Rashi Bhavishya| Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | Rashi Bhavishya

#rashi bhavishya / Rashi Bhavishya Weekly : दिनांक १४ ते २० ऑक्टोबर २०२४ या आठवड्याचे सर्व राशींचे राशी भविष्य या लेखाद्वारे देत आहोत.

dnyanjyotmarathi.com

मेष रास :- (१४ ऑक्टोबर २०२४ ते २० ऑक्टोबर २०२४) मेष राशीच्या व्यक्तींना या काळात खर्च होण्याची #rashi bhavishya शक्यता जास्त आहे. मधल्या काळात सुधारणा तर शेवटी  लाभदायक स्थिती असेल. हा आठवडा नोकरी व व्यापारासाठी चांगला आहे. #rashi bhavishya weekly आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक ओढाताणीमुळे त्रास होऊ शकतो. जमिनीमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. त्याचे चांगले परिणाम मिळतील. तंत्र आणि वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा शुभ आहे. त्वचारोगा बाबत एखादा जुना आजार डोके वर काढू शकतो. आरोग्याची विशेष काळजी घ्या. एखाद्या धार्मिक व मंगल कार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. संतती वाबत एखादी समस्याबाबत मार्ग मिळाल्याने समाधान वाटेल. आर्थिक देवाण घेवाण करताना विचारपूर्वक करा. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी संमिश्र निकाल देईल. #weekly horoscope

 मेष राशीच्या व्यक्तींनी “श्री गणेशाय नमः” या मंत्राचा जप करावा. लाभ होईल.


dnyanjyotmarathi.com

वृषभ रास :- (१४ ऑक्टोबर २०२४ ते २० ऑक्टोबर २०२४)

नवनवीन जबाबदाऱ्या  येतील. नोकरीत चांगले यश मिळेल. विशेषतः सरकारी कामे मार्गी लागतील. जोडीदारासोबत अनुकूल वेळ घालवाल. प्रवासाचे योग आहेत. मित्र तसेच सहकाऱ्यांसोबत चांगली वागणूक #rashi bhavishya असेल. संतती पासून सौख्य प्राप्ती होईल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या त्यामुळे आरोग्य उत्तम राहील. अविचारने एखादा निर्णय घेतल्याने कदाचित समस्यांना सामोरे जावे लागेल, #rashi bhavishya  त्यामुळे कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा. या आठवड्याच्या अखेर पर्यंत अनपेक्षित लाभ होईल ज्यामुळे तुम्हाला आनंद प्राप्त होईल.

 वृषभ राशीच्या व्यक्तींनी रोज पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे.


dnyanjyotmarathi.com

मिथुन रास :- (१४ ऑक्टोबर २०२४ ते २० ऑक्टोबर २०२४)

जमीन खरेदीची योजना कराल आणि त्यामुळे कामाचा विस्तार होण्याचा संभव आहे.  हा आठवडा उत्साह, धाडस आणि प्रयत्नांना चालना देणारा असेल. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे आनंद होईल. आठवड्याच्या शेवटी खर्चासंबंधी समस्या असतील. व्यवसायामध्यल्या #rashi bhavishya in marathi कामांमध्ये बदल होण्याची शक्यता राहील. आरोग्य चांगले राहील. हा आठवडा संघर्षमय होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरवातीला काही समस्या निर्माण होतील, परंतु एखादी प्रतिष्ठीत व्यक्ती यांच्याकडून मार्गदर्शन, #rashi bhavishya  मदत मिळेल. आराम मिळेल परंतु प्रवासाच्या योजनेमुळे त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांना मोठ्या स्पर्धेत यश मिळेल. #rashi bhavishya weekly आठवड्याच्या शेवटी आरोग्यासंबंधी समस्या जसे की ताप, सर्दी, खोकला असा त्रास होऊ शकतो.

 मिथुन राशीच्या व्यक्तींनी रोज महादेवांचे दर्शन करावे.


dnyanjyotmarathi.com

कर्क रास :- (१४ ऑक्टोबर २०२४ ते २० ऑक्टोबर २०२४)

सुखद बातमी मिळण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या प्रकारची कामे करण्याची संधी समोरून चालून येईल. नोकरीमध्ये वरिष्ठांसोबतच्या वादांमुळे पूर्वी जो त्रास झाला आहे तो सध्या कमी होईल किंवा शांत होईल. कामे सहज पूर्ण कराल. कामे बदलल्यामुळे थोडीफार निराशा होईल. #rashi bhavishya weekly जमीन जुमला मालमत्तेतून फायदा होऊ शकतो. त्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा. आठवड्याच्या उत्तरार्धात पाय दुखण्याचा त्रास सुरू होऊ शकतो. तसेच थकवा जाणवेल. नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. योग आणि ध्यान तुमच्यासाठी फायदेशीर #weekly rashi bhavishyaठरतील. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी आपण आपल्या जोडीदाराला वेळ दिला पाहिजे. कामाच्या ठिकाणी #weekly horoscope वरिष्ठांकडून कामाचा बोजा वाढेल.

