Today Rashi Bhavishya in marathi| आजचे राशी भविष्य मराठी (शुक्रवार, ३१ जानेवारी २०२५) |Aajche Rashi bhavishya
Rashi Bhavishya / Rashi bhavishya Today : मेष राशीचे आजचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Aajche Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र कुंभ राशीत असून आपल्या राशीत चंद्र लाभ स्थानी आहे. मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ जाणार आहे. आपले कायदेशीर प्रकरण चालू असल्यास जास्त परिश्रम न करता निकाल योग्य लागण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आपल्या हातून जे काम होणार आहे त्यात यश व समाधान प्राप्त होईल. भविष्यासाठी आपण चांगली गुंतवणूक करू शकता ज्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल. व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसाय बाबत कोणताही कराल प्रलंबित असेल तर तो आजच्या दिवशी पूर्ण होण्याची शक्यता आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ७ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.
वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र कुंभ राशीत असून आपल्या राशीत चंद्र दहाव्या स्थानी आहे. वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस ताणतणावात जाणार आहे. कामाच्या क्षेत्रात आपण कामात काही बदल केल्या असल्यास आपल्याला फायदेशीर ठरेल. भागीदारीत एखादा व्यवसाय करत असल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. आपण करत असलेल्या कठोर परिश्रमाचे नक्कीच चांगले फळ प्राप्त होईल. एखादा जुना मित्राची भेट तुम्हाला सुखकारक ठरेल. कोणतेही काम करताना घाई न करता विचारपूर्वक व नीटनेटके करावे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ६ आहे व आपल्यासाठी आजचा रंग गुलाबी आहे.
Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 27 Jan TO 02 Feb 2024
मिथुन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र कुंभ राशीत असून आपल्या राशीत चंद्र लाभ स्थानी आहे. मिथुन राशीच्या लोकांना आजचा दिवस शांततापूर्ण जाणार आहे. वाहने चालवताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. कोणत्याही अनावश्यक कार्यामुळे नुकसान होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत समंजसपणाने वागावे. कोणाशी बोलताना प्रथम विचार करणे व नंतर बोलणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी आपल्या कामावर खुश होऊन एखादा पुरस्कार किंवा शाबासकी मिळण्याची शक्यता आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ४ आहे व आपल्यासाठी आजचा रंग करडा आहे.
कर्क राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र कुंभ राशीत असून आपल्या राशीत चंद्र आठव्स्थाया नी आहे. कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस काही नवीन कार्य सुरू करण्यास अनुकूल आहे. आजच्या दिवशी काही खास लोकांच्या भेटीसाठी होतील. कुटुंबात एखादा शुभ आणि मांगलीक कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो ज्यामुळे कुटुंबातील सदस्य व्यस्त असतील. आपण कोणाकडून कर्ज घेतले असेल तर ते पूर्ण करण्यास यशस्वी होऊ शकता. व्यवसायिकांना एखाद्या करारा बाबत विलंब होत असल्यास आजच्या दिवशी तो अंतिम टप्प्यात येऊ शकतो. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ८ आहे व आपल्यासाठी आजचा रंग निळा आहे.
सिंह राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र कुंभ राशीत असून आपल्या राशीत चंद्र सातव्या स्थानी आहे. सिंह राशीच्या लोकांना आजचा दिवस आनंदी जाणार आहे. आज आपण बरीच मोठी गुंतवणूक करू शकता. सामाजिक क्षेत्रात आपल्या हातून कार्य होऊ शकते. पूर्वी घडलेल्या चुकांमुळे तुम्हाला चांगलाच अनुभव येईल. विद्यार्थ्यांना परदेशात जायचे असेल, शिक्षण घ्यायचे असल्यास त्यांनी वेगवान प्रयत्न केले पाहिजे. तरच तुम्हाला संधी मिळू शकेल. मुलांच्या प्रगतीमुळे कुटुंबातील सदस्यांना आनंद प्राप्त होईल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ६ आहे व आपल्यासाठी आजचा रंग गुलाबी आहे.
Aahar Niyojan बाबत, अन्न ग्रहणाबाबतचे काही साधे नियम पाहूया –
कन्या राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र कुंभ राशीत असून आपल्या राशीत चंद्र सहाव्या स्थानी आहे. कन्या राशीच्या लोकांना आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने कमकुवत असणार आहे. आज आपली अपरिचित व्यक्तींची भेट होऊ शकते. आपले आरोग्य आज आपल्याला त्रास देऊ शकते त्यामुळे गांभीर्याने घ्यावे. आपले एखादी पूर्वनियोजित काम पूर्ण होईल. विद्यार्थी आज एखाद्या बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ शकतात. आज तुम्ही जोडीदारासाठी एखादे आश्चर्यचकित करणारी भेट देऊ शकता. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ५ आहे व आपल्यासाठी आजचा रंग हिरवा आहे.
