Good Thoughts in Marathi| प्रेरणादायी सुविचार मराठी | Marathi Motivational Thoughts

Good Morning Thoughts in Marathi | मराठी प्रेरणात्मक विचार | Marathi Motivational Thoughts |

dnyanjyotmarathi.com

Good thoughts in marathi : प्रेरणा …..आयुष्य जगण्याची, आनंदाची, सुखाची, जिद्दीची, समाधानाची…. बऱ्याच गोष्टी #good thoughts in marathi नैराश्यामुळे आपल्या हातून निसटून जातात. प्रत्येक वेळी प्रेरणा देण्यासाठी कोणी व्यक्ती आपल्या आयुष्यात सतत आपल्या सोबत असेलच असे नाही. त्यामुळे पुस्तकं, निसर्ग, थोर व्यक्तिमत्व यांच्याकडून काही प्रेरणादायी संदेश शिकावेत, बघावेत आणि आचरणात आणावेत. त्यामुळे जीवन आनंदाने जगण्याला एक उभारी येते. म्हणजेच प्रेरणा मिळते. आपल्याला आपल्या माणसांची साथ आणि प्रेरणात्मक कोट्स #Motivational Quotes In Marathi नक्कीच मनात सकारात्मकता निर्माण करतात… त्यामुळे आपल्याला एखाद्या अडचणी वरती मात करण्यासाठी योग्य मार्ग मिळतो. आशा निर्माण होते. आणि एकदा सकारात्मक आशा मनात निर्माण झाली की योग्य मार्ग आपोआप नियती घडवून आणते. आयुष्यामध्ये प्रेरित व्हायची बऱ्याचदा आपल्याला गरज भासते. यासाठीच वाचा प्रेरणादायी मराठी विचार…
आम्ही तुमच्यासाठी खास, आकर्षक व नवीन प्रेरणादायी सुविचार मराठी, #good thoughts in marathi आणि #Marathi Motivational Quotes, #good morning thoughts in marathi चा संग्रह आणला आहे. हा संग्रह तुम्ही नेहमी वाचनात ठेवलात तर तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवू शकाल. चला तर मग Inspirational Quotes in Marathi संग्रह पाहूया.


श्रीक्षेत्र नाणीजधाम, रत्नागिरी भरपावसात भाविकांच्या प्रचंड गर्दीने महांमंगल सोहळा अनुभवला…


चांगले मन व चांगला स्वभाव दोन्ही खूप आवश्यक असतात. चांगल्या मनाने नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती आयुष्यभर टिकून राहतात.

टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच धरतात.
शिकावं तर माफ करायला, राग तर सगळेच करतात.
खळगी भरावी तर उपाशी पोटाची, पोट भरून तर सारेच जेवतात.
जगावं तर इतरांसाठी,
स्वतःसाठी तर सारे जगतात.

शरीराची सुंदरता किती दिवस सोबत राहणार ? सुंदर असते ते व्यक्तीचे कर्म, त्याचे विचार, त्याची वाणी, त्याचे व्यवहार, त्याचे संस्कार आणि त्याचे चरित्र. #motivational
जे आजन्म सोबत राहणार आहे आणि मृत्यूपश्चातही…

  • ध्येय साध्य करण्यासाठी समर्पण आणि संयम आवश्यक आहे.
  • यशासाठी समर्पण आणि संयम महत्त्वाचे आहेत.

Marathi Ukhane – मराठी उखाणे

dnyanjyotmarathi.com

परिस्थीती कशीही असो, पण दोन गोष्टी सोबत असल्यावर आपल्याला कोणच हरवू शकत नाही.
एक म्हणजे “सत्य आणि दुसर म्हणजे सातत्य”…

वर्तन हे ज्ञानापेक्षा नेहमीच मोठे असते. कारण जीवनात अनेक परिस्थिती असतात जिथे ज्ञान अपयशी ठरते, परंतु वर्तन तरीही हाताळू शकते.

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हुशार असण्याची गरज नाही, तर इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची व त्यावर मेहनत घ्यायची तयारी असली पाहिजे.

