Rashi Bhavishya | राशी भविष्य | Today’s Rashi Bhavishya| 4 March 2025 | Aaj ka Rashifal

Today Rashi Bhavishya in marathi| आजचे राशी भविष्य मराठी (मंगळवार, ४ मार्च २०२५) |Aajche Rashi bhavishya

dnyanjyotmarathi.com

Rashi Bhavishya / Rashi bhavishya Today : मेष राशीचे आजचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Aajche Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस मेष राशीच्या लोकांना उत्साहवर्धक जाणार आहे. आज आपण पूर्वनियोजित घरची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. आपल्यावर कामाच्या जबाबदाऱ्या भरपूर असतील परंतु घाबरण्याची आवश्यकता नाही. देव त्यालाच कामाच्या जास्त जबाबदाऱ्या देतो ज्याची ती पेलण्याची कुवत असते. कामाच्या ठिकाणी कामावर लक्ष ठेवून करावी एखादी जुनी चूक तुमच्या बॉसच्या लक्षात येवू शकते. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात आनंद प्राप्त होईल. विद्यार्थ्याना अध्ययनात यश प्राप्त होईल.


dnyanjyotmarathi.com

वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र बाराव्या स्थानी आहे. वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असेल. आज तुम्हाला खर्चाकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. आपण कोणाला उधार पैसे दिले असल्यास परत मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरु करण्याचे मनात असल्यास त्याला थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. कारण काही समस्या निर्माण होवू शकतात. व्यावसयिक भागीदारीमध्ये व्यवसाय करत असल्यास थोडे नुकसान सहन करावे लागेल. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मुलांना अभ्यासात मेहनत घ्यावी लागेल.


dnyanjyotmarathi.com

मिथुन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र लाभ स्थानी आहे. मिथुन राशीच्या लोकांना आजचा दिवस सकारात्मक उर्जा घेवून येणारा असा दिवस असेल. आपण एखादे नवीन काम किंवा व्यवसाय सुरु करण्याचे ठरवत असाल तर अनुभवी लोकांची मदत व सल्ला घेणे आवश्यक आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकडून आज सामाजिक कार्य होण्याची शक्यता आहे ज्यामुळे प्रतिष्ठा प्राप्त होईल. कलात्मक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची प्रगती होईल. स्पर्धेची भाबना आपल्या मनात राहील. आरोग्य उत्तम असेल. मुलांना अभ्यासात मेहनत करावी लागेल.

Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 3 March TO 9 March 2024

dnyanjyotmarathi

dnyanjyotmarathi.com

कर्क राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi)  –  आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र लाभ स्थानी आहे. कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस आनंद घेवून येणारा असा दिवस असेल. कौटुंबिक जीवनात काही समस्या उद्भवू शकतात. आपण आज आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरिता प्रयत्न कराल. आज एखाद्या जुन्या मित्राची भेट होवू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी कामावर लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा चूक घडण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत संध्याकाळ घालवाल. मुलांकडून आनंदी बातमी समजू शकेल.


dnyanjyotmarathi.com

सिंह राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र भाग्य स्थानी आहे. सिंह राशीच्या लोकांना आजचा दिवस हा आत्मविश्वासाने भरलेला असा दिवस असेल. आपल्यातील काम उरकण्याची कला असल्याने आपण आपली कामे वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामानिमित्त बाहेर गावी जाण्याची शक्यता आहे. प्रेमात असलेल्या लोकांना त्यांच्या नात्त्यात थोडी कटुता निर्माण झालेली दिसून येईल. आपण आपल्या घरात एखादे धार्मिक कार्य करण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत मनातील बोलण्याची आज सुवर्ण संधी आहे. एकमेकांच्या भावनाचा व विचाराचा आदर करावा. वैवाहिक सौख्य प्राप्त होईल. मुलांना अध्ययनात यश प्राप्त होईल.


dnyanjyotmarathi.com

कन्या राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi)   –  आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र आठव्या स्थानी आहे. कन्या राशीच्या लोकांना आजचा दिवस सामान्य फळ देणारा असणार आहे. आपण एखाद्या अनावश्यक गोष्टीच्या विचारात दिवस घालवाल. जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्रेमात असणाऱ्या प्रेमिका आपल्या एकमेकांच्या घरात आपल्या जोडीदाराची ओळख करून देवू शकतात. online माध्यमातून काम करणाऱ्या लोकांना मोठी संधी मिळू शकेल. वैवाहिक सौख प्राप्त होईल.


dnyanjyotmarathi.com

तूळ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi)   – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र सातव्या स्थानी आहे. तुळ राशीच्या लोकांना आजचा दिवस सकारात्मक परिणाम घेवून येणारा असेल. विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराचा प्रून पाठींबा कामात, व्यवसायात मिळणार आहे. नवीन लोकांचा भेटीगाठी होतील. त्यांच्याशी संवाद साधने आवश्यक आहे. राजकीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी आपल्या विरोधकांपासून सावध रहाणे आवश्यक आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना उत्तम यश प्राप्त होईल. प्रवास योग आहे परंतु प्रवास करताना गाडीवर व वेगावर संयम ठेवावे. जोडीदारासोबत वेळ घालवाल. शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यानी जास्त मेहनत घेतल्यास नक्की यश प्राप्त होईल.


