Today Rashi Bhavishya in marathi| आजचे राशी भविष्य मराठी (शनिवार, ८ फेब्रुवारी २०२५) |Aajche Rashi bhavishya

Rashi Bhavishya / Rashi bhavishya Today : मेष राशीचे आजचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Aajche Bhavishya Marathi Madhe) – आजचा दिवस मेष राशीसाठी नशिबाच्या दृष्टीकोनातून चांगला असणार आहे. आपण आपल्या घरातील कौटुंबिक समस्या व कार्याकडे पूर्ण लक्ष द्याल. घरात नवीन वस्तू देखील आणू शकता. आपली एका जुन्या मित्रासोबत भेट होईल. यामुळे आपल्याला आनंद व शांती लाभेल. घरगुती थोड्या समस्या वाढतील परंतु ज्येष्ठ लोकांच्या मदतीने त्या समस्या नक्की सुटतील. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. जोडीदारासोबत वेळ घालवला. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ५ आहे व आपल्यासाठी आजचा रंग आकाशी आहे.

वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असणार आहे. आज आपला आत्मविश्वास द्विगुणित असेल. जे नोकरीच्या, रोजगाराच्या शोधात आहेत अशांना यश प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी आपल्याला आपला कार्यावरती पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगला परिणाम दिसून येईल. लक्ष द्यावे विशेषता पोटासंदर्भात समस्या उद्भवू शकतात. चुकीच्या मार्गाने मालमत्ता, पैसे कमविणे टाळावे लागेल. आज रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणत्याही अनावश्यक वाद-विवादावर, गोष्टींवर रागावून आपण आपली तब्येत खराब करू शकता, रागावर व वाणीवर संयम ठेवावे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ४ आहे व आपल्यासाठी आजचा रंग करडा आहे.
Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 03 Feb TO 09 Feb 2024


मिथुन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – मी तुला राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असेल. कायदेविषयक बाबींवर चांगले परिणाम दिसून येतील. आपण कोणत्यातरी विषयावर तणावग्रस्त असाल तर तो ताण तणाव दूर होण्याची शक्यता आहे. घरातील कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे विशेषता वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आपण आज जोडीदारासाठी आश्चर्यचकित भेटवस्तू देऊ शकता. राजकारणात कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नवीन लोकांशी भेटीगाठी होती. आपले सामाजिक कार्यात हातभार लागेल ज्यामुळे तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक २ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.

कर्क राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस सकारात्मक परिणाम घेऊन येणारा असेल. आज आपली एखाद्या विशिष्ट व्यक्तींशी भेट होऊ शकते. त्यांच्याकडून आपल्याला सल्ला मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी कामाच्या नियमाचे उल्लंघन करू नये अन्यथा वरिष्ठांकडून ओरडा खावा लागेल. नवीन मालमत्ता खरेदी संदर्भात विचार करू शकता. आपण कोणतीही गोष्ट मनात न ठेवता जोडीदार सोबत मनमोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना नवीन कोर्स मध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळू शकेल. जोडीदारासोबत संध्याकाळ घालवण्याचा प्रयत्न करा. आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ६ आहे व आपल्यासाठी आजचा रंग गुलाबी आहे.

सिंह राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – सिंह राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ फळ देणारा असेल. आजच्या दिवशी आपल्याकडून दानधर्म होण्याची शक्यता आहे. आज आपण आपल्या चांगला विचारांचा फायदा घेऊन सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा प्राप्त करू शकता. आपला गुप्त शत्रू आपली प्रतिमा कलंकित करण्याचा आज प्रयत्न करू शकतो. त्याच्या परिणामाकडे लक्ष न देता आपण आपले कार्य करत राहावे. आज कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. कुटुंबातील समस्यांवर चर्चा करून मार्ग काढाल. कोणताही अनोखी व्यक्तीवर पैशाबाबत विश्वास ठेवू नये. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ४ आहे व आपल्यासाठी आजचा रंग करडा आहे.

