Today Rashi Bhavishya in marathi| आजचे राशी भविष्य मराठी (सोमवार, १३ जानेवारी २०२५) |Aajche Rashi bhavishya
Rashi Bhavishya / Rashi bhavishya Today : मेष राशीचे आजचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Aajche Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीत चंद्र बाराव्या स्थानी आहे. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंद देणारा असणार आहे. व्यवसायिक आपल्या व्यवसायामध्ये नवीन नवीन संकल्पना, नवीन उपकरणे यांचा वापर करून व्यवसाय वाढीकरिता प्रयत्न करतील. मुलांकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमचा एखाद्या जुन्या मित्राची भेट होवू शकते. ही भेट आनंद देणारी ठरू शकते. आज तुम्ही तुमच्या बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण ठेवावे. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमची एखादी आवडती वस्तू हरवली असल्यास ती तुम्हाला सापडण्याची आज शक्यता आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक 5 आहे व आपल्यासाठी आजचा रंग हिरवा आहे.
वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीत चंद्र लाभ स्थानी आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कठोर परिश्रमाने भरलेला असू शकतो. कामाच्या ठिकाणी काही अडथळे आले असतील तर तेही दूर होण्याची आज शक्यता आहे. कामा संदर्भात नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. काम करताना जोखीम घेणे टाळणे आवश्यक आहे. व्यावसायिकांना व्यवसायात मोठे यश मिळू शकते. मुलांकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. कुटुंबीयांकडून सहकार्य मिळेल. समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर हूरवळून जावू नका. योग्य तो विचार करून कोणताही निर्णय घ्या. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ४ आहे व आपल्यासाठी आजचा रंग करडा आहे.
मिथुन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीत चंद्र दहाव्या स्थानी आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नियोजित कामासाठी चांगला असणार आहे. कार्यक्षेत्रात काही नवीन विरोधक, विरोध करण्याची शक्यता आहे. वाणीवर संयम ठेवावे. आज तुम्हाला तुमच्या कामाचे व्यवस्थित नियोजन करावे लागेल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती दिसेल. घरातील व बाहेरील नियोजित कामे समन्वयाने पार पाडावीत. तुमच्या जोडीदाराविषयी तुम्हाला काही वाईट वाटेल. आज मित्रांसोबत आनंदात वेळ घालवाल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक २ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.
आहार कसा निवडावा | Aahar Kasa Nivadava | योग्य आहार कसा घ्यावा? | Yogya Aahar Kasa Ghyava |
कर्क राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीत चंद्र भाग्य स्थानी आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला फळ देणारा आहे. तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी व सुखमय राहील. तुम्ही तुमच्या कार्यालयात मैत्रिणींपासून थोडे अंतर ठेवून रहावे, अन्यथा तुमचा बॉस तुमच्याबद्दल गॉसिप, चर्चा करू शकेल. तुमच्या व्यवसायात तुम्हाला अचानक नफा मिळाल्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. त्यामुळे तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही खूप विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या जुन्या झालेल्या चुकीबद्दल पश्चाताप होईल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ५ आहे व आपल्यासाठी आजचा रंग हिरवा आहे.
सिंह राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) –आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीत चंद्र आठव्या स्थानी आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या महाग असण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायातही आज चढ-उतार असण्याची शक्यता आहे. तुमचा कोणताही करार पूर्ण करण्यात काही अडचण येत असल्यास तुम्हाला ते वेळेवर पूर्ण करावी लागेल. तुमच्या पालकांच्या आशीर्वादाने व सहकार्यामुळे तुम्ही नवीन कामात सुरुवात करू शकता, नशीब अजमावू शकता. एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा तुमचा विचार असेल तर तुम्ही तुमच्या सासरच्या लोकांकडून पैसे उधार घेण्याचा विचार केल्यास तुम्हाला ते सहज मदत करू शकतील. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ४ आहे व आपल्यासाठी आजचा रंग करडा आहे.
कन्या राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीत चंद्र सातव्या स्थानी आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंद घेवून येणार असणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्याच्या बोलण्याने प्रभावित होण्याची आवश्यकता नाही. जर तुमचा एखादा व्यवहार दीर्घ काळ अडकला असेल तर तो अंतिम पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. राज्यकारभार आणि सत्तेचा पुरेपूर लाभ तुम्हाला आजा मिळू शकेल. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर संयम ठेवावे लागेल. आज तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्याच्या हेतूने नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. त्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घ्याल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक २ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.