  • आदर दिला तरच आपली मूल्ये आणि संस्कार टिकून राहतात.
  • नम्रता हीच खरी सज्जनतेची ओळख आहे.
  • सौम्य शब्दांनी कठोर हृदयं देखील जिंकता येतात.
  • सौजन्याने वागल्यास मनःशांती मिळते.
  • नम्रता माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा देते.
  • अहंकार हा माणसाच्या प्रगतीचा मोठा शत्रू आहे.
  • विनम्रता आणि अहंकार हे एकत्र कधीच राहू शकत नाहीत.
  • जेथे अहंकार आहे, तेथे स्नेह आणि प्रेम नाही.
  • मोठेपणाने वागण्यासाठी अहंकाराला त्याग करावा लागतो.
  • आत्मपरीक्षण केल्यास अहंकार नाहीसा होतो.
  • जीवनातील खरी सुख-शांती अहंकारमुक्त जीवनात आहे.

“स्वतःच्या कल्याणापेक्षा इतरांच्या कल्याणाला अधिक महत्त्व देणे, म्हणजेच भक्ती होय.”

“ जीवनात जेवढे कठीण प्रसंग, जेवढा कठीण संघर्ष …. तेवढेच मोठे यश….” #motivational quotes

अनुभवानुसार माणसांची पारख करा म्हणजे चांगली माणसे दुर होणार नाहीत, आणि स्वार्थ साधणारे जवळ राहणार नाहीत.

डिलीट जेवढ्या लवकर होतं, तेवढ्या लवकर डाउनलोड होत नाही,…
कारण एखादी गोष्ट घडवायला वेळ लागतो, बिघडवायला नाही, मग ते अप्लिकेशन असो किंवा नाती…….

dnyanjyotmarathi.com

“संसारातलं तारुण्य वयाच्या मापदंडाने थोडंच मोजायचं असतं ? तारुण्य म्हणजे काही फक्त शरीराच्या हाका नव्हेत. दोघांमधील संवाद, ओढ, काळजी, विश्वास, आदर हे सगळं तरुण असलं की संसारही तरुणच राहतो… अगदी कायम…!”

रागात ते सगळे गमावून बसू नका, जे संयम राखून कमावले आहे…

जीवन बदलण्यासाठी #motivational
वेळ ही सगळ्यांनाच मिळते पण वेळ बदलण्यासाठी
दोन वेळा जीवन मिळत नाही. त्यामुळे मिळालेलं जीवन आनंदाने जगा. आरोग्यासाठी वेळ काढा.

“आयुष्यात त्याच व्यक्तीसाठी तडजोड करा…
ज्यांना स्वतःच्या दृष्टिकोनापेक्षा तुमच्या भावना महत्त्वाच्या असतील…”

शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावर अवलंबून असते.

वेळेला समजणे समजूतदारपणा आहे आणि वेळेवर समजणे ही जबाबदारी आहे.

जीवनात कितीही वाईट प्रसंग येउ द्या,
चांगलं वागणं कधीच सोडू नका,
विजय हा नेहमी सत्याचाच होतो.

काळानुसार बदला,
नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल.

आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो.
जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.

प्रेम सर्वांवर करा पण
श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो,
तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती,
आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून,
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.

Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi

dnyanjyotmarathi.com

आनंदाचे रोपटे तेव्हाच बहरेल, जेव्हा तुम्ही त्याला निर्मळ आणि आनंदी मनाने पाणी घालाल.

सुखाची देवाण घेवाण तर सारेच करतात. दुःखाची देवाण घेवाण जिथे केली जाते तिथे मैत्री, स्नेह, आपुलकी, प्रेम हे नाते बहरते.

आपण जे बोलतो ते शब्द असतात. #marathi suvichar जे बोलत नाही ती भावना असते…! आणि
जे बोलायचे असते पण बोलता येत नाही ती असते मर्यादा..!!

नात्यात गोडवा हवा असेल तर एकच करा… ते नाते निभावण्यासाठी मनाचे ऐका… डोक्याचे नाही.

जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ असते जे तुमच्या पाठीमागे
देखील तुमचा सन्मान ठेवते…!!

स्वतः कमावलेल्या पैश्यानी एखादी वस्तू खरेदी करून बघा,
तुमचे शौक आपोआप कमी होतील.

कोट्यवधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण होतो,
लक्षावधी हरीण शोधल्यावर कस्तुरीमृग सापडतो,
हजारो मोती उघडल्यावर एक मोती सापडतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात
पण तुमच्या सारखा एकदाच भेटतो.

