शेती करा आणि श्रीमंत व्हा ! Sheti kara ani shrimant vha! | Farming | Agriculture

Agriculture | Farming | शेती करा आणि श्रीमंत व्हा ! Sheti kara ani shrimant vha!

Agriculture : शेती #farming हा आता नामशेष ठरू पाहणारा व्यवसाय खरोखरीने किती #agriculture फायदेशीर होऊ शकतो याची माहिती या लेखात पाहूया.

आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीची प्रगती केल्याशिवाय या देशाची उन्नती होऊ शकत नाही हे अनेक तज्ञांनी सांगितले आहे. महात्मा गांधीजींनी तर ‘गाव’, ‘खेडे’ हा विकासाचा केंद्रबिंदू मानून त्याभोवती विकासाची वलय तयार व्हावीत असा योजनाबद्ध कार्यक्रम सांगितला होता. कृषीला दुय्यम स्थान असलेल्या पाश्चिमात्य राष्ट्रांचे विकसित देश हे मॉडेल अमलात आणून आपण शेतीचा पर्यायाने खेड्यांचा #agriculture विकास खुंटित केल्याचे स्पष्ट दिसत आहे. आपण अगदी अंदाधुंदपणे पाश्चिमात्यांचे औद्योगिकरण आपल्या आचरणात आणले परंतु कोणताही मागासवर्गीय भागाचा विकास एकट्या औद्योगीकरणामुळे झाल्याचे उदाहरण अस्तित्वात नाही. म्हणूनच विकासाच्या साधन सूत्रात स्पष्ट बदल करून त्यात आता कृषीला प्रमुख घटकाचे स्थान देणे अपरिहार्य आहे. ग्रामीण रोजगाराची वाढ करून तिचा अर्थव्यवस्थेत जमेची भर घालू शकणाऱ्या कृषी #agriculture विकासाशिवाय या देशाला अन्य पर्याय नाही. कुटुंब कल्याण योजनेच्या नावाखाली; लोकसंख्या वाढीचा वेग कमी करण्यासाठी अनेक योजना राबविल्या गेल्या परंतु देशाच्या लोकसंख्या वाढीचा वेग या 70 ते 80 वर्षांमध्ये म्हणावा तितका कमी झालेला नाही. म्हणूनच उत्पादन वाढीवर सतत भर द्यावा लागला आहे. आपल्या देशाची लोकसंख्या 100 कोटी च्या वरती जाऊन पोहोचलेली आहे.

सेंद्रिय शेती पद्धतीत रसायनांना पूर्ण बंदी आहे. #farming

सर्वांना अन्नधान्य मिळावे या हेतूने सहाजिकच हरितक्रांती केली गेली, परंतु या तंत्रज्ञानाने या देशातील अन्नधान्य उत्पादनात 50 दशलक्ष वरून 300 दशलक्ष टना पर्यंत इतकी वाढ करण्यात आली. परंतु या प्रगत तंत्रज्ञानाची किंमत आपल्याला पुढे नक्कीच मोजावी लागणार आहे यात शंका नाही. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानामुळे देशामध्ये ज्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत याची जाणीव गेल्या दोन चार दशकांमध्ये फारच स्पष्ट होत चाललेली आहे. जमिनीतील सुपीकतेचा ऱ्हास, पर्यावरण प्रदूषण, जमिनीतील पाण्याच्या पातळीतील घट, पाणी साठवण शक्तीचा अभाव, रोग आणि किडींचा वाढता प्रादुर्भाव; अशा अनेक समस्या आता आ वासून आपल्यासमोर उभ्या आहेत. प्रत्येक समस्या ही इतकी गंभीर आहे की, त्यावर स्वतंत्र संशोधन करूनच मार्ग काढावा लागेल. हे सर्व होत असताना सहाजिकच पूर्वीपासून कोणत्या पद्धती शेती करण्यासाठी अवलंबिया गेल्या होत्या याचा विचार समोर येत गेला आणि त्यातून आता नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, जैविक शेती #farming व रासायनिक शेती याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
सेंद्रिय शेती पद्धतीत रसायनांना पूर्ण बंदी आहे. पिकांचे पोषण आणि किडीपासून संरक्षण देखील रासायनिक पद्धतीने साधायचे आहे. तणावर नियंत्रण करण्यासाठी विशेष मशागत पद्धती, संकरित ऐवजी सेंद्रियतेचा वापर करणे, जिवाणूंचा जास्तीत जास्त उपयोग करणे, किडी व रोगांना नैसर्गिक उपायाने दूर ठेवणे, छोट्या शेतीला #agriculture आवश्यक असणाऱ्या सुलभ अवजारांचा वापर करणे, यासोबतच आर्थिक गुंतवणूक, बाजारपेठा इत्यादी अनेक बाबतींचा समावेश सेंद्रिय पद्धतीत करता येतो.
रासायनिक शेती करून उत्पन्न वाढविणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे रासायनिक शेतीच्या #farming शिफारशी करणाऱ्या शास्त्रज्ञांना सेंद्रिय शेती पद्धती बद्दल बऱ्याच प्रमाणात शंका आहे. प्रमुख भीती यातून उत्पादन आणि उत्पादकता वाढेल का ? ही आहे.
सेंद्रिय शेतीमधील संशोधन फार पूर्वी झालेले आहे, परंतु मध्यंतरी त्यांच्याकडे चांगल्या नजरेने किंवा न्यायबुद्धीने पाहिले गेले नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे थोड्या वेळामध्ये श्रीमंत होण्याचा हव्यास हे आहे. शहरीकरणामुळे सामान्यांनाही ग्रासले आहे.

