Diwali | Diwali Faral | दिवाळी फराळाच्या रेसिपीज आणि तळण करण्यासाठी योग्य वेळांचं वेळापत्रक

Diwali Faral List In Marathi |दिवाळीच्या फराळाची यादी आणि त्यांची रेसिपी | #diwali faral

dnyanjyotmarathi.com

Diwali | Diwali Faral : दिवाळी जवळ आली आहे.  आपण आज काही फराळाच्या रेसिपीज आणि तळण करण्यासाठी योग्य वेळांचं वेळापत्रक याची माहिती बघणार आहोत. मैत्रिणींनो, पूर्वी म्हणजे फार पूर्वी आपल्या आज्या, पणज्या हि दिवाळीची #diwali तयारी अगदी आनंदात साजरी करायच्या म्हणूया हवं तर. आता चाळीशीतल्या माझ्या मैत्रिणींनी हे पहिले सुद्धा असेल. कारण त्यात उगाच लुडबुड करणारे आपण असायचो. आताही काही ठिकाणी हा दिवाळी पूर्वीचा आनंद साजरा होतही असेल. पण आजची लक्ष्मी घराबाहेर सुद्धा तेवढेच श्रम घेते #diwali आपल्या आनंदी घरकुलासाठी आणि घरातही तेवढाच उत्साह ठेऊन हि सगळी परंपरा जपण्याची भाबडी धडपड. त्याच माझ्या मैत्रिणींना या लेखाद्वारे तयारीसाठी प्रेमाची थोडीशी मदत.

वरती सांगितल्याप्रमाणे तळण करण्याचे वेळापत्रक पूर्वी सर्रास वापरले जायचे. त्याचे काही शास्त्रीय कारण आहे. आपण कारणांकडे नको पण किमान आपले पदार्थ चविष्ठ आणि छान होण्यासाठी हे वेळापत्रक पाळून तर बघू.

जुन्या लोकांनी समुद्राच्या भरती ओहोटीच्या वेळांचा विचार करून मोठ्या प्रमाणात तळण करण्यासाठी  तेल जास्त लागू नये, पदार्थ तेलकट होऊ नयेत, पदार्थ लवकर तळून कूरकूरीत व्हावेत यासाठी असं वेळापत्रक ठरवलं होतं. त्यानुसार हिशोब करून या वेळांची माहिती मिळाली आहे. आपल्याला त्याचा फायदा व्हावा, म्हणून हे वेळापत्रक…..

यात नमूद केलेल्या वेळा सकाळच्या आणि संध्याकाळच्या दोन्हीही दिलेल्या आहेत. (a.m. / p.m.) कारण समुद्राला दोन वेळा भरती येते.(१२-१२ तासांनी)

वेळापत्रक

  • दि. १९-१०-२०२४ ——  १२:०० ते ३:००
  • दि. २०-१०-२०२४ ——- १२:४५: ते ५:४५
  • दि. २१-१०-२०२४ ——- २:४५ ते ५:४५
  • दि. २२-१०-२०२४ ——  ३:३० ते  ६:००
  • दि. २३-१०-२०२४ ——- ३:४५ ते  ६:४५
  • दि. २४-१०-२०२४ ——- ४:३० ते ७:३०
  • दि. २५-१०-२०२४ ——- ५:१५ ते ८:१५
  • दि. २६-१०-२०२४ ——- ६:०० ते ९:००
  • दि. २७-१०-२०२४ ——- ६:४५ ते ९:४५
  • दि. २८-१०-२०२४ ——–६:४५ ते ९:४५
  • दि. २९-१०-२०२४ ——- ७:३० ते १०:३०.

या वेळांच्या दरम्यान तळण करावं. वेळ, तेल दोन्हींची बचत करावी व पदार्थ तेलकट न होता, कुरकुरीत राहावेत.

आपली दिवाळी #diwali आनंददायी जावो.

