Today Rashi Bhavishya in marathi| आजचे राशी भविष्य मराठी (सोमवार, ३ फेब्रुवारी २०२५) |Aajche Rashi bhavishya
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-01.png)
Rashi Bhavishya / Rashi bhavishya Today : मेष राशीचे आजचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Aajche Bhavishya Marathi Madhe) – मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असेल. कामाच्या ठिकाणी टीम सोबत, सहकाऱ्यांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. सहकार्याची भावना आपल्या मनात राहील. आज आपले पूर्व नियोजित काम पूर्ण न झाल्यामुळे मन थोडे नाराज राहील परंतु काळजी करू नये. कोणाचीही फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच गुंतवणूक करताना फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध रहा. कौटुंबिक सौख्य लाभ आहे. प्रकृती सुधारण्यासाठी नियमित व्यायाम करत जा. जोडीदारासोबत वेळ घालवाल. देवघरात केतू यंत्र ठेवून रोज पूजा केल्यास लाभ मिळेल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक २ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-02.png)
वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस माफक प्रमाणात फळ देणारा असा असेल. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक व अनुभवी लोकांचा सल्ला लक्षात घेवून निर्णय घेणे. आज आपण आपल्या खाण्या पिण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आरोग्य विषयिक समस्या असल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टर सल्ला घेणे. प्रकृती सुधारण्यासाठी नियमित व्यायाम करत जा. कोणताही निर्णय घेताना भावनिक होवू नये. विद्यार्थी यांना उच्च शिक्षणाचे मार्क मोकळे होतील. जोडीदार आपल्या खांद्याला खांदा लावून सहकार्य, मदत करेल. महादेवाच्या पिंडीवर दुध अर्पण करा. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक १ आहे व आपल्यासाठी आजचा रंग नारंगी आहे.
Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 03 Feb TO 09 Feb 2024
![rashi bhavishya weekly](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2025/02/rashi-bhavishya-weekly-dnyanjyotmarathi-1024x540.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-03.png)
मिथुन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – मिथुन राशीच्या लोकांच्या काही समस्या असतील तर त्या दूर होण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय घेताना घाई करण्याची गरज नाही. कामाच्या ठिकाणी आपल्या हातून एखादि चूक होवू शकते. त्या बाबत वरिष्ठ लोकांकडून ओरडा खावा लागेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होण्याची शक्यता आहे. मुलाकडून आपल्याला चांगली बातमी ऐकायला मिळेल. आपण एखाद्याला चांगला सल्ला द्याल परंतु त्याच्या स्वभावामुळे त्याला वाईट वाटण्याची शक्यता आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. भगवान भैरवाच्या मंदिरात दुध दान करा. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ८ आहे व आपल्यासाठी आजचा रंग निळा आहे.
आहार कसा निवडावा | Aahar Kasa Nivadava | योग्य आहार कसा घ्यावा? | Yogya Aahar Kasa Ghyava |
![](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2025/01/Aahar1-1024x536.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-04.png)
कर्क राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांकरिता थोडा कठीण असण्याची शक्यता आहे. कामाचा ताण वाढल्यामुळे थोडे अस्वस्थ असाल. कौटुंबिक तणावमुळे आपल्या तब्बेतीवर परिणाम होवू शकतो. आपण वेळेवर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. पूर्व नियोजित व रखडलेले एखादे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. आपण मित्रांसोबत बाहेर जाण्याच्या प्लान करू शकता. वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे. हनुमान चालीसाचे पठण केल्यास लाभ मिळेल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ३ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पिवळा आहे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-05.png)
सिंह राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आजच्या दिवशी सिंह राशीचे लोकांना कामाच्या ठिकाणी चांगले प्रोत्साहन मिळेल. आपण जबाबदारीचे काम पूर्ण करु शकता. आपल्याला संयमाने काम करण्याची आवश्यकता आहे. घाई न करता कोण्याही निर्णयात प्रतिकूल परिस्थतीत धीर घेणे आवश्यक आहे. एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला तणाव येत असल्यास तो दूर होईल. भगवान भैरवाच्या मंदिरात दुध दान करा. प्रकृती सुधारण्यासाठी नियमित व्यायाम करत जा. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक १ आहे व आपल्यासाठी आजचा रंग नारंगी आहे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-06.png)
कन्या राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – कन्या राशीच्या लोकांना आजचा दिवस तणावपूर्ण दिवस असण्याची शक्यता आहे. आपण करत असलेल्या मेहनतीचे परिणाम चांगले मिळतील. आज कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात, त्यावर शांतपणे, विचारपूर्वक मात करणे आवश्यक आहे. आज आपल्याला गरजू व्यक्तींना मदत करण्याची संधी मिळाल्यास जरुरू मदत करा. एखादे प्रकरण कायदेशीर खटल्यात अडकले असेल, बराच वादविवाद होत असेल तर ते सुटण्याची शकता आहे. रोज ओम गणेशाय नमः या मंत्राचा ११ माळी जप करा. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ८ आहे व आपल्यासाठी आजचा रंग निळा आहे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-07.png)
