Today Rashi Bhavishya in marathi| आजचे राशी भविष्य मराठी (शुक्रवार, १७ जानेवारी २०२५) |Aajche Rashi bhavishya

Rashi Bhavishya / Rashi bhavishya Today : मेष राशीचे आजचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Aajche Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र पाचव्या स्थानी आहे. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करण्याचा दिवस असेल, कारण विचारपूर्वक निर्णय घेतला नाही तर तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच गुंतवणूक करावी. आज वाहने जपून वापरावी लागतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडल्यामुळे तुमचे मन अस्वस्थ होईल. विद्यार्थी शिष्यवृत्तीशी संबंधित परीक्षेची तयारी करण्यासाठीचा विचार करतील. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक १ आहे व आपल्यासाठी आजचा रंग नारंगी आहे.

वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र चवथ्या स्थानी आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. आज काही खास लोकांना भेटण्याची संधी मिळेल. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत सुद्धा वाढतील. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर आणि मन शांती देणारे ठरेल. एखाद्याकडून घर वगैरे खरेदी करणे तुमच्यासाठी चांगले राहील. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरीसाठी घरापासून दूर जावे लागेल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ९ आहे व आपल्यासाठी आजचा रंग लाल आहे.
शेतकरी पैशाने श्रीमंत तर होईलच परंतु देश मात्र संपन्न आणि समृद्ध होईल. #agriculture


मिथुन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र तिसऱ्या स्थानी आहे. मिथुन राशीच्या लोकांनी आज कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहावे. कोणतीही कायदेशीर बाब तुमच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. तुम्हाला कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून सरप्राईज गिफ्ट मिळू शकते. जुन्या व्यवहारातून तुमची सुटका होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या चांगल्या विचारसरणीचा फायदा करून घ्याल. आज अगदी विचारपूर्वक एखाद्याला पैसे किंवा उसनवार काही देताना विचार करावा. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात नोकरीच्या व्यवसायाच्या ठिकाणी कोणाचीही मदत मागितल्यास ती मदत तुम्हाला सहज मिळेल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ७ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.

कर्क राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र दुसऱ्या स्थानी आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असणार आहे. तुमचा कुटुंबात तसेच इतर ठिकाणी आदर वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल. तुम्हाला तुमच्या प्रियजनांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन योजना आखून काम सुरू करू शकता. भागीदारीत कोणतेही काम करण्यापूर्वी नीट विचार करावा लागेल. तुमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने आज तुमचे प्रलंबित राहिलेले काम पूर्ण होईल. तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्याच्या बोलण्याने प्रभावित होण्याचे टाळावे लागेल. संयमाने वागावे लागेल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक २ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.

सिंह राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र प्रथम स्थानी आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र ग्रहमान असल्याने सामान्य असणार आहे. तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा पूर्ण लाभ आज मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसह कुठेतरी बाहेर सहलीसाठी किंवा आप्तेष्टांकडे मित्रमंडळींकडे किंवा धार्मिक स्थळी जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कामाच्या अगर व्यवसायाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कोणतेही नवीन काम हाती घेण्यापूर्वी नीट विचार करावा. एखाद्याने सांगितलेल्या गोष्टीबद्दल वाईट वाटल्यामुळे तुमचे मन अस्वस्थ राहील. व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही चांगले नाव कमवाल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ९ आहे व आपल्यासाठी आजचा रंग लाल आहे.

कन्या राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र बाराव्या स्थानी आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. व्यवसायात तुम्हाला काही चढ-उतारांना सामोरे जावे लागेल, ज्यामुळे तुमच्या अडचणी वाढतील. तुम्हाला सरप्राईज गिफ्ट मिळाल्याने आनंद मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमच्या सुखसोयी मध्ये वाढ होईल, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. मुले कोणत्या ना कोणत्या परीक्षेच्या तयारीत व्यस्त दिसतील. तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांशी बोलण्यापूर्वी तुम्हाला नीट विचार करावा लागेल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ७ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.
चांगल्या आरोग्याचा मूलमंत्र – सहा कामे नेहमी योग्य वेळी केली पाहिजेत. | Aarogya |आरोग्य


तूळ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र लाभ स्थानी आहे. तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समस्यांनी भरलेला असणार आहे. घरात राहूनच कौटुंबिक बाबींचे निराकरण केल्यास ते तुमच्यासाठी चांगले होईल. तुम्ही अविचाराने घेतलेला कोणताही निर्णय तुमच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. तुमच्या दीर्घकालीन प्रलंबित योजनांना गती मिळेल. आज तुमची मुले तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या भूतकाळातील तुम्ही न केलेल्या गोष्टींची आठवण होऊन वाईट वाटू शकेल. काही नवीन लोकांच्या भेटीने तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक १ आहे व आपल्यासाठी आजचा रंग नारंगी आहे.

वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र दहाव्या स्थानी आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विचारपूर्वक निर्णय घेण्याचा किंवा कार्य करण्याचा आहे. आज भागीदारीत कोणतेही काम केल्याने मतभेद वाढू शकतात. काही खास लोकांना भेटण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात चांगल्या विचारांचा फायदा होईल. आज तुम्हाला तुमच्या चांगल्या कामांचे चांगले फळं मिळेल. त्यामुळे आनंद व समाधान लाभेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना काही काळानंतर नोकरीचे काही काम झाल्याने दिलासा मिळेल. आज तुमची कोणतीतरी इच्छा पूर्ण होऊ शकते. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ३ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पिवळा आहे.

धनु राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र भाग्य स्थानी आहे. धनु राशीच्या लोकांसाठी काही नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. वाहनांचा वापर सावधगिरीने करावा लागेल. व्यासपीठाशी निगडित गोष्ट असल्यास त्या क्षेत्रात तुमचा आदर वाढलेला पाहून तुम्हाला आनंद होईल. कुटुंबात तुम्हाला एखादे सरप्राईज गिफ्ट मिळू शकते. तुमच्या कुटुंबातील सदस्याचे लग्न निश्चित झाल्यामुळे वातावरण प्रसन्न राहील. कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे, अन्यथा तुमचे नुकसान होईल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ९ आहे व आपल्यासाठी आजचा रंग लाल आहे.

मकर राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र आठव्या स्थानी आहे. मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन वाहन खरेदीसाठी चांगला असणार आहे. तुमचे शारीरिक त्रासही पूर्वीपेक्षा कमी होतील, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुमच्या व्यवसायातील नव्याने किंवा प्रलंबित राहिलेल्या योजना आज पूर्ण होण्याची शक्यता आहे ज्यांच्या पूर्णतेमुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुम्हाला कुटुंबातील किंवा नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणातील सदस्याच्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर, इतर ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करू शकता. नवीन घर वगैरे घेणे तुमच्यासाठी चांगले राहील. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ८ आहे व आपल्यासाठी आजचा रंग निळा आहे.

कुंभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र सातव्या स्थानी आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विचारपूर्वक सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा व हाताळण्याचा दिवस असेल. तुमच्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आज दूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सातत्याने प्रयत्नशील राहा. तुमच्या सन्मानात वाढ झाल्याचे पाहून तुम्हाला आनंद होईल. आपण एक करार अंतिम करू शकता. तुम्ही तुमच्या घरी नवीन वाहन आणू शकता. एखाद्याने तुमच्याबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे किंवा गॉसिप मुळे तुमचे मन अस्वस्थ राहील. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ६ आहे व आपल्यासाठी आजचा रंग गुलाबी आहे.
लावीत होते कुंकू त्यात पडला मोती, …… टिंब टिंब रावांसारखे मिळाले पती, भाग्य मानू किती?


मीन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र सहाव्या स्थानी आहे. मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यस्त असणार आहे. तुमच्या मित्रांसोबत कोणताही व्यवहार करण्यापूर्वी तुम्ही काळजीपूर्वक विचार करावा. कुटुंबातील लोकांशी काही मतभेदांमुळे तुमच्या अडचणी वाढतील. व्यवसायामध्ये आज तुम्हाला काही मोठ्या ऑर्डर्स मिळण्याची शक्यता आहे. परंतु त्यामुळे कदाचित समस्यांना सुद्धा तोंड द्यावे लागेल. झेपेल तेवढेच काम हाती घ्या. तुम्हाला मोठी ऑर्डर मिळाल्याने आनंद होईल. तुम्ही तुमच्या कोणत्याही इच्छेबद्दल कुटुंबातील सदस्याशी बोलण्याचा प्रयत्न करा व त्यांचाही सल्ला घेऊन पुढे जा. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ४ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.