पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर उद्योग|मिनरल वॉटर | Mineral Water | Mineral Water udyog | Packaged Drinking Water Business

मिनरल वॉटर | Packaged Drinking Water Business Ideas in Marathi |

Packaged Drinking Water Business : या जगात पाण्याची बाटली कधीही न घेतलेला मनुष्य आपल्याला क्वचितच दिसेल. कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पाण्याची बाटली आपल्याला विकत घ्यावीच लागते. आपल्याला प्रवासा दरम्यान तहान लागली, तोंड धुवायचे आहे, कुठे काही कपड्यांवर डाग पडले हात पाय खराब झाले तर ते स्वच्छ करण्यासाठी या आणि अशा अनेक कारणांसाठी सोबत पाणी हवे असतेच.  सध्या पाण्याची बाटली पंधरा ते वीस रुपयात विकत दिली जाते. “बिसलेरी” कंपनीचा पाण्याची बाटली विक्रेता म्हणून जगात पहिला नंबर लागतो. आपण अजूनही पाण्याची बाटली विकत घेताना बिसलेरी असेच म्हणत असतो. कारण पाण्याची बाटली म्हणजे बिसलरी असे प्रख्यात झाले आहे.

बिसलेरीने जेव्हा सर्वात पहिले पिण्याचे पाणी म्हणजेच Drinking Mineral Water उत्पादन काढण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याला अनेकांनी वेड्यात काढले होते. त्यांच्या मित्रांनी, सहकाऱ्यांनी त्याला सांगितले की, मोफत व मुबलक पाणी नैसर्गिक रित्या मिळत असताना लोक पाणी विकत का घेतील? त्यावर पैसे का खर्च करतील?  तेव्हा बिसलेरीचे उत्तर होते की, “आज नाही तर उद्या लोक दुधाच्या किंमतीपेक्षा जास्त किंमत देवून पाणी विकत घेतील.” या जगात काय विकले जाते, लोकांची मागणी काय आहे, ग्राहक काय मागतात याचा पूर्ण विचार करून बिसलेरी या नावाने पिण्याचे पाणी बॉटल विकायला सुरुवात केली. आज खरच अशी अवस्था आहे कि, Packaged Drinking Water म्हणजे शुद्ध पाण्याला चांगली किंमत मिळत आहे. आपल्याला होणाऱ्या बऱ्याच आजाराचे मूळ कारण हे अशुद्ध पाणी पिणे हे असते. अशुद्ध पाणी पिण्याने अनेक आजार होवून लाखो रुपये हॉस्पिटलमध्ये खर्च करावे  लागतात. तो खर्च व जीवाचे हाल करण्यापेक्षा माणूस Packaged Drinking Water म्हणजेच शुद्ध पाणी बॉटल घेण्यास प्राधान्य देतो. हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा पंधरा/ वीस रुपये खर्च करणे हिताचे ठरते.

आज बिसलेरी यांच्या म्हणण्या नुसार देशातील व देशा बाहेरील अनेक कंपन्या हजारो कोटी रुपयाचा नफा या Packaged Drinking Water व्यवसायातून करत असतात. उत्पादन तयार करण्याकरिता लागणारा खर्च व विक्रीतून मिळणारा नफा जास्त असल्याने नवीन व्यावसायिकांना यात चांगली संधी मिळू शकते.

नोकरी की व्यवसाय करावे ? | Nokari vs Business|Naukri vs Business| Which is better Job or Business

dnyanjyotmarathi.com

व्यवसाय, शिक्षण, पर्यटन, कार्यक्रमाच्या व इतर निमित्याने माणूस हा प्रवास करत असतो. त्यामुळे प्रवास दरम्यान पाण्याची आवश्यकता असते. मनुष्य प्रवास दरम्यान घरातून पाण्याची बाटली घेवून जातोच पण ते संपल्यावर तहान भागविण्याकरिता  त्याला शुद्ध पाण्याकरिता विकतचे पाणी घ्यावेच लागते.  त्यामुळे ही व्यवसाया करिता उत्तम संधी आहे. पूर्वी तहान लागली कि लोक हॉटेल किंवा पाणपोई येथे जावून पाणी पीत होते. पण आता बस स्थानक, रेल्वे स्थानक, किराणा दुकान, हॉटेल, वेगवेगळी दुकाने व मॉल, औषधांची दुकाने असे अनेक ठिकाणी शुद्ध पाण्याच्या बॉटल्स उपलब्ध असतात.  हॉटेलमध्ये  गेल्यावर देखील वेटर आपल्याला विचारत असतात की, Mineral water कि साधे पाणी ? त्यावर आपण साधे पाणी पिण्यापेक्षा Packaged Drinking Waterची मागणी करतो.