मुलांमध्ये होणारे मानसिक आणि शारीरिक बदल व त्यानुसार पालकांनी कसे वागायचे ? त्यांचे संगोपन कसे करावे? | Bal Sanskar |
तूळ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीत चंद्र सहाव्या स्थानी आहे. तुळ राशीच्या लोकांना आजचा दिवस आनंद देणार असेल. तूळ राशीच्या लोकांनी एकाचवेळी अनेक कामे करण्याचे ठरविल्यास चिंता वाढू शकेल. आज तुम्हाला एकामागून एक चांगली बातमी ऐकायला मिळेल. विद्यार्थ्यांच्या बाबतीत उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये काही गोष्टींबाबत गैरसमज होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही अनोळखी लोकांपासून अंतर राखावे. तुमची कोणतीही कौटुंबिक समस्या असल्यास ती संयमानी सोडवणे आवश्यक आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ५ आहे व आपल्यासाठी आजचा रंग हिरवा आहे.
वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीत चंद्र पाचव्या स्थानी आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुमच्या जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. आज तुम्ही आपल्या जोडीदारासाठी भेटवस्तू आणू शकतात. आज तुम्हाला तुमच्या खर्चाकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे. आर्थिक नियंत्रण ठेवावे. तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्या बोलताना विचारपूर्वक बोलावे. कारण आपल्या बोलण्यामुळे त्यांना वाईट वाटू शकते. काम करत असताना तुमच्या मनमिळाऊ स्वभावामुळे तुमच्या कामात काही चूक होण्याची शक्यता आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ६ आहे व आपल्यासाठी आजचा रंग गुलाबी आहे.
धनु राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीत चंद्र चवथ्या स्थानी आहे. धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असू शकेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मालमत्तेशी संबंधित कोणत्याही विषयावर दीर्घ काळ वाद होत असल्यास त्यात तुम्हाला विजय मिळण्याची शक्यता आहे. आपल्या बंधू-भगिनींकडून काही आर्थिक, मानसिक, शारीरिक मदत मागितली तर ती सहज मिळेल. काही नवीन व्यक्तींच्या संपर्कांमुळे तुम्हाला फायदा होईल. भूतकाळातील घडलेल्या चुकांमधून धडा घेणे आवश्यक आहे व त्या पुढे होणार नाहीत याची काळजी घ्यावी. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ३ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पिवळा आहे.
मकर राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीत चंद्र तिसऱ्या स्थानी आहे. मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कामावर पूर्ण लक्ष द्यावे लागेल. कायद्यात कोणतीही बाब वादग्रस्त असेल, तर त्यात अजिबात शिथिलता आणू नये. तुमच्या आर्थिक उत्पन्नाचे स्रोत वाढतील ज्यामुळे तुमचा खर्च सहज भागवू शकाल. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. कौटुंबिक समस्यावर दुर्लक्ष करू नका. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ३ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पिवळा आहे.
सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? | Cyber Security
कुंभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीत चंद्र दुसऱ्या स्थानी आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा, फळ देणारा असणार आहे. तुम्हाला एखाद्या धार्मिक शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. आपल्या मनात कोणतेही नकारात्मक विचार ठेवू नका. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांचे त्यांच्या जोडीदाराशी काही मुद्द्यावरून वाद होण्याची शक्यता असते. तुमची दीर्घकाळ प्रलंबित असलेली कोणतीही अडचण, कामे पूर्ण होतील. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आज चांगली बातमी ऐकायला मिळेल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक १ आहे व आपल्यासाठी आजचा रंग नारंगी आहे.
मीन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीत चंद्र प्रथम स्थानी आहे. मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला परिणाम व आनंद देणारा राहील. तुम्हाला कोणत्याही कामाबद्दल काही टेन्शन असेल तर तेही दूर होईल. कुटुंबातील लोक तुमच्या बोलण्याला पूर्ण महत्त्व देतील. तुमच्या कामाबाबत तुम्ही तुमच्या वडिलांकडून काही सल्ला घेऊ शकता. लहान मुलांसोबत थोडा वेळ मजेत घालवाल. काही नवीन काम करण्याची इच्छा जागृत होऊ शकते. सामाजिक कार्यातही तुम्हाला आज चांगला रस वाटेल त्यामुळे सामाजिक कार्यात आजचा दिवस आनंदाने व्यतीत कराल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ८ आहे व आपल्यासाठी आजचा रंग निळा आहे.