 कर्क राशीच्या व्यक्तींनी “श्रीराम जय राम जय जय राम” या मंत्राचा जप करावा.


dnyanjyotmarathi.com

सिंह रास :- (१४ ऑक्टोबर २०२४ ते २० ऑक्टोबर २०२४)

मोठे काम मिळण्याची शक्यता आहे. मंगळाच्या पूर्ण दृष्टीने, कृपेने आत्मविश्वासात वाढ होईल. जमीन जुमलाच्या प्रकरणातील जुनी कामे मार्गी लागतील. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. आई-वडिलांपासून सुख आणि सहयोग मिळेल. मनात एक प्रकारची अज्ञात भीती आहे त्यावर मात करण्यात यशस्वी व्हाल. व्यापारासाठी #rashi bhavishya चांगल्या संधी उपलब्ध होतील. पोटासंबंधी किरकोळ समस्या उद्भवतील. बाकी आरोग्य उत्तम राहील. विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गदर्शकाशी संपर्क केल्यास लाभदायक ठरेल. आरोग्याबाबत सावध राहा. कामाच्या #weekly rashi bhavishya ठिकाणी पदोन्नती व धनलाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखी आहे. ज्यांचे प्रेम आहे अशा #weekly horoscope जोडीदारांच्या प्रेमाचे रूपांतरन लग्नात होण्याची शक्यता आहे. बौद्धिक कौशल्य, तुम्हाला शिक्षणात यश देऊ शकते.

 सिंह राशीच्या व्यक्तींनी “सूर्यकवच स्तोत्र” रोज वाचावे.


dnyanjyotmarathi.com

कन्या रास :- (१४ ऑक्टोबर २०२४ ते २० ऑक्टोबर २०२४)

 चांगली बातमी मिळेल व सहकार्यासोबत चांगला ताळमेळ राहील. अपत्याकडून सहकार्य आणि लाभ होईल. नोकरीतील कामाच्या दृष्टीने आठवड्याची सुरुवात चांगली राहील. मधल्या काळात संपत्ती संबंधित अडचणी येऊ शकतात. अचानक उद्भवणाऱ्या कार्यात गुंतून पडण्याची शक्यता आहे. अनावश्यक चर्चेकडे दुर्लक्ष करा, त्यामुळे अडचणी लवकर दूर होतील. त्यामुळे पदोन्नती होण्याची संभावना आहे कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तब्येत सुधारेल. विद्यार्थ्यांसाठी सप्ताह थोडा #weekly rashi bhavishya अधिक मेहनतीचा असेल, कंटाळून जाऊ नये. या आठवड्यात कार्यक्षेत्रात सतर्क रहावे. #weekly horoscope उगाच अडचणी ओढवून घेऊ नका. विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळण्यासाठी जास्त अभ्यास करावा लागेल. पित्तासंबंधित तक्रारी उद्भवतील. त्यामुळे पित्त होणार नाही यासाठी अयोग्य जपावे.

 कन्या राशीच्या व्यक्तींनी “श्री व्यंकटेश स्तोत्र” वाचावे.


dnyanjyotmarathi.com

तूळ रास :- (१४ ऑक्टोबर २०२४ ते २० ऑक्टोबर २०२४)

 एखाद्याचे भले करायला गेलात तर उगाच वाईटपणा ओढवून घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे उगाच स्वतःचा तोटाही होऊ शकतो. आठवड्याच्या सुरुवातीला अनावश्यक मनस्ताप होईल. त्यामुळे इतरांच्या भानगडीत पडू नका. घरातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्या संबंधित समस्या उद्भवू शकतात. काळजी घ्यावी लागेल. कोर्टासंबंधी खटले मजबूत होतील. #rashi bhavishya नोकरीत कठोर मेहनत घेऊनही  वरिष्ठांची नाराजी राहील. मेहनतीत सातत्य ठेवावे. तुम्हाला योग आणि ध्यानाचा लाभ मिळेल. या आठवड्यात सुख समृद्धी प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी #weekly rashi bhavishya पदोन्नती किंवा बदली होण्याची शक्यता आहे वैवाहिक सुख प्राप्त होईल. तंत्र, वैद्यकीय, फार्मसी, लेखा, गणितातील विद्यार्थ्यांना यश मिळेल. कंबर आणि पायात वेदना किंवा त्या प्रकारचे तत्सम आजाराचा त्रास होऊ शकतो.

