Rashi Bhavishya | राशी भविष्य | Rashi Bhavishya in Marathi | Weekly Horoscope | Rashifal
Rashi Bhavishya : ३ मार्च ते ९ मार्च २०२५ या आठवड्याचे सर्व राशींचे #rashi bhavishya राशी भविष्य या लेखाद्वारे देत आहोत.

Rashi Bhavishya / Rashi bhavishya : मेष राशीचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( ३ मार्च ते ९ मार्च २०२५ rashi bhavishya) मेष राशीसाठी हा आठवडा शुभ फळ देणारा आहे. या आठवड्यात आहारावर लक्ष ठेवणे. सकाळी चालणे, फिरणे, व्यायाम करणे नित्यनियमित करावे. इलेक्ट्रिक उद्योगात असणाऱ्या व्यक्तीकरिता हा आठवडा शुभ फळ देणारा असेल.. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची बदली होण्याची शक्यता आहे. प्रवास योग आहे. या आठवड्यात कोणतीही नवीन गुंतवणूक करू नये. नुकसान होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात गैरसमजुतीमुळे तणाव निर्माण होवू शकते. विद्यार्थ्यानी कठोर मेहनत करणे आवश्यक आहे. घाईघाईत कोणताही निर्णय घेवू नये.
मेष राशीच्या लोकानी या आठवड्यात हनुमान स्तोत्र पठण केल्यास लाभ मिळेल.

वृषभ राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( ३ मार्च ते ९ मार्च २०२५ rashi bhavishya) वृषभ राशीच्या लोकांना हा आठवडा संमिश्र फळ देणारा असेल. या आठवड्यात आपण थोडे भावनिक असण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात काम करण्याऱ्या लोकांची प्रतिष्ठीत व्यक्तींसोबत भेटीगाठी होतील. अनुभवाचा फायदा होईल. या आठवड्यात पोटाचे विकार जाणवू शकतात. त्यामुळे शिळे व उष्ण अन्न खाणे टाळावे. व्यावसायिकांना या आठवड्यात मोठा व्यवहार होण्याची शक्यता आहे. नोकरी करण्याऱ्या लोकांना थोडी जास्त मेहनत करावी लागेल. वडिलोपार्जित मालमत्तेवरून घरात वाद होवू शकतात. त्यामुळे वाणीवर व रागावर नियंत्रण ठेवावे. वैवाहिक जीवन सुखी असेल. विद्यार्थ्याना या आठवड्यात अभ्यासात थोडी रुची कमी असेल.
वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यात ओम नमः शिवाय या मंत्राचा रोज १०१ वेळा जप केल्यास लाभ मिळेल.
सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? | Cyber Security


मिथुन राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( ३ मार्च ते ९ मार्च २०२५ rashi bhavishya) मिथुन राशीच्या लोकांना हा आठवडा सकारत्मक उर्जा घेवून येणारा आठवडा असणार आहे. आर्थिक उत्पनात वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळण्याकरिता जास्त मेहनत करावी लागेल. वरिष्ठांचा व्यवहार आपल्यासोबत सकारात्मक असल्याने पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. प्रकृती उत्तम राहील. जुनाट आजारापासून थोड्याप्रमाणात दिलासा मिळेल. महिलांना कंबर दुखीचा त्रास जाणवेल. विद्यार्थ्याना अपेक्षिक यश मिळण्याकरिता मेहनत करावी लागेल. घराच्या डागडूजीवर थोडा पैसा खर्च करावा लागेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचा रुसवा घालवण्याकरिता तिला/त्याला अचानक एखादी भेटवस्तू देवून आनंदी करावे लागेल.
मिथुन राशीच्या लोकांना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा १०१ वेळा जप करावे. अन्नदान करावे.

