Sanskar | संस्कार म्हणजे काय ? मुलांच्या अवस्था ? | Mulavar Sanskar kase karave |

मुलांमध्ये होणारे मानसिक आणि शारीरिक बदल व त्यानुसार पालकांनी कसे वागायचे ? त्यांचे संगोपन कसे करावे? | Bal Sanskar |

Sanskar : या लेखात आपण पाहणार आहोत बाळ जन्माला #sanskar आल्यानंतर ते तरुण होईपर्यंतच्या काही अवस्था… त्या अवस्थांमध्ये मुलांची घ्यायची काळजी, पालकत्व …. मुलांच्या वैचारिक व मानसिक भावनांमध्ये होणारे बदल आणि त्यांचा आहार…

प्रथम सुजाण पालक म्हणून सध्या काही बाबी जाणून घेऊया. आपली सामाजिक व्यवस्था ही अजूनही बऱ्याच अंशी कुटुंब केंद्रित आहे. बदललेल्या सामाजिक परिस्थिती मुळे कुटुंबाचा संकोच झाला असला तरी, आजही अनेक घरातील मुलं ही लहानाची मोठी होतात ती त्यांच्या घरातल्या वडिलधाऱ्यांच्या प्रेमळ छत्राखाली… “पालकत्व ही जशी मुद्दामहून शिकण्याची गोष्ट नाही”, तसचं पाण्यात पडलं कि पोहायला येतं इतक्या सहजपणे, “एकदा आई वडील झालो की पालक म्हणूनही आपोआप शिक्षण होतं” असेही अजिबात नाहीये. असा समज आपल्या समाजात बरीच वर्षे होता, आजही काहीप्रमाणात काही ठिकाणी बघायला मिळतो. #sanskar परंतु शहरातला पालक मात्र खरंच स्वतःला अगदी जाणीवपूर्वक घडवू पाहतोय. बदलू पाहतोय.

आजची तरुण मुलांची पिढी विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा “सुकाळू” असलेल्या जगत वावरणारी, त्याच्या प्रचंड वेगाशी अगदी सहज विनासायास जुळवून घेणारी पिढी आहे. त्यांच्या पावलोपावली तंत्रज्ञानाने निर्माण केलेली संसाधने आणि आकर्षणे ठायीठायी आहेत. या लोभावणाऱ्या, भुलवणाऱ्या वातावरणातून त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचायचे आहे. यासाठी त्यांना आणि त्यांच्या भांबावलेल्या पालकांना सुद्धा आशेचा एक कवडसा म्हणा किंवा दीपस्तंभ म्हणा हवा आहे. जो या अवघड मार्गावरून सहज त्यांना त्यांच्या ध्येयाकडे वाटचाल करायला मदत करेल. या लेखात काही विख्यात मानसोपचार तज्ञांचे मार्गदर्शनपर साहित्य वाचनात आले असता, त्या साहित्याची सुद्धा मदत घेतली आहे.

सहवास आणि सुसंवाद हे दोन कोणत्याही सुदृढ नात्याचे बीजमंत्र आहेत.

व्यक्तिमत्व विकासासाठी चांगल्या सवयी मुलांमध्ये रुजवणं म्हणजे येताजाता त्याला त्याबाबतचे सल्ले देणं नाही. मुलांचं लक्ष वडिलधाऱ्या व्यक्तींच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीकडे जास्त असतं. मुलं हि कृतीचं अनुकरण करतात हे नेहमी लक्षात असू द्या. उदाहरण पाहूया- चांगले दर्जेदार साहित्य, वर्तमानपत्र यांचे वाचन हा व्यक्तिमत्व विकासाचा एक उत्तम मार्ग आहे. हे अगदी खरं आहे. परंतु ते मुलांना नुसतं बोलून दाखवण्याऐवजी घरासाठी पुस्तकांची खरेदी करताना मुलांनाही त्यात सहभागी करून घ्यायला हवं. त्याच्या आवडीची पुस्तकं खरेदी #sanskar करायला हवीत. तरच ते मुल मोठ्या माणसांनी न सांगता, त्याच्या शेजारी पुस्तक वाचत बसेल, हो कि नाही ? हा अनुभव अनेक घरांचा आहे. नुसतं येताजाता, “वाच रे काहीतरी” या भोंगळ उपदेशाने जे साधत नाही, ते या कृतीने होतं. मुलांच्या मनावर परिणाम होतो तो वातावरणाचा. असं पोषक वातावरण जाणीवपूर्वक निर्माण करावं लागतं. हे करण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि मुलांच्या दैनंदिन चौकशी व्यतिरिक्त त्यांच्याशी जिव्हाळ्याच्या गप्पा मारण्यासाठीही आवर्जून वेळ ठेवावा लागतो. त्यातूनच नात्यांचे बंध अधिक घट्ट होत जातात. नुसत्या भौतिक सुविधा पुरवणं म्हणजे पालकत्व नव्हे. पालक म्हणून वेळेची सुद्धा गुंतवणूक अपरिहार्य असते. मोठेपणी मुलांच्या स्मरणात राहतात त्या याच गोष्टी. केवळ आईबाबांनी पुरवलेल्या भौतिक सुविधा ती लक्षात ठेवत नाहीत. सहवास आणि सुसंवाद हे दोन कोणत्याही सुदृढ नात्याचे बीजमंत्र आहेत.