सध्या आधुनिकतेचा विपरीत परिणाम दिसून येत आहे. औद्योगिक वसाहती, कंपन्या, कारखाने व शहरातील आसपासच्या रासायनिक उत्पादन त्यांच्या रासायनिक प्रक्रियेतून दुषित झालेले पाणी जवळच्या ड्रेनेज व्यवस्थेत, गटारात सोडतात. ज्यामुळे ते पाणी नद्या आणि नाल्यात मिसळते. तसेच ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या मार्फत जलशुद्धीकरण १००% करत असतीलही, परंतु पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या मार्फत शेवटपर्यंत शुद्ध पाणी मिळेलच याची खात्री देवू शकत नाही. अशा दुषित पाण्यामुळे अनेक जीवाणू व विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतात आणि त्यामुळे अनेक रोग उद्भवतात. दुषित पाणी जमिनीत साचल्यामुळे जमिनीखाली असणारे जलस्त्रोत देखील प्रदूषित होण्याची शक्यता असते किंबहुना होतेच. म्हणूनच बोअरवेल मधून येणारे पाणी देखील लॅबोरेटरीमध्ये तपासून, ते पाणी पिण्यायोग्य आहे कि नाही याचा सल्ला घ्यावा लागतो. त्यामुळे पाणी शुद्ध असणे किती आवश्यक आहे हे कळलेच असेल. त्यामुळे पैसे खर्च झाले तरी चालेल परंतु शुद्ध पाणी पिण्याकडे माणसाचा कल असतो, तशी मानसिकता असते. त्यामुळेच आज काही घरांमध्ये वॉटर प्युरीफायर मशीनरीद्वारे Mineral Water पिण्याचा भर जास्त आहे.

आज बाजारात विविध कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये Packaged Drinking Water मिळते. परंतु ती सर्व उत्पादने मिनरल वॉटर नसतात.

मिनरल वॉटर | Packaged Drinking Water तयार करण्याची पद्धत पाहूया |

१. शुद्ध पाण्यासाठी ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड’ म्हणजे बी.आय.एस. यांनी ठरवलेल्या अटी व नियमांनुसारच शुद्ध पाण्याचे उत्पादन करणे बंधनकारक आहे. ‘पॅकेज्ड ड्रिंकींग वॉटर’ मध्ये माणसाच्या शरीराला हानिकारक असणाऱ्या सर्व प्रकारच्या क्षारांचे प्रमाण तपासले जाते. तसेच त्याचे प्रमाण कमी केले जाते. जसे कॅल्शियम, मॅग्नेशियम, क्लोराईड, सल्फेट, क्लोरीन इत्यादी. या क्षारांपैकी क्लोरीन हा शुद्धीकरण प्रक्रियेत पूर्णपणे कमी केला जातो, तर इतर क्षारांचे प्रमाण बी.आय.एस. ने निश्चित केलेल्या मर्यादेत कमी केले जाते.

२. Packaged Drinking Water तयार करण्यासाठी प्रती दिवस हजारो लिटर पाणी शुद्ध करण्याकरिता तेवढी क्षमता असलेली मशिनरी वापरली जाते. त्या मशिनरीला  रिव्हर्स ऑस्मोसिस (आर.ओ.) मशीनरी असे म्हणतात.

३. ‘Packaged Drinking Water’ मध्ये बाहेरून कोणत्याही प्रकारचे क्षार किंवा इतर घटक मिसळले जात नाहीत.

४. ‘Packaged Drinking Water’ हे उत्पादनासाठी वापरलेले पाणी बहुधा बोअरवेलमधून घेतले जाते.

५. मानवी जीवनासाठी पाणी अत्यावश्यक आहे व अशा प्रकारे उत्पादन केलेल्या पाण्यामुळे कोणत्याही प्रकारचे आजारपण होवू नये म्हणून हे पाणी पहिले बी. आय. एस. च्या लॅबमध्ये तपासणीकरिता पाठवले जाते. लॅबचा अहवाल मिळाल्यानंतर उत्पादन सुरु करता येते.

