Apachan Upay in Marathi | अपचन घरगुती उपाय मराठी | acidity
Apachan | Acidity : अति तिथे माती ही म्हण अगदी कोणत्याही गोष्टीसाठी लागू पडते…. मग खाण्याच्या बाबतीत कशी चुकेल ????
सणासुदीला सर्व कुटुंबीय एकत्र जमले कि, नकळतच ४ घास #aajicha batava अधिक खाल्ले जातात. त्यातही तेलकट, तुपकट असेल की तोंडावर ताबा राहत नाही. आणि मग अति तिथे माती होऊन बसते. अपचन, #acidity बद्धकोष्टता, आम्लपित्त, अजीर्ण या समस्या मुख्यतः चुकीच्या आहाराच्या सवयी, नियमित व्यायामाचा अभाव, ताण-तणाव, अनियमित झोप आणि जड अन्नाचे अधिक सेवन यामुळे उद्भवतात. #apachan gharguti upay in marathi याशिवाय गरम, तिखट, मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवनही पित्त आणि गॅसेसचे मुख्य कारण ठरते.
त्यात सध्याचे हवामानही अन्न पचनासाठी चांगले नसल्याने खाल्लेले अन्न शरीरात तसेच राहते आणि मग पचनाच्या तक्रारी वाढतात. गॅसेस, अपचन आणि पित्त या त्रासांनी दररोज लाखो लोकांचे जीवन अस्वस्थ असल्याचे आपण पाहतो.
अपचन कशामुळे होते?
अपचन बऱ्याच कारणांमुळे होते.
वारंवार अपचन होण्याची काही कारणे पाहूया.
- मद्यपान, चॉकलेट, कॅफिन आणि शीतपेये यांचे जास्त प्रमाणात सेवन करणे.
- स्निग्ध, चरबीयुक्त, तेलकट आणि मसालेदार असलेले जंक फूड खाल्ल्याने देखील अपचनाचा त्रास उद्भवू शकतो.
- कधी कधी भूक नसताना देखील निव्वळ जिभेच्या तृप्ती साठी भूक नसतानाही जास्त खाल्ल्याने देखील अपचन होऊ शकते. म्हणूनच आपण त्यांना जिभेचे चोचले पुरवणे म्हणतो.
- धृम्रपान, मद्यपान केल्याने तर अपचनाचा त्रास होतोच होतो.
- जेवल्या जेवल्या लगेच झोपल्याने पचनक्रिया मंदावून अपचनाचा त्रास होतो. पचनासाठी आतड्यांकडे अन्न जाण्याऐवजी आतड्याच्या वरच्या बाजूला वर अडकून राहते. त्यामुळे अस्वस्थता वाढते.
- अन्न ग्रहण केल्यानंतर लगेचच अधिक शारीरिक श्रम केल्याने देखील अपचनाचा त्रास होवू शकतो. म्हणजेच काय तर अन्नग्रहण केल्यानंतर थोडा वेळ शतपावली करणे किंवा वज्रासनात बसणे हिताचे असते.
- चिंता, मानसिक ताण, कामाचा ताण, ऑफिस मधील कामाचा ताण, घरगुती चिंता आणि नैराश्य याने देखील अपचनाचा #acidity त्रास होतो.
अतिवेगाने किंवा अति खाणे, तासन्तास बसून काम करणे आणि कमी पाणी पिणे हे देखील अपचनाचे कारण ठरू शकते. या समस्यांच्या मूळ कारणांचा आणि त्यावरच्या उपायांचा आढावा आयुर्वेदाच्या #aajicha batava दृष्टिकोनातून घेणे गरजेचे आहे. आयुर्वेदानुसार, पचनाच्या तक्रारी होतात. वात, पित्त, आणि कफ या त्रिदोषांमधील असंतुलनामुळे विशेषतः पित्त दोषाच्या असंतुलनामुळे ऍसिडिटी आणि अपचनाच्या समस्या #apachan gharguti upay in marathi अधिक प्रमाणात निर्माण होतात.
जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचे जन्मोत्सवानिमित्त जल्लोषात अभिष्टचिंतन | Jagadguru Narendracharyaji Maharaj | Nanijdham |
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/dnyanjyotmarathi.com_nanijdham_6-1024x682.webp)
अपचनाचा त्रास असणाऱ्या व्यक्तीला खालीलपैकी लक्षणे दिसू शकतात. #acidity
- जेवायला बसलात आणि दोन-चार घास खाल्ल्यानंतर वाटतय आता पुढचं जेवण जेवू नये, पोट भरल्यासारखे किंवा फुगल्यासारखे वाटत असेल तर समजून जा कि हे अपचनाचे लक्षण आहे.
- थोडेसे जेवल्यानंतर देखील अस्वस्थपणा जाणवणे.
- वरच्या ओटीपोटात सौम्य ते तीव्र वेदना होणे.
- पोटाच्या वरच्या भागात, छातीत आणि अन्ननलिकेमध्ये अस्वस्थ करणारी उष्णता किंवा जळजळ जाणवते.
- सतत ढेकर येणे किंवा जठरासंबंधी समस्या जाणवणे.
- मळमळ होणे. उलटी आल्यासारखे वाटणे. ही आणि अशी बरीच पित्ताची #acidity लक्षणे आहेत.
आम्ही या लेखात आयुर्वेदात #ayurvedic upay पचन सुधारण्यासाठी काही खास औषधी वनस्पती आणि साधने सांगितली आहेत. ती खालीलप्रमाणे –
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/apachan_ayurved-1024x574.webp)
१. ओवा : अपचन, आणि पित्ताच्या समस्यांवर उपयुक्त आहे. अर्धा चमचा ओवा चावून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. जेवणानंतर एक तुकडा सुकं खोबर आणि ओवा असं एकत्र खाल्लं तर ॲसिडिटी, गॅसेस कमी होतात.
२. जीरे : जेवणानंतर एक चमचा जीरे चावून खाल्ल्याने गॅसेसची, अपचनाचा #acidity प्रभाव कमी होतो.
३. लवंग – सकाळ संध्याकाळ जेवणानंतर एकेक लवंग चघळल्याने आम्लपित्त त्रासामध्ये आराम येतो. आम्लपित्ताच्या व्यक्तीला चहा नुकसानकारक असतो, म्हणून जोपर्यंत ऍसिडिटीचा #acidity त्रास असेल तोपर्यंत चहा घेऊ नये.
४. लिंबू – लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून सायंकाळी प्यायल्याने ऍसिडिटी कमी होते. एक कप गरम पाणी व एक चमचा लिंबाचा रस एक-एक तासाने तीन वेळा घेतल्यास आम्लपित्तामध्ये लवकर आराम येतो.
भूक न लागणे अपचन होणे आंबट ढेकर येणे यावर उपाय म्हणून अर्धा ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून साखर मिसळून नेहमी प्यावे.
एक चमचा आल्याचा रस, लिंबू, सैंधव मीठ एक ग्लास पाण्यात मिसळून प्यावे.
अर्ध्या लिंबाच्या रसात अर्धा ग्रॅम जिरे व अर्धा ग्रॅम वेलचीचे दाणे वाटून 50 मिली पाण्यात मिश्रण करावे दोन दोन तासांनी प्यायला द्यावे उलटी बंद करण्यासाठी चांगला उपाय आहे.
अननसाच्या फोडीवर मीठ व काळे मीठ टाकून खाल्ल्याने अजीर्ण दूर होते.
पपई खाल्ल्याने सुद्धा अजिर्णामध्ये आराम येतो.
लिंबू आणि मध : 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचे लिंबाचा रस घाला. नंतर 1 चमचे मध घाला. ते चांगले मिसळा आणि प्रत्येक जेवणानंतर प्या. लिंबू आणि मधासोबत गरम पाणी हे अपचनावर प्रभावी घरगुती उपाय आहे.
५. हरडा – आम्लपित्तासाठी हरड श्रेष्ठ औषध आहे. लहान काळया #ayurved हरडीचे चूर्ण दोन ग्रॅम गूळ मिसळून सायंकाळी जेवणानंतर खाऊन पाणी प्यावे, आठवडाभर सेवन केल्याने ऍसिडिटी पासून आराम मिळतो.