dnyanjyotmarathi.com

वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi)   – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र सहाव्या स्थानी आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना आजचा दिवस सामान्य फळ देणारा असा दिवस असेल. वृश्चिक राशीच्या लोकांना आज खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. एखादी कौटुंबिक समस्या बरेच दिवस त्रास देत असल्यास लवकरच तिचे निराकरण होईल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याला खोटे आश्वासन देणे आज टाळावे लागेल. आईच्या तब्बेतीबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. कारण एखादा जुनाट आजार डोके वर काढू शकतो. डॉक्टर सल्ला घेणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात थोडे तणावग्रस्त वातावरण असू शकते. एकमेकांचे विचार शांतपणे ऐकून घेतल्यास निराकरण होवू शकेल.


dnyanjyotmarathi.com

धनु राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र पाचव्या स्थानी आहे. धनु राशीच्या लोकांना आजचा दिवस मध्यम फळ देणारा असा दिवस असेल. कामानिमित अचानक प्रवास करण्याचा योग येवू शकतो. सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तींची बदली होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना नोकरीची संधी मिळू शकेल. आज आपली एखाद्या जुन्या मित्राची भेट होवू शकते. विद्यार्थी स्पर्धेत भाग घेवू शकतो. जोडीदारासोबत संध्याकाळ घालवाल. मुलांकडून आनंदी बातमी समजू शकेल. आज वाणीवर व रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

Cyber Crime | सायबर क्राइम म्हणजे काय? | What is cyber crime?

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

मकर राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe)  – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र चवथ्या स्थानी आहे. मकर राशीच्या लोकांना आजचा दिवस मिश्र फळ देणारा असेल. शेतकरी वर्गातील लोकांना शेतातील आवडते काम मिळाल्याने खुश असतील. विवाह करिता इच्छुक असणाऱ्या लोकांचे लग्न जमतील. पोटा संदर्भातील तक्रारी जाणवू शकतात म्हणून तेलकट व बाहेरचे खाणे टाळावे. नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्या लोकांना आर्थिक नियोजन व व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. व्यवसायात पैसे गुंतवावे लागतील. कोणतीही गुंतवणून करताना विचारपूर्वक गुंतवणूक करावी. वैवाहिक सौख्य प्राप्त होईल.


dnyanjyotmarathi.com

कुंभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र तिसऱ्या स्थानी आहे. कुंभ राशीतील लोकांना आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज आपण नवीन काम सुरु करण्याचे योजले असल्यास शुभ योग आहे. जुन्या गुंतवणुकीमुळे तुम्हाला चांगला फायदा मिळेल. आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरिता आपण आज लक्ष देणे आवश्यक आहे. वडिलोपार्जीत मालमत्तेवरून वादविवाद होण्याची शक्यता आहे. परंतु समजून, विचारविनिमय करून प्रश्न नक्की सुटू शकतो. आवश्यकता भासल्यास वरिष्ठ लोकांकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. वैवाहिक सुख प्राप्त होईल. जोडीदाराच्या मनातील इच्छा पूर्ण करू शकता.


dnyanjyotmarathi.com

मीन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीत चंद्र दुसऱ्या स्थानी आहे. मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असा दिवस असेल. आज मीन राशीच्या लोकांनी संयम व धैर्य ठेवणे आवश्यक आहे. आज आपल्याला जास्त मेहनत करणे आवश्यक आहे. कामासोबतच आपल्याला आपल्या आरोग्यावर लक्ष देणे आवश्यक आहे. राजकारणात काम करणाऱ्या लोकांची आज मोठ्या नेत्याशी भेट होण्याची शक्यता आहे. कुटुंबात एखाद्या अनावश्यक विषयावरून वाद विवाद होण्याची शक्यता आहे. जिभेवर साखर व डोक्यावर बर्फाचा गोळा ठेवणे आवश्यक आहे. वैवाहिक सौख्य प्राप्त होईल. जोडीदारासोबत संध्याकाळ घालवाल. विद्यार्थ्याना अध्ययनात यश मिळेल. नकारात्मक विचार मनात घर करतील ते काढण्याचे प्रयत्न करावे.


(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)


आहार कसा निवडावा | Aahar Kasa Nivadava | योग्य आहार कसा घ्यावा? | Yogya Aahar Kasa Ghyava |

Sanskar | संस्कार म्हणजे काय ? मुलांच्या अवस्था ? | Mulavar Sanskar kase karave |

Cyber Crime | सायबर क्राइम म्हणजे काय? | What is cyber crime?

शेती करा आणि श्रीमंत व्हा ! Sheti kara ani shrimant vha! | Farming | Agriculture

Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 3 March TO 9 March 2024