श्रीक्षेत्र नाणीजधाम, रत्नागिरी भरपावसात भाविकांच्या प्रचंड गर्दीने महांमंगल सोहळा अनुभवला… (21 oct 2024)
Mulanchi Nave | “अ ” मराठी अक्षरावरून मुलांची / मुलींची नावे|New born baby Name
Nanijdham नाणीज, दि. २१ ऑक्टोबर २०२४– सुंदरगडावर #ratnagiri संत, महंतांनी औक्षण करुन जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज #narendra maharaj यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा केला. पाऊस असतानाही भाविकांचा जनसागर सुंदरगडावर आपल्या गुरूंचे अभिष्टिचिंतन करण्यासाठी श्रद्धेने जमला होता. पाऊसही जणूकाही स्वतः माऊलींच्या या अभिष्टचिंतनासाठी स्वर्गातून जलवृष्टी करतो आहे. भक्तांनी केलेला जयजयकारांचा निनाद आसमंत भरून टाकीत होता. सोहळ्यात सहभागी झाल्याचा, तो महंमंगल सोहळा अनुभवल्याचा आनंद प्रत्येकजण डोळ्यांत साठवीत होता.
सकाळी जन्मोत्सवासाठी आलेल्या आपल्या लेकरांना भेटण्यासाठी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचे सुंदरगडावर आगमन झाले. सर्व भक्तांनी उभे राहून जयघोष करीत त्यांचे स्वागत केले. प्रथम जगद्गुरूश्री #jagadgurushri यांनी सुंदरगडावरील वरद चिंतामणी श्री गणपती मंदिर प्रभू श्रीराम मंदिर आणि संत शिरोमणी गजानन महाराज मंदिर या सर्व मंदिरांत जाऊन तेथील देवतांचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत सकलसौभाग्य संपन्न सौ. सुप्रियाताई, प.पू. कानिफनाथ महाराज, देवयोगी महाराज असे कुटुंबिय होते. संतशिरोमणी गजानन महाराज मंदिरातील दर्शनानंतर सुरुवातीला सुवासिनींनी जगद्गुरूश्रींचे औक्षण केले. त्यानंतर परमपूज्य स्वामीजी आपल्या कुटुंबासोबत आणि संत महांतांसोबत संतपीठावर आले. आपल्या परम पूज्य माऊलींना संत पिठावर आलेले पाहताच सर्व भाविकांनी जल्लोष केला, जगद्गुरुश्रींनी देखील जमलेल्या भाविकांना आशीर्वाद दिले. #nanijdham भाविकांनीही जल्लोश करीत त्यांचे अभिष्टचिंतन केले. त्यानंतर संतपीठावर जगदगुरूश्रींचे गुरू प.पू. सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज यांचे शिष्य आपल्या गुरुबंधुंचे अभिष्टचिंतन करण्यासाठी एकत्र जमले होते. अनंतगिरी महाराज यांच्यासमवेत सर्वांनी एकित्रतपणे महाराजांचे अभिष्टचिंतन केले.
Marathi Ukhane – मराठी उखाणे
जगदगुरू नरेंद्राचार्य महाराजांचा जन्मोत्सव सोहळा
अश्विन शुद्ध अष्ठमी, वार शुक्रवार रात्रौ १०.०० वा. नाणीजधाम या ठिकाणी जग उद्धारक नरेंद्राचार्यांचा जन्म झाला. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्रौत्सव संपूर्ण भारतात साजरा होत असतो. अगदी याच कालावधीत नरेंद्रचार्याचा जन्मोत्सव येत असतो. या दिवशी वैदिक सनातन हिंदू संस्कृतीप्रमाणे हा जन्मोत्सव संपन्न केला जातो. स्वत: जगदगुरूआपले उपास्य दैवत गजानन महाराज आणि सदगुरु काडसिद्धेश्वर महाराज यांची विधिवत पुजा करतात. भक्तही त्यांच्या वतीने आपल्या लाडक्या जगदगुरू माऊलीस दिर्घायुष्य लाभावे म्हणून महामृत्युंजय यज्ञाचे आयोजन केले जाते. मंदिरातील दैनंदीन सांजारती, शेजारती, धुपारती, शेजारती कार्यक्रम संपन्न होत असतानाच पालखी सोहळा देखील संपन्न केला जातो. अनेक साधु – संत जगदगुरुश्रींचे दर्शन, आशिर्वाद घेण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेले असतात. रात्रौ १०.०० वाजता सुहासिनी पंचारती ओवाळून अभिष्ठचिंतन करतात. साधु – संत जगदगुरुश्रींचे औक्षण करतात. संपुर्ण दिवसभर संगीताशी संबंधित वेगवेगळे कार्यक्रम उदा. गायन, नृत्य, कला इ. संपन्न होत असतात. जगदगुरुश्रींचे आशिर्वाद घेवुन या कार्यक्रमाची सांगता होते. हा उत्सव नवरात्रामध्ये येत असल्याने जवळजवळ सर्वच भक्त-शिष्यांची गैरसोय टाळण्यासाठी भक्त-शिष्यांनी जगदगुरूंना विनंती करुन २१ ऑक्टोबर या त्यांच्या जन्मदिनांकाला जन्मोत्सव आणि वर्धापनदिन असा हा उत्सव साजरा करावा अशी विनंती केली. त्यामुळे २१ ऑक्टोबर या दिवशी जन्मोत्सव सोहळा संपन्न केला जातो. रत्नांचे आगर असलेल्या, नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या, तहानभूक विसरायला लावणारा, विस्तीर्ण सागरकिनारा लाभलेल्या, रूद्र पराक्रमी, महाबली भगवान परशुरामाची भूमी असलेल्या कोकण भूमीत आंबे, फणस, काजू, नारळी, पोफळी यांचे आगर असलेल्या या रत्नागिरी जिल्हयात नाणीज गावी श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराजांचा जन्म झाला.