६. आलं : आलं पचनक्रियेला चालना देण्याचे काम करते. #acidity आल्याचा रस आणि सैंधव मीठ जेवणापूर्वी एकत्र घेतल्याने अपचन कमी होते. एक ग्लास कोमट पाण्यात थोडे किसलेले आले, एक चमचे मध घाला आणि एकत्र करून प्या.
७. काळया मनुका : रोज १५ ते २० काळया मनुका रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी उपाशीपोटी खाल्ल्याने पित्त कमी होणे, पोट साफ होणे आणि हिमोग्लोबिन वाढणे हे तीन फायदे होतात.
८. त्रिफळा चूर्ण : (आवळा, हरडा, बेहडा) रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण घेतल्याने अपचन आणि बद्धकोष्ठता कमी होते.
९. ताक : रोज लावलेल्या ताज्या दह्यामध्ये भरपूर पाणी घालून घुसळून ताक करावे. या ताकामध्ये सैंधव मीठ, भाजलेली जिरे पावडर, किसलेले आले आणि पुदिन्याची पाने मिक्स करून हे ताक #ayurved प्यावे. पचनक्रिया यामुळे चांगली होते आणि अपचनाचा #acidity त्रासही होत नाही. ताक हा आयुर्वेदातील अत्यंत उत्तम उपाय आहे.
दही हा अतिसार आणि पचनशक्ती असलेल्या लोकांसाठी अतिशय प्रभावी उपाय आहे. यासाठी दह्यात थोडे जिरे आणि मीठ मिसळा आणि दिवसातून किमान दोनदा प्या.
मूलमंत्र, आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/aarogya_5.jpg)
१०. बडिशेप : काहीही खाल्ल्यानंतर जर पोट सतत भरल्यासारखे वाटते अथवा पोट फुगल्यासारखे वाटत असेल तर गरम किंवा कोमट पाणी प्यायल्याने तुम्हाला यापासून आराम मिळेल. गरम पाण्यात तुम्ही १ चमचा बडिशेप मिसळा आणि हे पाणी प्या.
११. हिंग – अपचनासाठी या घरगुती उपायासाठी 5 ग्रॅम हिंग एक ग्लास गरम पाण्यात मिसळा. चव सुधारण्यासाठी एक चमचा साखर घाला. गिळताना दुर्गंधी येत असली, तरी ते तुमच्या पोट फुगण्याची समस्या लवकर दूर करते आणि अपचन #acidity दूर करण्यास मदत करते.
१२. पुदिन्याचे तेल : एक कप कोमट पाण्यात पुदिन्याच्या तेलाचे 2 थेंब टाका आणि लगेच प्या. हे फुशारकी आणि फुशारकीपासून त्वरित आराम देते.
१३.. कढीपत्ता : सुमारे 20-25 ताजी कढीपत्त्याची पाने थंड पाण्याने धुवा. या पानांचा रस काढा. एक कप साध्या पाण्यात साधारण १ चमचा लिंबाचा रस आणि कढीपत्त्याचा रस घाला. या मिश्रणात 1 चमचा मध घाला आणि जेव्हा ते ताजे असेल तेव्हा प्या. हे मळमळ, उलट्या आणि अपचनामुळे #acidity होणारी पोटफुगी दूर करते.
१४. अजोवन बियाणे : अपचनासाठी घरगुती उपचारांमध्ये अजोवन बियाणे देखील समाविष्ट आहे. एक चमचा अजोवन बियामध्ये अर्धा चमचा सैंधव मीठ मिसळा. मिश्रण एका ग्लास पाण्यासोबत घ्या. यामुळे पोट फुगणे आणि पोटाचे विकार यापासून त्वरित सुटका होईल.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/motivational_3.jpg)
Marathi Motivational Quotes | प्रेरणादायी सुविचार मराठी | Success Quotes In Marathi
१५. धणे बिया : धणे बियाणे त्यांच्या दाहक-विरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते जे तुम्हाला अस्वस्थ, पोट किंवा अपचनापासून आराम देतात. आपल्या पचन प्रक्रियेस आणखी उत्तेजित करणे. कोथिंबीरमध्ये एरंड तेल मिसळावे. त्याने भूक वाढवते आणि पचन सुधारते. फरक पाहण्यासाठी धणे बियांचे पाणी सुमारे आठवडाभर घ्या.