Marathi Motivational Quotes | प्रेरणादायी सुविचार मराठी | Success Quotes In Marathi

dnyanjyotmarathi.com

आता दिवाळी म्हटलं की सरकन डोळ्यासमोरून कंदील, रोषणाई, आनंद, दिवाळी शुभेच्छा आणि येतो तो दिवाळीचा खमंग फराळ. घराघरात आठवडाभर आधीपासूनच सुरू होते ती फराळाची तयारी. आणि सगळीकडे मस्त खमंग सुगंध…. तसे तर करावे तेवढे फराळाचे पदार्थ कमीच हो… पण घरातली लक्ष्मी मात्र कितीही घाईगडबड असली तरीही वेळात वेळा काढून किमान चकली, चिवडा आणि लाडू आणि शंकरपाळे हे तरी घरात करण्याचा अगदी कासोशिने प्रयत्न करते, नाही का ? #Diwali Faral Recipe In Marathi अशाच काही खमंग फराळाच्या रेसिपी #diwali faral recipes in marathi आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. अर्थात… आजी, आई, काकी, मामी यांनी सांगितलेल्याच … आपल्या महाराष्ट्रात या दिवाळीच्या फराळाची किती वेगवेगळ्या प्रकारची यादी असते नाही!!! #diwali faral list in marathi. अशाच काही पारंपरिक पदार्थांची यादी आणि त्यांची रेसिपी #Diwali Faral Recipe आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. मग वाट कसली पाहताय लागा आता तयारीला. (Diwali Faral List In Marathi)

फराळाच्या नावांची यादी #list of Diwali faral

dnyanjyotmarathi.com

चकली (chakali Diwali Faral )

चिवडा (Chivada / Chiwada )

कणीकचे लाडू / गव्हाच्या पीठाचे लाडू  (kanakeche ladu / gavhachya pithache ladoo )

खजूर लाडू ( Date’s/ khajurache ladoo)

तांदळाच्या पिठाचे कडबोळे / बोरं (tandalachya pithache kadbole / Bore )

 तिखट शंकरपाळे (tikhat shankarpali )

ओल्या नारळाच्या करंज्या ( olya naralachya karanjya)

चंपाकळी (Champakali)

बेसन लाडू (Besan Ladoo)

अनारसे (Anarase)  Diwali Faral Recipe In Marathi

चकली (chakali)  Diwalicha Faral

dnyanjyotmarathi.com

चकली हा असा पदार्थ आहे ज्याशिवाय दिवाळीचा फराळ (Diwali Faral Recipes In Marathi) अपूर्णच.  इतर काही नसलं तरी चालेल पण चकली मात्र हवीच. चकलीशिवाय ना मुलांना, ना मोठ्या माणसांना गमणार!!! तांदळाची, भाजाणीची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चकल्या आपण बनवतो. आपली पारपंरिक चकलीची रेसिपी (Diwali Faral Recipe In Marathi) काय आहे आपण जाणून घेऊया. #diwali faral चकलीची वेगळी भाजणी या दिवसात आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होते. त्यामुळे हि रेडीमेड चकली भाजणी वापरून सुद्धा अगदी कमी वेळात घरच्या घरी सुंदर खुसखुशीत चकल्या घरी तयार करू शकतो. आपण इथे भाजणी आणि तांदूळ पीठ दोन्हीच्या चकल्यांची रेसिपी बघणार आहोत.

भाजणी चकली

साहित्य (material) : १ किलो तांदूळ, अर्धा किलो चणाडाळ, पाव किलो उडीद डाळ, ५० ग्रॅम धणे, ३० ग्रॅम जिरे, चवीपुरते मीठ, तेल (तळण्यासाठी आणि मोहन घालण्यासाठी)

चकली कृती (recipe) : तांदूळ, चणाडाळ आणि उडीद डाळ वेगवेगळी स्वच्छ धुवून वेगवेगळ्या कपड्यावर वाळवून घ्यावी. पूर्ण कडकडीत दिवसभर वाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी कढईमध्ये वेगवेगळी भाजून घ्यावी. भाजताना त्यात धणे घालावेत. सर्व भाजून झाल्यावर त्यात जिरे मिसळावे. हे सर्व साहित्य थंड झाले कि बारीक दळून घ्यावे.