 तूळ राशीच्या व्यक्तींनी रोज कुलदेवीस दुधाचा नैवेद्य दाखवावा.


dnyanjyotmarathi.com

वृश्चिक रास :- (१४ ऑक्टोबर २०२४ ते २० ऑक्टोबर २०२४)

आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसात जे काम कराल त्यात यश मिळेल. त्यानंतरच्या दिवसांमध्ये थोडी सावधगिरी बाळगणे हिताचे राहील. या आठवड्यात जमिनीसंबंधी प्रकरणात फायदा होईल. वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल.  आठवड्याच्या शेवटी ग्रहमान तुमच्या बाजूने असेल. त्यामुळे यशप्राप्ती होऊ शकते. चांगली कामे हातात घ्या. दीर्घ गुंतवणूक मात्र हानिकारक ठरू शकेल.  वातावरणात बदल झाल्याने आरोग्यविषयक तक्रारी उद्भवू शकतात. डावा  पाय दुखण्याची शक्यता आहे.  

वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी “ऋण मोचक मंगल स्तोत्र” पठण करावे.


dnyanjyotmarathi.com

धनु रास :- (१४ ऑक्टोबर २०२४ ते २० ऑक्टोबर २०२४)

नोकरीमध्ये सुरुवातीला त्रास होण्याची शक्यता आहे. मधल्या काळात त्या त्रासात सुधारणा आणि अखेरीस लाभ होऊ शकेल. अनावश्यक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. शत्रू आणि आरोग्य संबंधित #rashi bhavishya weekly समस्यांमध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे सावध रहावे. व्यवसायाच्या दृष्टीने गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे. नवीन व्यापाराच्या संधी मिळतील. विवाहितांचे जोडीदारासोबत चांगले सहकार्य राहील. विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी जास्त प्रयत्न करण्याची तयारी ठेवा.

 धनु राशीच्या व्यक्तींनी “श्री गुरुदेव दत्त” या मंत्राचा जप करावा.


dnyanjyotmarathi.com

मकर रास :- (१४ ऑक्टोबर २०२४ ते २० ऑक्टोबर २०२४)

एकच काम अनेक वेळा करावे लागेल. ज्येष्ठ व्यक्तींनी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. विचार न करता कामे केल्याने आठवड्याच्या सुरुवातीला त्रास होऊ शकतो. आठवड्याच्या मधल्या काळात त्रासातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. पराक्रमामध्ये वाढ होईल आणि विरोधकांचा पराभव करण्याची शक्ती मिळेल, धैर्य दाखवाल. व्यवसायात नवीन नवीन संधी मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी कसोटीचा काळ राहील. परंतु प्रयत्न सुरू ठेवावेत. आरोग्यासंबंधी तक्रार उद्भवणार नाही.

 मकर राशीच्या व्यक्तींनी “आदित्य हृदय स्तोत्र” वाचावे.


dnyanjyotmarathi.com

कुंभ रास :- (१४ ऑक्टोबर २०२४ ते २० ऑक्टोबर २०२४)

व्यवसायामध्ये उशिरा घेतलेल्या निर्णयामुळे हानी होऊ शकते. विचार करून गुंतवणूक करा. अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्याने उत्साहात चांगली वाढ होईल. कार्यक्षमतेत वाढ होईल. तसेच #rashi bhavishya weekly आठवड्याच्या मध्यात धनलाभ होण्याची शक्यता आहे. मुले तुमच्या मनासारखे वागतील.  संतती सौख्य लाभेल. मित्रांना भेटण्याची संधी चालून येईल. आपल्या आनंदासाठी वेळ काढाल. आपल्या कामासाठी दुसऱ्यांवर विसंबून राहणे तोट्याचे ठरेल. प्रवास लाभदायक होतील.

 कुंभ राशीच्या व्यक्तींनी “संकटनाशन गणपती स्तोत्र” वाचावे.


dnyanjyotmarathi.com

मीन रास :- (१४ ऑक्टोबर २०२४ ते २० ऑक्टोबर २०२४)

कार्य वेळेवर पार पडतील त्यामुळे मन प्रसन्न राहील. मोठ्या कामांमध्ये यश मिळेल. आठवड्याचा प्रारंभ लाभदायक आणि उत्तम राहील. त्यामध्ये धनलाभ होण्याची शक्यता आहे. समस्यांपासून दूर राहाल. निर्मितीसंबंधि प्रकरणात समस्या उद्भवू शकतील. दुसऱ्यावर अधिक#rashi bhavishya weekly विश्वास नुकसानकारक राहील. त्यामुळे स्वतः ची कामे स्वतः करण्यावर भर द्या. व्यवसायासंबंधी तज्ञांचा सल्ला घ्यावा. जागा बदलाचे संकेत उदभवतात. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उत्तम वेळ आहे.

 मीन राशीच्या व्यक्तींनी “बृहस्पती कवच स्तोत्र” वाचावे.


(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मूलमंत्र स्वतःचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी