Today Rashi Bhavishya in marathi| आजचे राशी भविष्य मराठी (शुक्रवार, १४ मार्च २०२५) |Aajche Rashi bhavishya

Rashi Bhavishya / Rashi bhavishya Today : मेष राशीचे आजचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Aajche Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र पाचव्या स्थानी आहे. मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ फळ देणारा असणार आहे. परंतु आज निर्णय घेताना घाई गडबड करू नका. अन्यथा त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना आजचा दिवस व्यवसाय वाढीकरिता लाभदायक आहे. आपली पूर्व नियोजित कामे पूर्ण होतील. आपल्या घरात एखादे मांगलिक कार्य होण्याची शक्यता आहे. मुलांच्या भविष्याकरिता मोठी गुंतवणूक करू शकता. बऱ्याच दिवसापासून रखडलेले एखादे करार पूर्ण होण्याची शक्यता आहे. आरोग्य ठीक राहील. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र चवथ्या स्थानी आहे. वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा दिवस असेल. आपल्या भौतिक सुखामध्ये वाढ होणार आहे. आज आपण मित्रांसोबत आनंदात वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी आपल्यावर एखादा आळ येण्याची शक्यता आहे. विरोधकापासून सावध रहावे. परिवारातील काही समस्या आज डोके वर काढण्याची शक्यता आहे. परंतु आपण कौशल्याने त्या सोडविण्याचा प्रयत्न कराल. आज जोडीदारासोबत संध्याकाळ आनंदात घालवाल. विद्यार्थ्याना अध्ययनात लक्ष लागेल.
Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 10 March TO 16 March 2024


मिथुन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र तिसऱ्या स्थानी आहे. मिथुन राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असणार आहे. पूर्वनियोजित व बरेच दिवस रखडलेली कामे पूर्ण होतील. आपण घराच्या डागडूजीबाबत काम करू शकता. व्यवसायिक आपल्या व्यवसाय भागीदारीत करत असल्यास ती भागीदारी संपविण्याचा विचार तुम्ही करू शकता. आज आर्थिक अडचणी टाळण्यासाठी पैसा जपून खर्च करा. आज आपले मन थोडे अस्वस्थ असण्याची शक्यता आहे. आपली आपल्या एखाद्या जुन्या मित्रासोबत भेट होवू शकते. जोडीदारासोबत संध्याकाळी एखादा फिरण्याचा प्लान करू शकता.

कर्क राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र दुसऱ्या स्थानी आहे. कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस सकारात्मक असा असणार आहे. कर्क राशीच्या लोकांच्या सोई सुविधेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आज आपण एखादे नवीन वाहन खरेदी करू शकता. आज काही नवीन लोकांच्या ओळखी होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी वादविवाद निर्माण झाल्यास शांततेत रहावे. आपण आज जे काम नियोजित केले आहे त्या कामात नक्की यश प्राप्त होईल. आज आपल्याला नशिबाची साथ लाभणार आहे. आज एखादी व्यक्ती आपल्याकडे पैसे उधार मागू शकते. विश्वासहर्ता तपासूनच पैसे उधार द्यावे अन्यता नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या दयाळू स्वभावामुळे आज तुम्हाला अनेक आनंदाचे क्षण अनुभवण्यास मिळतील. आज थोडे व्यस्त दिनचर्येमुळे जोडीदाराला कमी महत्व दिले असे वाटू शकते. परंतु संवादाने नाराजगी दूर होईल.

सिंह राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र पहिल्या स्थानी आहे. सिंह राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असणार आहे. मानसिक तणावातून मुक्तहोण्याचा दिवस आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकडून विकासाची कामे होतील ज्यामुळे तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. मुलाच्या कारकिर्दीबाबत आपण थोडे तणावात असण्याची शक्यता आहे. पूर्व नियोजित व प्रलंबित कामे आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज घरी अचानक पाहुणे येण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत बोलल्यामुळे आज तुम्हाला हुरूप येण्याची शक्यता आहे.

कन्या राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र बाराव्या स्थानी आहे. कन्या राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ फळ देणारा दिवस असेल. आपण कोणाला उधार पैसे दिले असल्यास परत मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या अज्ञात व्यक्तीपासून दूर रहाण्याची आवश्यकता आहे. आज पण एखादे काम हातात घेतले तर कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळून ते काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. भागीदारीत केलेला करार अंतिम टप्यात असू शकतो. खूप दिवसापासून होत असलेल्या शारीरिक व्याधी दूर होण्याची शक्यता आहे. आपण पूर्वी खरेदी केलेली जमीन विकण्याचा विचार करत असल्यास चांगला ग्राहक प्राप्त होवून त्यात आपल्याला अपेक्षित लाभ मिळेल. व्यावसायिकांना देखील चांगला फायदा होईल.