निसर्गाने दिलेलं माणसाला घेता आलं की, त्याच्यातलं माणूसपण जागं झालं म्हणायचं. पुस्तकं बुद्धिमत्तेला धार देतात, तर शिक्षण ती बुद्धिमत्ता मोजयचं परिमाण देते. #motivational निसर्गातून मिळालेल्या ज्ञानाला परिमाण नसतं. पण निसर्ग माणूस घडवतो… त्याच्या संवेदना जागवतो.

स्वतःवर प्रेम करावं कारण आपल्याला आनंदी राहायचं आहे. हा जन्म मिळाला आहे, त्याचा मूळ उद्देशच हा आहे की, आपल्यात काहीतरी अद्भुत आहे. त्याला जपावं, जोपासावं. लोकांनी त्याचे गुणगाण गावे किंवा गाऊ नयेत, त्याने आपल्याला फरक का पडावा ? त्यांना आपण काय आहोत हे दाखविण्यात आपल्या अमूल्य वेळ वाया घालवू नका.

सुकन्या समृद्धी योजना | Sukanya Samriddhi Yojana | Sukanya Samriddhi Account Scheme

dnyanjyotmarathi.com

तुम्हाला सर्व शक्य असताना केलेली मदत म्हणजे तुमचं समाजाप्रती कर्तव्य असतं. पण स्वतःची तारेवरची कसरत असताना, दुसऱ्यांना आधार देणे.. हाच खरा माणूसकीचा कस आहे. तरच तुमच्या या माणुसकीची दखल परमेश्वर घेतो.

आनंदी लोक ते असतात जे दुसऱ्यांना आनंदी करतात. आनंद ही आपण केलेल्या कार्याने प्राप्त होणारी तृप्ती आहे. आनंदी रहा. आपले सर्वोत्तम कार्य करा.

प्रगतीच्या दिशेने टाकलेली छोटी छोटी पावले एक दिवस मोठ्या बदलाकडे नेऊन पोचवतात.

आयुष्याच्या प्रत्येक व्यवहारात आपण जर फायदा शोधत राहिलो, तर समाधानासारख्या सुखाला मुकावे लागते.

नेहमी तुम्ही स्वतःला आठवण करून देत चला की, आयुष्य किती अनमोल आहे आणि तुम्ही स्वतः किती मौल्यवान आहात.

आपल्या शारीरिक शक्तीपेक्षा आपली मानसिक शक्ती अधिक बलवान असते. म्हणून कधीही धैर्याची का सोडू नका.

आनंदासाठी कोणताही मार्ग नाही, #marathi suvichar आनंद हा स्वतःच एक राजमार्ग आहे.

चांगल्या मनस्थितीने केलेली अभिलाषा एक चांगली संधी बनू शकते.

कधी कधी औषधांनी फरक पडत नाही पण आपुलकीच्या माणसांचा एक शब्दही आजार बरा करून जातो.

आदर आणि चादर कधीही चुकीच्या व्यक्तीला देवू नये, नाहीतर आपण उघडे पडतो.

कधी कधी अगदी शांत राहावं.. कारण शब्द तुमच्या मनात आणि विचारात काय सुरू आहे, हे समजावून सांगण्यासाठी अपुरे पडतात.

साधं सोपं आणि सरळ असतं तेच सुंदर आणि छान असतं, मग ते जगणं असो वा वागणं.

तपासून पाहत राहिलात तर कधीच कोणी आपलेपणा दाखवणारे सापडणार नाही. परंतु प्रेमाने पाहिलंत तर परकेही आपले होतील.

dnyanjyotmarathi.com

मित्र, पुस्तक, रस्ता आणि विचार चुकीचे असतील तर दिशाभूल होते आणि तेच जर चांगले असतील तर जीवन यशस्वी बनते.

गरज संपली की जवळचे लोक पण खेळ करतात, म्हणून खेळ खेळतील इतकेही कोणाला जवळ करू नये.

दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली तर मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला मिळते.

सत्य आणि चांगुलपणा जगात शोधायला गेलात तर तो कधीही सापडणार नाही. जर तो स्वतःमध्ये नाही, तर तो कुठेही नाही.


मूलमंत्र, आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?

जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचे जन्मोत्सवानिमित्त जल्लोषात अभिष्टचिंतन | Jagadguru Narendracharyaji Maharaj | Nanijdham |

Marathi Ukhane – मराठी उखाणे

Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi

Acidity | Apachan | अपचन-गॅसेसचा त्रास होतो? डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला तातडीने वाचा….

Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | Rashi Bhavishya