कर्क राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( ३ मार्च ते ९ मार्च २०२५ rashi bhavishya) कर्क राशीच्या लोकांना हा आठवडा चांगला असेल. एखाद्या शुभ कार्यात सहभागी होवू शकता. आरोग्याकडे लक्ष द्या. प्रकृती ठीक रहाण्यासाठी सकाळी चालणे, फिरणे, व्यायाम व योगा करणे समाविष्ट करा. कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. या आठवड्यात प्रवास योग आहे. व्यावसायिकांना हा आठवडा शुभ आहे. या आठवड्यात आर्थिक गुंतवणूक करताना थोडा विचार करून करावे. नोकरी करणाऱ्या लोकांना हा आठवडा चांगला जाईल. विद्यार्थ्याना मेहनत करणे अनिवार्य आहे. जोडीदारासोबत जुन्या गोष्टीवरून वादविवाद होण्याची शक्यता आहे. विनाकारण वाहनावर खर्च करावे लागेल. एखादा नवीन व्यवसाय सुरु करावयाचा असल्यास अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घ्यावे.
कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात श्री गणेशाय नमः या मंत्राचा १०१ वेळा जप केल्यास लाभ मिळेल.

सिंह राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( ३ मार्च ते ९ मार्च २०२५ rashi bhavishya) सिंह राशीच्या लोकांना हा आठवडा संमिश्र फळ देणारा असेल. या आठवड्यात आपली आर्थिक परिस्थिती चांगली होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्यावे. एखादा जुना आजार डोक वर काढू शकतो. त्याकडे दुर्लक्ष करू नका. नोकरी करण्याऱ्या व्यक्तीना मेहनत करावी लागेल तरच यश प्राप्त होईल. कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना घाई करू नये, अन्यथा नुकसान सहन करावे लागेल. अहंकारामुळे नात्यामध्ये वादविवाद होवू शकतात. प्रेम टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केल्यास कुटुंबात आनंद मिळेल. कुटुंबात शांतता निर्माण करणे आपल्या हातात आहे. कुटुंबाकरिता वेळ द्या. विद्यार्थ्यांना यश प्राप्त होईल.
सिंह राशीच्या लोकांना गणपती स्तोत्राचे रोज पठण करावे.
Sanskar | संस्कार म्हणजे काय ? मुलांच्या अवस्था ? | Mulavar Sanskar kase karave |


कन्या राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( ३ मार्च ते ९ मार्च २०२५ rashi bhavishya) कन्या राशीच्या लोकांना हा आठवडा सामान्य फळ देणारा असेल. मानसिक ताण तणाव दूर होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना लाभ मिळेल. जुनाट आजार डोक वर काढण्याची शक्यता आहे. या आठवड्यात पाहुण्याची ये जा होवू शकते. आरोग्याकडे लक्ष द्यावे. कोणाचाही अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. जोडीदारासोबत किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांनाही हा आठवडा चांगला जाईल. पदोन्नती होण्याची शक्यता आहे.
कन्या राशीच्या लोकांना भीमरूपी महारुद्रा या स्तोत्राचे पठण करावे व बुधवारी गाईला हिरवा चारा खावू घालावा.

तूळ राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi) – ( ३ मार्च ते ९ मार्च २०२५ rashi bhavishya) तुळ राशीच्या लोकांना हा आठवडा सामान्य असा असेल. पूर्व नियोजित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्यावे. ताप, सर्दी, खोकला किंवा छातीत दुखण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळीच औषधोपचार करणे. सरकारी कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना हा आठवडा थोडा तणाव ग्रस्त जाणार आहे, तुम्ही आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. प्रवास योग आहे. प्रवासात वेगावर नियंत्रण ठेवावे. विद्यार्थ्याना यश प्राप्त करण्याकरिता मित्रांची संगत सोडून अभ्यासात लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तरच उत्तम यश प्राप्त होईल. जोडीदारासोबत विनाकारण वाद विवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकमेकाला समजून घेणे आवश्यक आहे.
तुळ राशीच्या लोकानी ललित सहत्रनामावालीचे रोज पठण करावे.

वृश्चिक राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( ३ मार्च ते ९ मार्च २०२५ rashi bhavishya) वृश्चिक राशीच्या लोकांना हा आठवडा शुभ फळ देणारा असणार आहे. या आठवड्यात कामात प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. परंतु जे सध्या नोकरी करत आहेत त्यांनी नोकरी सोडू नये. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकता. व्यावसायिकांना नवीन ओर्डेर मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद प्राप्त होईल. हवामान बदलामुळे आजारपण येवू शकते त्यामुळे वेळीच डॉक्टर सल्ला घेणे आवश्यक आहे.
वृश्चिक राशीच्या लोकांना ओम ग गणपतये नमः या मंत्राचा १०१ वेळा जप करावा.