६. दररोज तयार होणाऱ्या पाण्याच्या बाटल्यांवर व ड्रमवर पाण्याची एक्सपायरी तारीख व बॅच नंबर लिहिणे आवश्यक असते.

७. तसेच अन्न व औषध प्रशासन आणि बी. आय. एस. यांच्या मंजुरीचे प्रमाणपत्र उत्पादन सुरु होण्यापूर्वी मिळवणे बंधनकारक आहे.

Udyog Vyavsay Mahiti|उद्योग व्यवसाय माहिती | नवीन उद्योग – व्यवसाय कोणता सुरू करावा : नवीन उद्योजकांसाठी मार्गदर्शक | Udyog Vyavsay in Marathi|

dnyanjyotmarathi.com

८. एक लीटर ते वीस लीटर क्षमतेच्या बाटल्या व कॅनवर उत्पादन तारीख नंतर ‘Best before six months from packaging date’ असा उल्लेख करणे आवश्यक आहे.

९. पाणी एक लिटर, अर्धा लिटर च्या बाटल्यांमध्ये पॅक केले जाते. तर दोनशे मिली पॅकिंग करिता प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. पाच लिटर ते वीस लिटर पॅकिंगकरिता प्लास्टिक कॅनचा वापर करतात. अशा प्लास्टिक कॅनचा वापर कार्यालय, रुग्णालय, हॉटेल किंवा एखाद्या कार्यक्रमात सर्रास केला जातो.

१०. पाणी शुद्धीकरण प्रक्रियेत बोरिंगमधून पाणी घेवून ते पहिले ‘सँड फिल्टर’ मध्ये सोडले जाते. ‘सँड फिल्टर’ मशिनच्या द्वारे पाण्यातील कार्बन पूर्णपणे काढून टाकला जातो. नंतर ते पाणी सॉफ्टनरमध्ये टाकले जाते.

११. सॉफ्टनरमध्ये पाणी हलके केले जाते. यानंतर ते पाणी रिव्हर्स ऑस्मोसिस (आर.ओ.) मशीनमध्ये टाकले जाते.

१२. आर. ओ. मशीनमध्ये मेमरन असते. ज्यामुळे खऱ्या अर्थाने पाणी शुद्धीकरण केले जाते. आर. ओ. मधून बाहेर पडणारे पाणी  ५०%  शुद्ध होते. ते शुद्ध केलेले पाणी मोठ्या टाकीत साठवले जाते.

१३. पाण्यातील क्षार, माती, कचरा, धातू यासारखे अगदी लहान कणही काढले जातात. या प्रक्रियेसाठी मायक्रॉन फिल्टर मशीनचा वापर केला जातो. ०.५ मायक्रॉनचा फिल्टर आणि यु. व्ही. ट्यूबद्वारे हे शुद्ध पाणी अत्यंत काळजीपूर्वक पुढे पॅकिंगसाठी पाठवले जाते.

१४. पॅकिंग करताना  यामध्ये काही प्रक्रिया जसे फिल्ट्रेशन, डिकॅन्टेशन, एरिएशन किंवा डिसइन्फेक्शन केले जाते. त्याशिवाय इतर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही.

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजे बी. आय. एस. यांनी वर दिलेल्या दोन प्रकारच्या पाण्यासाठी दोन इंडियन स्टँडर्ड प्रकाशित केले आहेत.

१)   आय. एस. १३४२८ – “पॅक्ड नॅचरल मिनरल वॉटर Pack Natural Drinking Water

(अ) हे पाणी नैसर्गिक पाणी असावे किंवा जमिनीखालील स्रोतांमधून मिळालेले असावे. अशा पाण्याच्या स्रोतावर राज्य किंवा केंद्र सरकारचे भूअंतर्गत पाण्याचे अधिकार असावेत.

(ब) उत्पादनासाठी वापरणाऱ्या स्रोतांकडून पाणी मिळवताना पूर्ण काळजी घेतलेली असावी. त्यातील नैसर्गिक सूक्ष्मजीव-जंतु आणि पाण्याचा नैसर्गिक रासायनिक संयोग तसाच राखला जातो.

(क) पाणी स्रोताजवळच थांबवले जावे आणि तेथे वातावरण स्वच्छ आणि स्वच्छता राखलेली असावी.

(ड) या पाण्यात काही प्रमाणात मिनरल सॉल्ट्स आणि इतर घटक असू शकतात, तर त्यांचे प्रमाण योग्य असावे.

