Today Rashi Bhavishya in marathi| आजचे राशी भविष्य मराठी (शुक्रवार, २४ जानेवारी २०२५) |Aajche Rashi bhavishya
Rashi Bhavishya / Rashi bhavishya Today : मेष राशीचे आजचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Aajche Bhavishya Marathi Madhe) – मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चिंतेत जाणार आहे. वडिलोपार्जित चालत आलेल्या परंपरेवर, मालमत्तेवर लक्ष द्यावे लागेल. तुम्ही मुलांच्या भविष्याबाबत जोडीदारासोबत गुंतवणुकीबाबत विचार विनिमय करू शकता किंवा एखादी गुंतवणूक देखील कराल. मालमत्ते संबंधित एखादी केस कोर्टात चालू असेल तर निकाल आपल्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. जास्त पैशाच्या मागे लागू नका, प्रकृतीकडे लक्ष द्या. तुमच्या एखादा जुन्या मित्राची भेट होईल ही भेट आपल्याला सुखद अनुभव देईल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ८ आहे व आपल्यासाठी आजचा रंग निळा आहे.
वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य फळ देणारा असणार आहे. तुमची तुमच्या परिवारासोबत काही विषयासंदर्भात चर्चा, विचार विनिमय होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर खोटे आरोप होण्याची शक्यता आहे त्यामुळे काळजी घ्यावी. असे घडल्यास आपण आपली बाजू मांडणे आवश्यक आहे. कुटुंबात प्रेम व सहकार्याची भावना असेल. तुमचे आज लक्ष विचलित असल्यास योग आणि ध्यान केल्यास समाधान मिळेल. आज तुम्ही तुमची दिनचर्या, दिनक्रम सांभाळावे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ८ आहे व आपल्यासाठी आजचा रंग निळा आहे.
नक्की वाचा : पालक नोकरीच्या #nokari फायद्याचा आणि तोट्याचा विचार करतात.
मिथुन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ फळ देणारा असणार आहे. तुमच्या आईची प्रकृती ठीक नसल्यास तुमचा दिवस थोडा तणावात, चिंतेत जाण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी दिलेले काम वेळेत पूर्ण न केल्यामुळे मानसिक तणाव वाढेल. आज तुम्ही घरातील लहान मुलांसोबत थोडा वेळ मजेत घालवाल. शिक्षण घेणारे विद्यार्थी उच्च शिक्षणाबाबत मार्ग शोधत असल्यास त्यांच्यासाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. तुमचा कामात यशस्वी होणार काही अडचण येत असल्यास असे अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. आज प्रवास योग आहे. प्रवासात तुम्हाला नवीन नवीन अनुभव किंवा नवीन काही गोष्टी शिकायला मिळतील. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ६ आहे व आपल्यासाठी आजचा रंग गुलाबी आहे.
Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 20 Jan TO 26 Dec 2024
कर्क राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ फळ देणारा, आनंद देणारा असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामात काही चुका होण्याची शक्यता आहे त्यामुळे काम करताना लक्षपूर्वक काम करावे. व्यवसायिकानी आपल्या कामात आपल्या व्यवसायात पूर्ण लक्ष देणे गरजेचे आहे. कार्यालयात स्त्री मैत्रिणीकडून पूर्ण सहकार्य लाभेल. तुम्ही तुमच्या भावंडांकडून काही मदत, सहकार्य मागितल्यास तुम्हाला सहकार्य नक्की मिळेल. जर तुम्ही बँकेत, पतपेढी कर्जाबाबत अर्ज केला असल्यास तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ९ आहे व आपल्यासाठी आजचा रंग लाल आहे.
सिंह राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – सिंह राशीच्या लोकांना आजचा दिवस मिश्र फळ देणारा असेल. कामाच्या ठिकाणी कामावर लक्ष द्यावे लागेल. परिवारातील काही गोष्टींबाबत तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्यातील वागण्यातील सौम्यतामुळे तुम्हाला घरात, समाजात आदर दिला जाईल. वडिलोपार्जित मालमत्तेवरून कुटुंबात वाद विवाद होण्याची शक्यता आहे. कृपया वाणीवर, रागावर नियंत्रण ठेवावे. प्रकृतीबाबत काळजी घ्यावी. पोटाच्या समस्या वाढू शकतात. वडिलांच्या मार्गदर्शनामुळे सहकार्यामुळे तुमची नियोजित कामे पूर्ण होतील. आज तुमच्या बाबत नवीन विरोधक निर्माण होऊ शकतात. नवीन लोकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्याशी चर्चा केल्यामुळे तुमच्या विचारसरणीत चांगला भर पडेल. याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ८ आहे व आपल्यासाठी आजचा रंग निळा आहे.