Aarogya | स्वतःचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी |आरोग्य

dnyanjyotmarathi.com

त्यानंतर त्याची भाजणी तयार करावी. भाजणी मध्ये तेल अथवा तुपाचे मोहन पीठ भिजवताना घालावे. मोहन घालताना त्याचे प्रमाण चकली फसफसणार नाही एवढे प्रमाणबद्ध असावे. अति मोहन घालू नये.  भाजणी भिजवताना गरम पाण्याचा वापर करावा. चकली खुसखुशीत होते. खूप घट्ट अथवा सैल मळू नये अन्यथा चकली कडकडीत होते. पीठ मळून थोडावेळ साधारण अर्धा तास झाकून ठेवावे.

चकलीपात्रात मळलेले पीठ घालून नंतर व्यवस्थित त्या चकल्या पाडा आणि #diwali faral तेल व्यवस्थित तापले आहे की नाही ते पाहून मगच तळायला घ्या. तळलेली चकली थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात भरावी.

तांदळाच्या पिठाच्या चकली

साहित्य (material) : दोन वाट्या तांदूळ पीठ, हिंग चिमूटभर, धने – जिरे पावडर 1-1 छोटा चमचा, पाव वाटी लोणी, पांढरे तीळ, ओवा एक छोटा चमचा, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा तिखट

कृती (Recipe) : तांदळाच्या पिठामध्ये वरील सर्व साहित्य चांगले एकजीव करून घ्या. #diwali साध्या पाण्याने हे पीठ घट्ट भिजवा. चकल्या पाडा आणि तळा. अतिशय सोपी आणि कमी वेळात होणारी चकली रेसिपी आहे ही.

चिवडा (Diwali Faral Recipe)

dnyanjyotmarathi.com

आपल्याकडे चिवड्याचे विविध प्रकार खायला मिळतात. भाजलेला, तळलेला तर आहेच पण यामध्ये नायलॉन चिवडा,  पोहे चिवडा, चुरमुरे  चिवडा अशा अनेक चिवड्यांचा समावेश आहे. आपण आता सोपा पारंपारिक पोह्यांचा चिवडा रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य (material) : अर्धा किलो पातळ पोहे, अर्धी वाटी डाळ (भाजलेली चणाडाळ), अर्धी वाटी शेंगदाणे, सुक्या खोबऱ्याचे बारीक काप पाव वाटी, कढीपत्ता अर्धी छोटी वाटी, हिरव्या मिरच्यांचे तुकडे (आवडीनुसार), तेल, मोहरी, हिंग, हळद, मीठ, साखर, काजू, बेदाणे (हवे असल्यास)

चिवडा कृती (Recipe) : पातळ पोहे उन्हात चांगले कडकडीत वाळवून घ्या आणि मग पातेल्यात व्यवस्थित मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. कढईत तेल घ्या. त्यामध्ये शेंगदाणे,  भाजलेली चणाडाळ आणि काजू,  सुक्या  खोबऱ्याचे तुकडे, हिरव्या मिरच्याचे तुकडे आणि कढीपत्ता व्यवस्थित न करपवता वेगवेगळे तळून घ्या.

एका परातीत किंवा मोठ्या भांड्यात हे मिश्रण एकत्र करा आणि त्यात चवीनुसार मोहरी, हिंग, हळद हे सर्व साहित्य घालून एकत्र करा आणि पुन्हा मिश्रण मंद आचेवर मोठ्या भांड्यात खमंग वास सुटल्यावर भाजलेले पोहे घालून व्यवस्थित एकत्र करून परतून घ्यावे, चिवडा तयार.

