Rashi Bhavishya | राशी भविष्य | Today’s Rashi Bhavishya| 5 March 2025 | Aaj ka Rashifal

Today Rashi Bhavishya in marathi| आजचे राशी भविष्य मराठी (बुधवार, ५ मार्च २०२५) |Aajche Rashi bhavishya

dnyanjyotmarathi.com

Rashi Bhavishya / Rashi bhavishya Today : मेष राशीचे आजचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Aajche Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र प्रथम स्थानी आहे. मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कौटुंबिक आनंद देणारा असेल. आज काही खास लोकांच्या भेटी होण्याची शक्यता आहे. कामाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वरिष्ठाकडून कामाबद्दल विशेष दाद मिळेल. आपल्या कामासाठी वरिष्ठाकडून समर्थन मिळेल. पूर्वी झालेल्या चुका पाठवून पुन्हा त्यात चुकांची पुनरावृत्ती करू नका. आर्थिक किंवा कौटुंबिक बाबतीत काही योजना आखल्या असतील तर त्या योजनांना गती मिळेल. काही कर्ज घेतले असेल तर त्याची परतफेड करण्यासाठी आज प्रयत्नात रहाल. मेष राशीच्या लोकानी दुर्गा सप्तशती पाठ केल्यास लाभ मिळेल.


dnyanjyotmarathi.com

वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र बाराव्या स्थानी आहे.  वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. अनावश्यक खर्च टाळावेत. आपण करीत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या कामांचे योग्य नियोजन करा आणि चांगली योजना तयार करा. त्यामुळे कामे लवकर यशस्वी होतील. आपण जमाखर्चांचा योग्य तो ताळमेळ ठेवा. आपल्या हिताचे राहील. स्वतःच्या आरोग्याकडे, खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे. आरोग्याची काळजी घ्यावी. कोणालाही सल्ला देताना विचारपूर्वक द्या. विद्यार्थ्यांना अभ्यासात सातत्याने मन लावून प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे यश प्राप्त होईल. वृषभ राशीच्या लोकांनी गणपतीला दुर्वा अर्पण केल्यास लाभ मिळेल.


dnyanjyotmarathi.com

मिथुन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र लाभ स्थानी आहे.  आज आपला दिवस नवनवीन योजनांच्या आखणीत व्यस्त राहील. आज स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी, कुटुंबासाठी विशेष लक्ष द्याल. इतरांच्या कामाबाबत आज मौन राहील. आज मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवाल. ज्यामुळे आपल्या जुन्या आठवणी ताज्या होतील. आज आपले छंद जोपासण्यासाठी काही नवीन खरेदी कराल ज्यामुळे खर्च वाढेल. कामाच्या बाबतीत काही अडथळे येत आहेत, ते दूर करण्यासाठी प्रयत्नशील रहाल. आपल्याला काही जुन्या चुकांमधून धडा घ्यावा लागेल. आज भावंडांचे तुमच्या काही निर्णयांसाठी पूर्ण समर्थन मिळेल. मिथुन राशीच्या लोकांनी कुलदेवतेची उपासना केल्यास मनोकामना पूर्ण होतील.

Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 3 March TO 9 March 2024

dnyanjyotmarathi

dnyanjyotmarathi.com

कर्क राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi)  – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र लाभ स्थानी आहे.  कर्क राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस कामांमध्ये व्यस्त राहण्याचा असणार आहे. आज तुम्हाला काम करताना प्रचंड आत्मविश्वास जाणवेल. आपल्याला आर्थिक व्यवहारांमध्ये पूर्ण लक्ष द्यावे लागेल. अगदी कमी फायद्याच्या योजनांकडे सुद्धा काळजीपूर्वक लक्ष द्या. ‘थेंबे थेंबे तळे साचे’, हे लक्षात ठेवा. आज व्यवसाय धंद्यात पूर्वीपेक्षा चांगला जोर असेल. एखाद्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. आज एखाद्या विशेष व्यक्तीला भेटण्याचा योग संभवतो. आज मनात स्पर्धेची भावना निर्माण होईल. कर्क राशीच्या लोकांनी नियमित हनुमान चालीसा पठण करावी.