शेतकरी पैशाने श्रीमंत तर होईलच परंतु देश मात्र संपन्न आणि समृद्ध होईल. #agriculture

सेंद्रिय शेती #farming पद्धत अत्यंत उपयुक्त पद्धत असून आपल्या देशातील छोट्या छोट्या शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्त काळ उत्पन्न देण्यासाठी वापरता येते. शेतीमध्ये काही करू नका याचा अर्थ निसर्गाच्या विरोधात जाऊन काही करू नका असा होतो. याचा बोध प्रत्येकाला होणे आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्यांच्या अनुभवावरून शेती करा व श्रीमंत व्हा हा लेख काही तज्ञांनी लिहिला आहे. त्या लेखातील अगदी उपयुक्त माहिती आपल्यासाठी लेखात सादर करणार आहोत.

विज्ञानाने उलगडून दाखवलेल्या निसर्गाच्या रहस्याची मदत घेऊन शेतीला जिवंत करणे, जमीन ही एक जिवंत शक्ती आहे, हे ओळखणे पिकाच्या पोषणाचे सिद्धांत पुन्हा तपासणे, जैविक आणि नैसर्गिक सिद्धांतावर आधारित किडे आणि रोगांचा बंदोबस्त करणे, अशा अनेक तत्त्वांचा या लेखात उल्लेख केलेला आहे. या माहिती द्वारे शेतकरी पैशाने श्रीमंत तर होईलच परंतु देश मात्र संपन्न आणि समृद्ध होईल यासाठी एक पाऊल उचललेले आहे. सेंद्रिय शेतीतून #farming जास्त काळ समृद्धी येऊ शकते याबद्दल दुमत नाही. साध्या आणि सोप्या समजणाऱ्या भाषेमध्ये सेंद्रिय शेतीतील तत्त्वांचा उलगडा करणारा लेख जरूर वाचा आणि श्रीमंत व्हा.

संत तुकाराम महाराज म्हणतात, ” जळामध्ये मासा झोप घेई कैसा, जावे त्याचे वंशा तेव्हा कळे”, आपण कापसाचे झाड झाल्यावरच त्या अचर जिवाचे संगोपन कसे होते ते समजते आणि निसर्गाची वनस्पतीच्या पोषणाची व्यवस्था समजते. पोषणाचा सिद्धांत हा त्रिकाल बाधित आहे. कोणतेही झाड कसे वाढते व त्याला फुले फळे कशी लागतात हे नैसर्गिक सत्य ध्यानात घ्यायला हवे. नत्र-स्फुरद-पलाश यांची गरज जर झाडांना असती तर जंगलातील झाडे, रस्त्याच्या कडेची झाडे, दुर्लक्षित झाडे वाढूच शकली नसती. मग शेतीतील पिके तशी का वाढता येणार नाहीत, यावर काही शास्त्रज्ञांनी प्रयोग केले. त्यावेळी त्यांना कळले की, जिवंत मातीत वनस्पतीच्या संपूर्ण संगोपनाची व्यवस्था असते आणि तशी व्यवस्था आपल्याला शेतीत #agriculture करता येते आणि म्हणून बाहेरून काहीही न देता शेतीच्या #farming उत्पन्नात सतत वाढ करता येते.