कन्या राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – कन्या राशीच्या लोकांना आजचा दिवस सामान्य फळ देणार असेल. पूर्वी उद्भवत असलेला समस्या दूर होण्याच्या शक्यता आहे. व्यवसायिकांना व्यवसाय मधील काही उणीवा, अडचणी दूर करण्यास यश प्राप्त होईल. कोणताही निर्णय घेताना घाईघाईत घेऊ नये. आर्थिक बाबतीत नवीन स्तोत्र उपलब्ध होतील. आपल्या घरात धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ३ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पिवळा आहे.

तूळ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi) – तुळ राशीच्या लोकांना आजचा दिवस ठीकठाक असा जाईल. कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या ठिकाणी महत्त्वाचे जबाबदारी किंवा ऑर्डर मिळू शकते. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आज प्रवास योग आहे. आज आपण वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळू शकेल. आपला कामावरच लक्ष करावे. कोणाच्याही बोलण्यावर लक्ष देऊ नये. वैवाहिकाना सुख प्राप्त होईल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ५ आहे व आपल्यासाठी आजचा रंग हिरवा आहे.
आहार कसा निवडावा | Aahar Kasa Nivadava | योग्य आहार कसा घ्यावा? | Yogya Aahar Kasa Ghyava |


वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – वृश्चिक राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ फळ देणार असेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीमध्ये फायदा होईल. आज तुमच्या जुन्या मित्राची भेट तुम्हाला आश्चर्यकारक धक्का देईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना नोकरी मिळू शकते. घराच्या डागडुजीचा विचार करू शकता. आज कोणालाही उधारीत पैसे देणे टाळावे. जोडीदार नाराज होणार नाही याकडे आज लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांच्यासोबत वेळ घालवणे व त्यांच्या मतांचा आदर करणे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ७ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.

धनु राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – धनु राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ फळ देणारा व समाधानी असेल. धनु राशीच्या लोकांना आपल्या कामाकडे, कारकिर्दीकडे लक्ष द्यावे लागेल. आपली मुले अपेक्षेप्रमाणे आपले ऐकतील. आज आपल्याला पैशाचे नियोजन करणे आवश्यक आहे. मुलांचा भविष्यासाठी आपण गुंतवणूक करू शकता. आपण एखाद्याकडे मदत मागितले असल्यास आपल्याला ती सहज प्राप्त होईल. आज आपण व्यर्थ वेळ घालवणे टाळावे. जोडीदारासोबत संध्याकाळ घालवणे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ४ आहे व आपल्यासाठी आजचा रंग करडा आहे.

मकर राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – मकर राशीच्या लोकांना आजचा दिवस आनंदी जाणार आहे. आपल्या आजूबाजूचे वातावरण सकारात्मक असेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला आपण सल्ला दिल्यास तो निश्चितपणे त्याची अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे. व्यवसायिक आपल्या व्यवसाय निमित्त प्रवास करू शकतात. आज आपल्यातून धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील किंवा व्यवसायातील कोणतेही गुपित इतर कोणाला कळणार नाही याची काळजी घ्यावी. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ४ आहे व आपल्यासाठी आजचा रंग करडा आहे.

कुंभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ परिणाम देणार असेल. व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायात चांगला परिणाम दिसू देईल. कामसंदर्भात किंवा आवडी संदर्भात कोणताही निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. आपण कुटुंबातील कोणत्याही एका सदस्या कडून आर्थिक मदत मागू शकता व ती सहज मिळेल. कामाच्या ठिकाणी आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास काही अडचण जाणवू शकते. पालकांच्या सहकार्याने, मार्गदर्शन ती अडचण दूर होईल. वैवाहिकांना सुख लाभेल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक २ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.
सहवास आणि सुसंवाद हे दोन कोणत्याही सुदृढ नात्याचे बीजमंत्र आहेत.


मीन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणार असेल. आज आपल्या आरोग्य बाबत तक्रार जाणवेल. कामाच्या ठिकाणी कामाबाबत थोडं उत्तर चढाव आपल्याला स्वस्थ करतील. पण मित्रांसोबत करमणुकीच्या कार्यक्रमात वेळ घालवू शकता. आज आपली काही प्रभावशाली व्यक्तींच्या भेटीचा योग आहे. त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्धी आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतील परंतु काळजी करू नये. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदात वेळ घालवाल. जोडीदारांच्या भावनांचा, मतांचा आदर करावा. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ८ आहे व आपल्यासाठी आजचा रंग निळा आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)