dnyanjyotmarathi.com

सिंह राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र भाग्य स्थानी आहे. आज विशेष डोळसपणे कामांकडे लक्ष द्यावे लागेल. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवलात तर अडचणीत येऊ शकता. वाहन वापरताना काळजी घ्या. अपघात होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आज अभ्यासासाठी विशेष मेहनत घ्यावी लागेल. आज जर तुम्ही विशेष काम करून वरिष्ठांची मर्जी राखलीत तर नोकरीमध्ये काम करणारे लोक पदोन्नती मिळवू शकतात. पूर्वीपासून प्रलंबित असलेली सरकारी कामे आज मार्गी लागू शकतील. आज सामाजिक किंवा धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. त्यामुळे आनंद मिळेल. सिंह राशीच्या लोकांना सफेद कपडे दान केल्यास लाभ मिळेल.


dnyanjyotmarathi.com

कन्या राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi)   – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र आठव्या स्थानी आहे.  स्वतःला किंवा इतरांना दिलेले चॅलेंज म्हणजेच आव्हान आज पूर्ण करण्याची संधी मिळेल. कौटुंबिक वाद विवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोके शांत ठेवण्यातच फायदा आहे. आज घरातील सुखसोयींकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल. एखादा रखडलेला जुना व्यवहार मार्गी लागेल. एखादे काम वेळेतच झाले पाहिजे यासाठी आग्रही राहू नका. त्यामुळे नाहक चिडचिड होईल. आज कुटुंबातील मंडळींकडून एखादी वाईट बातमी कळण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या लोकांनी खिश्यामध्ये छोटा ताब्यांचा सिक्का ठेवल्यास लाभ मिळेल.


dnyanjyotmarathi.com

तूळ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi)   – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र सातव्या स्थानी आहे. आजचा दिवस तूळ राशीच्या व्यक्तींसाठी अगदी अनुकूल असा असेल. तुमच्या जोडीदाराशी असलेले नातेसंबंधांमध्ये आज गोडवा वाढेल. आजचा दिवस तुमच्या दोघांसाठी आनंद देणारा राहील. तुमच्या प्रगतीच्या मार्गात येणार्‍या अडथळ्यांवर मात करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. दूर असलेल्या नातेवाईकांची, कुटुंबियांची आज विशेष आठवण येईल. आज प्रेम आणि सहकार्याची भावना आपल्या मनात राहील. कुटुंबीयांसोबत किंवा मित्रमंडळींसोबत आज सहलीची किंवा फिरायला जाण्याची योजना कराल. कामाकडे पूर्ण लक्ष द्यावे, यश मिळेल. गणपतीची उपासना केल्यास लाभ मिळेल.


dnyanjyotmarathi.com

वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi)   – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र सहाव्या स्थानी आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना आजचा दिवस मानसिक समाधान देणारा असा दिवस असेल. आपल्याला आज काही अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल. आपल्या दिनचर्येत योगभ्यास व ध्यानाचा अवलंब करावा लागेल. ज्यामुळे आपल्याला तणावमुक्त जीवन जगता येईल. नोकरी निमित्त आपल्याला घरापासून दूर जावे लागू शकते. नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामावर वरिष्ठ नाराज होवू शकतात. त्यामुळे कामावर लक्ष द्यावे. अचानक काम वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत संध्याकाळ घालवाल. वृश्चिक राशीच्या लोकांना चांगल्या आरोग्यासाठी पूर्वेकडे तोंड करून जेवणे आवश्यक आहे.

