नोकरी की व्यवसाय करावे ? | Nokari vs Business|Naukri vs Business| Which is better Job or Business
Job or Business / नोकरी की व्यवसाय : जीवन जगत असताना अन्न, वस्त्र व निवारा या तीन मुलभूत गरजा माणसाला पूर्ण कराव्या लागतात. #nokari ki business माणसाला आपला व आपल्या कुटुंबियांचा उदरर्निवाह करण्याकरिता रोजगाराची आवश्यकता असते. या रोजगारातून, मिळालेल्या धनातून माणूस कुटुंबातील सदस्याच्या गरजा पूर्ण करत असतो. मुलभूत गरजा पूर्ण करण्याकरिता धनाची आवश्यकता असते. तसेच आजच्या धावपळीच्या काळात आरोग्याची काळजी घेण्याकरिता देखील धनाची गरज असते. हे धन प्राप्त करण्यासाठी माणसाकडे आजच्या युगात दोन पर्याय आहेत. एक म्हणजे नोकरी #nokari व दुसरा म्हणजे व्यवसाय, #business बिजनेस.
आता प्रश्न येतो कि व्यवसाय करावा कि #nokari नोकरी? तर मग व्यवसाय #business का करावा व नोकरी का करू नये याबाबत मनात आलेले विचार प्रथम तपासून घेतले पाहिजेत. म्हणजेच काय कि, या दोघांमधील फायदा, तोटा यावर पूर्ण विचार केला पाहिजे. नोकरी #naukri करावी की व्यवसाय हा निर्णय विचारपूर्वक घ्यावा.
आजच्या धावपळीच्या जीवनात भौतिक सुखाच्या मागे धावताना बहुतेक लोक नोकरीला जास्त प्राधान्य देतात. नोकरी म्हटली कि ती साधारणपणे 8 किंवा 10 ते 12 तासांची असते. महिनाभर काम केल्यानंतर एका ठराविक तारखेला ठराविक पगार मिळतो. या पगारातून कुटुंबियांच्या गरजा पूर्ण केल्या जातात. नोकरी #mazi nokari करत असलेल्या ठिकाणी कंपनीच्या नफा व तोट्याची जबाबदारी आपल्यावर म्हणजेच नोकरदार वर्गावर नसते. आठ किंवा बारा तासांची ड्युटी केल्यानंतर आमचे काम पूर्ण झाले, त्यात कंपनीच्या नफा-तोट्याशी आमचा काहीही संबंध नाही असे तो समजतो. दरमहा एक फिक्स पगार मिळणार, यातून आपल्या भौतिक गरजा पूर्ण केल्या जावू शकतील, मग उद्योग व्यवसाय करून नफा तोटा याची टांगती तलवार घेवून का जगावे? असा विचार साधारण मनुष्य करत असतो.
पालक नोकरीच्या #nokari फायद्याचा आणि तोट्याचा विचार करतात.
मुलांचे शिक्षण पूर्ण करताना पालक नोकरी करण्याकडे जास्त प्राधान्याने वळतात, नोकरी #nokari करणे स्वीकारतात. आणि मुलांच्या मनावर देखील, “तू चांगला अभ्यास कर, चांगले मार्क्स मिळव म्हणजे तुला चांगली नोकरी मिळेल” हे बिंबविण्याचा प्रयत्न करत असतात.
महिन्याच्या निश्चित तारखेला पगार मिळेल आणि मिळालेल्या पगारातून कुटुंबाचा खर्च भागवला जाईल. मग उद्योग-व्यवसायात जाऊन फसवणूक का करवून घ्यावी? आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण करताना बहुतेक पालक नोकरीच्या फायद्याचा आणि तोट्याचा विचार करतात आणि मुलाने मोठे झाल्यावर काय बनले पाहिजे आणि त्याने कोणती नोकरी #naukri केली तर त्याच्या सगळ्या गरजा भागतील, आपलेही नाव मोठे होईल, गाडी, चांगले घर घेता येईल? याचा विचार केला जातो. आणि त्याला शिक्षण देताना ते संबंधित शिक्षण पालकांकडून दिले जाते. त्यासाठीचे फिल्ड निवडले जाते, त्या क्षेत्रातील पदविका आणि पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला वारंवार सांगितलं जातं की, “मोठं झाल्यावर अमुक अमुक…विशिष्ट व्यक्ती… व्हावं बनला तर हे…हे मिळेल…. ! ते क्षेत्र त्याच्या मनात बिंबवलं जातं.