कणीकचे लाडू / गव्हाच्या पीठाचे लाडू  (kanakeche ladu / gavhachya pithache ladoo )

dnyanjyotmarathi.com

बाकी लाडवांपेक्षा कणकेचे लाडू अत्यंत सोपे आहे. यासाठी जास्त तयारीही करावी लागत नाही. हे पटकन होतात आणि पौष्टिकही असतात. अगदी लहान मुलं आणि आपल्या घरातील जेष्ठ मंडळी सुद्धा अगदी निःसंकोचपणे आवडीने खाऊ शकतात. आणि हे लाडू अगदी कमी साहित्य वापरून कमीत कमी वेळेत तयार होतात. चला पाहूया साहित्य आणि कृती…

साहित्य (material) : कणीक 4 वाट्या, सुके किसलेले खोबरे 1 वाटी (मिक्सर मधून बारीक करून घ्या), चिरलेला गूळ 3 वाट्या, जायफळ पावडर 1 लहान चमचा, खसखस भाजून केलेली पावडर 2 चमचे, साजूक तूप अडीच वाटी

कृती : सर्वप्रथम बारीक केलेले खोबरे मंद आचेवर भाजून घ्यावे. त्यानंतर दुसऱ्या कढईत साजूक तूप घालून त्यावर कणीक छान मंद आचेवर गव्हाळसर रंग येईपर्यंत भाजून घ्यावे. कणीक खमंग भाजून झाले कि पातेले किंवा कढई कणिक भाजून झाल्यावर खाली उतरवा आणि त्यात खोबरे, खसखस,  जायफळ पावडर, बारीक चिरलेला गूळ घालून चांगले हाताने मळून एकजीव करा आणि लाडू वळा. जर लाडवाचे सारण कोरडं वाटत असेल तर तुम्ही तूप वाढवू शकता. झाले कणकेचे लाडू तयार.

खजूर लाडू (Date’s ladoo) Diwali Faral Recipe In Marathi

dnyanjyotmarathi.com

अगदी तोच तोच फराळ खाऊन कंटाळला असाल तर हे खजुराचे लाडू नक्की करून पहा. खजूराचा लाडू हा अत्यंत पौष्टिक असतो. अगदी एक लाडू जरी खाल्लात तरी चांगले प्रोटीन्स मिळतात. अशक्तपणा निघून जातो. शरीरात लोहाचे प्रमाण वाढते. चला पाहूया साहित्य आणि कृती.

साहित्य (material) : बिया काढलेला 1 वाटी खजूर, अर्धी वाटी भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट, १० बदाम, १० काजू, वेलची पूड १ लहान चमचा, 1 चमचा भाजलेले तीळ, 1 चमचा भाजलेली खसखस, पाव वाटी पिठी साखर,3-4 चमचे किसलेले सुके खोबरे

कृती : वर दिलेले सर्व पदार्थ (सुके खोबरे आणि खसखस सोडून) एकत्र करून मिक्सरमधून अगदी जाडसर वाटून घ्या

खजुरामुळे हे सर्व मऊ होते. हे सर्व मिश्रण कणिक मळतो तसे हाताने चांगले एकजीव करावे आणि लाडू वळावे. प्रत्येक लाडूवर बदाम आणि काजू लावावा आणि मग खोबऱ्यात आणि खसखस मध्ये घोळवावा. झाले झटपट खजुराचे पौष्टिक लाडू तयार.

झटपट तांदळाच्या पिठाचे कडबोळे (tandalachya pithache kadbole )

dnyanjyotmarathi.com

साहित्य (material) : 2 वाट्या तांदळाचं पीठ, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरेपूड, पाव वाटी लोणी, चवीनुसार मीठ, कांद्याचे बी/ कलोन्जी २ लहान चमचे, अर्धा चमचा तिखट, पीठ भिजविण्यासाठी दूध, तळण्यासाठी तेल

कृती : तांदळाच्या पिठामध्ये हिंग, जिरेपूड, कांद्याचे बी अर्थात कलौंजी, मीठ आणि लोणी घालून नीट एकजीव  करून घ्या. दूध घालून पीठ घट्ट भिजवा. थोडा वेळ म्हणजे साधारण अर्धा तास पीठ तसंच झाकून ठेवा.  कडबोळी वळून म्हणजे हातावर गोल गोल करून तेलात मध्यम आचेवर तळून घ्या.