(2) आय. एस. १४५४३ – “पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर Packaged Drinking Water

हे पाणी सुविधा असलेल्या स्रोतांमधून मिळवले जाते. त्यावर डिकॅन्टेशन, फिल्ट्रेशन, डिमिनरलायझेशन, रिमिनरलायझेशन, रिव्हर्स ऑस्मोसिस, डिसइन्फेक्शन यांसारख्या प्रक्रिया केल्या जातात आणि त्यानंतर हे पाणी स्वच्छ वातावरणात बाटल्या भरून पॅक केले जाते. बाटल्यांवर असलेला आय. एस. आय. मार्क सूचित करतो की ते उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल, योग्य प्रक्रिया, अंतिम तपासणी आणि स्वच्छ वातावरण अशा सर्व बाबी इंडियन स्टँडर्ड्सनुसार पूर्ण केल्या आहेत. लक्षात ठेवा की आय. एस. आय. मार्कवर वरच्या बाजूला स्टँडर्ड नंबर आणि खालच्या बाजूला लायसन्स नंबर असतो, तो बी. आय. एस. कडून दिलेला असावा आणि योग्य ठिकाणी असावा. आय. एस. आय. मार्क असलेल्या पाण्याच्या बाटल्या सुरक्षित असून धोकादायक जीवाणूंपासून मुक्त असतात.

पॅकेज्ड ड्रिंकींग वॉटर ( Mineral Water) उत्पादन करताना घ्यावयाची काळजी !

१. Packaged Drinking Water करिता शक्यतो बोअरवेलचे पाणी वापरावे. सदरचे पाणी फिल्टरेशन करिता वापरावे.

२. बोअरवेल खोदकाम करताना, जिथे खोदकाम करणार आहात त्यापासून कमीत कमी ५० ते १०० फुट अंतरावर कोणतेही गटार किंवा ड्रेनेज, नाला नसावा.

३. तसेच आपण ज्या ठिकाणी उत्पादन करणार आहात तेथे रासायनिक द्रवे तयार करणारी कंपनी असेल आणि ती प्रदूषित पाणी जमिनीत सोडत असेल तर असे प्रदूषित पाणी जमिनीत मिसळल्याने रासायनिक अंश असलेले पाणी आपल्या बोअरवेल मध्ये येण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रासायनिक कंपनी पासून देखील आपले उत्पादन प्रकल्प लांब असावेत.

४. आपण उत्पादनाकरीता निवडलेले कुशल आणि अकुशल मजूर कोणत्याही प्रकारचे व्यसन करणारे नसावेत. निरोगी मजुरांची निवड करा.

५. फिल्टर प्लांट आणि पॅकेजिंग प्लांटमध्ये काम करणाऱ्या मजुरांना काम करताना डोक्यावरील केस पाण्यात पडू नयेत म्हणून टोप्या, हातांना ग्लोव्हज, एप्रन यासारख्या साहित्यांचा वापर करण्याचे नियम ठरवा.

६. शुद्धीकरण प्रकल्पाला स्वतःची लॅब असावी. दररोज प्रत्येक बॅचचे पाणी तपासून खात्री करूनच पॅकिंग करा.

७. पाण्याच्या बाटल्या प्लास्टिक वस्तू तयार करणाऱ्या कंपनीकडून आपल्याला आवडेल त्यानुसार डिझाईन करून ओर्डर करावी किंवा बाटल्या तयार करण्यासाठी स्वतंत्र प्लांट उभारू शकता. 

८. बाजारात पाठवलेल्या पाण्याच्या बाटल्यांवर उत्पादन दिनांक, बॅच नंबर, एक्सपायरी दिनांक याची नोंद ठेवा.

९. शुद्धीकरण प्रकल्प अंतर्गत व आसपास स्वच्छता राखणे आवश्यक आहे.

Packaged Drinking Water ( मिनरल वॉटर) उत्पादनाची मार्केटिंग कशी करावी ?