सुकन्या समृद्धी योजना | Sukanya Samriddhi Yojana | Sukanya Samriddhi Account Scheme
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/11/sukanya-samriddhi-yojana.webp)
पालक त्यांच्या अपूर्ण इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षा मुलांवर लादतात. मुलांच्या आवडीनिवडी काय आहेत, त्यांची क्षमता काय आहे, त्यांना ते करणे शक्य आहे का ? याचा कोणताही विचार न करता, स्वतःच्या आकांक्षा आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, बहुतेक वेळा मुलांना ज्या क्षेत्रात रस नाही अशा क्षेत्रात शिक्षणासाठी प्रवेश घेतला जातो. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी #nokari मिळवण्याचा विचार प्रत्येकजण करतो. पण अशी काही मोजकीच माणसे आहेत जी प्रगती आणि विकास आणि काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने शिक्षण घेतात.
त्यांना त्या क्षेत्रात संशोधन करून नवनवीन प्रयोग करायचे असतात आणि त्यासाठी त्यांच्या बर्याचदा पालकांचा विरोधही असतो.
आज नोकरीमुळे #naukri सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/11/job.webp)
आज नोकरीमुळे सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. “अमक्या तमक्याचा मुलगा त्या कंपनीत इंजिनीअर आहे आणि त्याला एवढा पगार मिळतो”, अशी चर्चा समाजात रंगली की, आपला मुलगाही असा इंजिनीअर व्हायला हवा, त्यालाही तेवढाच पगार मिळायला हवा, म्हणून आई-वडील आपल्या मुलाचे हीत विचारात न घेता, मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांच्या इच्छेविरुद्ध अशा शिक्षणासाठी त्यांच्या मागे लागतात. त्यामुळे मुलांची अवस्था दयनीय होऊन त्यांच्या इच्छेविरुद्ध असणार्या क्षेत्रात करिअर करतांना आई-वडील आपल्या मुलांना चांगल्या नोकरदारांची त्यांच्या पगाराची पॅकेजची उदाहरणे देतात.
परंतु अशावेळी उदाहरणे देताना डॉ. एपीजे अब्दुल कलाम, धीरूभाई अंबानी, किर्लोस्कर, बजाज, टाटा, बिर्ला, लक्ष्मीनिवास मित्तल यांसारख्या उद्योजकांनी कशी प्रगती केली याची उदाहरणे देता येत नाहीत का??? ज्या उद्योजकांनी स्वत:च्या विकासात तसेच देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले, त्यांची उदाहरणे आजच्या पिढीसमोर ठेवली जात नाहीत. त्यामुळे आजची तरुण पिढी नोकरीच्या #naukri मागे लागलेली दिसते. यापैकी ज्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, ते तरुण निराश होऊन चुकीचा मार्ग स्वीकारताना दिसतात. ते निराशेच्या गर्तेत हरवलेले दिसतात. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अशा बेरोजगारांचा फायदा घेतात आणि आपल्या भावी पिढ्या गुन्हेगारीकडे आपसूक वळतात. अशी अनेक उदाहरणे आपण समाजात पाहतोही.
उद्योगात येण्यापूर्वी आपण व्यवसाय करायचा की नोकरी #nokari or business ?
उद्योगात येण्यापूर्वी आपण व्यवसाय करायचा की नोकरी ? या अनिर्णायक मानसिकतेत कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. व्यवसायाच्या सुरुवातीला अपयश आले तर….? नोकरी #nokari मिळाली तर किती बरे होईल….. असा विचार बर्याचदा मनात येऊन जातो. परंतू ‘नवीन काही तरी करूया..’ याची खात्री असेल, तर पारंपरिक मार्ग सोडून नवीन उपजीविकेचा शोध घेत असताना येणाऱ्या चांगल्या-वाईट अनुभवांना सामोरे जाण्याची हिंमत दाखवली पाहिजे, उद्योग-व्यवसायाकडे वळले पाहिजे.
