Today Rashi Bhavishya in marathi| आजचे राशी भविष्य मराठी (शनिवार, १८ जानेवारी २०२५) |Aajche Rashi bhavishya
Rashi Bhavishya / Rashi bhavishya Today : मेष राशीचे आजचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Aajche Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र पाचव्या स्थानी आहे. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विचारपूर्वक नवीन काम सुरू करण्याचा दिवस राहील. तुमचा एखादा मित्र तुम्हाला मोठ्या गुंतवणुकीचा सल्ला देऊ शकतो, ज्यामध्ये तुम्ही विचारपूर्वक पुढे जावे. वेळप्रसंगी तज्ञांचा सल्ला घ्या. तुम्हाला तुमच्या खर्चाकडे आज प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे आहे. कारण आज तुमच्या खर्चात प्रचंड वाढ संभवते. तुमचे मूल तुमच्याकडून नवीन वाहनाची मागणी करू शकते. दूर राहणाऱ्या कुटुंबातील सदस्याकडून काही निराशाजनक बातम्या ऐकायला मिळू शकतात. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ३ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पिवळा आहे.
वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र चवथ्या स्थानी आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस त्रासदायक असणार आहे. कामाच्या अतिरेकामुळे तुम्ही त्रस्त राहाल. तुमचे विरोधक तुम्हाला त्रास देण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत. तुमचा कोणताही जुना आजार आज पुन्हा डोके वर काढू शकतो. जो तुम्हाला आतून कमजोर करेल. तुमचे मन आज अस्वस्थ राहील. काही कौटुंबिक समस्यांबाबत तुम्ही तुमच्या जोडीदाराचा सल्ला घ्याल. एखाद्याने सांगितलेल्या गोष्टीबद्दल तुम्हाला वाईट वाटेल. परंतु एकंदरीत दिवसाचे ग्रहमान चांगले नसल्याने वाईट गोष्टी जास्त मनावर घेऊ नका. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक २ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.
मिथुन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र तिसऱ्या स्थानी आहे. मिथुन राशीच्या लोकांच्या मनात प्रेम आणि सहकार्याची भावना कायम असतेच ती आज अजून वृद्धिंगत होईल. तुम्हाला आज काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमच्या मनात प्रेम आणि सहकार्याची भावना कायम राहील. कोणत्याही भांडणापासून आज दूर राहावे, अन्यथा अनावश्यक वाद होऊ शकतात. कोणत्याही कायदेशीर बाबींवर बराच काळ वाद होत असेल, तर त्यातही तुम्हाला काही सल्ल्याची आवश्यकता वाटल्यास वडीलधाऱ्या व्यक्तींकडून सल्ला घ्यावा. आज तुमची आई देखील तुम्हाला काही कामाच्या संदर्भात काही सल्ला देऊ शकते. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ९ आहे व आपल्यासाठी आजचा रंग लाल आहे.
लावीत होते कुंकू त्यात पडला मोती, …… टिंब टिंब रावांसारखे मिळाले पती, भाग्य मानू किती?
कर्क राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र दुसऱ्या स्थानी आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हानीकारक असणार आहे. व्यवसायातील तुमचा एखादा सहकारी तुमच्याविरुद्ध कट रचू शकतो. परंतु तुम्ही घाबरण्याचे कारण नाही. सकारात्मक विचारांसोबत रहा. आज कोणतेही नवीन काम सुरू करू नये. तुमचे काही सौदे किंवा करार अंतिम होण्याआधीच अडकू शकतात. परंतु नंतर मार्गी लागतील आता काळजी करण्याची गरज नाही. नोकरीत मनाप्रमाणे काम न झाल्याने तुमचे मन अस्वस्थ राहील. कौटुंबिक समस्या पुन्हा निर्माण होतील, ज्यामुळे तुमचा तणाव वाढेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास त्यातही काही प्रमाणात तोटा होण्याची शक्यता आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ४ आहे व आपल्यासाठी आजचा रंग करडा आहे.
सिंह राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र प्रथम स्थानी आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. काही चांगल्या लोकांकडून उत्तम मार्गदर्शन मिळेल. कोणाच्या बोलण्याने प्रभावित होण्याचे आज टाळावे लागेल. एकत्र बसून कुटुंबातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी काही छोटे काम सुरू करू शकता. तुम्हाला तुमच्या कामाचे उत्तम नियोजन करावे लागेल. त्याने जरूर फायदा होईल आणि आनंदही मिळेल. आज कौटुंबिक सुख मिळण्याची शक्यता आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक २ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.