Mineral water

  • या व्यवसायाला ग्रामीण व शहरी अश्या सर्व ठिकाणी ग्राहक उपलब्ध असतात. परंतु उत्पादनाच्या विक्रीसाठी योग्य वितरण प्रणाली अत्यंत महत्वाची आहे. तुमचा प्लांट किती मोठा आहे, त्याची दररोजची फिल्टरेशन व पॅकिंग क्षमता किती आहे, याचा अभ्यास करून तयार माल ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी मालकाने स्वत: वितरण व्यवस्थेवर पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे.
  • माल व्यवस्थित वितरीत करण्यासाठी एखादी एजन्सी किंवा डीलर्स नियुक्त करावेत. पहिल्यांदा तुमच्या स्थानिक बाजाराला तुमचा माल विकण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे.
  • सुरुवातीला तुम्ही स्वत: मार्केटिंग करावे, जेणे करून तुमच्या मालाची मागणी किती हे सुनिश्चित होईल.
  • बस स्थानक, रेल्वे स्थानक, हॉटेल, सिनेमा गृह, मॉल, कंपनी, कारखाने, वेगवेगळी दुकाने येथे स्वत: किंवा विक्री प्रतिनिधीद्वारे जावून प्रत्येक ठिकाणी भेट देवून माल विका.
  • दुकानदार आणि किरकोळ विक्रेते हे आपले उत्पादन विक्रीसाठी ठेवतात त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या योजना सांगून त्यांना तुमचा माल विक्री केल्यानंतर फायदा कसा होईल याचे महत्व पटवून द्या.
  • सदरचे उत्पादन तयार करण्यासाठी लागणारा खर्च कमी असल्याने सुरुवातीला एम.आर.पी. मध्ये नफा थोडा कमी ठेवून किरकोळ विक्रेत्यांना जास्त नफा कसा होईल यावर लक्ष द्या.
  • बी.आय. सी. च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून दर्जेदार उत्पादन तयार करावे.
  • डिजिटल मार्केटिंग, डिजिटल पोस्टर, डिजिटल बॅनर्स, स्टिकर्स मार्फत उत्पादनाची जाहिरात करावी.
  • मोठ्या मोठ्या कंपनीज, कार्यालये, बँका यांना २० लिटरच्या पारदर्शक कॅनमध्ये पाणी पुरवठा करावा. त्यांनी मागणी केली असता त्वरित त्याची पूर्तता करावी.
  • आपला बुकिंग नंबर सर्वांना द्यावा. फोन येताच वेळेत ऑर्डर पूर्ण करा.
  • बाटल्या व कॅन व्यवस्थित सील बंद आहेत कि नाही याची खात्री करून घ्या.
  • तुमच्या उत्पादनाच्या ठिकाणाहून दूरच्या बाजारपेठेत माल पोहोचविण्याकरिता एजन्सी किंवा डीलर्सची नेमणूक करा. त्यांच्या ऑर्डर प्रमाणे माल त्यांना पोहोच करा.
  • Packaged Drinking Water उत्पादन आणि विक्री व्यवसायात मोठी स्पर्धा आहे. बाजारात स्पर्धक असणारच, तरीही या उत्पादनासाठी नवीन उद्योजकांना भरपूर संधी आहे.
  • उत्पादन सुरु करताना सर्व सरकारी परवानने घेतले कि नाही याची खात्री करा.
  • मार्केटचा अभ्यास करून उत्पादनाची सुरुवात करा.

Packaged Drinking Water उद्योग करिता आवश्यक कच्चा माल : या उत्पादनासाठी पाणी हाच मुख्य कच्चा माल आहे. वितरणासाठी प्लास्टिकच्या पारदर्शक बाटल्या. कॅन, लेबल यासारखे साहित्य लागते.

Packaged Drinking Water उद्योग करिता आवश्यक मशिनरी : या व्यवसायासाठी  रिव्हर्स ऑसमॉसिस (R.O.) मशीन, सँड फिल्टर, कार्बन फिल्टर, सॉफ्टनर, बाटल्या पॅक करण्यासाठी पॅकिंग मशीन, आणि बोरमधून पाणी काढण्यासाठी सबमर्सिबल पंप, पाणी मोटर इत्यादी मशिनरी यांची आवश्यक आहे.


आहार कसा निवडावा | Aahar Kasa Nivadava | योग्य आहार कसा घ्यावा? | Yogya Aahar Kasa Ghyava |

Sanskar | संस्कार म्हणजे काय ? मुलांच्या अवस्था ? | Mulavar Sanskar kase karave |

Cyber Crime | सायबर क्राइम म्हणजे काय? | What is cyber crime?

शेती करा आणि श्रीमंत व्हा ! Sheti kara ani shrimant vha! | Farming | Agriculture