कुटुंब, समाज, निसर्ग आणि अर्थव्यवस्था | Family, Society, Nature And Economy

dnyanjyotmarathi.com

आपली परंपरागत शेती पद्धती अगदी अनुभवसिद्ध आहे. सर्वसामान्य अशिक्षित शेतकऱ्याला समजेल व आर्थिक दृष्ट्या झेपेल अशी सोपी शेती पद्धती पारंपारिक रित्या चालत आलेली आहे. त्याच पद्धतीला नव्या शास्त्रीय ज्ञानाची जोड दिल्यास ती पद्धत सहज सर्वमान्य होईल आणि शेतकरी स्वावलंबी #agriculture झाल्यामुळे सुखी होईल. शेतीतील #farming सर्व प्रकारचे खर्च कसे कमी करता येतात आणि त्यामुळे उत्पन्नावर काहीही विपरीत परिणाम होत नाही, याशिवाय रसायन मुक्त शेतीची सर्व उत्पादने बाजारात जास्त किमतीत कशी विकता येतील, याबाबतही आपण या लेखात माहिती पाहणार आहोत.

तसेच सर्व कृषी शास्त्रज्ञांनी उत्पादन कसे वाढवावे हे शिकवले परंतु उत्पन्न कसे वाढवावे याबाबतही आपण या लेखात माहिती पाहणार आहोत.

जमीन एक जिवंत शक्ती आहे.

जमीन #farming एक जिवंत शक्ती आहे. शेती करायची म्हणजे प्रथम जमीन हवी. तिचे अनेक प्रकार निसर्गाने निर्माण केलेले आहेत आणि त्यात फारसा बदल करणे अशक्य नसले तरी कष्टप्रद आणि खर्चिक आहे. म्हणून असेल त्या जमिनीवर चांगले उत्पादन घेण्यासाठी काय करावे लागेल हे प्रथम आपण पाहूया.

आपल्याला सर्वांना ज्ञात आहेच की, जमिनीचे #agriculture रासायनिक पृथ:क्करण करून घेण्यास सध्या खूप जास्त भर दिला जातो. तिच्यात किती नत्र, स्फुरद आणि पालाश आहे हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानंतर जे पीक घ्यायचे असेल त्या पिकासाठी या तिघांची किती गरज आहे हे पाहावे आणि मग उपलब्ध नत्राला किंवा स्फुरद किंवा पालाशाला आवश्यक त्या परिणामापर्यंत आणणारे रासायनिक खत जमिनीत मिसळायचे ही झाली रासायनिक शेती #farming करणाऱ्यांची सध्याची पद्धती आणि शेतीचा पोषणाचा ( चुकीचा ) सिद्धांत.

नोकरी की व्यवसाय | Nokari ki Vyavsay | Job or Business | Naukri or Business

dnyanjyotmarathi.com

आपल्या महाराष्ट्रात शेतीचे #farming रासायनिक पृथ:क्करण करण्याची खरंच गरज आहे का? वनस्पतीच्या पोषणाचा सिद्धांत त्रिकाल बाधित असायलाच हवा. परंतु जमिनीच्या रासायनिक पृथ:क्करणाची गरज, पिकांच्या पोषणासाठी नत्र, स्फुरद, पालाश व इतर अनेक सूक्ष्म द्रव्य लागतात असा सार्वत्रिक समज आहे. खरंच पिकांचे अन्न ही रसायने आहेत का? हा मूलभूत प्रश्न शेतकऱ्याने स्वतःला विचारून बघावा. रासायनिक खतांच्या अनेकविध दुष्परिणामांची जाणीव प्रथमतः स्वतः शेतकऱ्याला #agriculture असणे अत्यंत गरजेचे आहे.

वनस्पती सृष्टीतले जीव तर 24 तास नव्हे जन्मापासून मृत्यूपर्यंत निसर्गाच्या पूर्ण सानिध्यात राहतात.

