Rashi Bhavishya : ०२ डिसेंबर ते ०८ डिसेंबर २०२४ या आठवड्याचे सर्व राशींचे राशी भविष्य या लेखाद्वारे देत आहोत | Rashi Bhavishya in Marathi|
मेष राशी (Aries Weekly Horoscope) – (०२ डिसेंबर २०२४ ते ०८ डिसेंबर २०२४) येणाऱ्या काळात सर्जनशीलता वाढल्याने #rashi bhavishya आपण काहीतरी नवीन विचार कराल. आपल्या प्राप्तीत चढता आलेख राहील. आपल्या कुटुंबाच्या भलाई साठी तुम्हाला लागोपाठ मेहनत करावी लागेल यासाठी तुमच्या प्रत्येक कामामागे प्रेम आणि दूर दृष्टी ची भावना असली पाहिजे. आपण आपले खर्च भागविण्यात यशस्वी व्हाल. आपल्या एखाद्या छंदास प्राप्तीचे साधन बनवू शकता. आपले व्यक्तिगत व व्यावसायिक जीवन सुरळीत चालण्यासाठी आपणास आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवावे लागेल. विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या असल्याचे जाणवेल.
मेष राशीच्या लोकांनी रोज पिंपळाला पाणी घालावे. तसेच तुम्ही नियमित 21 वेळा ‘ॐ राहवे नम:’ चा जप करा.
वृषभ राशी (Taurus Weekly Horoscope) – (०२ डिसेंबर २०२४ ते ०८ डिसेंबर २०२४) आठवड्याच्या सुरुवातीस आपण एखादे मोठे काम हाती घेऊ शकता. आपल्या खर्चात कपात होऊन प्राप्तीत वाढ होईल. #rashi bhavishya व्यापाऱ्यांना नवीन काम हाती घेण्यात यश मिळू शकते. मच्या चंद्र राशीने बृहस्पती च्या पहिल्या भावात उपस्थित असण्याने, या सप्ताहात वित्त संबंधात गती कायम ठेवण्यासाठी तुम्हाला कमी मेहनती नंतर चांगला नफा प्राप्त होऊ शकेल कारण, या काळात ग्रहांची स्थिती सांगते की, तुमचे अप्रत्यक्षित खर्च बरेच कमी होतील. नोकरी करणाऱ्यांची कामाच्या ठिकाणी स्थिती सुधारेल. आपणास सहकाऱ्यांचे सहकार्य सुद्धा मिळेल. विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात काही त्रास जाणवेल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमचे पूर्ण योगदान देण्यास तयार राहा.
वृषभ राशीच्या लोकांनी श्री रुद्राय नमः या मंत्राचा जप करावा.
Cyber Crime | सायबर क्राइम म्हणजे काय? | What is cyber crime?
मिथुन राशी (Gemini Weekly Horoscope) – (०२ डिसेंबर २०२४ ते ०८ डिसेंबर २०२४) हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण आपल्या योजना पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. थकबाकी मिळेल. आपली स्थगित कामे सुद्धा सुरु होतील. आपण नवीन प्रॉपर्टी खरेदी करू शकता. #rashi bhavishya नोकरी करणाऱ्यांना कामात मजा येईल. आपण मन लावून व आपले पूर्ण योगदान देऊन कामे कराल. या सप्ताहात तुमच्या राशीतील लोकांचे आर्थिक जीवन सामान्य पेक्षा उत्तम राहील कारण, तुमच्या चंद्र राशीने केतूच्या चौथ्या भावात विराजमान होण्याने, एकीकडे जिथे विनाकारण खर्च तुम्हाला काही त्रास देईल तर, बऱ्याच स्त्रोतांची धन प्राप्ती होण्याने ही तुम्हाला या सर्व खर्चांपासून आराम मिळू शकेल. व्यापाऱ्यांसाठीसुद्धा हा आठवडा अनुकूल आहे. वैवाहिक जीवनातील ताण कमी होऊन व्यक्तिगत जीवनात सुधारणा होईल.
मिथुन राशीच्या लोकांनी श्रीराम जयराम जय जय राम या मंत्राचा जप करावा. तुम्ही बुधवारी गरीब मुलांना शालेय वस्तू दान करा.
कर्क राशी (Cancer Weekly Horoscope) – (०२ डिसेंबर २०२४ ते ०८ डिसेंबर २०२४) या आठवड्यात तुम्हाला अनेक संधी मिळतील, ज्या आपण योग्य प्रकारे स्वीकारल्यास आपण खूप काही करू शकाल. तुमच्या #rashi bhavishya चंद्र राशीने बृहस्पती तुमच्या बाराव्या भावात उपस्थित असण्याने, तुमच्या आर्थिक निर्णयात सुधार, या सप्ताहात तुमच्या जीवनात सकारात्मक प्रभाव टाकू शकतो आणि यामुळे तुम्हाला पूर्वीच्या प्रत्येक नुकसान मधून वर येण्यात मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. नोकरीत आपले समाधान होईल. आपण आपली कामे इतरांहून उत्तम प्रकारे करू शकाल, त्यामुळे वरिष्ठांचा विश्वास वाढेल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा.
