Rashi Bhavishya | राशी भविष्य | Today’s Rashi Bhavishya| 4 Feb 2025 | Aaj ka Rashifal

Today Rashi Bhavishya in marathi| आजचे राशी भविष्य मराठी (मंगळवार, ४ फेब्रुवारी २०२५) |Aajche Rashi bhavishya

dnyanjyotmarathi.com

Rashi Bhavishya / Rashi bhavishya Today : मेष राशीचे आजचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Aajche Bhavishya Marathi Madhe) – मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ फळ देणार असेल. आजच्या दिवशी आपली निर्णय क्षमता अधिक चांगली होणार आहे. मुलांच्या शिक्षणासंदर्भात आपण व्यस्त असू शकता. मुलांना एखादा नवीन कोर्स, सर्वांगीण विकास करणारा एखादा कोर्स मध्ये प्रवेश देण्याच्या कामात व्यस्त असाल. घराच्या डागडुजी, नवीन साहित्य खरेदी संदर्भात कर्ज काढण्याची शक्यता आहे. आज आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आज कोणत्याही नवीन कामाची सुरुवात तुम्ही करू शकता. वैवाहिक जीवनात सुख प्राप्त होईल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ३ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पिवळा आहे.


dnyanjyotmarathi.com

वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) –  वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस भरपूर यश देणारा असेल. आजच्या दिवशी तुम्हाला शेअर बाजारात किंवा पूर्वी केलेल्या गुंतवणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभेल. आपण जोडीदारासाठी एखादा छोट्या व्यवसाय सुरू करण्याचे ठरवू शकता. आपण आज बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ शकता. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करावे लागेल. कोणतेही काम करताना त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. कामाच्या ठिकाणी कामावर पूर्ण लक्ष ठेवावे जेणेकरून वरिष्ठांची मर्जी संपादन होईल. आज जोडीदाराला वेळ देणे आवश्यक आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक २ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.

Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 03 Feb TO 09 Feb 2024

rashi bhavishya weekly

dnyanjyotmarathi.com

मिथुन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – मिथुन राशीच्या लोकांना आजचा दिवस सामान्य असा असेल. कामाच्या ठिकाणी आज आपल्या कामाची गती मंद असण्याची शक्यता आहे. कौटुंबिक नात्यात एखाद्या गोष्टीबद्दल गैरसमज झालेले असल्यास ते दूर होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी महिला कर्मचारी किंवा महिला मित्रांपासून अंतर ठेवून रहाव. आपल्या संदर्भात इतर कोणाला आपल्याबद्दल चुगली करण्याची शक्यता आहे. आज कोणतेही काम पूर्ण करताना थोडी अडचण जाणवेल. परंतु मंदपणे का होईना पण काम पूर्ण करा. आज आपल्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण त्यांची उठबस करण्यात व्यस्त असाल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ९ आहे व आपल्यासाठी आजचा रंग लाल आहे.


dnyanjyotmarathi.com

कर्क राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi)  – कर्क राशीच्या लोकांची आज प्रगती होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आपल्या क्षमतेनुसार काम मिळाल्याने तुम्हाला आनंद प्राप्त होईल. व्यवसायिकांना व्यवसाय संदर्भात अचानक बाहेरगावी प्रवास करावा लागेल. कामाच्या ठिकाणी आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कामसंदर्भात एखादी महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल. कुटुंबातील काही गोष्टींबद्दल आपण तणावग्रस्त असाल. थोडी आर्थिक अडचण जाणवेल त्यामुळे तुम्ही आपल्या एखाद्या मित्राकडून पैशाच्या मदती संदर्भात विचारू शकता. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ४ आहे व आपल्यासाठी आजचा रंग करडा आहे.


dnyanjyotmarathi.com

सिंह राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) –  सिंह राशीच्या लोकांना आजचा दिवस फलदायी असा ठरणार आहे. जे तरुण रोजगाराच्या चिंतेत आहेत, नोकरीच्या चिंतेत आहेत त्यांना चांगली बातमी समजू शकेल. कौटुंबिक वातावरण आनंदित राहील. आज मित्रांसोबत काही वेळ घालवाल जेणेकरून तुम्हाला आनंद प्राप्त होईल. आपल्या प्रगती मार्गावर येणारे अडथळे आपण सहजरीत्या पार करा. वैवाहिक सौख्य प्राप्त होईल. जोडीदारासोबत आज वेळ घालवणे आवश्यक आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक २ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.


dnyanjyotmarathi.com

कन्या राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – कन्या राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणार असा असेल. आज आपल्या हातून एखादे धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. आज आपण आपल्या उत्पन्नातील काही भाग गरिबांच्या सेवेसाठी देऊ शकता. आपण कुटुंबासोबत एखाद्या करमणुकीच्या कार्यक्रमास जाण्याची शक्यता आहे. आरोग्यांकडे लक्ष द्यावे. आरोग्य संदर्भात थोडे मन अस्वस्थ होईल. परंतु धीर धरणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी काम करताना कामाचे नियोजन करणे आवश्यक आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ९ आहे व आपल्यासाठी आजचा रंग लाल आहे.

