Today Rashi Bhavishya in marathi| आजचे राशी भविष्य मराठी (गुरुवार, २३ जानेवारी २०२५) |Aajche Rashi bhavishya
Rashi Bhavishya / Rashi bhavishya Today : मेष राशीचे आजचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Aajche Bhavishya Marathi Madhe) – मेष राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवसाचे ग्रहमान चांगले राहिल. दिवस चांगला जाणार आहे. एखादे चांगले काम तुमच्या हातूनच होणार असल्याने त्यासाठी बाहेर जावे लागणार आहे. कोणतेही कार्य करताना नकारात्मक विचार मनात ठेवू नयेत. आज कदाचित कौटुंबिक समस्या पुन्हा डोके वर काढतील, ज्यामुळे तुमचा तणाव वाढेल. विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा असेल तर आजचा दिवस अनुकूल आहे. आज पैशाची बऱ्यापैकी आवक झाल्याने तुम्ही तुमचे कर्ज फेडण्याचा प्रयत्न कराल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ६ आहे व आपल्यासाठी आजचा रंग गुलाबी आहे.
वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – वृषभ राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवसाचे ग्रहमान आनंदी ठेवणारे असणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी आपल्या कामात पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. आज चांगला नफा होऊ शकतो त्यामुळे तुमच्या कामाकडे अत्यंत आत्मीयतेने लक्ष द्या व कार्य करा. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एखादे नवीन काम सुरू करू शकता. तुमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमचे कोणतेही प्रलंबित काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. राजकारणाची निगडित व्यक्तींनी आज त्यांच्या कार्यात जपून पाऊल टाकावे. तुमचे काही नवीन शत्रू तयार होण्याची शक्यता आहे. जे तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. कुटुंबासाठी, व्यवसायासाठी एखादी चांगली योजना, कल्पना डोक्यात असेल तर त्याला आज गती मिळेल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ५ आहे व आपल्यासाठी आजचा रंग हिरवा आहे.
Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 20 Jan TO 26 Dec 2024
मिथुन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – मिथुन राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवसात रेंगाळलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. ग्रहमान चांगले असले तरी सुद्धा कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही गतीशील असणे आवश्यक आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ होईल. आज तुमच्या भावंडांच्या मदतीने काही महत्त्वाची कामे पूर्ण कराल. आज तुमच्या मुलाच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगली प्रगती दिसेल. आजचा दिवस कालपर्यंतच्या दिवसांपेक्षा अधिक चांगला असेल. आज आई-वडिलांची सेवा तुमच्या हातून घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कौटुंबिक जिव्हाळा वृद्धिंगत होईल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ३ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पिवळा आहे.
कर्क राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – कर्क राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवसाचे ग्रहमान छान व खास असणार आहे. व्यावसायिकांना किंवा इतर कामात आज तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आज कुटुंबातील काही घरगुती कामे पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा जेणेकरून घरातील वातावरण प्रसन्न राहील. घरासाठी थोडाफार खर्च कराल. प्रेमी युगूलांसाठी सुद्धा आजचा दिवस आनंदाचा राहील. तुमच्या मुलांसोबत आज एखाद्या धार्मिक स्थळी किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी फिरायला जाण्याची शक्यता आहे. काही जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला आज चांगले फायदे मिळतील. त्यामुळे पैशाची आवक वाढल्याने जुनी देणी, कर्ज बऱ्यापैकी फेडू शकाल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ७ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.
सिंह राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी आव्हानांनी भरलेला असणार आहे. आज तुम्हाला संयमाने आणि धैर्याने काम करावे लागणार आहे. डोके शांत ठेवून अगदी विचारपूर्वक कार्य करावे. आज वडीलधाऱ्या व्यक्तींकडून एखाद्या कारणामुळे राग ओढाळून घ्याल. परंतु इतर कौटुंबिक संबंध दृढ राहतील. तुम्हाला आज तुमच्या व्यवहारातील गुंतवणुकीबाबत सतर्क रहावे लागेल. नोकरदार वर्ग किंवा व्यावसायिकांसाठी विद्यार्थ्यांसाठी एखाद्या कार्याबद्दल कौतुक किंवा सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. कोणत्या गोष्टीबद्दल जर मनात किंतु किंवा तणाव असेल तर तो आज सकारात्मक रित्या मार्गी लागेल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ५ आहे व आपल्यासाठी आजचा रंग हिरवा आहे.
कन्या राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नाविन्यपूर्ण काम करण्यासाठी उत्तम दिवस आहे. एखादा संकल्प किंवा योजना आज पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे सातत्याने प्रयत्नशील राहा. तुमच्या वैयक्तिक बाबतीत कोणतीही गोष्ट कोणाशीही शेअर करू नका. मित्रांसोबत मजेत वेळ घालवाल. कोणत्याही शारीरिक समस्येला किरकोळ समजू नका, अन्यथा नंतर मोठा आजार होऊ शकतो. नवीन वाहन खरेदीचा विचार असेल तर आज त्यासाठी कर्ज घेण्यासाठी दिवस योग्य आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ४ आहे व आपल्यासाठी आजचा रंग करडा आहे.
