Rashi Bhavishya | राशी भविष्य | Today’s Rashi Bhavishya| 26 March 2025 | Rashifal | Rashi Bhavishya 2025

Today Rashi Bhavishya in marathi| आजचे राशी भविष्य मराठी (बुधवार, २६ मार्च २०२५) |Aajche Rashi bhavishya

dnyanjyotmarathi.com

Rashi Bhavishya / Rashi bhavishya Today : मेष राशीचे आजचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Aajche Bhavishya Marathi Madhe) – मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा दिवस असेल. तुम्ही सामना करत असलेल्या समस्यांपासून मुक्त होण्याचा आजचा दिवस आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांनी केलेल्या कामामुळे नोकरीत उच्च स्थान मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्याला एखादी नवीन जबाबदारी देवू शकतात. मुलांना पालकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. कामाच्या दबावामुळे मानसिक ताण वाढेल, परंतु दिवसाच्या उत्तरार्धात समाधान मिळेल. वैवाहिक जीवनात ताण तणाव निर्माण होईल. आजच्या दिवशी पांढरे कपडे वापरल्यास फायदेशीर ठरेल.

Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 24 March TO 30 March 2024

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा दिवस असेल. वृषभ राशीच्या लोकांनी आपल्या आवश्यक कार्याकडे पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. नोकरीच्या ठिकाणी नवीन नवीन कामांना सामोरे जावे लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना नोकरीच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे. डोळ्यासंबधित समस्या निर्माण होवू शकतात. पूर्वी केलेल्या व्यवहारात लाभ मिळेल. मुलांसोबत संध्याकाळ आनंदात घालवाल. आज आपण धार्मिक कार्यासाठी पैसा खर्च करू शकता. ज्यामुळे मानसिक समाधान मिळेल. वरिष्ठ लोकांकडून किंवा धार्मिक गुरूंकडून मार्गदर्शन मिळेल. जोडीदारासोबत संध्याकाळ आनंदात घालवाल.


dnyanjyotmarathi.com

मिथुन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – मिथुन राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ फळ देणारा असणार आहे. कुटुंबात चालू असलेल्या समस्या सुटू शकतील. उधार दिलेले पैसे तुम्हाल परत मिळू शकतात. कोणावरही विश्वास ठेवून गुंतवणूक करू नका. गुंतवणूक करताना पूर्ण विचार करून गुंतवणूक करावी. व्यावसायिकांना व्यवसायाबाबत केलेला एखादा करारा बाबत समस्या उद्भवू शकतात ज्यामुळे मानसिक ताण वाढेल. मुलांचे अध्यनात मन लागेल. वेळ व्यर्थ घालवणे टाळावे व गरजेच्या कामात लक्ष दिले असता फायदा होईल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

ही नवीन वर्षाची सुरूवात म्हणजे नवीन संकल्प घेण्याचा दिवस.

gudi padwa

dnyanjyotmarathi.com

कर्क राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi)  – कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ फळ देणारा दिवस असेल. आर्थिक स्तोत्र वाढून उत्पन्नात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी आपल्याला कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. विरोधकापासून सावधगिरी राखावी. विद्यार्थ्यानाच्या मनात स्पर्थात्मक भावना असेल. कुटुंबियांकडून सहकार्य मिळेल. व्यवसायिकांनी व्यवसायाच्या वाढीकरिता सोशल मिडीयाचा वापर केल्यास नक्की फायदा होईल. आईच्या तब्बेतीची काळजी घेणे आवश्यक आहे. एखादा जुना आजार डोके वर काढू शकते. आज प्रवास योग आहे. प्रवास करताना वाहने सावकाश चालवावीत.


dnyanjyotmarathi.com

सिंह राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – सिंह राशीचा लोकान आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असणार आहे. पैशा संबधित बाबींकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तसे न केल्यास आर्थिक स्थिती कमकुवत होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना व्यवसायात गती मिळेल. आपल्या मनातील एखाद्या शंकेमुळे आपणा अस्वस्थ असू शकता. ज्यामुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीने सल्ला दिला व त्याप्रमाणे बदल आवश्यक असल्यास बदल करू शकता. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना चांगली बातमी समजू शकेल. कुटुंबातील एखादी समस्या सोडविण्यात महत्वाची भूमिका निभावू शकता. जोडीदारासोबत वेळ आनंदात घालवाल.


dnyanjyotmarathi.com

कन्या राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi)   – कन्या राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असेल. आपण नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असल्यास आज शुभ योग आहे. आपली एखादी प्रिय गोष्ट हरवली असल्यास ती आज सापडू शकते. नोकरीच्या ठिकाणी प्रेम आणि सहकार्याची भाबना असेल. कुटुंबातील अडचणी जाणून त्या अडचणींवर तुम्ही आज मात करण्यास यशस्वी व्हाल. शेतकरी बंधू शेतातील कामे मित्रांच्या सहकार्याने पूर्ण करू शकतील. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्या दिनचर्येत सकाळी ध्यान व योग करणे समाविष्ट करावे. विद्यार्थ्याना यश मिळण्यासाठी कठोर मेहनत करणे आवश्यक आहे. जोडीदाराच्या विचारांचा आदर करून त्यांच्या सोबत महत्वाच्या विषयावर चर्चा करू शकता.