कन्या राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र बाराव्या स्थानी आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. काही नवीन काम सुरू करणे तुमच्यासाठी चांगले राहील. तुमच्या मनमिळाऊ स्वभावामुळे उगाच कारण नसताना इतरांचा रोष ओढवून घ्याल. काही खास लोकांना भेटण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमच्या मुलांच्या संगतीकडे विशेष लक्ष द्यावे, अन्यथा ते काही चुकीच्या कामाकडे वाटचाल करू शकतात. आज कुटुंबात काही शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक १ आहे व आपल्यासाठी आजचा रंग नारंगी आहे.
तूळ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र लाभ स्थानी आहे. तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हानीकारक असणार आहे. भागीदारीत कोणतेही काम केल्याने तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर तुम्हाला ते परत मिळण्यास अडचणी येतील. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. त्यामुळे थोडाफार दिलासा मिळेल. कोणत्याही वादविवादात जाणून-बुजून अडकू नका. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. एखाद्याला दिलेले वचन तुम्ही आज पूर्ण कराल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ३ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पिवळा आहे.
चांगल्या आरोग्याचा मूलमंत्र – सहा कामे नेहमी योग्य वेळी केली पाहिजेत. | Aarogya |आरोग्य
वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र दहाव्या स्थानी आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तणावपूर्ण असणार आहे. तुम्हाला लांबच्या प्रवासाला जावे लागू शकते. त्यामुळे प्रवासाची दगदग होईल. तुम्हाला काही खर्चांचा सामना करावा लागेल जो तुम्हाला अनिच्छेने सहन करावा लागेल. जर तुम्ही भागीदारीत कोणतेही काम केले असेल तर त्यात आज अडचण उद्भवू शकते. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासह तुमच्या भविष्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागेल. जी तुमच्या भविष्यासाठी लाभदायक ठरेल. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून तुम्हाला आज तुमच्या कामाबद्दल काही सल्ला मिळण्याची शक्यता आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ५ आहे व आपल्यासाठी आजचा रंग हिरवा आहे.
धनु राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र भाग्य स्थानी आहे. धनु राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी काहीतरी खास, नवीन कार्य करण्याचा असेल. तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. तुमचे मन अध्यात्मिक कार्याकडे वळेल. कोणाच्या बोलण्याने, वागण्याने जर तुम्हाला वाईट वाटले असेल तर त्याबद्दल काळजी नसावी. कामाच्या ठिकाणी आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये अजिबात शिथिलता आणू देऊ नका. रक्ताचे नाते अधिक घट्ट होतील. कौटुंबिक सौख्य मिळेल. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक २ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.
मकर राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र आठव्या स्थानी आहे. मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असणार आहे. वाहने जपून वापरावी लागतील. तुमचा कोणताही जुना आजार अचानकपणे डोके वर काढू शकतो किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये एखाद्या विषयावर वादही होऊ शकतो. तुमच्या कामात काही अडथळे येत असतील तर तेही आज बऱ्यापैकी दूर होतील. व्यवसायातील एखादा जुना व्यवहार तुम्हाला त्रास देईल. तुमचे काही बिघडलेले काम आज पूर्ववत होऊन पूर्ण होईल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक २ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.
कुंभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र सातव्या स्थानी आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी काही नवीन काम करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही तुमच्या व्यवसायात कोणतेही बदल विचारपूर्वक करा. जर तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला तर तो तुमचा विश्वास तोडू शकतो. त्यामुळे सावधगिरी आणि संयम बाळगा. पैशाच्या बाबतीत घाई करू नका. आज तुमच्या आजूबाजूचे वातावरण प्रसन्न राहील. नोकरीत नवीन पद मिळू शकते. मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ९ आहे व आपल्यासाठी आजचा रंग लाल आहे.
शेतकरी पैशाने श्रीमंत तर होईलच परंतु देश मात्र संपन्न आणि समृद्ध होईल. #agriculture
मीन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीत चंद्र सहाव्या स्थानी आहे. मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुमच्या घरी पाहुण्यांच्या आगमनामुळे वातावरण प्रसन्न राहील. तुमचा मान-सन्मान वाढेल. कायदेशीर बाबींमध्ये डोळे आणि कान उघडे ठेवावे लागतील. जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर तेही तुम्हाला आज परत मिळू शकतात. नोकरीमध्ये तुमचे सहकारी तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील, त्यामुळे तुम्ही हाती घेतलेले काम वेळेपूर्वी पूर्ण करू शकाल. एकंदरीत आजच्या दिवसाचे ग्रहमान चांगले राहील. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ६ आहे व आपल्यासाठी आजचा रंग गुलाबी आहे.