कुटुंब, समाज, निसर्ग आणि अर्थव्यवस्था | Family, Society, Nature And Economy

dnyanjyotmarathi.com/

कुटुंब, समाज, निसर्ग आणि अर्थव्यवस्था | Family, Society, Nature and Economy

Pratik Dhanmer : Community Architect, Natural Farmer, Activist and a Human, Co-foundar at @design_jatra

Family, Society, Nature and Economy : वारली आदिवासी समाजातील एका मित्राच्या लग्नाला जाण्याचा योग आला. माझी आणि माझ्या शहरी मित्राची अश्या लग्नाला जाण्याची पहिलीच वेळ होती. लग्न बऱ्यापैकी धामधुमीत पार पडले. अर्थशास्त्राची #economy काही पुस्तके वाचलेल्या माझ्या मित्राच्या डोक्यात वेगळेच गणित चालू झाले. त्या लग्नाला साधारणत दोन लाख रुपये तरी खर्च आला असावा. (आपल्यासाठी जरी हा खर्च खूप कमी असला तरी मासिक कौटुंबिक मिळकत ३०००-४००० रुपये असणाऱ्या कुटुंबासाठी ही प्रचंड मोठी रक्कम आहे.) इतकी कमी मिळकत असलेल्या त्या #dnyanjyotmarathi.com आदिवासी मित्राला हे लग्न परवडले तरी कसे? जरी त्याने त्याचा मिळकतीमधील अर्धी रक्कम लग्नाचे हफ्ते फेडण्यासाठी बाजूला काढली तरी हे लग्न कर्जमुक्त करण्यासाठी त्याला साडे आठ वर्ष लागतील. मग, आमच्या चांभार चौकश्या चालू झाल्या. परंतु, ह्या चौकश्या करताना आदिवासी समाजाची एक विलक्षण समाजव्यवस्था आमच्यासमोर आली. ह्या समाजात #society मदतीची देवाणघेवाण होते. ह्या समाजात लग्न हा कौटुंबिक #family सोहळा नसून सामाजिक सोहळा असतो. लग्नाची संपूर्ण जबादारी गावातील प्रत्येक कुटुंबामध्ये विभागली जाते. लग्न लावून देणाऱ्या भगताला तांदूळ आणि काही जिन्नस मानधन म्हणून देण्यात येते. जेवण बनवायला आणि वाढायला संपूर्ण गाव एकत्र येतो. प्रत्येक घरातून जेवण बनवायचे साहित्य आणि जिन्नस मागवले जातात. पाहुण्यांची राहण्याची पाहुणचाराची व्यवस्था विभागली जाते, आणि खर्चिक दिसणारे हे भले मोठे लग्न वीस तीस हजाराच्या खर्चात सफळ संपूर्ण. भली मोठी कर्ज काढून आणि आयुष्यभर त्याच्या हफ्त्यांचा भर घेऊन पार पडणाऱ्या लग्नांचा विचार करताना हे सामाजिक व्यवस्थेच लग्न कुठे हरवल ? हा प्रश्न आम्हाला पडला. कदाचित लग्न व्यवस्था नव्हे तर ‘समाज’च #society हरवला आपल्यापासून.

माणसाच्या जगण्यातल्या शाश्वततेचे उत्तम उदाहरण

माणूस समाजशील प्राणी आहे हे अगदी शाळेपासून आपण शिकत आलो. आधी संरक्षणासाठी आणि शिकारीसाठी माणूस समूहात राहत असे. नंतर शेतीचा शोध लागल्यापासून आपल्या जीवनात स्थैर्य आले. यातून कायमस्वरूपी निवाऱ्याची गरज निर्माण झाली. गावे आणि नगरे निर्माण झाली. हजारो वर्षांच्या उत्क्रांतीत अनेक संस्कृतींचा जन्म झाला. देवाण घेवाण व्यवस्थेवरून जेव्हा आपण अर्थव्यवस्थेकडे वळलो तेव्हा राज्ये, राष्ट्रे, जाती धर्मांचा उदय झाला. समूहात राहताना किवा समाजात #society राहताना त्याच्या संतुलनासाठी अनेक लिखित आणि अलिखित नियम अस्तित्वात आले, आणि आपण त्यावर शंका न घेता ते पाळू लागलो. हे सर्व शाश्वततेने जगण्याचे नियम आपल्या गुणसूत्रात खोलवर कोरले गेले. औद्योगिक क्रांतीच्या उगामाअगोदर हे सर्व नियम पाळत आपण निसर्गाबरोबर एक छान समन्वय साधला होता. कुटुंब व्यवस्था वारसा पुढे देत होती. समाजव्यवस्था निसर्गाचे संतुलन राखून नैसर्गिक संसाधने वापरत होती. माणसे समूहाने राहून एकमेकांची काळजी घेत होते. माणसाच्या जगण्यातल्या शाश्वततेचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचा आदिवासी समाज.