कुटुंब, समाज, निसर्ग आणि अर्थव्यवस्था | Family, Society, Nature And Economy

dnyanjyotmarathi.com

लहान मुलांचा मानसिक विकास म्हटलं की, सर्वप्रथम आठवणारा शब्द “संस्कार” #sanskar आणि प्रचलित वाक्प्रचार, “लहान मुल म्हणजे मातीचा गोळा, घडवावा तसा घडतो”. काही पालक यात “छडी लागे छम छम ….” हा वाक्प्रचार जोडून अगदी जमेल तसे आपल्या गोळ्याला बदडून काढताना सद्धा दिसतात. संस्कार म्हणजे नेमके काय ? संस्कार नेहमीच मनावर होत असतात. मन फक्त भाषा जाणते ती सुसंवादाची. ती भाषा पालकांच्या, त्या बाल्यावस्थेत सोबत केलेल्या सर्व नजीकच्या व्यक्तींच्या नात्यातून आणि परस्परांना समजण्यातून. लहान मुलांचे विश्व असते त्यांचे घर आणि त्याचं विश्व असतात ते त्यांचे पालक. त्यांच्या छोट्या विश्वातून मोठ्या विश्वात पाऊल टाकताना ते अनुकरण करतात ते त्यांच्या पालकांचे आणि हो …. सध्याचा घरातील अविभाज्य घटक टी.व्ही. आणि मोबाईल वरील विविध सेलेब्रेटीज ! म्हणूनच पालकांनी संस्कार देण्याचे काम कसे केले पाहिजे या आधी मुलांचा मानसिक विकास कसा घडतो याकडे थोडा प्रकाश टाकूया.

मानसिक विकासात भावनिक विकास, बौद्धिक विकास आणि सामाजिक विकास या सर्वांचा विकास अंतर्मुख होतो. फ्रॉइड या सायंटिस्टने मुलांच्या भावनिक विकासासंबंधी लिहिताना #sanskar त्यांच्या शैवावस्थेपासून तारुण्य अवस्थेपर्यंत होणाऱ्या शारीरिक विकासाची व भावनिक स्थिरतेची उत्कृष्ट सांगड घातली आहे. फ्रॉईडने भावनिक विकासाचे टप्पे सांगितले आहेत.