dnyanjyotmarathi.com

तूळ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi)   – तूळ राशीच्या लोकांना आजचा दिवस सकारात्मक उर्जा देणारा दिवस असेल. नोकरीच्या ठिकाणी कामे पूर्ण करताना वेळेला महत्व देणे आवश्यक आहे जेणेकरून वेळेत कामे पूर्ण झाली असता वरिष्ठ लोकांकडून प्रशंसा केली जाईल. राजकारणात काम करणाऱ्या लोकांकडून सामाजिक कार्य होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे समाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. ज्या विद्यार्थ्याना परदेशात जायचे आहे अशा विद्यार्थ्यानी कठोर मेहनत करणे आवश्यक आहे. त्यांना चांगली संधी चालून येईल. आपण मुलांकडून चांगली बातमी ऐकू शकता. कुटुंबातील सदस्याच्या गरजा ओळखून त्या वेळीच पूर्ण करणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनान नेहमीपेक्षा आजचा दिवस आपल्यासाठी वेगळा ठरणार आहे.


dnyanjyotmarathi.com

वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi)   – वृश्चिक राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ फळ देणारा असेल. आजच्या दिवशी आनंद देणाऱ्या बातम्या समजतील. कुटुंबात एखादे शुभ कार्य आयोजित करू शकता. ज्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान प्राप्त होईल. नशिबाच्या आधारावर कोणतेही कार्य न सोडता आपल्याला कठोर मेहनत करून ते कार्य पूर्ण करणे आवश्यक आहे. आज काही महत्वाच्या लोकांसोबत आपले संवाद होईल ज्यामुळे तुमच्या मनात सकारात्मक भावना जागृत होईल. विद्यार्थी नवीन कोर्स मध्ये प्रवेश घेवू शकतात. आज आपण एखाद्या गरिबाला, गरजूला मदत केली असता लाभ मिळेल. आज बुद्धीचा सद्सदविवेक बुद्धीचा वापर करून तुम्हाला एखादा निर्णय घ्यावा लागू शकतो. जोडीदारासोबत संध्याकाळ चांगली जाईल.

नोकरी की व्यवसाय | Nokari ki Vyavsay | Job or Business | Naukri or Business

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

धनु राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – धनु राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असणार आहे. आपण करत असलेल्या मेहनतीमुळे तुमची अनेक कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आपण आपल्या भविष्याचा आर्थिक नियोजन बाबत चिंतीत असाल तर चिंता करण्याची आवश्यकता नाही. भविष्याबाबत योग्य विचार करून योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी. पालकांच्या आर्शीवादाने आपले अडकलेली कामे पूर्ण होतील. आज आपल्याला आरोग्याकडे पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. व्यावसायिक आपल्या व्यवसायात काही नवीन गोष्ठी, नवीन तंत्र वापरु शकतात ज्यामुळे तुमचे आर्थिक उत्पन्न वाढेल. विद्यार्थ्याना अध्ययनात लक्ष लागेल. जोडीदाराच्या भावना लक्षात घेवून त्यांचा सोबत वेळ घालवणे आवश्यक आहे.


dnyanjyotmarathi.com

मकर राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe)  – मकर राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ फळ देणारा असणार आहे. आज आपल्या हातून सामाजिक कार्य होण्याची शक्यता आहे ज्यामुळे आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायात त्यांची मुले सहकार्य करतील. आज आपण जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी दर्शनाकरिता जावू शकता. भविष्याबाबत करत असलेल्या नियोजनाची चर्चा इतर लोकांसोबत करू नका . तुमच्या मनमोहक व आकर्षक जीवनशैलीमुळे आपल्या कडे अनेक लोक आकर्षित होवू शकतात. प्रेमी जीवनाकरिता आजचा दिवस शुभ आहे. जोडीदारासोबत एखाद्या जुन्या विषयावरून भांडण होवू शकते, परंतु संवादाने ते भांडण मिटू शकते.


dnyanjyotmarathi.com

कुंभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असेल. आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांना व्यस्त जाणारा आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना नोकरीच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरीच्या ठिकाणी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत तुम्हाला संयम राखणे आवश्यक आहे. विरोधका पासून सावधगिरी बाळगावी. विवाह करण्यास इच्छुक असणाऱ्या लोकांना लग्न स्थळे चालून येतील. आपले एखादे काम आर्थिक टंचाईमुळे थांबले असल्यास ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांची पदोन्नती होण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांना मानसिक समाधान व आनंद प्राप्त होईल. विद्यार्थ्याचे अध्ययनात लक्ष लागेल. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा माराल.


dnyanjyotmarathi.com

मीन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस थोडा अडचणींना सामना करावा लागेल असा दिवस असेल. एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असल्यास काळजी घेणे आवश्यक आहे. कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. मुलांच्या भविष्यासाठी एखादा निर्णय घ्यावा लागेल. कामाच्या ठिकाणावरून लवकर वेळ काढून आपल्या आवडत्या गोष्ठी करिता वेळ द्या आनंद मिळेल. सुखी वैवाहिक जीवन कसे असते याचा अनुभव तुम्हाला आज येणार आहे. एकमेकामधील प्रेम वाढेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना नोकरी मिळेल. आरोग्य चांगले राहील.


(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)


आहार कसा निवडावा | Aahar Kasa Nivadava | योग्य आहार कसा घ्यावा? | Yogya Aahar Kasa Ghyava |

Sanskar | संस्कार म्हणजे काय ? मुलांच्या अवस्था ? | Mulavar Sanskar kase karave |

Cyber Crime | सायबर क्राइम म्हणजे काय? | What is cyber crime?

शेती करा आणि श्रीमंत व्हा ! Sheti kara ani shrimant vha! | Farming | Agriculture

Gudi Padwa : गुढीपाडवा बाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या. गुढी का व कशी उभी करायची जाणून घ्या !

Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 24 March TO 30 March 2024