माझ्या आदिवासी गावात घर बांधण्याची खूप छान प्रथा आहे.

माझ्या आदिवासी गावात घर बांधण्याची खूप छान प्रथा आहे. येथील घरे शेणा-मातीची आणि कुडाची असतात. घराचे खांब आणि छप्पर लाकडी असते. घराच्या मध्यभागी जो लाकडी खांब उभा केला जातो त्याला देवाचा खांब संबोधले जाते. हा खांब घराचे आयुष्य ठरवतो. हा लाकडी खांब थेट जमिनीत गाडला जातो. त्यावर वाळवी लागू नये म्हणून कोणतीच प्रक्रिया केली जात नाही, या उलट त्या खांबाला सडू दिले जाते. सदर खांब सडायला जवळजवळ २० वर्षे जातात. तोपर्यंत घरमालकाचा मुलगा युवक होऊन घराचा ताबा घेण्यास सक्षम झाला असतो. मग संपूर्ण घर पाडून हवे ते साहित्य पुनर्वापरासाठी ठेवून बाकी साहित्य जंगलात टाकले जाते. शेण, माती, लाकूड ह्यासारखे विघटनशील साहित्य जंगलात सहज विरून जाते. मग हा युवक जंगलातून नवीन लाकडे आणतो आणि घर पुन्हा बांधतो. या वेळी तो परंपरेप्रमाणे स्वतःच्या मुलासाठी नवीन झाडे जंगलात लावतो, त्यांचे संगोपन करतो. ह्या कौटुंबिक #family व्यवस्थेचा वारसा असाच पुढे दिला जातो. घराचे जीवनचक्र आणि जंगलाचे जीवनचक्र ह्याचा मानवाच्या जीवनचक्राशी असलेला समतोल त्यांच्या जगण्याच्या शाश्वततेचे आणि पावित्र्याचे उत्तम उदाहरण आहे. ह्याच घराचे बांधकाम चालू असताना गावातील प्रत्येक घरातून एक व्यक्ती घर बांधकामाला मदत करायला येते. घर पूर्ण झाल्यावर घराचा घरमालक गावातील इतर व्यक्तींच्या घर बांधकामाला मदत करण्यासाठी बांधील राहतो. ह्या पद्धतीमुळे नक्की काय होत? बांधकामाचा खर्च प्रचंड कमी होतो. घर बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक संसाधनांचे योग्य संवर्धन आणि विभागणी होते कारण, या प्रक्रियेत समाज सक्रीय असतो. घरांमध्ये आर्थिक विषमता दिसून येत नाही करण प्रत्येक घर हे एकमेकांच्या सहकार्यातून बांधले जाते. ह्या सर्व प्रक्रियेमुळे समाज बांधला जातो. तंटे कमी होतात. लोक एकमेकांवर अवलंबून असल्याने एकमेकांची काळजी घेतात. हेच मानवी जीवनचक्राच समाजशास्त्र.

औद्योगिक प्रगतीमुळे निसर्गाचा ह्रास झाला.

dnyanjyotmarathi.com

वरील दोन्ही उदाहरणे पहिली तर एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते ती म्हणजे, दोन्ही व्यवस्थेत नैसर्गिक संसाधनांचा वापर हा नीतिमत्तेने करून निसर्ग आणि मानव यातील संतुलन कायम राखले आहे. ह्यात कुठेही अर्थव्यवस्था नाही, किंवा जी अर्थव्यवस्था आहे ती मदतीवर आधारित आहे, भेटीवर आधारित आहे (गिफ्ट इकोनोमी). सर्व व्यवस्था पारंपारिक रीवाजांनी सुरक्षित केलेल्या आहे. मग आपण शहरी व्यक्ती निसर्गापासून इतके दूर का गेलो? आपला सामाजिक #society समतोल कधी बिघडला? ह्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे आपण स्वीकारलेली अर्थव्यवस्था. देशाची प्रगती मोजण्यासाठी आपण जी.डी.पी. (gross domestic product ) हे प्रमाण मानतो. सदर प्रमाणात आपण जितक्या जास्त वस्तूंचा उपभोग घेऊ तितकी जास्त देशाच्या विकासात वाढ होत असते. जीवनावश्यक वस्तूंपासून ते चैनीच्या वास्तुपर्यंत सर्वच गोष्टींचा यात समावेश असतो. इतकेच काय तर आपण आजारी असताना दवाखान्यावर केलेला खर्च सुद्धा देशाच्या प्रगतीसाठी महत्वचा आहे. म्हणजेच जास्तीत जास्त लोक आजारी पडले तर देशाचा विकास होतो. म्हणूनच जाहिरातींमध्ये आपल्याला प्रथम आपल्या वर्णाबद्दल, केसांबद्दल, आपल्या दिसण्याबद्दल असमाधानी केले जाते आणि उत्पादन खपवले जाते. आपण जितके जास्त असमाधानी तितके अर्थव्यवस्थेसाठी चांगले. कदाचित ह्यामुळेच आपले सामाजिक बंध तुटून आपण वैयक्तिक भौतिक समाधानाच्या अधीन होऊन सामाजिक बंध तोडून टाकले. औद्योगिक प्रगतीमुळे निसर्गाचा ह्रास झाला. उत्पादन वाढवण्यासाठी जंगले कापली गेली. हे सर्व होताना केवळ पर्यावरणाचा समतोल नाही बिघडला, तर कौटुंबिक #family आणि सामाजिक #society समतोलसुद्धा बिघडला.