जगद्गुरू माऊलींच्या पदस्पर्शाने पुलंकित होवून आज संपूर्ण विश्वाला खर्या अर्थाने जागे ठेवणारे हे गाव नाणीज.
हे नाणीज गाव तसे साधेसुधे. परंतु जगद्गुरू माऊलींच्या पदस्पर्शाने पुलंकित होवून आज संपूर्ण विश्वाला खर्या अर्थाने जागे ठेवणारे हे गाव नाणीज. ना……नीज म्हणजे जे स्वतः झोपत नाही किंवा स्वतः जागे राहून जे अब्जावधी लोकांना खर्या अर्थाने जागे रहायला शिकविते ते नाणीज.
जगद्गुरू श्रींचे मातापिता हे पूर्वजन्मीचे कोणीतरी योगभ्रष्ट तपस्वीच होते. माता सुभद्रा दत्त महाराजांच्या भक्त. पिता बाबूराव यांचे घराणे क्षत्रियकुळात सूर्यवंशी, यांचे गोत्र वशिष्ठ, आई भवानीमाता (तुळजापूर) हे यांचे कुलदैवत. पंचपल्लव व सूर्यफूल हे यांचे देवक. हे घराणे मुळातील नाशकातले निफाडचे. छत्रपती शिवरायांच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख बहिर्जी नाईक निंबाळकर यांच्या तुकडीत या घराण्याचे पूर्वज सामिल असल्यामुळे रयतेचा कानोसा घेण्यासाठी, शत्रूंच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी, गनिमांचे मनसुबे समजून घेण्यासाठी शिवरायांच्या आदेशाने ही तुकडी सतत भ्रमंती करत होती. कोकणाला लाभलेली विस्तीर्ण समुद्रपट्टी सिंधुदूर्ग, विजयदुर्ग, रायगड, जंजिरा असे अनेक किल्ले यांची इत्थंभूत माहिती संग्रही ठेवण्याकरीता हे घराणे कोकणात उतरले.
प्रथम जगद्गुरूश्री #jagadgurushri यांनी सुंदरगडावरील वरद चिंतामणी श्री गणपती मंदिर प्रभू श्रीराम मंदिर आणि संत शिरोमणी गजानन महाराज मंदिर या सर्व मंदिरांत जाऊन तेथील देवतांचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत सकलसौभाग्य संपन्न सौ. सुप्रियाताई, प.पू. कानिफनाथ महाराज, देवयोगी महाराज असे कुटुंबिय होते. संतशिरोमणी गजानन महाराज मंदिरातील दर्शनानंतर सुरुवातीला सुवासिनींनी जगद्गुरूश्रींचे औक्षण केले. त्यानंतर परमपूज्य स्वामीजी आपल्या कुटुंबासोबत आणि संत महांतांसोबत संतपीठावर आले. आपल्या परम पूज्य माऊलींना संत पिठावर आलेले पाहताच सर्व भाविकांनी जल्लोष केला, जगद्गुरुश्रींनी देखील जमलेल्या भाविकांना आशीर्वाद दिले. #nanijdham भाविकांनीही जल्लोश करीत त्यांचे अभिष्टचिंतन केले. त्यानंतर संतपीठावर जगदगुरूश्रींचे गुरू प.पू. सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज यांचे शिष्य आपल्या गुरुबंधुंचे अभिष्टचिंतन करण्यासाठी एकत्र जमले होते. अनंतगिरी महाराज यांच्यासमवेत सर्वांनी एकित्रतपणे महाराजांचे अभिष्टचिंतन केले. सकाळी मराठवाडा व नाशिक, मुंबई, तेलंगणा, नागपूर येथून निघालेल्या पायी दिंड्या सुंदरगडावर पोहोचल्या. त्यांचे स्वागत दैनिक रत्नागिरी टाईम्सचे संपादक उल्हासराव घोसाळकर व सौ. उर्मिला घोसाळकर यांनी स्वागत केले. हजारो भाविक या दिंड्यांत सहभागी झाले होते. शेकडो किलोमीटर अंतर चालीत ही मंडळी मजलदरमजल करीत निघाली होती. वाटेत गावोगावी ते निसर्ग वाचवण्याचे आवाहन करीत होते. पाच ठिकांणाहून निघालेल्या दिंड्यांनी महाराष्ट्रभर वाटेत असे जनजागरण केले.
