Today Rashi Bhavishya in marathi| आजचे राशी भविष्य मराठी (शनिवार, २१ डिसेंबर २०२४) |Aajche Rashi bhavishya
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-01.png)
Rashi Bhavishya / Rashi bhavishya Today : मेष राशी (Aries Daily Rashifal) – आज शनिवारी चंद्र सिंह राशीत #rashi bhavishya असून आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या स्थानी आहे. समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणवू द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा. नोकरदार लोकांनी वरिष्ठांकडून आलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे म्हणजे त्यांना ऑफिसमध्ये कोणताही त्रास होणार नाही. व्यावसायिक अडचणींना व्यक्तिगत चर्चेतून मार्ग सापडेल. दिवस कसा चांगला बनवला जाईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. विवाहानंतर पापाचं रुपांतर पुजेत होतं आणि आज तुम्ही भरपूर पुजा करणार आहात. मानसिक शांती प्राप्त करण्यासाठी आज कुठल्या नदीचा किनारा किंवा पार्कचा फेरफटका उत्तम विकल्प असू शकतो. तुमची काळजी करणार्यांना शोधा. नवनव्या आव्हानास सामोरे जाण्याची मनाची तयारी ठेवा.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-02.png)
वृषभ राशी (Taurus Daily Rashifal) – आज शनिवारी चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र चवथ्या स्थानी आहे. प्रत्येक गोष्टींचा आस्वाद घेताना त्याचा अतिरेक होणार नाही ना याची काळजी घ्या. कोणावर अवलंबून #rashi bhavishya राहणे टाळा. काही वेळा शांततेसाठीही बरीच मोठी किंमत मोजावी लागते हे ध्यानात ठेवा. रेंगाळलेल्या गोष्टीकडे लक्ष घालण्याचा निश्चय केल्यास त्याचा फायदा भविष्यात जरूर मिळेल. तुमच्या कामाचा झपाटा वाढल्यामुळे कामे लवकर मार्गी लागतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. तुमच्या जोडादाराने दिलेल्या सरप्राइझमुळे तुमचा गेलेला मूड परत येईल. जर आज काही काम नसेल तर, कुठल्या लायब्ररीत वेळ व्यतीत करणे एक चांगला विकल्प असू शकतो. अहंकार आणि मोहाला बळी पडू नका.
Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 16 Dec TO 22 Dec 2024
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/12/rashi-bhavishya-weekly-1024x541.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-03.png)
मिथुन राशी (Gemini Daily Rashifal) – आज शनिवारी चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या स्थानी आहे. अतिरेकी #rashi bhavishya आत्मविश्वास धोकादायक ठरेल. एखाद्या चांगल्या घटनेने मनोबल वाढेल. कोणताही निर्णय घेताना संयम घ्यावा. दक्ष राहणे गरजेचे आहे. बाहेरील व्यक्तींशी विशेष संवाद ठेवू नका. भागीदारीच्या व्यवसायातील लोकांनी आपले नवे भागीदार निवडतांना चोखंदळ असावे, पुढे पश्चात्तापाची वेळ येणार नाही. नोकरीत बदल जरूर असावा पण त्यात स्थैर्य असाव नाहीतर शेवटी पश्चात्तापाची पाळी येईल. पण दिवसाच्या शेवटी सगळं काही व्यवस्थित होईल. आयुष्याची चव तर स्वादिष्ट जेवण करण्यात आहे. ही गोष्ट आज आपल्या तोंडावर येऊ शकते कारण, तुम्ही घरात आज उत्तम जेवण बनवू शकतात. कामाच्या ठिकाणी धावपळीचे वातावरण राहील.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-04.png)
कर्क राशी (Cancer Daily Rashifal) – आज शनिवारी चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या स्थानी आहे. आपल्याला #rashi bhavishya भवसागर पार करायचा तर लाटांनाही तोंड द्यावे लागते. टोकाची भूमिका टाळणे तुमच्या हिताचे ठरेल. कोणावर अवलंबून राहणे टाळा. काही वेळा शांततेसाठीही बरीच मोठी किंमत मोजावी लागते हे ध्यानात ठेवा. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासासाठी नवे वेळापत्रक तयार करावे. विद्यार्थ्यांनी काही तरी नवे शिकण्याचा प्रयत्न करावा. तुमच्यातील दानशूरता वाखण्याजोगी आहे. कोर्टखटल्यांच्या तारखा पुढे ढकलणे उचित राहील. उत्तम भविष्याची योजना बनवणे कधीचवाईट नसते. आजच्या दिवशी चांगले प्रयोग तुम्ही उज्वल भविष्याची योजना बनवण्यात करू शकतात. केलेले दान गुप्त असू द्या.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-05.png)