गेली काही वर्षे आदिवासी गावात राहिल्याने त्यांची जीवन संस्कृती फार जवळून पाहायला मिळाली. त्यांचा देव ‘वाघोबा’. वाघ हा प्राणी देव कसा बरे असू शकतो? लाकडावर ढोबळ वाघाचे कोरलेले चित्र ही त्यांची मूर्ती. मंदिराला भिंती नाहीत.

संस्कृतीत जीवनाचे सार लपलेले आहे.

फक्त वर छप्पर. अगदीच सामान्य आणि आजूबाजूच्या गर्द झाडीत लपलेले मंदिर. पण पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर या संस्कृतीत जीवनाचे सार लपलेले आहे. वाघ हा अन्न साखळीतील शिखरावरील प्राणी. वाघ जर जंगलात असेल तर ते वन सर्वोत्तम आहे. वाघाची शिकार केली तर वनातील शाकाहारी प्राणी वाढून जंगलातील समतोल बिघडणार. म्हणून वाघोबा देव. हे मंदिर गाव आणि जंगलाच्या वेशीवर असते. मंदिराला भिंती नसल्याने त्यात लावलेल्या दिव्याच्या किवा मशालीच्या प्रकाशाने जंगली प्राणी गावाकडे येत नाहीत. हा झाला निसर्गाबरोबरचा समन्वय. ह्याच मंदिराच्या बाजूला गावातील प्रत्येक कुटुंब एका दगडाची स्थापना करते. हे पूर्वजांचे दगड. तेथील कोणत्याच झाडाची फांदी देखील तोडली जात नाही. अनेक पक्षी, कीटक तिथे आश्रयाला येतात. हे छोटे जंगल जैव विविधता सांभाळण्याचे काम करते. गावातील सर्वच धार्मिक कार्यक्रम येथे पार पडतात. धर्माबरोबर पर्यावरणशास्त्राची घातलेली हि अनोखी सांगड विचार करायला भाग पाडते. सध्या या सर्व ज्ञानापासून आपण कित्येक कोस दूर आहोत. पर्यावरणाशी घातलेल्या या अनोख्या चालीरीती आज आपल्याला माहित देखील नाहीत.