बालकांमध्ये आत्मविश्वास व आशावाद यांसारख्या अनुरूप भावनांचा विकास

दीड वर्षापर्यंत चा जो टप्पा असतो त्याला मुखावस्था म्हणतात दीड ते तीन वर्षापर्यंतच्या टप्प्याला गुदावस्था म्हटले आहे तीन ते पाच वर्षापर्यंतची अवस्था लैंगिक परिचया अवस्था आहे तर त्यानंतर अकरा वर्षापर्यंत असते सुप्तावस्था व त्यानंतर सुरू होते पौगंडावस्था संपल्यानंतर पदार्पण होते ते तारुण्यवस्थेत. आपण त्याचे थोडक्यात विश्लेषण पाहूया….
मुखावस्थेत आनंद मिळण्याचे साधन असते ते म्हणजे ‘मुख’. बालकाच्या सुखदुःख वगैरे भावना मुखाभोवती केंद्रित झालेल्या असतात. जितक्या सहजपणे, शांतपणे, संतुलितरित्या बालकाची भूक भागवली जाते आणि तहान,भूक, दूध ओढणे या क्रिया व संवेदना सातत्याने तृप्त होतात. जितकी ही अवस्था समाधानकारकरीत्या पूर्ण होते, त्यातूनच त्याचा आईवर, पालकांवर विश्वास निर्माण होतो. जो विश्वास पुढे कुटुंब व समाज यावर परावर्तित होतो.
एकूणच बालकांमध्ये आत्मविश्वास व आशावाद यांसारख्या अनुरूप भावनांचा विकास होतो. म्हणूनच या अवस्थेला ‘प्राथमिक विश्वास’ आणि अविश्वासाचा पाया रचणारी अवस्था’, असे म्हटले आहे.

पालकांनी मुलांसोबत कसे वागावे ? जाणून घ्या १० उपाय | बालसंस्कार

या अवस्थेत शेवटच्या सहा महिन्यात मुलाला दात येतात. त्यामुळे दूध ओढण्यातून मिळणाऱ्या आनंदाचे रूपांतर हे चावण्यातून मिळायला लागते. म्हणूनच त्यांना दुधाबरोबरच बाहेरील जेवण देणे महत्त्वाचे असते. तसे न केल्यास पूर्ण आनंद न मिळाल्याने समाजावर अविश्वासाची भावना मुलांमध्ये वाढू लागते. म्हणूनच दीड वर्षात त्यांच्या संगोपनामध्ये कोणी भागीदार न येणे महत्त्वाचे असते. थोडक्यात काय तर मुखावस्था ही ‘विश्वास’ व ‘आत्मविश्वासासारख्या’ अनुरूप भावना निर्माण होण्यासाठी महत्त्वाची आहे.

‘ गुदावस्था ‘ म्हणजे काय ?

पुढची अवस्था आहे ‘ गुदावस्था ‘. या अवस्थेत गुदद्वार हे समाधान मिळण्याचे साधन होते. याचाच अर्थ मलमूत्र विसर्जनाच्या क्रियेवर स्वतःचे नियंत्रण या अवस्थेत येते व ते समाधान मिळवून देते. कधी, कुठे, केव्हा विसर्जन करायचे यापासून स्वतःशी संबंधित कसे नियंत्रण ठेवायचे हे मूल या अवस्थेतच शिकते. हे त्याचे त्याला शिकू देणे व या सर्व क्रिया करताना काही वेळा चूक झाल्यास त्याला जास्त अपराधी न बनवणे हे पालकांचे कर्तव्य असते. बालकाला योग्य ते स्वातंत्र्य मलमूत्र विसर्जनाबाबत देणे व त्यात काही चूक झाल्यास आधार देणे, परंतु चुकीचे लाड न करणे महत्त्वाचे आहे. तरच मुलाला स्वतःच्या स्नायूंवर नियंत्रण मिळवण्याचे समाधान मिळते व लाज, शंका यांसारख्या विरूप भावना निर्माण होत नाहीत. आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होते. बाल मानसशास्त्रज्ञ एरीक्सने या अवस्थेचे वर्णन ‘स्वतःची उजळ प्रतिमा याचा पाया रचणारी अवस्था’ असे केले आहे.

याच वयात मुलांमध्ये सत्सदविवेक बुद्धी निर्माण होत असते.