सिंह राशी (Leo Daily Rashifal) – आज शनिवारी चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी आहे. विचार शांत ठेवल्याने आयुष्यात अधिक सफलता येईल. स्पर्धात्मक गोष्टीची आवड असल्यास जरुर भाग घ्या. आपल्या शत्रूच्या कारवायांवर लक्ष असू द्या. स्थिर मनाने विचार करा. समोरील व्यक्ती आपल्यावर छाप पाडण्याचा प्रयत्न करील, अशा व्यक्तींचा हेतू जाणून घ्या. अध्यात्मिक बाबतीत प्रगती होईल. माणसाचे कर्म हेच सुख दु:खाचे कारण असून आपण आपले कर्म सुधारण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत. वैवाहिक आयुष्यात #rashi bhavishya वैयक्तिक स्वातंत्र्य हवं असतं, पण आजचा दिवस एकमेकांच्या जवळ राहण्याचा आहे. रोमान्सचा असीम आनंद घेण्यास तयार राहा. विवाहित आहेत तर, आज तुमच्या मुलांची काही तक्रार घरात येऊ शकते ज्यामुळे तुम्ही चिंतीत व्हाल. आरोग्य तपासण्याच्या वेळीच करणे आवश्यक आहे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-06.png)
कन्या राशी (Virgo Daily Rashifal) – आज शनिवारी चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र बाराव्या स्थानी आहे. प्रवासात उंचावरून चालताना काळजी घ्या. आत्मपरीक्षण करा म्हणजे पुढील चुका टळतील. विरोधकांना न दुखवता त्यांचे कर्तव्य त्यांना सांगावे लागेल. समाजकार्यात सरशी होईल. जिद्द ठेवा यश मिळेल. प्रलोभने व आश्वासने यापासून दूर राहा. विवाहासंबंधी निर्णय स्थगित #rashi bhavishya ठेवावा. वैवाहिक जीवनात दुराव्याचे प्रसंग येतील. स्वभावात चिडचिडेपणा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मौन पाळा, संयम ठेवा. वादविवाद करु नका. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्याल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल. जर तुमचा आवाज सुरेल आहे तर, तुम्ही कुठले गाणे गाऊन तुम्ही आपल्या प्रेमीला आज खुश करू शकतात. विश्रांती घ्या.
नोकरी की व्यवसाय | Nokari ki Vyavsay | Job or Business | Naukri or Business
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/11/Business.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-07.png)
तुळ राशी (Libra Daily Rashifal) – आज शनिवारी चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र लाभ स्थानी आहे. मत्सर, मोह, मद, क्रोध या भावनांना नेहमी नियंत्रणात ठेवावे, कधीही व्यक्त करू नये. मोठेपणाच्या खोटया कल्पनेपायी खर्च वाढवत बसू नका. कोणाला जामीन राहू नका. मौनव्रत पाळा. आश्वासनात खैरात करु नका. जे खात्रीने जमणार असेल तेवढेच बोला, रात्रीचे जागरण करु नका. आपल्या विकासाची दीर्घकालीन योजना आखली पाहिजेत. आज तुमचा रिकामा वेळ घरातील सफाई करण्यात व्यतीत होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची काहीशी कणखर आणि धाडसी बाजू दिसेल, ज्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ व्हाल. #rashi bhavishya मित्रांसोबत गप्पा मारणे एक चांगला टाइमपास असू शकतो परंतु, सतत फोनवर गप्पा मारणे डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. चिडचिड होऊ देऊ नका. मित्रमंडळींशी संबंध जपावे. गैरसमज टाळावे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-08.png)
वृश्चिक राशी (Scorpio Daily Rashifal) – आज शनिवारी चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र दहाव्या स्थानी आहे. गरजेपेक्षा जास्त वस्तू खरेदी करू नका. खरेदी करताना किंमत कमी करण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीच्या बाबतीत काळजी करण्यासारखे नसले तरी अगदीच बिनधास्त राहून चालणार नाही. झोपेच्या वेळा पाळा. विद्यार्थ्यांनी बाहेरील मोहजालापासून स्वत:ला अलिप्त ठेवून आपले सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित करावे. तणावातून मार्ग शोधावा लागेल. शांतपणे विचार केल्यास भविष्याचे उत्तम नियोजन करता येईल. कार्य क्षेत्रात कुठले काम #rashi bhavishya आटल्यामुळे आज तुमची संद्याकाळची महत्वाची वेळ खराब होऊ शकते. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल. एकटेपण्याला आपल्यावर वरचढ होऊ देऊ नका. यापेक्षा उत्तम असेल की, तुम्ही कुठे फिरायला निघून जाऊ शकतात. क्षेत्र कोणतेही असो, तुमची घोडदौड वेगवान ठरणार आहे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-09.png)
