Rashi Bhavishya | राशी भविष्य | Today’s Rashi Bhavishya| 9 March 2025 | Aaj ka Rashifal

Today Rashi Bhavishya in marathi| आजचे राशी भविष्य मराठी (रविवार, ९ मार्च २०२५) |Aajche Rashi bhavishya

dnyanjyotmarathi.com

Rashi Bhavishya / Rashi bhavishya Today : मेष राशीचे आजचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Aajche Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मिथुन राशीत असून आपल्या राशीत चंद्र तिसऱ्या स्थानी आहे.  मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ फळ देणारा, आनंद देणारा असा दिवस असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामाची प्रगती पाहून वरिष्ठ आपल्यावर एखादी नवीन जबाबदारी टाकू शकतात. ती जबाबदारी आपण यशस्वी रीत्या पूर्ण कराल. आज आपण मित्रांसोबत मज्जा मारण्याकरिता थोडा वेळ काढू शकता. आजचे काम उद्यावर ढकलू नका. आज आपण जोडीदारासोबत मुलांच्या भविष्याबाबत चर्चा करू शकता. जोडीदारासोबत आपण काही इच्छा व्यक्त केली असता ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज आपण नकारात्मक विचार मनातून काढून दानशूर होवून दान केल्यास सकारात्मक उर्जा निर्माण होईल.


dnyanjyotmarathi.com

वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मिथुन राशीत असून आपल्या राशीत चंद्र दुसऱ्या स्थानी आहे.  वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असा असणार आहे. आर्थिक स्तोत्रात वाढ होवू शकते. रोजगाराच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना रोजगार उपलब्ध होवू शकते. संपत्ती वाढीसाठी प्रयत्न कराल. आज आपले महत्वपूर्ण कामे पूर्ण होवू शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्ही अनुभवी व्यक्तीच्या अनुभवाचा फायदा करून घेवू शकता. कोणालाही पैसे उधार देणे टाळावे. राजकारणात असणाऱ्या व्यक्तींचा नवीन भेटीगाठी होतील. विद्यार्थ्यांना अध्यनात यश प्राप्त होईल. संपत्ती वाढ होण्याकरिता नवीन नवीन योजना आपल्या समोर येतील परंतु कोणत्याही योजनेत सहभागी होताना विचारपूर्वक निर्णय घ्यावे. जोडीदारासोबत संध्याकाळ आनंदात घालवाल.

Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 3 March TO 9 March 2024

dnyanjyotmarathi

dnyanjyotmarathi.com

मिथुन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मिथुन राशीत असून आपल्या राशीत चंद्र प्रथम स्थानी आहे.  मिथुन राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ फळ देणारा, आनंद व शांततामय असा असणार आहे पूर्व नियोजित रखडलेली कामे पूर्ण करण्यात आपला आजचा दिवस जावू शकतो. कुटुंबातील सदस्याच्या गरजा लक्षात घेवून त्या पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. सामाजिक कार्यात आपण सहभागी होवू शकता ज्यामुळे तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींना यश मिळण्याकरिता कठोर मेहनत घेणे आवश्यक आहे. आज आपण जोडीदाराला काही भेटवस्तू प्रदान करू शकता.


dnyanjyotmarathi.com

कर्क राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi)  – आज चंद्र मिथुन राशीत असून आपल्या राशीत चंद्र बाराव्या स्थानी आहे.  कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस सकारात्मक उर्जा भरून आणणारा असा दिवस असले. आपले उत्पन्नाचे स्तोत्र वाढतील. पैसा व गुंतवणुकी संदर्भातील कोणत्याही गोष्ठीबाबत घाई करू नये. आपला एखादा जुना मित्र आपल्याला भेटण्याकरिता येवू शकतो. नोकरीच्या ठिकाणी सहकार्याकडून योग्य सहकार्य मिळेल. नोकरीच्या ठिकाणी कामामध्ये काही गडबड होणार नाही याची काळजी घ्यावी. आज एखाद्या व्यक्तीसोबत आपले भांडण होण्याची शक्यता आहे त्यामुळे रागावर व वाणीवर संयम ठेवावे. आज अनावश्यक चिंतेमुळे तुम्ही एखाद्या मंदिरात किंवा धार्मिक स्थळाला भेट देवू शकता. जोडीदारासोबत मनमोकळे बोलून संध्याकाळ आनंदात घालवाल.