१६. गाजर : गाजर हे ऊर्जा वर्धक अन्न म्हणून ओळखले जाते आणि पोट चांगले होण्यास मदत करते. मिक्सर मध्ये गाजर, एक केळ आणि थोडे पाणी मिसळा. हा रस प्या. हे पोटात अस्वस्थता #acidity निर्माण करणारे सर्व ऍसिड आणि वायू शोषून घेण्यास मदत करेल.
17. कांदा – एक चमचा कांद्याचा रस दोन- दोन तासाने घेतल्यास अजीर्ण झालेल्या व्यक्तीस आराम पडतो. लाल कांद्यावर लिंबू पिळून जेवताना खाल्ल्यास अजीर्ण दूर होते. लहान मुलांना अजीर्ण झाल्यास पाच थेंब कांद्याचा रस दिल्यास आराम पडतो.
१० ग्रॅम कांद्याच्या रसात १० ग्रॅम आल्याचा रस एकत्र करून प्यायल्याने मळमळ आणि उलटी थांबते.
- जेवण हलकं आणि पचण्यास हलके असावे. शक्यतो ताजे आणि सेंद्रिय अन्न खावे.
- तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थांचे प्रमाण आहारात कमी करावे.
- पाण्याचे नियमित आणि दिवसाला किमान ४ लिटर सेवन करावे; जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये.
- फळं आणि भाज्या यांचे अधिक सेवन करावे, ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होईल.
- संध्याकाळी सूर्यास्तानंतर पचनशक्ती मंदावते. त्यामुळे संध्याकाळचे जेवण लवकर घेणे आवश्यक आहे. उशिरा जेवल्याने अन्न पचण्यास अडथळा येतो आणि अॅसिडिटी व अपचनाच्या समस्या वाढतात.
- नियमित वेळेत आणि मोजकं खाणं आवश्यक आहे. अति खाणं किंवा उपाशी राहणं हे दोन्ही आपल्या शरीरास त्रासदायक ठरू शकतात.
योग आणि व्यायामाचे महत्त्व…
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/yogasan-1024x1024.webp)
पचन सुधारण्यासाठी आणि पोटातील वात कमी करण्यासाठी काही विशेष योगासने आणि व्यायाम उपयुक्त ठरतात. सध्याचे युग संगणकीय असल्यामुळे बऱ्याच व्यक्ती बैठी कामे करताना दिसतात. बरेचदा बैठ्या कामाने अन्नपचन #acidity क्रिया सुरळीत होत नाही. पण काही योगासने नियमित केल्यास पचन सुधारण्यास मदत होते. ही आसने तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य पद्धतीने करायला हवीत. आसनांचा कालावधी हळूहळू वाढवला तर त्याचा निश्चितच फायदा होतो.
१. पवनमुक्तासन : पोटातील वायू दूर करण्यासाठी पवनमुक्तासन अत्यंत उपयुक्त आहे. हे आसन जेवणापूर्वी 20 मिनिटे नियमित केल्याने गॅसेसची समस्या कमी होते आणि पचनक्रिया सुधारते.
२. वज्रासन : जेवणानंतर 3-5 मिनिटे वज्रासनात बसल्याने पचन सुधारते. हे एकमेव आसन आहे जे जेवणानंतर लगेच करायला हरकत नाही.
३. भुजंगासन आणि धनुरासन : या आसनांमुळे पोटाचे स्नायू मजबूत होतात आणि पचनक्रिया चांगली राहते.
४. प्राणायाम : प्राणायाम आणि अनुलोम-विलोम, कपालभाती पचनसंस्था सुधारण्यासाठी आणि पोटातील गॅसेस दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
आपल्या शरीरात रोगांचा प्रादुर्भाव हा फक्त तीनच गोष्टींमुळे होतो पित्त, वात आणि कफ . त्यातील पित्त आणि पित्याच्या काही प्रकरांवरील काही उपाय आपण या लेखात दिले आहेत.
(सूचना : वरील माहिती हि संग्रहातून घेतलेली आहे. कृपया आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो उपाय करावा.)