नोकरीपेक्षा व्यवसाय का? #nokari vs business तर व्यवसाय हा तुम्हाला स्वातंत्र्य आणि ध्येय प्रदान करतो. ही स्वातंत्रता, ध्येय शक्ति आपल्याला बाजारात विकत मिळत नाही आणि त्याची किंमतही आपण ठरवू शकत नाही. नोकरीच्या गुलामगिरीपेक्षा व्यवसायातून स्वातंत्र्याचा अनुभव घ्या. काहीतरी नवीन करण्याचे ध्येय, निर्णय घेण्याची क्षमता, संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळवण्याच्या अमर्याद आकांक्षा यांचा अनुभव घ्या. तुमच्या पायात ताकद असेल तर तुम्हाला व्यवसायात जमेल तेवढे उडण्याची, विहाराची संधी मिळते. ज्यांना कोणाच्या तरी अधिकारात किंवा गुलामगिरीत काम करता येत नाही, ज्यांचा स्वभाव धडपडणारा आहे, कष्ट सहन करण्याची प्रचंड क्षमता आहे, ज्यांची शारीरिक आणि बौद्धिक क्षमता तीक्ष्ण आहे, अशा लोकांनी उद्योग-व्यवसायात #business स्वत:साठी काम करावे.
Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | Rashi Bhavishya
नोकरीत #mazi nokari एखाद्याने आपले नशीब आजमावले पाहिजे. घाण्याला जोडलेल्या बैलाप्रमाणे, ज्यांना ठराविक पद्धतीने आयुष्य जगण्याची सवय आहे, जे थोडेसे उत्पन्न घेऊन आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात, विहिरीतल्या बेडकाप्रमाणे ज्यांना आयुष्य जगावे लागते, त्यांनी नोकरी #naukri करावी. ज्यांना नावीन्याची हौस नाही, ज्यांना नाविन्याची आवड नाही, ज्यांना जगातल्या बदलांशी काही देणेघेणे नाही, ज्यांची मोठी स्वप्ने नाहीत, ज्यांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यात रस नाही, ज्यांना स्वप्नच पडत नाहीत, जगासमोर काहीही मोठे करणे ज्यांना रुचत नाही, अर्थव्यवस्थेतील बदलांशी काही देणेघेणे नाही, त्यांनी व्यवसायात न उतरता सरळमार्गी नोकरी करणे चांगले. कारण व्यवसायाच्या यशाचा पाया कठोर परिश्रम, ध्येय आणि मोठी स्वप्ने यावर आधारित असतो. ज्यांना स्वप्ने दिसत नाहीत, अपार कष्ट करण्याची तयारी नाही आणि ज्यांचा मानसिक व सामाजिक विकास स्वकेंद्रित आहे, त्यांनी व्यवसायात न जाता नोकरी करावी.
नवीन व्यवसायात उतरताना | In New Business
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/11/Business.webp)
ज्यांच्या कुटुंबात व्यावसायिक पार्श्वभूमी आहे, त्यांना नवीन व्यवसाय सुरू करताना जुन्या पिढीकडून नवीन पिढीला प्राथमिक ज्ञान द्यावे. परंतु ज्यांच्या कुटुंबांना व्यावसायिक पार्श्वभूमी नाही, त्यांना नवीन व्यवसाय सुरू करताना व्यावसायिक प्रशिक्षणापासून विक्रीपर्यंतच्या नियोजनापर्यंतची पूर्वतयारी करूनच व्यवसाय सुरू करावा. यासाठी नवउद्योजकांना बरीच तयारी करावी लागते. व्यवसाय #new business सुरू करण्याआधी, जो व्यवसाय सुरू करत आहे त्यात यशस्वी होणारच या निर्धाराने व्यवसायात प्रवेश केला पाहिजे. यश मिळवायचे असेल तर त्यासाठी पूर्वतयारी करावीच लागते.
जसे की, आपल्या घरात लग्नसमारंभ असेल तर मंडप उभारण्यापासून पाहुण्यांचे स्वागत करण्यापासून खाण्यापिण्यापर्यंत किती त्याग करावा लागतो, हे आपल्याला माहीत आहे. एकाच दिवशी होणाऱ्या अशा विवाह सोहळ्यासाठी जवळपास महिनाभर तयारी करावी लागते. शिक्षण घेत असताना वर्षभर वार्षिक परीक्षेची तयारी करावी लागते. तर ज्या व्यवसायातून आपल्याला आपले ध्येय साध्य करायचे आहे आणि स्वतःसाठी आणि नवीन पिढीसाठी यश मिळवायचे आहे, त्या व्यवसायात #my job आपल्या स्वप्नातले यश प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला पूर्व तयारी ही करावीच लागणार. नाही का ?
आर्थिक, मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक क्षमता तपासावी.