तूळ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi) – आज तुला राशीच्या लोकांची नेतृत्व करण्याची क्षमता वाढवणारा दिवस असेल. तुमच्या आत्मविश्वासात भर पडेल. आपण कोणतेही काम सहज पूर्ण करण्यास आज सक्षम असाल. आपल्या आजूबाजूचे बातावरण देखील आनंदित असेल. बऱ्याच दिवसापासून एखादी शारीरिक समस्या असल्यास ती देखील दूर होण्याची शक्यता आहे. आपला प्रभाव आणि वैभव वाढेल. कौटुंबिक संबंधात सुधारणा होईल. आजच्या दिवशी नवीन काम सुरु करण्यास अनुकूल वातावण आहे. श्री गणेशाची उपासना करा. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक २ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-08.png)
वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – वृश्चिक राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असेल. बराच काळ रखडलेले एखादे काम मार्गी लागेल. पूर्वी झालेल्या चुकांमधून आपण बोध घेवून सुधारणा करणे आवश्यक आहे. थोडासा फायदा देणाऱ्या योजनेकडे डोळे झाकून विश्वास ठेवू नका. प्रकृतीकडे लक्ष द्या. प्रकृती सुधारण्यासाठी नियमित व्यायाम करत जा. पोटदुखीच्या समस्या उद्भवतील पण काळजी करू नका. वाहने चालवताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. एखाद्या गोष्टीबाबत आपले पण काळजीत असेल. वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदारासोबत संध्याकाळ घालवाल. दरोरोज सूर्याला अर्घ्य द्या. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ४ आहे व आपल्यासाठी आजचा रंग करडा आहे.
सहवास आणि सुसंवाद हे दोन कोणत्याही सुदृढ नात्याचे बीजमंत्र आहेत.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/12/SANSKAR-1024x683.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-09.png)
धनु राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – धनु राशीच्या लोकांना आजचा दिवस सुंदर जाणार आहे. कामाच्या ठिकाणी नियोजन करून कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. वेळेत काम पूर्ण केल्यामुळे वरिष्ठ अधिकारी करून शाबासकी मिळेल. घरगुती व वैवाहिक जीवन आनंदी असेल. आपण आपले भविष्य सुधारण्याचा प्रयत्न करत आहात त्यात नक्की प्रगती होईल. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आज कोणालाही उधारीत पैसे देणे टाळावे. जोडीदाराच्या मतांचा व विचारांचा आदर करणे. एखाद्या मंदिरात तेलाचे दान करा. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक १ आहे व आपल्यासाठी आजचा रंग नारंगी आहे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-10.png)
मकर राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – मकर राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ फळ देणारा असेल. आपल्या उत्पन्न स्तोत्रात वाढ होईल, ज्यामुळे आपला आनंद शतगुणित होईल. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. पालकांच्या मदतीमुळे तुमचे एखादे रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रकृती सुधारण्यासाठी नियमित व्यायाम करत जा. आज नवीन पाहुणे घरात येवू शकतात. घरात एखादे धार्मिक किंवा मंगल कार्य होण्याकरिता नियोजन करू शकता. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा व पिंपळाच्या ५ प्रदक्षिणा घाला. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ९ आहे व आपल्यासाठी आजचा रंग लाल आहे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-11.png)
कुंभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – कुंभ राशीच्या लोकांना आज आपल्या कामाकडे लक्ष द्यावे लागेल. आळसपणा सोडून काम पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करणे आवश्यक आहे. कुटुंबात मालमत्तेवरून वाद विवाद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होवू शकतो. परंतु काळजी करू नका. अशावेळी आपण आपल्या वाणीवर व रागावर नियंत्रण ठेवावे व प्रकृती जपावी. प्रकृती सुधारण्यासाठी नियमित व्यायाम करत जा. घरामध्ये पूजा, होम हवन, पाठ करण्याचे नियोजन करू शकता. आज वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे. भगवान भैरवनाथाच्या मंदिरात प्रसाद दान करा. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ७ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-12.png)
मीन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आजच्या दिवस मीन राशीच्या लोकांसाठी चांगला जाणार आहे. आज कामासाठी आपण प्रवास करू शकता. मुलांकडून आनंदी बातमी समजेल. एखाद्या गरजू व्यक्तीस मदत करण्यासाठी आपण पुढाकार घेवू शकता. कामाच्या ठिकाणी स्पर्धेची भावना आपल्या मनात असेल. कोणत्याही शारीरिक व्याधीबाबत काळजी वाटत असल्यास दूर होईल. प्रकृती सुधारण्यासाठी नियमित व्यायाम करत जा. सूर्याला अर्घ्य द्या व दररोज सूर्योदय वेळी प्राणायाम केल्यास आरोग्य छान राहील. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ५ आहे व आपल्यासाठी आजचा रंग हिरवा आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)