तिखट शंकरपाळी ( Tikhat Shankarpali )

dnyanjyotmarathi.com

हल्लीची पिढी जरा जास्तच हेल्थ कॉन्शिअस झालेली आहे. मैद्याचे पदार्थ खाताना थोडा विचार करतात. आपण नेहमीच्या गोड शंकरपाळ्या मैद्याच्या बनवून खातोच. पण या तिखट शंकरपाळ्या गव्हाच्या पिठाच्या बनवता येतात. चला पाहूया साहित्य आणि कृती.  

साहित्य (material) : 2 वाट्या गव्हाचे पीठ, दीड चमचा साखर, चिमूटभर हळद, मीठ चवीनुसार, जिरे १ लहान चमचा, तिखट चवीनुसार, तळण्यासाठी तेल

कृती : परातीत गव्हाचे पीठ घेऊन वरील साहित्य त्यात घालून अगदी थोडे कडकडीत तेलाचे मोहन घालावे. मोहन गरम असल्यामुळे आधी चमच्याने सर्व साहित्य मिक्स करून घ्या आणि मग हाताने एकत्र करून पाण्याने पीठ घट्ट भिजवून घ्या. लाट्या करून लाटा आणि कातणीने बारीक शंकरपाळ्या करून घ्या. शक्यतो शंकरपाळ्या पातळ कराव्यात म्हणजे कुरकुरीत होतात. गोड शंकरपाळी जाडसर ठेवावी लागते. परंतु या शंकरपाळ्या पातळ लाटाव्यात. मंद आचेवर तेलात तळा.

ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachya karanjya)

dnyanjyotmarathi.com

सुके खोबरे, मैदा आणि पिठी साखरेच्या सुक्या करंज्या आपण नेहमीच दिवाळीच्या फराळात आपण नेहमीच बनवतो. परंतु आता दिवाळीला पूर्वीसारखे थंडीचे वातावरण राहिलेले नाही. त्यामुळे साखर, मैद्याच्या करंज्या बनवण्यापेक्षा ओल्या नारळाच्या करंज्यादेखील दिवाळीला बनवू शकतो. चला साहित्य आणि कृती पाहूया.

साहित्य (material) : ओलं खोबरं (एक नारळ) (गरजेनुसार प्रमाण घ्यावे), चिरलेला गूळ (किसलेला नारळ एक वाटी असेल तर अर्ध्यापेक्षा थोडा जास्त गुळ घ्यावा.), वेलची पावडर चवीपुरते, काजू – बदाम – बेदाणे (हवे असल्यास), साजूक तूप, गव्हाचे पीठ, मीठ चवीनुसार, पाणी

कृती : कणिक मळताना त्यात थोडे मीठ व थोडे मोहन घाला. कणीक मळून घ्या आणि कापडाखाली झाकून ठेवा. जाड बुडाच्या भांड्यात ओलं खोबरं आणि गूळ एकत्र करून ते एकजीव होईपर्यंत भाजून घ्या. व्यवस्थित मिक्स झाले की त्यात वेलची पावडर, काजू, बदाम आणि बेदाणे घाला आणि मिश्रण थंड होऊ द्या. कणेकेचे गोळे करून छोटी पोळी लाटा आणि त्यात हे सारण भरा आणि करंजीच्या आकारात तयार करा. तेल गरम करून मंद आचेवर या करंज्या तळा. हा फराळ अगदी दिवाळीच्या दिवशी ताजा ताजा नैवेद्याला बनवू शकता.

चंपाकळी (Champakali)

dnyanjyotmarathi.com

चंपाकळी हा खरं तर आता अगदी लुप्त झालेल्या फराळात गणला जातो. हा दिवाळीचा अगदी जुना फराळ आहे. हल्ली कोणीही घरी मिठाई बनवत नाहीत. पण तुम्हाला हा पदार्थ ट्राय करायचा असेल तर अगदी कमी साहित्यात लगेच होणारा हा मिठाईचा प्रकार आहे. नक्की करून पाहा.

