शॉपिंग साठी किंवा बाहेर फेरफटका, डेटवर जाण्याची योजना करू शकता. तुम्हाला कोणाकडून काही बोलले गेले तर त्याचे मनावर परिणाम होऊ देऊ नका. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक १ आहे व आपल्यासाठी आजचा रंग नारंगी आहे.
आम्ही या लेखात आयुर्वेदात #ayurvedic upay पचन सुधारण्यासाठी काही खास औषधी वनस्पती आणि साधने सांगितली आहेत.

मीन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीत चंद्र प्रथम स्थानी आहे. मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला परिणाम व आनंद देणारा राहील. तुम्हाला कोणत्याही कामाबद्दल काही टेन्शन असेल तर तेही दूर होईल. कुटुंबातील लोक तुमच्या बोलण्याला पूर्ण महत्त्व देतील. तुमच्या कामाबाबत तुम्ही तुमच्या वडिलांकडून काही सल्ला घेऊ शकता. लहान मुलांसोबत थोडा वेळ मजेत घालवाल. काही नवीन काम करण्याची इच्छा जागृत होऊ शकते. सामाजिक कार्यातही तुम्हाला आज चांगला रस वाटेल त्यामुळे सामाजिक कार्यात आजचा दिवस आनंदाने व्यतीत कराल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ८ आहे व आपल्यासाठी आजचा रंग निळा आहे.