3 ते 5 वर्षांमधील वयाची अवस्था ही ‘लैंगिक परिचयावस्था’ आहे असे फ्रॉइड यांचे म्हणणे आहे. तर एरिक्सने या अवस्थेचे ‘पुढाकार व स्पर्धा करणारी व्यवस्था’ असे वर्णन केले आहे. स्वतःचे सामाजिक त्याहीपेक्षा कुटुंबातील स्थान निर्माण करण्यासाठी या अवस्थेत धडपड केली जाते. या अवस्थेत सर्वात महत्त्वाचे आहे बालकांचे लैंगिक कुतूहल. या वयात मुलांना स्वतःच्या लैंगिक इंद्रियांचे कुतुहल निर्माण होते. त्यांना हात लावायचा चाळा निर्माण होतो. यावर पालकांनी ही विकृती आहे असे समजून अस्वस्थ होणे, चिडणे, मुलांना मारणे योग्य नाही. त्यापेक्षा त्याकडे तात्पुरते दुर्लक्ष करून नंतर त्याला समजेल अशा भाषेत, मुलगा मुलगी फरक समजावून सांगणे इष्ट असते. यामुळे पुढे लैंगिक बाबतीत भावी आयुष्यात मूल पुढाकार घेऊ शकते. त्याचबरोबर विविध गोष्टी सांगून त्यांच्या प्रश्नांमध्ये स्वतः रस घेऊन त्यांचे कुतूहल, जिज्ञासा पूर्ण करणे तसेच नैतिक मूल्ये देखील गोष्टी रूपाने सांगणे हे पालकांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. #sanskar कुठल्याही चुकीसाठी अगदी टोकाची शिक्षा देणे टाळले पाहिजे. अर्थात प्रोत्साहन देणे सुद्धा टाळले पाहिजे. अशावेळी पालकांनी दोन्हीचे संतुलन ठेवणे महत्त्वाचे असते. याच वयात मुलांमध्ये सत्सदविवेक बुद्धी निर्माण होत असते. त्यामुळे चूक काय ते सांगताना; ते का चूक आहे? त्यामागचे कारण त्याला समजेल का? वगैरे विचार मनात न आणता (मी म्हणतो म्हणून हा विचार न करता) सांगणे तितकेच महत्त्वाचे आहे. आणि त्याचबरोबर योग्य काय ते सुद्धा सांगणे तेवढेच इष्ट आहे. शेवटी काही बाबतीत चूक बरोबर वगैरे ठरवण्याचे स्वातंत्र्य मुलांनाही दिले पाहिजे. आपले ऐकावेच असा अट्टाहास मुलांकडून ठेवण्यापेक्षा चूक बरोबरचे सिद्धांत त्यांच्यावर लादू नयेत. अशा संस्कारातूनच त्यांचे स्वतःचे नैतिक शिक्षण होताना; त्यांचे स्वातंत्र्य व आत्मविश्वास वाढीला लागतो.

मुलांवर चांगले संस्कार होण्याकरिता काय कराल? | बालसंस्कार

सहा ते अकरा वयातील अवस्था बाल्यावस्था व पौगंडावस्था यामधील सुप्तावस्था असते. या अवस्थेला एरिक्सने ‘उद्यमशीलतेची अवस्था’ असे म्हटले आहे. लैंगिक कुतुहल सुप्तावस्थेत जाते. तर मुलांच्या इतर सुप्त कलागुणांना वाव मिळण्याची व त्यांचा विकास घडवणारी, त्यांना क्रियाशील बनवणारी अवस्था ही सुप्तावस्था असते. या अवस्थेतच मुलांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. मुल अनेक कला, खेळ शिकू लागते. या सर्वांसाठी त्याला योग्य प्रोत्साहन मिळायला पाहिजे. त्यासाठी दडपण आणू नये. तरच मुलांच्या मनात स्वतःबद्दल सुदृढ प्रतिमा तयार होते व आत्मविश्वास वाढीला लागतो,.अनुरूप भावना वाढीला लागतात.

dnyanjyotmarathi.com


थोडक्यात वयाचे परिणाम अगदी असेच धरले नाहीत तरी अवस्थांचे वर्गीकरण असेच आहे. त्यावरून असे दिसते की गाईपासून तिचे वासरू चार दिवसात वेगळे उभे राहू शकते. पण माणसाच्या मुलाला वेगळे उभे राहायला म्हणजे स्वतःची सुदृढ प्रतिमा निर्माण करायला अनेक वर्षे लागतात. (जसा आपण पालक आपल्या मुलाबद्दल विचार करतो) तो बदल शारीरिक विकासाला धरून होतो. पालकांना #sanskar आपल्या बालकाकडे चिकाटीने व सातत्याने लक्ष पुरवायला लागते. एकूणच विकासाचा अर्थ ‘मुलाचे स्वातंत्र्य’ आणि ‘स्वतंत्र व्यक्तिमत्व’ निर्माण होणे हे आहे. म्हणूनच संस्कार म्हणजे चांगल्या वाईट अनुभवातून त्याला जाऊ देणे. तरच त्या लोखंडाचे सोने होईल. संस्कार म्हणजे असे, ” करू नका, हे चूक आहे, हे वाईट आहे असे सांगणे नव्हे! तर ते का चूक ? का वाईट? हे सांगून; काय करणे योग्य आहे? हा सल्ला देणे म्हणजे संस्कार !!!!