कर्क राशीच्या लोकांनी रोज मारुतीचे दर्शन करावे.
सिंह राशी (Leo Weekly Horoscope) – (०२ डिसेंबर २०२४ ते ०८ डिसेंबर २०२४) हा आठवडा आपल्या जीवनात चढ उतार घेऊन येऊ शकतो. आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मानसिक ताण वाढेल, व त्यामुळे आपणास मानसिक नैराश्यही येऊ शकते. खर्चात वाढ होईल, #rashi bhavishya ज्याचा प्रभाव आपल्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. तुमच्या चंद्र तशीच्या शनी तुमच्या सातव्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने, या सप्ताहात तुमच्याकडून तुमचा मित्र, किंवा जवळचा नातेवाईक तुमच्याकडून मोठी रक्कम उधारीवर माघण्याची शक्यता आहे परंतु, जर तुम्ही त्यांना हे धन दिले तर, त्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो म्हणून, या सप्ताहात कुणाला ही उधारीवर धन देऊ नका. तेव्हा आपणास आर्थिक नियोजन करावे लागेल. काहींना वैवाहिक जीवनात तणाव असल्याचे जाणवेल. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती होण्याची दाट शक्यता आहे.
सिंह राशीच्या लोकांनी रोज कुलदेवीस दुधाचा नैवेद्य दाखवावा.
नोकरी की व्यवसाय | Nokari ki Vyavsay | Job or Business | Naukri or Business
कन्या राशी (Virgo Weekly Horoscope) – (०२ डिसेंबर २०२४ ते ०८ डिसेंबर २०२४) आठवड्याची सुरुवात चांगलीच असेल. आपण पूर्वी #rashi bhavishya जी मेहनत केली होती त्याचे परिणाम ह्या आठवड्यात मिळतील. तुमच्या चंद्र राशीने बृहस्पती च्या तुमच्या नवव्या भावात विराजमान होण्याने, हा सप्ताह अश्या गोष्टी खरेदी साठी उत्तम आहे, ज्याची किंमत पुढे जाऊन वाढू शकते अश्यात, तुम्ही सोन्याचे आभूषण, घर-जमीन किंवा काही घराच्या निर्माण कार्यात गुंतवणूक करू शकतात. यामुळे तुम्हाला पुढे जाऊन उत्तम नफा मिळण्याचे योग बनतील. आपला आत्मविश्वास सुद्धा उंचावेल. आपली रोग प्रतिकारशक्ती वाढेल, व त्यामुळे प्रकृतीत सुद्धा सुधारणा होईल. नोकरी करणाऱ्यांची स्थितीसुद्धा चांगली राहील. विवाहित व्यक्ती त्यांचे वैवाहिक जीवन अधिक सुखावह करण्याचा प्रयत्न करतील.
कन्या राशीच्या लोकांनी सूर्याला अर्घ्यदान करावे.
तुळ राशी (Libra Weekly Horoscope) – (०२ डिसेंबर २०२४ ते ०८ डिसेंबर २०२४) आठवड्याच्या सुरवातीस कौटुंबिक व्यवसायात मोठा #rashi bhavishya आर्थिक फायदा होऊ शकतो. बाजारात आपली पत वाढेल. धार्मिक कार्यातसुद्धा आपला हातभार असेल. नोकरी करणाऱ्यांना सावध राहून कामे करावी लागतील. तुमच्या चंद्र राशीने शनी तुमच्या पाचव्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या आठवड्यात तुम्हाला धन लाभ तर होईलच, परंतु तुम्ही तुमच्या करमणुकीवर जास्त पैसे खर्च करताना दिसाल. इमानदारीने आपली कामे करावी, अन्यथा अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. विवाहितांना त्यांचे वैवाहिक जीवन आनंदित असल्याचे जाणवेल.
तुळ राशीच्या लोकांनी व्यंकटेश स्तोत्र वाचावे.
वृश्चिक राशी (Scorpio Weekly Horoscope) – (०२ डिसेंबर २०२४ ते ०८ डिसेंबर २०२४) आपली आर्थिक प्रगती होईल. आपण जर नोकरी करत असाल तर आपणास पगारवाढ मिळू शकते. आपले विरोधक आपणास #rashi bhavishya त्रास देतील, परंतु ते त्यात यशस्वी होणार नाहीत. व्यापाऱ्यांना व्यापारात वृद्धीची शक्यता. काही नवीन लोकांचा पाठिंबासुद्धा मिळेल. भागीदारीत लाभ होईल. अचानकपणे बदल घडून जीवनात नावीन्य येईल. विवाहितांमधला समन्वय उत्तम होईल.