आहार कसा निवडावा | Aahar Kasa Nivadava | योग्य आहार कसा घ्यावा? | Yogya Aahar Kasa Ghyava |
तूळ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi) – तूळ राशीच्या लोकांसाठी उद्याचे ग्रहमान संपत्तीत वाढ करणारे राहील, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक संपत्तीत वाढ करणारे राहील. हरवलेले पैसे किंवा दागिने मिळण्यासाठी आजचे ग्रहमान अनुकूल आहे, प्रयत्नात सातत्य ठेवा. तुमच्या सासरचे कोणीतरी आज तुम्हाला भेटायला येण्याची शक्यता आहे. आज काही किरकोळ कौटुंबिक समस्यांमुळे थोडीफार चिंता लागून राहील. आज तुमचे व्यवसायात लक्ष नसल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुकसान टाळायचे असल्यास लक्षपूर्वक काम करा. आज कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ६ आहे व आपल्यासाठी आजचा रंग गुलाबी आहे.
वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक परिणाम देणारा असणार आहे. स्वतःच्या कामात लक्ष द्या इतरांच्या कामांकडे लक्ष दिल्याने तुमचे काम अपूर्ण राहू शकते आणि तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणाला काही शब्द दिला असल्यास तो आज अवश्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. तुमच्या आईला आरोग्यविषयक काही समस्या उद्भवू शकते. राजकारणाशी संबंधित लोकांना एखाद्या मोठ्या नेत्याला भेटण्याची आज प्रयत्न केल्यास संधी मिळू शकेल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ८ आहे व आपल्यासाठी आजचा रंग निळा आहे.
धनु राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – धनु राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला फलदायी ठरणार आहे. तुमच्या आजूबाजूचे वातावरण आज प्रसन्न असेल. व्यवसायात चांगला नफा मिळाल्याने आनंदी असाल. ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आज जवळचे मित्र मैत्रिणी भेटण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत छान वेळ घालवाल. पार्ट टाइम जॉब करणाऱ्या लोकांसाठी आज चांगला वेळ मिळेल. तुमच्या घरी काही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होण्याची शक्यता आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ५ आहे व आपल्यासाठी आजचा रंग हिरवा आहे.
मकर राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायक ग्रहमान देणारा आहे. तुम्ही केलेल्या कार्याचे चांगले फळ आज मिळणार आहे. तुमचे चांगले संपर्क वाढवा त्यातून तुम्हाला चांगल्या विचारांच्या माणसांचा सहवास लाभेल. ज्ञानात भर पडेल. तुम्ही अनोळखी व्यक्तीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. त्यामुळे नुकसान होऊ शकते. उगाचच दिखावा करण्याचे टाळा. मार्केटिंगशी संबंधित लोकांना आज चांगला फायदा होईल. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून सरप्राईज गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. आज कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींकडून कामाबाबत तुम्ही सल्ला घेण्याची शक्यता आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ५ आहे व आपल्यासाठी आजचा रंग हिरवा आहे.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी सध्या व्याजदर 8.2 टक्के आहे | Sukanya Samriddhi Yojana |
कुंभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – कुंभ – कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साही, प्रफुल्लित करणारा ठरणार आहे. आज मिळणारा नफा त्यातून होणारा खर्च याचा योग्य तो ताळमेळ घालावा लागेल. आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवावे. प्रेमी-युगुलांमध्ये सरप्राईज गिफ्ट ची देवाण-घेवाण होईल. त्यामुळे दोघांनाही आनंद मिळेल. आज तुमच्या सुख सोयींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. एखाद्या नवीन कामात तुम्हाला आवड निर्माण होईल. तुम्हाला आज तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. तुमचा व्यवसाय पूर्वीपेक्षा चांगला होईल. आज व्यवसायाकरिता एखादे यंत्र खरेदी करण्याची शक्यता आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ३ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पिवळा आहे.
मीन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आजचा दिवस मीन राशींच्या लोकांसाठी प्रत्येक गोष्टीसाठी चांगला ठरणार आहे. व्यावसायिक लोकांनी, कायदेशीर सल्लागार अशा काही ठराविक व्यक्तींनी आपल्या महत्त्वाच्या कामाकडे पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. कोणत्याही कायदेशीर बाबींवर दीर्घकाळ विवाद झाला असेल तर त्यात तुम्हाला आज यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. एखाद्या दैनंदिन कामात नाविन्य म्हणून बदल करू शकता. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे लग्न निश्चित झाल्याने कुटुंबात आनंदी वातावरण असेल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ९ आहे व आपल्यासाठी आजचा रंग लाल आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)