अपेक्षांचा अट्टाहास न ठेवता, त्यांच्यावर तो न लादता त्यांचा व्यक्तिमत्व विकास कसा साधता येईल हे ध्यानात ठेवावे.

आपल्या बालकाने सल्ला नाही मानला तरी चालेल अशी निरपेक्ष वृत्ती सुद्धा पालकांची असायला हवी. म्हणून दोन-तीन महत्त्वाच्या गोष्टी पालकांनी लक्षात ठेवाव्यात. प्रथम मूल ही आपली मालमत्ता वंशाचा/ दिवा/ आपले प्रतिरूप वगैरे कल्पना मनातून काढून टाकाव्यात. आपले मूल हे एक स्वतंत्र रोपटे आहे, ज्याचे बीज आपण पेरले होते, हे ध्यानात ठेवावे. जसे आंब्याच्या झाडाला लागलेल्या आंब्याच्या कोयीपासून उगवलेल्या नवीन रोपट्याला वागवले जाते, अगदी तसे स्वतंत्रपणे वागवावे. त्यांच्यात आपले गुणदोष उतरले असले तरी त्याचे स्वतःचेही काही गुणदोष असतात. म्हणून आपल्या तत्त्वांचा, विचारांचा, आकांक्षांचा अपेक्षांचा अट्टाहास न ठेवता, त्यांच्यावर तो न लादता त्यांचा व्यक्तिमत्व विकास कसा साधता येईल हे ध्यानात ठेवावे. नवीन युगातील या लहान मुलांशी विशेषतः माहिती आणि #sanskar तंत्रज्ञान युगातील लहान मुलांशी संवाद साधताना आपली संवादशैली बदलली पाहिजे. आपला प्रौढपणा, मोठेपणा बाजूला ठेवून, आपल्याला माहिती नसल्यास ती मिळवून नंतर सांगणारे, कुतूहल पूर्ण करणारे पालक बनले पाहिजे. तसेच शैवावस्थेत मलमूत्र विसर्जनावर कंट्रोल येईपर्यंत मूल कुठेही बाहेर आपली तारांबळ उडवू नये यासाठी आपण आई-वडीलच त्याची तारांबळ उडवत असतो. सध्याच्या प्रगत जगात बाजारपेठेत आता डायपरची उपलब्धता आहे, त्याचा वापर करून हे टाळता येईल. तसेच लैंगिक कुतूहलाबाबत सुद्धा म्हणता येईल. आपले मूल जेव्हा लिंगाशी चाळा करते तेव्हा त्याच्या मनात विकृती नसते. आपण त्याला ओरडतो तेव्हा त्याकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा असतो. त्यामुळे हे पालकांनी कटाक्षाने टाळले पाहिजे. आजच्या मुलांना ज्ञानाच्या अनेक कक्षा उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण त्याच्यापासून कुठचीही माहिती न लपवता, न दवडता हळूहळू वाढत्या वयाप्रमाणे त्यांना समजेल अशा भाषेत, त्यांना समजतील अशी उदाहरणे देऊन त्यांची जिज्ञासा, कुतूहल पूर्ण केले पाहिजे. त्यासाठीच आपण त्यांच्या कोमल मनाशी ‘सानुल्या’ भाषेत संवाद साधला पाहिजे. हेच खरे पालकत्वाचे संस्कार जे मुलांवर कोमल फुलाप्रमाणे व्हायला हवेत.

क्रमशः


मूलमंत्र, आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?

जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचे जन्मोत्सवानिमित्त जल्लोषात अभिष्टचिंतन | Jagadguru Narendracharyaji Maharaj | Nanijdham |

Marathi Ukhane – मराठी उखाणे

Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi

Acidity | Apachan | अपचन-गॅसेसचा त्रास होतो? डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला तातडीने वाचा….

नोकरी की व्यवसाय | Nokari ki Vyavsay | Job or Business | Naukri or Business

Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 02 Dec TO 08 Dec 2024