तूळ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र लाभ स्थानी आहे. तुळ राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा दिवस असेल. कामाबाबत चालू असलेल्या संघर्षात दिलासा मिळेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. कामाच्या ठिकाण घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे तुम्हाला खेद वाटेल. एखादे काम पूर्ण होत नसेल तर वडिलांसोबत चर्चा तुम्ही करू शकता. व्यावसायिकांना व्यवसायात नफा होईल. विद्यार्थ्यानी अभ्यासाच्या वेळी इतर कामे केल्यामुळे पालकांच्या रोषास सामोरे जावे लागेल. जोडीदार आपली चांगली काळजी घेवू शकतो.

वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र दहाव्या स्थानी आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना आजचा दिवस समिश्र फळ देणारा दिवस असेल. रोजगाराच्या शोधात असणाऱ्या लोकांना रोजगाराच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरीच्या ठिकाणी आपल्याकडून चांगले काम झाल्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून शाबासकी मिळेल. आज आपल्याला आरोग्याकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांचे स्पर्धात्मक स्वभाव असल्याने ते एखाद्या स्पर्धेत भाग घेवू शकतात. कुटुंबातील समस्या सोडविण्यात आज आपला वेळ सत्कारणी लागू शकतो. जोडीदारासोबत संध्याकाळी वेळ चांगला घालवाल.

धनु राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र भाग्य स्थानी आहे. धनु राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ फळ देणारा असेल. सोयी सुविधेमध्ये वाढ होईल. कुटुंबातील चालू असलेल्या समस्या पासून आराम मिळेल. आपण आज एखाद्या महत्वपूर्ण प्रकल्पात पैसे गुंतवू शकता. पैसे गुंतवणूक करताना विचारपूर्वक पैसे गुंतवणूक करावे. व्यावसायिकांना भागीदारीत केलेल्या व्यवसायात लाभ मिळेल. बरेच दिवस थकीत असलेले आपण दिलेले उधार पैसे परत मिळू शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी. घरातील एखादा सदस्या आजारी होण्याची शक्यता आहे.
Sanskar | संस्कार म्हणजे काय ? मुलांच्या अवस्था ? | Mulavar Sanskar kase karave |


मकर राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र आठव्या स्थानी आहे. मकर राशीच्या लोकांना आजचा दिवस सकारात्मक उर्जा घेवून येणारा दिवस आहे. आपल्याला कामात यश प्राप्त होईल. आज आपण एखाद्या सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमात सहभागी होवू शकता. ज्यामुळे तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. नोकरीच्या ठिकाणी विरोधकापासून सावध रहाणे आवश्यक आहे. आज आपण काही नवीन करण्याचा प्रयत्न केल्यास यश प्राप्त होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्याना अध्ययनात यश प्राप्त होईल.

कुंभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र सातव्या स्थानी आहे. कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा दिवस असेल. व्यावसायिकांना आजचा दिवस चांगल जाणार आहे. आपल्याला कोणत्याही प्रतिकूल परिस्थिती संयम व समय सूचकता राखणे आवश्यक आहे. आपल्याला एखादी मोठी कामगिरी मिळण्याची शक्यता आहे. आज आपण एखाद्या मांगलिक कार्यक्रमात सहभागी होवू शकता. नोकरीच्या ठिकाणी कामात निष्काळजीपणा केल्यास समस्या निर्माण होवू शकते. जोडीदाराच्या भावनाचा विचार करावा त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. विद्यार्थ्याना यश पाप्त होण्याकरिता कठोर मेहनत करणे आवश्यक आहे.

मीन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र सहाव्या स्थानी आहे. मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा दिवस असेल. कामाबाबत आपण एखादा नवीन करार करू शकता. आपण कोणावरही अवलंबून न रहाता चांगला पैसा कमवू शकता. राजकारणात काम करणाऱ्या लोकांना चांगला पाठींबा पाप्त होईल. आपल्या कामाचे कौतुक केले जाईल. आपण एखाद्या धार्मिक मांगलिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. कोणत्याही समस्या पासून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला आपल्या वडिलांच्या सल्ल्याची आवश्यकता आहे. कामच्या ठिकाणी कामे पूर्ण करण्यासाठी आपली बुद्धिमता वापरणे आवश्यक आहे. आरोग्य ठीक राहील. आज अचानक प्रवास योग आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)