जर आपण व्यवसाय #business करायचा ठरवला तर नोकरी हा विषय मनापासून पूर्णपणे वेगळा करावा लागेल. काय करावे? जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत कोणताही उद्योग, व्यवसाय सुरू करू नये. बिझनेस किंवा नोकरीचा #my naukri निर्णय घेताना सर्वप्रथम तुम्हाला मेहनतीसाठी तुमची आर्थिक, मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक क्षमता तपासावी लागेल. नफा-तोटा सहन करण्याची आपली आर्थिक क्षमता नसली तरी निदान मानसिक क्षमता तरी असली पाहिजे. आणि तेवढी मानसिक क्षमता नसेल तर धंदा न केलेलाच बरा. थोडे अपयश आल्यावर सर्व काही संपते, अशी नकारात्मक मानसिकता असेल तर उद्योग-व्यवसाय #business हे आपले क्षेत्र नाही हे समजून घेतले पाहिजे. अशी मानसिकता उद्योजकांसाठी घातक आहे. काहीही झाले तरी यश मिळवण्याच्या उद्देशाने व्यवसाय सुरू करणाऱ्यांनाच यामागची कारणे शोधून काही तरी नवीन करून अपयश सहन करावे लागते. उद्योगात यशाची शिखरे गाठण्यासाठी शिखरावर चढण्याची मनोबलता वाढविणे ही प्राथमिक तयारी आहे.
नवउद्योजकाने स्वत:ला जगाच्या सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक ज्ञानाविषयी आपल्याला किती ज्ञान आहे, हे तपासणे महत्त्वाचे आहे. ऐकलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही व्यवसायात यश मिळवू शकत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष ज्ञान आणि कृतीतून व्यवसायात यश मिळते. आपल्याजवळ असलेल्या ज्ञानाची आणि कौशल्याची योग्य सांगड घालून उद्योग-व्यवसायात यश मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. व्यवसायात काही कारणाने अपयश आले तर मनस्ताप करत बसण्यापेक्षा चुका सुधारून नव्या प्रेरणेने कामाला सुरुवात करावी. अनेक वेळा सुरुवातीचे अपयश ही पुढील यशाची सुरुवात असते. आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा वापर करून, त्यावर विचार करून स्वतः आत्मपरीक्षण केले पाहिजे. आपल्याकडे असलेल्या ज्ञान आणि कौशल्याच्या सहाय्याने आपण उद्योग आणि व्यवसायात किती यश मिळवू शकतो, याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. तुम्हाला उद्योग किंवा व्यवसाय #business करण्यात काही मूलभूत स्वारस्य आहे का ते आत्मचिंतनाने तपासावे. इतरांना यश मिळाले म्हणून ते तुम्हालाही मिळेल असे नाही. इतरांच्या यशाची कारणे शोधा. त्याने मिळवलेल्या यशाचे रहस्य जाणून घ्या. त्यांचा अभ्यास करा. जे ज्ञान आपल्याजवळ नाही, पण जे उद्योग आणि व्यवसायासाठी आवश्यक आहे ते मिळवा, ते मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा.
कठोर परिश्रमाशिवाय जगातील कोणत्याही क्षेत्रात शिखर गाठता येत नाही.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/11/job-vs-business.webp)
जेव्हा तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करता, तेव्हा तुम्हाला मालक म्हणून जगावे लागते, मग त्या व्यवसायाचे #job or business यश मिळविण्यासाठी तुम्ही केलेल्या कामाला कालमर्यादा नसते. नोकरीत 8 तास काम केल्यानंतर त्या दिवसाचे ते काम पूर्ण झाले असे आपण मानतो समजतो. ही भावना व्यवसायात ठेवून चालणार नाही. काम पूर्ण होईपर्यंत काम करण्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता असली पाहिजे. कठोर परिश्रमाशिवाय जगातील कोणत्याही क्षेत्रात शिखर गाठता येत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर एखादा दुकानदार सकाळी 8 वाजता दुकान उघडतो आणि रात्री 9, 10, 11 वाजेपर्यंत त्याच्या दुकानात गिर्हाईक/ ग्राहक असतात. आठ तासांच्या ड्युटीऐवजी तो सुमारे बारा तास काम करतो. इथे त्यांनी फक्त आठ तास दुकान उघडणार असे सांगितले तर त्यांचे दुकान चालणार नाही. नोकरीचे कोणतेही बंधन नसावे, म्हणून जेव्हा तो व्यवसाय #business or job सुरू करतो तेव्हा त्याला व्यवसायाचे स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी आणि त्याचे इच्छित स्वप्न आणि ध्येय ठरवण्यासाठी त्याच्या दुकानात ग्राहक आहेत तोपर्यंत दुकानातच थांबावे लागते. उद्योग आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी, यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी, खगोलशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्यासारखे ध्येय असले पाहिजे. जो व्यक्ती आपल्या शरीराची कोणतीही हालचाल करू शकत नाही, स्वतःचे वैयक्तिक काम पूर्ण करू शकत नाही, बोलण्यासाठी, हालचाली करण्यासाठी त्यांचे शरीर सक्षम नाही अशा स्टीफन हॉकिंग यांनी आपल्या अनंत ध्येयाच्या बळावर विश्वात अनेक शोध लावले.