वृश्चिक राशीच्या लोकांनी श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा.
धनु राशी (Sagittarius Weekly Horoscope) – (०२ डिसेंबर २०२४ ते ०८ डिसेंबर २०२४) तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण झाल्याने आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. आपण प्रत्येक काम उत्तम प्रकारे करू लागाल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा बदल करण्याचा आहे. आपणास नवीन नोकरी मिळू शकते. जर तुमच्या कुटुंबात कुणाचा विवाह नुकताच झालेला आहे तर, तुम्हाला नवीन #rashi bhavishya पाहुण्याच्या आगमनाची वार्ता या सप्ताहात मिळू शकते. व्यापाऱ्यांनी कोणतेही मोठे धाडस करणे किंवा निर्णय घेणे टाळावे. हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल नाही. सर्दी खोकल्यासारखे आजार होण्याची शक्यता.
धनु राशीच्या लोकांनी अंगारक कवच स्तोत्र पठण करावे.
Acidity | Apachan | अपचन-गॅसेसचा त्रास होतो? डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला तातडीने वाचा….
मकर राशी (Capricorn Weekly Horoscope) – (०२ डिसेंबर २०२४ ते ०८ डिसेंबर २०२४) हा आठवडा अनुकूल व शुभ राहणार आहे. नोकरीत चढ – उतार येतील. तुम्हाला आपल्या कामावर जास्त लक्ष द्यावे लागेल. या सप्ताहात तुमचे आपल्या कुटुंबासोबत व्यवहार खूप खराब होतील यामुळे सप्ताहाच्या शेवटी तुमच्या द्वारे केल्या गेलेल्या गोष्टींना घेऊन तुम्हाला पश्चाताप ही होऊ शकतो परंतु, या पस्तावाच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या कुटुंबासोबत #rashi bhavishya आपले संबंध उत्तम करण्यात अयशस्वी राहाल. आजूबाजूच्या ताण-तणावांपासून पासून दूर राहा. आपली कामगिरी उत्तम करण्यावर भर द्या. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा फायदेशीर होऊ शकतो. विवाहितांचे वैवाहिक जीवन संतुलित होईल. आपसातील प्रेम वृद्धिंगत होईल.
मकर राशीच्या लोकांनी संकटनाशन गणपती स्तोत्र वाचावे.
कुंभ राशी (Aquarius Weekly Horoscope) – (०२ डिसेंबर २०२४ ते ०८ डिसेंबर २०२४) तुमची प्रकृती बिघडण्याची शक्यता असल्याने त्याची काळजी घ्यावी लागेल. एखादा पोटाचा विकार त्रस्त करण्याची शक्यता आहे. #rashi bhavishya नोकरी करणाऱ्यांची स्थिती चांगली राहील. आपणास वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल व त्यांच्या सहकार्याने आपला पगार वाढण्याची शक्यता आहे. . तुमच्या चंद्र राशीने केतूच्या आठव्या भावात विराजमान होण्याने, जर आपण आपली संपत्ती जमा करण्यासाठी चांगली गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आपण या आठवड्यात असे काही करणे टाळावे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्यच आहे. विद्यार्थ्यांनी आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित करावे, त्यामुळे यश प्राप्ती होईल.
कुंभ राशीच्या लोकांनी आदित्य हृदय स्तोत्र वाचावे.
Mulanchi Nave | “अ ” मराठी अक्षरावरून मुलांची / मुलींची नावे|New born baby Name
मीन राशी (Pisces Weekly Horoscope) – (०२ डिसेंबर २०२४ ते ०८ डिसेंबर २०२४) ह्या आठवड्यात खर्चात खूप वाढ होण्याची शक्यता आहे. #rashi bhavishya त्यामुळे आपल्या खिशावर ताण येऊन आपली आर्थिक स्थिती खालावली जाईल. एखाद्या नवीन योजनेत पैसे गुंतवल्याने फायदा होईल. विवाहितांसाठी हा आठवडा उत्तम आहे. तुमच्या चंद्र राशीने बृहस्पती तुमच्या तिसऱ्या भावात विराजमान असण्याने, या सप्ताहात तुमचा सामना, तुमच्या जीवनातीलबऱ्याच नवीन आर्थिक योजनांनी होईल. आपण एकमेकांना पूरक होईल असे काम केल्यास दोघांचाही फायदा होईल. प्रकृती उत्तम राहिली तरी अधून- मधून एखादा छोटा आजार त्रास देऊ शकतो.
मीन राशीच्या लोकांनी बृहस्पती स्तोत्र वाचावे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)