dnyanjyotmarathi.com

सिंह राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मिथुन राशीत असून आपल्या राशीत चंद्र लाभ स्थानी आहे.  सिंह राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असणार आहे. आज आपण संयमाने कामे करण्याची आवश्यकता आहे. आज आपण आपल्या मनात सकारात्मक विचार केले असल्यास आपली सर्व कामे पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कोणतीही मालमत्ता खरेदी करताना कागदपत्राची तपासणी करणे आवश्यक आहे . आपल्याला काही अडचणी असल्यास आपण कुटुंबातील सदस्या सोबत बोलून त्यांच्याकडून सल्ला घेवू शकता. जोडीदारासोबत संध्याकाळ चांगली घालवाल. आज तुमचे छंद जोपासण्यासाठी, तुमच्या आवडत्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी वेळ काढाल. आरोग्य ठीक राहील.


dnyanjyotmarathi.com

कन्या राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi)   – आज चंद्र मिथुन राशीत असून आपल्या राशीत चंद्र दहाव्या स्थानी आहे.  कन्या राशीच्या लोकांना आजचा दिवस इतर दिवसापेक्षा चांगला असणार आहे. आपण आज आपल्या आवडत्या छंदावर खर्च करू शकता. नोकरीच्या ठिकाणी आपण कामे पूर्ण केल्याने वरिष्ठ अधिकारी आपल्या कामावर अधिक खुश होईल. परंतु विरोधक थोडे अग्रेसिव होण्याची शक्यता आहे. परंतु काळजी करू नये. आपण आपल्या घरी एखादी नवीन इलेक्ट्रिक वस्तू आणू शकता. आपल्याला आपल्या खर्चावर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. गुंतवणूक करताना आपण एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेवून गुंतवणूक केल्यास तुम्हाला फायदा होवू शकतो.


dnyanjyotmarathi.com

तूळ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi)   – आज चंद्र मिथुन राशीत असून आपल्या राशीत चंद्र भाग्य स्थानी आहे.  तुळ राशीच्या लोकांना आजचा दिवस आजचा दिवस कामामध्ये व्यस्त असणारा दिवस असू शकतो. कामासंदर्भात काही नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. बराच काळ चालू असलेल्या वडिलोपार्जित मालमत्ते संदर्भातील प्रश्न निकाली लागतील. आज आपली काही प्रभावशाली लोकांसोबत भेट होवू शकते. आपल्या उत्पन्न स्तोत्रात वाढ होण्यासाठी आपल्याला लक्ष देणे आवश्यक आहे. विवाह करण्यास इच्छुक व्यक्तीचे विवाह जुळू शकतात. विद्यार्थ्याना अध्ययनात यश प्राप्त होईल. जोडीदारासोबत मनमोकळे बोलू शकता. जोडीदाराच्या विचारांचा आदर करणे.


dnyanjyotmarathi.com

वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi)   – आज चंद्र मिथुन राशीत असून आपल्या राशीत चंद्र आठव्या स्थानी आहे.  वृश्चिक राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असेल. व्यावसायिकांना त्याच्या व्यवसायात चांगला लाभ मिळेल. आपल्या कुटुंबातील एखाद्याचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आपली धावपळ होण्याची शक्यता आहे. बोलताना आपल्याला विचारपूर्वक बोलावे लागेल. कामाच्या ठिकाणी द्विधा मनस्थिती करून चालणार नाही अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे सर्वतोपरी सहकार्य आपल्याला मिळेल. आपले उल्हासित मन तुम्हाला योग्य उर्जा व आत्मविश्वास मिळवून देईल.