Marathi Motivational Quotes | प्रेरणादायी सुविचार मराठी | Success Quotes In Marathi
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/motivational_1.jpg)
मग आपण का नाही ? आपण त्यांच्याइतके मोठे असू शकत नाहीत, पण आपण निवडलेल्या क्षेत्रासाठी आपल्याला वेळ, मेहनत आणि अभ्यास करावा लागेल आणि हे सर्व करण्याची तयारी असेल तरच आपण उद्योग-व्यवसायात यशस्वी होऊ शकतो…. अगदी शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो. परंतु ध्येय वेडे असायला हवे. प्रामाणिकपणे त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी व जिद्द असायला हवी.
व्यवसाय की नोकरी? #nokari ki vyavsay ठरवायला थोडा वेळ द्यावा.
व्यवसाय की नोकरी? #nokari ki vyavsay ठरवायला थोडा वेळ द्यावा. पण तो तुमचा अंतिम निर्णय असावा. कारण एकदा निर्णय घेतला की, ध्येय गाठण्यासाठी सर्व प्रकारचे नियोजन करावे लागते. या कारणास्तव काळजीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा लागेल. काय करावे? जर हा निर्णय घेतला जात नसेल, तर ज्या क्षेत्रासाठी अनिर्णायक मानसिकता आहे त्या क्षेत्राची खोली आणि व्यावहारिकता किती आहे याचा विचार करा. मी हे करावं की नाही आणि ते माझ्यासाठी शक्य होईल की नाही याची चिंता वाटत असेल तर त्या विषयाशी संबंधित साहित्याचा अभ्यास करावा. त्या भागातील उद्योग-व्यवसायांच्या #business ठिकाणी प्रत्यक्ष भेटी द्याव्या. अशा संधी आणि असे व्यावसायिक लोक शोधावेत, अभ्यासावेत. कारण उच्च ध्येय साध्य करण्यासाठी मदत करणाऱ्या संधी आणि लोक नेहमीच उपलब्ध नसतात. अशा संधी आणि माणसे क्वचितच सापडतात. मिळालेल्या संधींचा योग्य वापर करण्याचे कौशल्य आपल्याकडे असले पाहिजे. उद्योग-व्यवसायात उतरताना व्यावहारिक क्षमता असली पाहिजे. मित्राने असा… असा व्यवसाय सुरू केला आहे, म्हणून तोच व्यवसाय निवडू नका. कारण तुम्ही त्याच्याशी अप्रत्यक्षपणे स्पर्धा करत आहात. जगात असा कोणताही व्यवसाय नाही, कोणतेही क्षेत्र नाही ज्यामध्ये स्पर्धा नाही. जी स्पर्धा आज दिसत नाही, जी आज घडत नाही, ती उद्या होऊ शकते किंवा उद्या जाणवू शकते. तुम्ही नोकरी #mazi nokari करणार की व्यवसाय करणार हे ठरवा आणि निर्णय घेताच तयारीला लागा. कारण अप्रभावी निर्णय हा घेतलेल्या निर्णयासारखाच असतो. आळस सोडा, वेळेचा गैरवापर टाळा, कामात गुंतून राहा, जर तुम्ही व्यवसाय सुरू करायचे ठरवले असेल, तर तुम्ही कोणता व्यवसाय #my business कराल ते निवडा. कारण तुम्ही करत असलेल्या व्यवसायाचे यश किंवा अपयश तुमच्या करिअरशी निगडीत असल्याने तुम्हाला ज्यात करिअरची संधी व प्रगती दिसत आहे आणि तुमच्यासाठी ती करणे शक्य आहे असा व्यवसाय तुम्ही निवडावा.