कन्या राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने व आत्मविश्वासाने भरलेला असणार आहे. कोणताही निर्णय घेताना घाई करू नये अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. तुम्हाला तुमच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. घरात एखादे बांधकाम चालू असल्यास बांधकामात लक्ष देऊन कामे पूर्ण करून घ्यावीत. एखाद्या हितचिंतकाने दिलेल्या सल्ल्यामुळे तुमचे मन अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे. आज प्रवास योग आहे तुम्ही मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत पिकनिक नियोजित करू शकता. जोडीदारासोबत वेळ घालवणे त्यांच्या विचारांचा, भावनेचा आदर करणे आवश्यक आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ६ आहे व आपल्यासाठी आजचा रंग गुलाबी आहे.
तूळ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi) – तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कठीण प्रयत्न करण्याचा दिवस असेल. तरुणांना त्यांच्या करिअरवर थोडे लक्ष केंद्रित करावे लागेल. करिअरसाठी मेहनत प्रचंड प्रमाणात घेण्याची मानसिकता ठेवावी लागणार आहे. येणाऱ्या अडथळ्यांना शांततेने सामोरे जावे लागेल. इतरांबद्दल विनाकारण बोलू नये. अविवाहित व्यक्तींची उद्या त्यांच्या जोडीदारा सोबत भेट होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ८ आहे व आपल्यासाठी आजचा रंग निळा आहे.
आपल्या शरीराला कोणतं अन्न लागतं? काय खाल्ल्याने पोषण मिळतं? आणि काय खाल्ल्याने त्रास होतो ?
वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस विचारपूर्वक निर्णय घेऊन कार्य करण्याचा राहील. अनावश्यक गोष्टींच्या वादात पडणे टाळावे. तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. नवीन घर घेण्यासाठी विचार करत असाल तर पाऊल पुढे टाकू शकता. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर आज त्याची बऱ्यापैकी परतफेड करण्यासाठी प्रयत्न कराल. तुम्हाला संयम आणि धैर्याने काम करावे लागेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा आज चांगली राहील. तुमच्या पालकांच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात मोठे यश मिळवू शकाल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक १ आहे व आपल्यासाठी आजचा रंग नारंगी आहे.
धनु राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल फळ देणारा असणार आहे. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पनांनी, नाविन्यपूर्ण योजनांनी इतरांना आकर्षित कराल. तुमच्या आजूबाजूचे वातावरण आज प्रसन्न राहील. काही नवीन कामात तुमची आवड जागृत होऊ शकते. तुम्हाला कोणत्याही कामाचे योग्य नियोजन करून पुढे जाणे आवश्यक आहे. आज एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी लाभेल. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींबद्दल आज आदराची व प्रेमाची भावना निर्माण होईल त्यामुळे कौटुंबिक सौख्य लाभेल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ७ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.
मकर राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगली कामगिरी दाखविण्याचा दिवस असणार आहे. आज तुमच्या कामाला प्रगतीला चांगली गती मिळाल्याने वेगाने मनासारखे कार्य साधता येईल. तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चाकडे लक्ष देण्याची गरज आहे. कोणत्याही गोष्टीवर विनाकारण रागावू नका. जर तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते आज तुमच्यासाठी योग्य फळ देणारे ठरेल. आज इजा होण्याची शक्यता असल्याने वाहनांचा वापर सावधगिरीने करावा लागेल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ७ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.
कुंभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमचा प्रभाव आणि वैभव वाढवणारा असणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रातील लोकांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. जेणेकरून कार्य वेळेत संपन्न करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याकडेही थोडे लक्ष देणे आवश्यक आहे. नकारात्मक विचार असलेल्या लोकांपासून अंतर ठेवावे. तुमच्यातील काही दुर्गुणांमुळे आज तुमचा जोडीदार तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे. आज विचारपूर्वक व्यवहार करावा. अन्यथा अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ५ आहे व आपल्यासाठी आजचा रंग हिरवा आहे.
पालक नोकरीच्या #nokari फायद्याचा आणि तोट्याचा विचार करतात.
मीन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संमिश्र फलदायी असणार आहे. तुमच्या कामात काही अडथळे येत असतील तर ते आज बऱ्यापैकी दूर होण्याची शक्यता आहे. आज नशीब बलवत्तर असेल. परंतु नशीब जरी चांगले असले तरी सुद्धा कामात हलगर्जीपणा करू नये. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. व्यवसाय करणारे लोक त्यांच्या व्यवसायात काही नवीन योजनांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करतील, जे त्यांच्यासाठी चांगले असेल. तुमच्या तब्येतीत काही चढ-उतारांमुळे तुम्ही थोडे चिंतीत राहाल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ३ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पिवळा आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)