धनु राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( ३ मार्च ते ९ मार्च २०२५ rashi bhavishya) धनु राशीच्या लोकांना हा आठवडा चांगला जाईल. या आठवड्यात पोटाचे विकार, डोळ्यांची जळजळ होण्याची शक्यता आहे. बरेच दिवस अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसायीकानी या आठवड्यात थोडे सावध राहून व्यवहार करावे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम आहे. नोकरीच्या शोधात असणार्यांना नवीन संधी मिळू शकते. जोडीदारासोबत सकारात्मक विचार केल्यास हा आठवडा उत्तम आहे. या आठवड्यात आपल्याला नशिबाची साथ मिळून मनात असलेली एखादी गोष्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे.
धनु राशीच्या लोकांनी कुलदेवतेचे स्मरण करावे. ओम श्री कुलदेवता नमः या मंत्राचा १०१ वेळा जप करावा.

मकर राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( ३ मार्च ते ९ मार्च २०२५ rashi bhavishya) मकर राशीच्या लोकांना हा आठवडा सामान्य फळ देणारा असणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्यावे. डोळ्यांची जळजळ किंवा डोळ्याचे विकार होण्याची शक्यता आहे. पूर्व नियोजित व प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांचे या आठवड्यात कामासंदर्भात प्रवास होवू शकतो. मालमत्ते संदर्भातील प्रश्न मार्गी लागतील. या आठवड्यात वाणीवर व रागावर नियंत्रण ठेवावे. विद्यार्थ्याना मेहनत करावी लागेल. वैवाहिक सुख प्राप्त होईल. जोडीदारासोबत एकमेकांच्या मनातील बोलण्याकरिता, मन मोकळे करण्याकरिता हा आठवडा उत्तम आहे.
मकर राशीच्या लोकांना ओम नमो विष्णवे नमः या मंत्राचा १०१ वेळा जप करावा व अन्नदान करावे.

कुंभ राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( ३ मार्च ते ९ मार्च २०२५ rashi bhavishya) कुंभ राशीच्या लोकांना हा आठवडा सामान्य फळ देणारा असेल. नोकरीच्या ठिकाणी अपेक्षित फळ मिळेल. उत्तम सहकार्य पाप्त होईल. या आठवड्यात डोके दुखी व चर्म रोगाच्या विकारांना सामोरे जाण्याची शक्यता आहे. या आठवड्यात पूर्व नियोजित कामे पूर्ण करू शकता. व्यवसायिक आपले व्यवसाय वाढविण्याकरिता नवीन तंत्रज्ञानचा वापर करू शकतात. आठवड्याच्या शेवटी आरोग्य उत्तम वाटत असेल तरी कृपया आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना व नोकरी बदल करणाऱ्या लोकांना नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. वैवाहिक जीवनात कटुता येवू शकते. विद्यार्थ्याना शिक्षण व ज्ञान प्राप्ती करिता हा आठवडा लाभदायक आहे.
कुंभ राशीच्या लोकांनी रोज हनुमान चालीसा पठण करावे.

मीन राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( ३ मार्च ते ९ मार्च २०२५ rashi bhavishya) मीन राशीच्या लोकांना हा आठवडा उत्तम फळ देणारा असेल. परंतु आठवड्याच्या सुरवातीला कामामध्ये अडथळे जाणवू शकतात. परंतु परिश्रमाने अडचणी दूर करण्याची आपली क्षमता आहे. डोळ्या संदर्भातील आजार उद्भवू शकतात. या आठवड्यात वाणीवर व रागावर नियंत्रण ठेवावे. व्यावसायिकांना हा आठवडा समाधानकारक असेल. विद्यार्थ्यानी अभ्यासाकडे दुर्लक्ष केले असता नुकसान होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकता. वैवाहिक जीवनात गैरसमज निर्माण होवून दुरावा निर्माण होवू शकतो. त्यामुळे एकमेकांशी बोलून वाद संपवणे आवश्यक आहे.
मीन राशीच्या लोकांना दत्त उपासना करणे आवश्यक आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)