साहित्य (material) : 1 वाटी मैदा, मोहन – 2 चमचे तेल किंवा तूप, 1 वाटी साखर, तळण्यासाठी तेल

कृती : मैद्यात मोहन घालून थोडे घट्ट भिजवून अर्धातास झाकून ठेवावे. साखरेचा एकतारी पाक करून ठेवायचा, पाकात थोडा केशरी रंग घाला. केशर असल्यास केशर घाला. मैद्याच्या पुरी लाटून#diwali faral मधे कापायची केलेली पुरी दोन बाजूला धरुन उलट सुलट अलगद पीळ भरायचा नंतर मंद गॅसवर तळून घ्यावे आणि पाकात टाकावे ती चाफ्याच्या कळीसारखी दिसते म्हणून या मिठाईला चंपाकळी म्हणतात.

dnyanjyotmarathi.com

साजूक तुपातले खमंग बेसनाचे लाडू कसे बनवायचे त्याची साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

साहित्य (material) : बेसन (शक्यतो चणाडाळ घरी छान भाजून दळून आणावी), साजूक तूप, पिठी साखर, बेदाणे, वेलची पूड, दूध

कृती : तुपावर बेसन खमंग भाजून घ्यावे. तुपाचे प्रमाण बेसनाच्या प्रमाणावर अवलंबून आहे. जास्त तुपामुळे लाडवाचे पेढे होणार नाहीत याची काळजी घ्या. गॅस मंद ठेवावा अन्यथा पीठ जळण्याची #diwali faral शक्यता असते. पीठ भाजून झाले की त्यावर थोडेस दूध शिंपडून बाजूला ठेवावे. मिश्रण कोमट झाले की त्यात पिठी साखर, वेलची पूड, बेदाणे घालून पुन्हा एकदा हलकेसे भाजून घ्या. नंतर लाडू वळून घ्या आणि सुकू द्यावेत.  

अनारसे (Anarase)

dnyanjyotmarathi.com

हल्ली चविष्ट असूनही दिवाळीला घरात अनारसे बनवले जात नाहीत. कारण सगळ्यात जास्त फसणारा आणि वेळकाढू फराळाचा हा प्रकार आहे. परंतु या सोप्या पद्धतीने नक्कीच अनारसे घरच्या घरी बनवू बघा.

साहित्य (material) : एक वाटी तांदूळ, किसलेला गूळ अर्ध्या वाटीपेक्षा थोडा जास्त, एक चमचा तूप, खसखस, तळण्यासाठी तेल

कृती : तीन दिवस तांदूळ पाण्यात भिजवून ठेवा.  रोज सकाळी याचे पाणी बदला. चौथ्या दिवशी तांदूळ कोरडे करून घ्या आणि मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्या. किसलेला गूळ आणि तूप बारीक केलेल्या तांदळात टाका. सर्व एकत्र करून घट्ट मळून घ्या. हा तयार केलेला गोळा तुम्ही चार ते पाच दिवस एका #diwali faral डब्यात ठेऊन द्या. पाच दिवसांनी बाहेर काढून मळून घ्या. त्याचे छोटे गोळे करून प्लास्टिक पेपर वर पुरीसारखे लाटा किंवा हातावर गोल गोल थापा. त्यावर खसखस घालून ते तेलात अथवा तुपात तळा. लक्षात ठेवा तळताना पुरीची बाजू बदलू नका अन्यथा खसखस सगळी तेलात उतरते. मध्यम आचेवर नीट अनारसे तळून घ्यावेत.

टीप – हे पीठ जितके जास्त दिवस ठेवाल तेवढे ते चांगले फरमेंट होते आणि अनारस्याला छान जाळी पडते.

या फराळाच्या सोप्या रेसिपी नक्की करून बघा. सर्वांना शुभ दीपावली.  

मूलमंत्र, आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?

Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | Rashi Bhavishya

Marathi Motivational Quotes | प्रेरणादायी सुविचार मराठी | Success Quotes In Marathi