आपण एक अचर जीव आहोत. जिथे जन्म झाला तिथेच मरेपर्यंत राहावे लागणार आहे. निसर्गाने निर्माण केलेल्या लक्षावधी योनीपैकी फक्त वनस्पती सृष्टीतील जीवच#agriculture अचर आणि स्थिर आहेत बाकी सगळे, मग ते पशु असोत की पक्षी, लहानात लहान जिवाणू किंवा कीटक हे चर आहेत. आणि म्हणून वनस्पती सृष्टीतील जीवांना एक प्रकारचे अपंगत्व (अचरत्व) निसर्गतःच मिळालेले आहे. मग अशा जीवांच्या पोषणाची व्यवस्था निसर्गाने कशी केली असेल? याचा जर विचार केला तर असे कळते की, सर्वत्र उपलब्ध असलेला हवेतील 78% नत्र, प्राणवायू, कार्बनडायऑक्साइड, आर्द्रता ही व्यवस्था कोणासाठी बरे असावी? झाडांच्या फुलांमध्ये अनंत प्रकारचे रंग किंवा मिश्रणे दिसत असली तरी त्यांची पाने मात्र हिरव्याच रंगाची का ? अर्थात हिरव्या रंगाच्या अनेक छटा त्यात आहेत. पण मुख्यतः पानांचा रंग हिरवाच आहे असे का बरे असावे ? याचे उत्तर असे असावे की, वनस्पती सृष्टीतील जीवांचे अपंगत्व (अचरत्व) लक्षात घेऊन निसर्गाने या सर्व जीवांच्या पोषणाची परिपूर्ण व्यवस्था जागेवरच करून #farming दिली असावी. संत तुकाराम महाराज म्हणतात, “चोच देई पाखराला, तोची चारा देतसे”. विज्ञानाने निसर्गाची अनेक रहस्य उलगडून दाखवली आहेत. सूर्यप्रकाशा शिवाय झाडे वाढत नाहीत म्हणून सावलीतील झाडे चांगली वाढत नाहीत हे सत्य आहे. सूर्यप्रकाशाचा उपयोग करून प्रकाश संश्लेषणाने म्हणजेच वनस्पतीचे अन्न तयार करण्याची प्रक्रिया हिरव्या पानातील क्लोरोफिल ग्लुकोजची निर्मिती करते हे विज्ञानाने दाखवले आहे. मानवाच्या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे पशुपक्षी या भूमीवर निवास करतात. प्रत्येक जीवाची #agriculture अन्न ही प्राथमिक गरज आहे. मानवाला वस्त्र आणि निवारा या दोन दुय्यम गरजा आहेत. तर इतर जीवांना त्या नाहीत. किंबहुना वन-मानवालाही त्या गरजा नव्हत्या. मध्य प्रदेशातील एका आदिवासी समाजात नुकतेच जन्मलेले मुल नागडे उघडे अंगणात 24 तास ठेवायचा रिवाज अजूनही आहे, असे वाचण्यात आले आहे. जो 24 तास निसर्गाशी म्हणजे ऊन, वार, पाऊस, थंडी आणि वीज यांच्याशी सामना करून जिवंत राहील #farming तोच पुढे जगण्याचा अधिकारी आहे, असे तो समाज अजूनही समजतो. वनस्पती सृष्टीतले जीव तर 24 तास नव्हे जन्मापासून मृत्यूपर्यंत निसर्गाच्या पूर्ण सानिध्यात राहतात. (आत्ताची एअर कंडिशनर पॉलिहाऊस हा अपवाद वगळता). माणसाला बुद्धी नसती तर त्याच्या पोषणाची व्यवस्था निसर्गाने केलीच असती असे समजण्यात दुमत नाही. म्हणूनच पिकांचे पोषण, निसर्गाने त्यांचे अन्न #agriculture जागेवरच निर्माण करून देण्याची व्यवस्था केली आहे हे अगदी त्रिवार सत्य आहे.


मूलमंत्र, आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?

जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचे जन्मोत्सवानिमित्त जल्लोषात अभिष्टचिंतन | Jagadguru Narendracharyaji Maharaj | Nanijdham |

Marathi Ukhane – मराठी उखाणे

Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi

Acidity | Apachan | अपचन-गॅसेसचा त्रास होतो? डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला तातडीने वाचा….

नोकरी की व्यवसाय | Nokari ki Vyavsay | Job or Business | Naukri or Business

Maharashtra MLA List | महाराष्ट्र राज्यातील 288 नवीन आमदार कोण? वाचा संपूर्ण यादी