Cyber Crime | सायबर क्राइम म्हणजे काय? | What is cyber crime?


dnyanjyotmarathi.com

धनु राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र पाचव्या स्थानी आहे.  धनु राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभफल देणारा असणार आहे. सरकारी नोकरीत असणाऱ्या लोकांची बदली होण्याची शक्यता आहे. आपली आर्थिक परिस्थिती पूर्वी पेक्षा चांगली असेल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी कामाचा दबाव वाढण्याची शक्यता आहे. परंतु त्याठिकाणी आपेल सहकारी आपल्याला सहकार्य करतील. मित्रांसोबत वेळ घालवाल. कोणतीही गुंतवणूक करताना अनुभवी लोकांची मदत घ्यावी. आज आपली सकारात्मक दिशेने वाटचाल असेल. जोडीदाराला सरप्राईज देवू शकता जेणे करून तिला/त्याला आनंद प्राप्त होईल. सूर्याची उपासना करावी लाभ मिळेल.


dnyanjyotmarathi.com

मकर राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe)  – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र चवथ्या स्थानी आहे. मकर राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ आहे. आपण एखाद्या मांगलिक कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे. शेतकरी वर्गातील लोकांना त्यांच्या अनुभवाचा शेती करिता फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांनी आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करून काम करणे आवश्यक आहे. यश प्राप्त होईल. आज प्रवास योग आहे. मुलानी आपल्या अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पाल्यांकडून आनंदी बातमी समजेल. आरोग्याकडे लक्ष देणे, अतिरिक्त खाणे टाळावे. विचार न करता धन खर्च केल्यास डोकेदुखी ठरेल. मनाला समाधान मिळण्यासाठी जोडीदारासोबत आज एकांतात वेळ घालवणे आवश्यक आहे. आज हिरव्या रंगाचे कपडे परिधान केल्यास लाभ मिळेल.


dnyanjyotmarathi.com

कुंभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र तिसऱ्या स्थानी आहे. कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल आहे. आज आपण कोणतेही नवीन काम सुरु करू शकता. आज परिवारात शांत व आनंदी वातावरण असेल. वडिलोपार्जित मालमत्तेसंदर्भात वादविवाद होण्याची शक्यता आहे. घरातील मोठ्आया व्पयक्ल्यातीकडून याबाबत मार्तीगदर्लशन घ्यावे. कार्यक्षमता दाखविण्याचा आजचा दिवस आहे. नोकरीच्या ठिकाणी कामावर लक्ष ठेवणे. व्यस्त दिनचर्येतून स्वतःसाठी वेळ काढणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यानी अभ्यासासाठी वेळ देणे आवश्यक आहे. जोडीदाराच्या सततच्या वेगवेगळ्या मागणीमुळे वादविवाद होण्याची शक्यता आहे. जोडीदाराला चांदीची रिंग दिल्यास लाभ मिळेल.


dnyanjyotmarathi.com

मीन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र दुसऱ्या स्थानी आहे.  मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस अधिक चांगला जाणार आहे. आजची दिनचर्या सुंदर घालवण्याचा दिवस आहे. राजकारणात काम करणाऱ्या लोकांना चांगला पाठींबा मिळेल. कोणतेही काम करताना आपल्याला धीर व संयम ठेवणे आवश्यक आहे. आपली आज एखाद्या जुन्या मित्राशी भेट होवू शकते. व्यावसायिकांना भागीदारीत व्यवसाय करणे लाभदायक ठरेल. उत्पनाच्या स्तोत्रात वाढ होण्यासाठी दानधर्म करणे आवश्यक आहे. जोडीदारासोबत संध्याकाळ चांगली घालवाल.


(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)


आहार कसा निवडावा | Aahar Kasa Nivadava | योग्य आहार कसा घ्यावा? | Yogya Aahar Kasa Ghyava |

Sanskar | संस्कार म्हणजे काय ? मुलांच्या अवस्था ? | Mulavar Sanskar kase karave |

Cyber Crime | सायबर क्राइम म्हणजे काय? | What is cyber crime?

शेती करा आणि श्रीमंत व्हा ! Sheti kara ani shrimant vha! | Farming | Agriculture

Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 3 March TO 9 March 2024