तूळ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र कुंभ राशीत असून आपल्या राशीत चंद्र पाचव्या स्थानी आहे. तुळ राशीच्या लोकांना आजचा दिवस वादविवादाने भरलेला असू शकतो. कुटुंबातील एखादा सदस्य बद्दल आपल्याला वाईट बातमी समजू शकते. मालमत्तेच्या संबंधी एखादा वाद चालू असल्यास आपण शांततेत राहिल्यास फायदा होऊ शकेल. आपल्याला आपल्या मुलांच्या सहकार्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कोणताही व्यवहार करताना त्याबद्दल अभ्यास करणे व त्या व्यवहाराची लिखापडी करणे आवश्यक आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ७ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.
वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र कुंभ राशीत असून आपल्या राशीत चंद्र चवथ्या स्थानी आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा तणावग्रस्त असण्याची शक्यता आहे. कोणतेही नवीन काम सुरू करताना पूर्ण विचारपूर्वक सुरू करावे. आपल्याला काही अपरिचित लोकांकडून दूर राहावे लागेल. महत्वाची कागदपत्र पूर्ण करण्यास अडथळा निर्माण होत असेल तर आज ही परिपूर्ण होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त आपला प्रवास होऊ शकेल. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून आपल्याला महत्त्वाचा सल्ला प्राप्त होऊ शकेल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ९ आहे व आपल्यासाठी आजचा रंग लाल आहे.
धनु राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र कुंभ राशीत असून आपल्या राशीत चंद्र तिसऱ्या स्थानी आहे. धनु राशीच्या लोकांना आजचा दिवस समिश्र फळ देणार असेल. आपण आपली ऊर्जा योग्य कामात ठेवल्यास आपल्यासाठी चांगले असेल. धनु राशीच्या लोकांना अध्यात्माची खूप गोड असेल. कोणतेही काम करताना नियोजनपूर्वक करणे आवश्यक आहे. मुलांच्या एखाद्या वागणुकीमुळे तुम्ही अस्वस्थ असू शकता. आपण आपल्या मालमत्तेविषयी वाद विवाद न करता भविष्याच्या विचाराने समंजसपणाने निर्णय घेतल्यास लाभदायक ठरेल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ६ आहे व आपल्यासाठी आजचा रंग गुलाबी आहे.
मकर राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र कुंभ राशीत असून आपल्या राशीत चंद्र दुसऱ्या स्थानी आहे. मकर राशीच्या लोकांना आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. व्यवसायात पूर्ण लक्ष द्यावे लागेल अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या प्रगतीच्या मार्गावर येणारे अडथळे दूर होतील. आपल्याला आपल्या वडिलांसोबत मनातील गोष्टीची चर्चा करण्यास संधी मिळू शकेल. आपली मुलं आपल्या अपेक्षेप्रमाणे कार्य करतील. एखाद्या बौद्धिक चर्चेत तुमची मुले सहभागी होऊ शकतात. वैवाहिक सुख लाभेल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ६ आहे व आपल्यासाठी आजचा रंग गुलाबी आहे.
Acidity | Apachan | अपचन-गॅसेसचा त्रास होतो? डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला तातडीने वाचा….
कुंभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र कुंभ राशीत असून आपल्या राशीत चंद्र पहिल्या स्थानी आहे. कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस वाईट अनुभव देणारा असेल. आपण काही नवीन लोकांना भेटू शकता त्यांचे अनुभव आपल्याला मार्गदर्शक ठरतील. मुलांच्या भविष्याबद्दल आपण तणावग्रस्त असाल. एखाद्याला उधार पैसे देणे टाळावे. कोणत्याही धोकादायक कामात हात घालू नका, अन्यथा त्या कामाबद्दल आपल्याला दिलगिरी मानावी लागेल. जोडीदारासोबत बाहेर फिरण्याचा प्लॅन करू शकता. वैवाहिक सुख लाभेल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ४ आहे व आपल्यासाठी आजचा रंग करडा आहे.
मीन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र कुंभ राशीत असून आपल्या राशीत चंद्र बाराव्या स्थानी आहे. मीन राशीच्या लोकांना आज थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. कोणतेही निर्णय घेताना काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, कारण चुकीच्या निर्णयामुळे गडबड होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चर्चा केल्याने वाद विवाद दुर होण्याची शक्यता आहे हे आपल्यासाठी चांगले होईल. कामाच्या ठिकाणी इतरांवर अवलंबून राहू नका. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक १ आहे व आपल्यासाठी आजचा रंग नारंगी आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)