आजच्या सोहळ्याला महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत, #mahayuti किरण सामंत, उल्हास घोसाळकर, सौ. उर्मिला घोसाळकर यांच्यासह सर्व क्षेत्रांतील मंडळी उपस्थित होती. सर्वांनी जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे आशीर्वाद घेतले.
Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi
अश्विन शुद्ध अष्ठमी, वार शुक्रवार रात्रौ १०.०० वा. नाणीजधाम या ठिकाणी जग उद्धारक नरेंद्राचार्यांचा जन्म झाला. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्रौत्सव संपूर्ण भारतात साजरा होत असतो. अगदी याच कालावधीत नरेंद्रचार्याचा जन्मोत्सव येत असतो. या दिवशी वैदिक सनातन हिंदू संस्कृतीप्रमाणे हा जन्मोत्सव संपन्न केला जातो. स्वत: जगदगुरूआपले उपास्य दैवत गजानन महाराज आणि सदगुरु काडसिद्धेश्वर महाराज यांची विधिवत पुजा करतात. भक्तही त्यांच्या वतीने आपल्या लाडक्या जगदगुरू माऊलीस दिर्घायुष्य लाभावे म्हणून महामृत्युंजय यज्ञाचे आयोजन केले जाते. मंदिरातील दैनंदीन सांजारती, शेजारती, धुपारती, शेजारती कार्यक्रम संपन्न होत असतानाच पालखी सोहळा देखील संपन्न केला जातो. अनेक साधु – संत जगदगुरुश्रींचे दर्शन, आशिर्वाद घेण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेले असतात. रात्रौ १०.०० वाजता सुहासिनी पंचारती ओवाळून अभिष्ठचिंतन करतात. साधु – संत जगदगुरुश्रींचे औक्षण करतात. संपुर्ण दिवसभर संगीताशी संबंधित वेगवेगळे कार्यक्रम उदा. गायन, नृत्य, कला इ. संपन्न होत असतात. जगदगुरुश्रींचे आशिर्वाद घेवुन या कार्यक्रमाची सांगता होते. हा उत्सव नवरात्रामध्ये येत असल्याने जवळजवळ सर्वच भक्त-शिष्यांची गैरसोय टाळण्यासाठी भक्त-शिष्यांनी जगदगुरूंना विनंती करुन २१ ऑक्टोबर या त्यांच्या जन्मदिनांकाला जन्मोत्सव आणि वर्धापनदिन असा हा उत्सव साजरा करावा अशी विनंती केली. त्यामुळे २१ ऑक्टोबर या दिवशी जन्मोत्सव सोहळा संपन्न केला जातो. दरम्यान काल सकाळी सुरू झालेल्या सप्तचिरंजीव महामृत्यूंजय यागाची व अन्नदान विधिची आज समाप्ती झाली. दोन्ही दिवस वेद शास्त्र संपन्न श्री. भालचंद्रशास्त्री शौच्चे गुरूजी व त्यांच्या सहकार्यांनी पौरोहित्य केले. भाविकांसाठी दोन दिवस २४ तास महाप्रसादाची सुविधा होती. अतिशय शिस्तबद्धरित्या सारे त्याचा आस्वाद घेत होते. सद्गुरू कडसिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये कालपासून सुरू असलेल्या आरोग्य शिबिराची आज सांगता झाली. त्यात अनेक नामवंत #doctor डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले. त्याचा लाभ दूरवरून आलेल्या अनेक भाविकांनी घेतला.
यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत| अभ्युत्थानं अधर्मस्य तदात्म्यहं सृज्यामहमं| परित्राणाय साधूनाम| विनाशाय दुष्कृत्यं| धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥
ज्या ज्या वेळी धर्माची हानी होते, नीतिमुल्यांचा र्हास होतो, साधुसंतांना तसेच सात्विक, सज्जनांना जगणे दुरापास्त होते, त्यावेळी तो विधाता कभी राम बनके, कभी श्याम बनके तर कधी ज्ञानेश्वर माऊली बनून तर कधी स्वामी विवेकानंद बनून या भूतलावर अवतरतोच. असाच या भुतलावर आश्विन शुध्द अष्टमी, आई जगदंबेच्या नवरात्रात, जगदंबा पुत्र जो जगाचा नाथ होणार आहे, असे ज्याचे वर्णन जन्मताच पुरोहितांनी केले होते, तो ज्ञानसूर्य शुक्रवार दि. २१ ऑक्टोबर १९६६ रोजी रात्रौ दहा वाजता क्षेत्र नाणीजधाम येथे जन्मास आला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांना पूज्य मातेमुळे दत्तभक्तीची ओढ लागली. श्रीमहाराजांचे जीवनच असे आहे, कोणतीही गोष्ट करायची किंवा अंगिकारायची तर मग ती एकदम टोकाचीच…..मग ती देवभक्ती असो किंवा अन्य काही असो. या गुणांमुळे श्रीदत्तमहाराजांना त्यांनी आपलेसे करून घेतले. अगदी बालवयात दत्तमहाराज त्यांच्याशी बोलत असत. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु भगवंताने गीतेमध्ये सांगितले आहे.