धनु राशी (Sagittarius Daily Rashifal) – आज शनिवारी चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र भाग्य स्थानी आहे. महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी पुरेशी काळजी घेणे आवश्यक ठरेल. बोलण्यातून अनेक कामे सिद्धीस जाणार असल्यामुळे त्यावर लक्ष ठेवा. मित्रांबरोबरचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे. दातृत्वाचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्यावी. एखादा संकल्प #rashi bhavishya सोडला की त्याचे अवलंबन होत आहे की नाही हे बघणंही तितकंच महत्त्वाच आहे त्यासाठी तुमच्या रोजच्या प्रगतीची नोंद ठेवली पाहिजे. आपल्या कुठल्या मित्रांसोबत आज वेळ घालवू शकतात परंतु, या वेळी तुम्ही मद्यपान करू नका अथवा वेळ व्यर्थ होईल. आर्थिक व्यवहार समर्थपणे हाताळा.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-10.png)
मकर राशी (Capricorn Daily Rashifal) – आज शनिवारी चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र आठव्या स्थानी आहे. कोणतीही गोष्ट फार न ताणता त्यातून सामंजस्याने कसा मार्ग काढता येईल हयाचा विचार करा. माणसाचे कर्म हेच सुखदु:खाचे कारण असून आपण आपले कर्म सुधारण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत. आपल्या कामातून ओळख निर्माण करा. शत्रूचा सहज पराभव कराल. आागामी निवडणुकीच्या तयारीला आतापासून लागा. राजकीय क्षेत्रात #rashi bhavishya कोणावरही विसंबून राहू नका. आज तुमच्या व्यर्थ खर्चावर तुमचा साथी तुम्हाला लेक्चर देऊ शकतो. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. विद्यार्थी वर्गाला अभ्यास करण्यासाठी उत्तम वातावरण राहील. त्याचबरोबर व्यायामासाठी थोडा खेळातही सहभाग घ्या.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-11.png)
कुंभ राशी (Aquarius Daily Rashifal) – आज शनिवारी चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या स्थानी आहे. मानापमानाची भावना बाजूला ठेवून काम केल्यास यश मिळेल. शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. धीराने वाटचाल केलीत तर तुमच्या यशाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत राहील. आवश्यकतेपेक्षा जास्त बोलू नका. #rashi bhavishya नम्रतेचे धोरण स्वीकारावे. आपला राजकीय क्षेत्रात दरारा निर्माण होईल. हिशेब आणि हिशेबीपणा ठेवला तर आपण खूप काही करू शकाल. विद्यार्थ्यांनी आपली महत्त्वाकांक्षा योग्य ठिकाणी वापरली पाहिजे त्यासाठी चांगल्या गुरुजनांचे मार्गदर्शन घ्यावे. स्वावलंबनाचे सुत्र जोपासा.
सुकन्या समृद्धी योजना | Sukanya Samriddhi Yojana | Sukanya Samriddhi Account Scheme
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/11/sukanya-samriddhi-yojana.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-12.png)
मीन राशी (Pisces Daily Rashifal) – आज शनिवारी चंद्र सिंह राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या स्थानी आहे. घडलेल्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्यांचा विचार नको. तुम्हाला तणावातून मार्ग शोधावा लागेल. विरोधकांच्या आरोपाकडे व टीकेकडे लक्ष देण्यात वेळ न घालवता कामावर लक्ष केंद्रित करा. हितचिंतकांच्या सल्ल्यांनी चांगले निर्णय घ्या. मित्रमैत्रिणींचा सहवास तुम्हाला आराम मिळवून देईल. जागेच्या व्यवहारात नुकसान होण्याची चिन्ह असल्याने ते #rashi bhavishya टाळण्याचा प्रयत्न करा. परदेश गमनाची संधी मिळेल. जीवनात सांभाळून वागावे म्हणजे नंतर पश्चात्ताप करायला लागणार नाही.
Sanskar | संस्कार म्हणजे काय ? मुलांच्या अवस्था ? | Mulavar Sanskar kase karave |
Cyber Crime | सायबर क्राइम म्हणजे काय? | What is cyber crime?
शेती करा आणि श्रीमंत व्हा ! Sheti kara ani shrimant vha! | Farming | Agriculture
कुटुंब, समाज, निसर्ग आणि अर्थव्यवस्था | Family, Society, Nature And Economy
Marathi Motivational Quotes | प्रेरणादायी सुविचार मराठी | Success Quotes In Marathi
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/motivational_3.jpg)