Sanskar | संस्कार म्हणजे काय ? मुलांच्या अवस्था ? | Mulavar Sanskar kase karave |

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

धनु राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मिथुन राशीत असून आपल्या राशीत चंद्र सातव्या स्थानी आहे.  धनु राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असेल. आरोग्य चांगले राहील. कामानिमित प्रवास योग आहे. आजचा प्रवास कटकटीचा व त्रासदायक होवू शकतो. आज आपण बुद्धिमत्ता वापरून कामे पूर्ण करू शकता. कामाच्या ठिकाणी आपले विरोधक आपल्याला त्रास देवू शकतात. परंतु आपण वेळीच कामे पूर्ण केल्याने वरिष्ठ आपल्या कामावर खुश होतील. आज आपण एखादा नवीन व्यवसाय सुरु करू शकता. मुलांना परीक्षेत चांगले यश प्राप्त होईल. जोडीदारासोबत संध्याकाळ छान घालवाल.


dnyanjyotmarathi.com

मकर राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe)  – आज चंद्र मिथुन राशीत असून आपल्या राशीत चंद्र सहाव्या स्थानी आहे.  मकर राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ फळ देणारा असणार आहे. कामानिमित्त तुमचा प्रवास होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात दुर्लक्ष करणे टाळावे. उत्पन्नाचे वेगवेगळे स्तोत्र निर्माण होतील. आपली आर्थिक स्थिती पूर्वी पेक्षा चांगली होईल. आपल्याला मुलांकडून चांगली बातमी समजेल. नवीन लोकांचा भेटीगाठी होवून त्यांचा सोबत चांगला संवाद होवू शकतो. आज कुटुंबातील सदस्यासोबत निवांत वेळ घालवाल. आज जोडीदारासोबत मन मोकळे संभाषण करू शकता.


dnyanjyotmarathi.com

कुंभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मिथुन राशीत असून आपल्या राशीत चंद्र पाचव्या स्थानी आहे.  कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस सकारात्मक आनंद देणारा असा दिवस असेल. नोकरीच्या ठिकाणी कामाचा दबाव कमी झालेला आज जाणवेल. मानसिक ताण तणावातून आराम मिळेल. कुटुंबात एखादे धार्मिक व मांगलिक कार्यक्रम करू शकता. आज महत्वपूर्ण काम पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. आरोग्याची काळजी घ्या. डॉक्टर सल्ला घेणे आवश्यक आहे. गुंतवणूक करताना विचार करून पैसे गुंतवा. इतरांच्या सल्ल्याने वागणे सोडून द्यावे. आज जोडीदारासोबत बाहेर फिरण्याचा प्लान करू शकता. विद्यार्थ्याना अध्ययनात यश मिळेल.


dnyanjyotmarathi.com

मीन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मिथुन राशीत असून आपल्या राशीत चंद्र चवथ्या स्थानी आहे.  मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ फळ देणारा असा असणार आहे. आज तुम्हाला आनंद देणाऱ्या बातम्या समजतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तीना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आज आपल्याला एखाद्या मित्रावर पैसे खर्च करायला लागू शकतात. पैशा संदर्भातील कामे पुढे ढकलणे टाळावे. जोडीदारासोबत वादविवाद झाला असल्यास तोही संभाषणातून दूर होईल. आर्थिक स्तोत्र वाढतील, त्यामुळे आपल्या आर्थिक स्थितीत बदल होण्याची शक्यता आहे. आज आपण खर्च करण्यास सक्षम झाल्याचे जाणवेल. आपल्या मनातील नैराश दूर होवून आपल्याला समाधान व आराम प्राप्त होईल. आज एखाद्या लहान मुलाचा सल्ला देखील तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. जोडीदारासोबत संध्याकाळ आनंदात घालवाल.


(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)


आहार कसा निवडावा | Aahar Kasa Nivadava | योग्य आहार कसा घ्यावा? | Yogya Aahar Kasa Ghyava |

Sanskar | संस्कार म्हणजे काय ? मुलांच्या अवस्था ? | Mulavar Sanskar kase karave |

Cyber Crime | सायबर क्राइम म्हणजे काय? | What is cyber crime?

शेती करा आणि श्रीमंत व्हा ! Sheti kara ani shrimant vha! | Farming | Agriculture

Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 3 March TO 9 March 2024