नोकरी की व्यवसाय | Nokari ki Vyavsay | Job or Business | Naukri or Business

सध्याच्या अर्थव्यवस्थेमुळे माणूस समाजापासून #society तुटत गेला असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. आपण सर्वच गोष्टींचे प्रमाणीकरण करून त्याचे वैविध्य नाकारले. प्रमाणीकरण हे अर्थव्यवस्थेला पोषक असते तर वैविध्य अर्थव्यवस्थेला #economy मर्यादा घालते. म्हणून शिक्षणापासून, जगण्याच्या चाकोरीपर्यंत इतकच काय तर आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल सुद्धा आपण प्रमाणीकरण केले. पैसा जास्त हातात आल्याने आपले समाजाशी असलेले परस्परावलंबी चक्र तुटले. सध्याच्या स्मार्ट फोन तंत्राने आपले उरलेसुरले सामाजिक आणि कौटुंबिक संबंधसुद्धा संपवले. पूर्वी दुकानात जाऊन समान घेऊन आपण जे सामाजिक #society संबंध प्रस्थापित करीत होतो ते online खरेदीमुळे आता होत नाही. आता पूर्वीसारखे घराला ओटे नाहीत, कि आपला शेजाऱ्याशी संबंध नाहीत. अर्थव्यवस्था #economy केंद्रित झाल्याने सामाजिक विषमता वाढत आहे. आज जाहिराती पाहून आपण भौतिक समाधान विकत घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत आहोत. निसर्गापासून दुरावत आहोत. आज लहान मुले मातीत खेळत नाहीत, त्यांचे आरोग्य सुदृढ राहत नाही. समाजात #society एकटेपणा वाढतो आहे. आजी आजोबांच्या संस्कारक्षम गोष्टी आजकाल ऐकायला मिळत नाहीत. सोशल मिडियामधून आपण आपली वेगळी ओळख बनवत आहोत. ज्यात हजारो मित्र असूनही कोणीच कोणाला भेटत नाहीत. आत्महत्यांचे प्रमाण, गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालेले आहे. मेळघाट मध्ये सेमाडोह नावाचे एक गाव आहे. त्या गावात सर्व घरांना एकच रंग आहे. संपूर्ण गाव दिवाळीला एकत्र येऊन सर्व घरांना रंग लावतो. त्या गावात जर कोणी काही अपराध, गुन्हा केला असेल तर त्या एकाच घराला रंग लावला जात नाही. त्या घराला वाळीत टाकले जाते. ह्या एका कारणामुळे त्या गावात गुन्ह्यांची संख्या शून्य. हि आहे समाजाची #society खरी शक्ती. आपण हि शक्ती का गमावली ?

Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi

dnyanjyotmarathi.com

यातून बाहेर येण्यासाठी ही अर्थव्यवस्था #economy झुगारून द्यायची का? ते आता शक्य नाही, कारण ही व्यवस्था आता फार खोलवर रुतली आहे. पण आदिवासी समाजाप्रमाणे काही अंशी आपणही त्यांच्या समाजव्यवस्था आपल्या समाजात पुनर्जीवित करू शकतो. शेती नाही पण निदान बाल्कनीमध्ये किवा टेरेस वर बागा फुलवू शकतो. मुलांना बागकामात गुंतवून पुन्हा एकदा निसर्गाकडे आणि समाजाकडे पुन्हा आणू शकतो. पावसाचे पाणी साठवू शकतो. महिन्यातून एकदा का होईना पण निसर्ग समजून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. एकूणच काय तर हरवलेली संवेदनशीलता पुन्हा आणण्याचा प्रयत्न करू शकतो.

निसर्ग हा असा काम करतो.

एक शेतकरी नेहमी आपले उत्तम प्रतीचे बियाणे आपल्या शेजारील शेतकरी मित्रांना फुकट वाटत असे. एकदा त्याच्या बायकोने त्याला विचारले- “ तुम्ही तुमचे चांगले बियाणे मित्रांना फुकट देऊन स्वतःसाठी स्पर्धा का निर्माण करत आहात?” त्यावर शेतकरी म्हणाला- “ अग, जर मी त्यांना चांगले बियाणे दिले नाही तर परागीभवनाने माझे चांगले बियाणे काही वर्षांनी खराब होऊन जाईल.” निसर्ग हा असा काम करतो. तो आपली दानत वाढवतो. आपल्या भारतीय समाज रचनेची गुंफण हि अशीच निसर्गाशी समतोल राखून झालेली आहे. परंपरा, सण, नाती त्याचा अविभाज्य घटक आहेत. ह्यातील विचार समजून घेतला कि हे ज्ञान अध्यात्म होत, त्याचे पावित्र्य वाढते. ह्याच ज्ञानातून वयाच्या सोळाव्या वर्षी “ दुरितांचे तिमिर जाहो | विश्व स्वधर्म सूर्ये पाहो | जो जे वांछील तो ते लाहो| प्राणिजात|” अश्या ओळी संत ज्ञानेश्वर लिहू शकतात. आजही माझ्या गावातील लहान आदिवासी मुलांना स्वतःचे खेळणे स्वतः बनवून मिळून मिसळून खेळताना पाहतो तेव्हा अंगावर शहारे येतात. आणि कुठेतरी खंतसुद्धा वाटते… समाज हरवत चालल्याची …. !


मूलमंत्र, आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?

जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचे जन्मोत्सवानिमित्त जल्लोषात अभिष्टचिंतन | Jagadguru Narendracharyaji Maharaj | Nanijdham |

Marathi Ukhane – मराठी उखाणे

Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi

Acidity | Apachan | अपचन-गॅसेसचा त्रास होतो? डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला तातडीने वाचा….

Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | Rashi Bhavishya |

नोकरी की व्यवसाय | Nokari ki Vyavsay | Job or Business | Naukri or Business