आहार कसा निवडावा | Aahar Kasa Nivadava | योग्य आहार कसा घ्यावा? | Yogya Aahar Kasa Ghyava |


dnyanjyotmarathi.com

तूळ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi) –  तूळ राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असेल. कामाच्या ठिकाणी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या युक्त्या समजून घेणे आवश्यक आहे. प्रेम प्रकरणात असणाऱ्या व्यक्ती आपल्या प्रेमिकाची ओळख आपल्या कुटुंबात देऊ शकतात. पूर्वनियोजित कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. आज आपण गुंतवणूक करण्यासंदर्भात विचार करू शकता. परंतु गुंतवणूक करताना विचारपूर्वक गुंतवणूक करा. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ३ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पिवळा आहे.


dnyanjyotmarathi.com

वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – वृश्चिक राशीच्या लोकांना आजचा दिवस आनंद देणारा असेल. आज आपल्याला आनंद देणारी बातमी समजू शकेल. आज कोणताही निर्णय घेताना भावनावश होऊ नका. आपले मन थोडे तणावग्रस्त असू शकेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. आज आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबातील बाबींवर, सदस्यांच्या गरजेवर लक्ष देणे आवश्यक आहे. जोडीदारांच्या मतांचा आदर करणे. जोडीदारांसोबत आज वेळ घालवा. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ५ आहे व आपल्यासाठी आजचा रंग हिरवा आहे.


dnyanjyotmarathi.com

धनु राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) –  धनु राशीच्या लोकांना आजचा दिवस काही नवीन खरेदी करण्याच्या, नवीन मालमत्ता खरेदी करण्याच्या दृष्टीने योग्य असेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी इतर कोणावरही अवलंबून राहू नये. कुटुंबातील, कौटुंबिक समस्यांवर मार्ग काढणे आवश्यक आहे. आपण एखाद्याकडून कर्ज घेतले असल्यास आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. धनु राशीच्या लोकांना वैवाहिक सौख्य प्राप्त होईल. जोडीदारासोबत वेळ घालवणे आवश्यक आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक २ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.


dnyanjyotmarathi.com

मकर राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – मकर राशीच्या व्यक्तींच्या प्रतिष्ठेस आज आदर मिळणार आहे. वैवाहिक जीवनात असलेल्या समस्या आज बहुतांशी दूर होतील. दुसऱ्यांच्या आयुष्यात उगाच नाक खुपसू नये अन्यथा तुम्ही गोत्यात याल. आज एखादा कायदेशीर खटला आपल्यासाठी डोकेदुखी ठरू शकतो. एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी थोडा विचार करावा. राजकारणात काम करणाऱ्या लोकांनी आजूबाजूच्या लोकांच्या खेळी समजून घ्याव्यात. आणि त्यानुसार कार्य करावे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक २ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.

सहवास आणि सुसंवाद हे दोन कोणत्याही सुदृढ नात्याचे बीजमंत्र आहेत.

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

कुंभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अडीअडचणींनी ग्रासलेला राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना आज ओळखीचा फायदा होईल. आज कुटुंबासाठी काहीतरी व्यवसाय किंवा उद्योग करण्याचा प्रयत्न कराल. जर जोडीदाराशी भांडण झाले असेल जास्त ताणून धरू नका समन्वय साधून मिटवण्याचा प्रयत्न करा. आज घरात एखादा नवीन वाहन आणण्याचा विचार कराल. तुम्ही तुमच्या व्यवसायात चांगली गुंतवणूक केली असाल तर त्याच्या वरती चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आज आपले काही मित्र आपल्याला भेटायला येऊ शकतात. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ८ आहे व आपल्यासाठी आजचा रंग निळा आहे.


dnyanjyotmarathi.com

मीन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe)  – मीन राशीच्या व्यक्तींसाठी आज आरोग्य विषयक काळजी घेणे आवश्यक आहे. आज आपण स्वतःबद्दल शुभ आणि चांगले चिंतावे जेणेकरून तशा प्रकारचे सकारात्मक बदल आपल्या आजूबाजूला तयार होतील. आपल्याला एखाद्यावर अधिक विश्वास ठेवणे टाळावे लागेल. अति तेलकट अति तिखट पदार्थांचे सेवन कमी करावे आपल्या प्रकृतीस त्याने इजा होण्याची शक्यता आहे. आपण जे सामाजिक कार्य कराल त्यामध्ये आपली प्रतिमा नजरेत भरणारी राहील. चांगले प्रतिष्ठित पद मिळण्याची शक्यता आहे. प्रेम आणि सहकार्याची भावना आपल्या मनात राहील. आज एखादा जुना व्यवहार मार्गी लागेल. आज चांगले वाचन करा. त्याचा नक्कीच चांगला उपयोग होईल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ६ आहे व आपल्यासाठी आजचा रंग गुलाबी आहे.


(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)


आहार कसा निवडावा | Aahar Kasa Nivadava | योग्य आहार कसा घ्यावा? | Yogya Aahar Kasa Ghyava |

Sanskar | संस्कार म्हणजे काय ? मुलांच्या अवस्था ? | Mulavar Sanskar kase karave |

Cyber Crime | सायबर क्राइम म्हणजे काय? | What is cyber crime?

शेती करा आणि श्रीमंत व्हा ! Sheti kara ani shrimant vha! | Farming | Agriculture

Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 03 Feb TO 09 Feb 2024